मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा किस्सा माघे टाकला की नाही आठवत नाही तरी परत येकदा टाकतो...
माझा मित्र बर्याच वर्षानी घरी आला होता.... पोराला त्यानी नाव विचारल.... पठ्ठ्या अगदी action करुन(टाळी वाजऊन) म्हणाला " छोटी मगर " ..... सगळे येकदम गप्प झाले.... तेव्हड्यात मी घरी आलो, मित्रानी शांत बसाव तर तो म्हनाला अरे बघ मोठी मगर आली. चिरंजीव लगेच म्हनाले काका तुला काय कळतच नाय, मोठी मगर नगरला असते. माझे आई वडील नगरला असतात.

मगर नगरला असते>>:खोखो:

कालचा किस्सा : मी भावीकाला [वय १३महीने] घेउन खाली मुले खेळतात तिथे गेली एक मुलगा रस्त्यात भेटला त्याचे नाव आत्मय Uhoh [:कसे सुचले असा विचार करनारी बाहुली:], बाहेर चालवत न्हेले की भावीका भरपुर वेळ असल्यासारखी रमत गमत चालते तर खेळण्याच्या ठीकाणी जाई पर्यंत माझी अन आत्मय च्या गप्पा झाल्या ,
खेळण्याच्या ठीकाणी पोहोच्ल्या वर मी त्याला चुकुन [खरचं चुकुन ] तन्मय म्हटले तर
तो :"नाsssssय माझे नाव तन्मय नाही आत्मय आहेsssss"
मी: Uhoh "सॉरी हं"
तो: "सगळे म्हातारे विसरतात तुम्ही तर म्हातारे नाही पण तुम्ही विसरले"
मी: Sad
तो: "माझे माने अजोबा आहेत ना तसेच विसरले तुम्ही त्याना तर काही म्हणजे काहीच लक्शात रहात नाही

दोन किस्से.

एका नातेवाईकांकडे गेलो होतो. त्यांची परिस्थिती तशी साधारणच होती. एका चाळीतली एकच मोठी खोली, त्यातच एका कोपर्‍यात स्वयंपाकघर, दुसर्‍या एका कोपर्‍यात पडदा लावून केलेले बाथरूम (मोरी) असे त्यांचे घर होते.

काही वेळाने माझ्या कन्येने (वय वर्षे साडेचार) विचारले,
"तुम्ही इथेच राहता का?"

यावर त्या बाई 'हो' म्हणाल्या.

त्यावर माझ्या मुलीने आगाऊपणे विचारले,
"मग तुम्ही आंघोळ कुठे करता? आणि तुम्ही झोपता कुठे"

हे ऐकल्यावर त्या बाईंचा चेहरा पडला आणि आम्हालाही शरमल्यासारखे झाले.

यावर कडी म्हणजे काही वेळाने तिने "तुमचं घर शेणाचं आहे का?" असं विचारल्यावर मात्र आम्हाला काय करावं ते सुचेना. (तिने नुकतीच "चिमणीचं घर मेणाचं, काऊचं घर शेणाचं" ही गोष्ट ऐकली होती).

एकदा दुसर्‍या मुलीला घेऊन (वय वर्षे ३) एका दुकानात गेलो होतो. ते दुकानमालक तिरळे होते व एका डोळ्यात काहीतरी मोठा दोष दिसत होता. त्यांच्याशी बोलताना, २-३ वेळा मुलीने माझा सदरा ओढून बाबा, बाबा अशा हाका मारायला सुरूवात केली. शेवटी त्यांच्याशी बोलणे मध्येच थांबवून मी तिला 'काय पाहिजे' असे विचारले.

त्यावर तिने, "बाबा, ह्यांचे डोळे बघ" असे त्यांच्याकडे बोट दाखवून सांगितले.

ते ऐकल्यावर त्या गृहस्थांचा चेहरा पडला व माझी अवस्था अत्यंत विचित्र झाली. त्यानंतर आजतगायत तिला त्या दुकानात घेऊन गेलो नाही.

Rofl
माझ्या वहिनीच्या माहेरी घडलेला किस्सा....त्यांची बहिण बाळंतपणासाठी माहेरी आली...तर भाची (वय ३ असेल तेव्हा) पहिल्या दिवशी, ती सारखी पोटाकडे बघत होती...शेवटी जेवण झाल्यावर ती बोलली, "आत्या किती खाशिल? जा ना शी करुन ये"

मास्तुरे .. बाप रे !!! तुम्हाला तर "धरणी माय पोटात घेते तर बरे".. असेच वाटले असेल Sad

माझ्या वडीलांना संधिवाताचा त्रास सुरु झाल्याने अचानक काठी लागायला लागली. त्याआधी ते मस्त चालायचे सकाळी.

आमच्या शेजारी(पुण्यात) एक लहान मुस्लीम मुलगी जी बाबाला ओळखते कारण ती सुद्धा सकाळी तिच्या कामवालीबाईबरोबर यायची रॉउंड मारायला. ओळख झालेली होती. त्यामुळे बाबाशी गप्पा मारायची. मध्ये ५-६ महिने बाबा गेलाच नाही चालायला थंडीत त्रास खूप व्हायचा म्हणून.
एकदा पुन्हा थोडे बरे वाटले म्हणून सुरु केले बाबाने तर ही ३ वर्षाची मुलगी एकदम बोलण्यात हुशार..
आली जवळ बाबाला बघून...
क्या हुवा तेरेको? आया क्यु नही तु इतने दिन?
बाबा हसले... काही बोलणार इतक्यात हिच , अभी तु बुढा हो गया क्या.. तुझे चलने को भी नही आता...
या अल्ला... कौन करेगा तेरेसे शादी अब?.
अब तो ये स्टिक के साथ तुझे कौन पसंद करेगा? Proud

-----------------
बरे, काही वेळा असे लहान मुलांचे बोलने गमतीदार वाटते,पण इथे भंग करायचा विचार नाही तरी सिरियसली सांगावेसे वाटते, आपले मुल कुठल्या कामवाली बाई बरोबर वा सांभाळणार्‍या बाई बरोबर आहे तिची भाषा काय व कशी आहे हे ताडून पहावे.
असाच एक प्रसंग शेजारच्या काकूंच्या नातवाचा, त्यांच्या नातवाला सांभाळायला जी बाई ठेवली होती सुनेने दिवसभर, तिच्या सहवासात राहून तो एकदम रांगडी मराठी भाषा बोलायचा.
हाक मारली त्याला की, म्हातारी मेली केकाटत राहील.. येतो येतो.. असे पुटपुटायचा व बाहेर यायचा.(वय ५ वर्षे).

>>अरे आपली जी गर्ल असते ना तिचे आडनाव फडणीसच असत>><<

आजच्या मुलांना लिंगनिरपेक्षतेचे इथली चर्चेची कात्रणं दिली पाहिजेत वाचयाला, त्यातल्या त्यात उपयोग होइल चर्चेचा शेवटी.
आजकालच्या पिढीला खूपच गरज आहे बाई 'लिंगनिरपेक्ष मैत्री कशी करावी.... आमच्याकाळी चर्चा न्हवत्या हो इतक्या हुशारीच्या तरी आम्ही खूपच लिंगनिरपेक्ष लहानपणी होतो गं बाई..बाई.... Proud

वर मास्तुरेंचा किस्सा वाचून वाटले की, जर आपण कुणाच्या घरी जाणार आहोत आणि त्यांचे घर लहान असेल तर मुलांना कल्पना दिलेली बरी की, त्यांचे घर लहान आहे पण तरी ते कीती मजेत राहतात वगैरे. आमच्या एका नातेवाईकांचे गिरगावातले घर लहान होते. म्हणजे एकच रूम (आणि पोटमाळा).....त्यात ७-८ माणसे, एक कुत्रा, एक पोपट असे सर्वजण. पुन्हा गावाहून कुणि ना कुणी येतच असे. आई त्यांच्याकडे जायच्या आधीच आम्हा दोघा भावंडांना सांगायची, पहा ते कसे सर्वजण छान अ‍ॅडजस्ट करून लहान जागेतही मजेत राहतात वगैरे. आधीच कल्पना असल्याने आम्ही प्रश्न विचारत नसू.

मी_अमि, अनुमोदन.

खरे तर पालकांचा सहभाग असतो मूल कसे, कुठे काय बोलते. किंवा पालक कसे घरी वागतात व बोलतात. मुले अनुकरण करतात. ह्याचा अर्थ पालकांनीच मुलाला समज दिली पाहिजे. असो. हे कुणाला उद्देशून नाहीये.

बरे, काही वेळा असे लहान मुलांचे बोलने गमतीदार वाटते,पण इथे भंग करायचा विचार नाही तरी सिरियसली सांगावेसे वाटते, आपले मुल कुठल्या कामवाली बाई बरोबर वा सांभाळणार्‍या बाई बरोबर आहे तिची भाषा काय व कशी आहे हे ताडून पहावे.>
हो रे हो! माझी पुतणी वय वर्षे ३. आरे काय बडबडत असते ती. सतत कामवाली आणि तिची केअर टेकर बोलते तशीच रिपीट करत रहाते.

मी लहान असताना आई आणि मी एका काकू कडे गेलो होतो, तिचे काहितरी डोळ्याचे का कसले ऑपरेशन झाले म्हणुन बघायला. दुपारच्या वेळेस गेलो, जेवणं आटपली होती, पण तिच्या घरी जाऊन, गप्पा संपून आम्ही निघे निघे पर्यंत संध्याकाळ व्हायला आली. मग आई म्हणाली, चल निघुया आता.
मी: आणि पोहे????????
बिचार्‍या काकूंनी परत बळे बळेच पोहे केले....आई एकीकडे कानकोंडी होत होती , नको नको म्हणताना आणि एकीकडे माझ्याकडे डोळे मोठे करून पाहत होती! Lol

Biggrin Biggrin

सगळेच किस्से महान आहेत!
लहानांचे महान किस्से!

काल मोठी लेक शाळेत (इयत्ता पहिली) जायला तयार होत होती. मी तिची वेणी घालत होते. धाकटी लेक टीव्ही बघत होती. मो लेक मला सांगत होती, 'आई वर्गातल्या अमुक अमुक मुली माझ्याशी खेळत नाहीत/बोलत नाहीत' मी तिला सांगितलं की जाऊ दे तू पण त्याना सांगत जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी! आणि फार त्रास दिला तर वर्गशिक्षिकेला सांगत जा/ यार्ड ड्युटी टीचरल सांगत जा!
पहिल्यांदाच जरा 'जशास तसे वागयचे असते' असं तिच्याशी बोलले.

मोठी लेक शाळेत निघुन गेली! धाकटी लेक (अडीच वर्षे वय) टीव्ही बघतच होती. तिला ४-५ वेळा सांगितलं, दुध संपव, पिऊन घे पटकन. ऐकतच नव्हती! म्हणुन मी तिला जरा त्राग्यानेच म्हटलं, दुध पी नाहीतर मी नाही बोलणार तुझ्याशी! ती म्हणली, नको बोलु. मला पन नाहीये बोलायचं तुझ्याशी!

माझ्यासाठी धक्काच होता!

भलतेच भन्नाट किस्से आहेत सगळे. खरच असं वाटतं की हे सगळं आपल्याला रेकॉर्ड करुन ठेवता यायला हवं होतं.

काही दिवसांपुर्वी माझ्या मुलीच्या (वय ७ वर्ष) एका मैत्रिणीची आई अगदी अचानक चालता बोलता सिवीयर अटॅक येऊन वारली. ३५शीचीच होती. नवरा-बायको आणि मुलगी असं तिघांचच कुटूंब. त्यातही नवरा कामानिमीत्त पुण्याला असल्याने ईकडे ह्या दोघीच. मला ती गेल्याचं ऐकुनच इतका धक्का बसला आणि त्या लहान मुलीबद्दल विचार करुन सतत वाईट वाटत होतं. माझ्या लेकीला हे सांगावं की नाही ह्या विचारात होते. पण म्हटलं एकत्र खेळणार त्यात दुसर्या कोणीतरी काहीतरी सांगणार त्यापेक्शा आपणच निट सांगावं. शिवाय थोडीशी उत्सुकताही होती तिच्या प्रतिक्रिया बघण्याची. मी जरा भावनिक प्रतिक्रिया अपेक्शित होते की ती माझ्या संदर्भाने काही इमोशनल बोलेल मग मी तिला जवळ घेईन वगैरे वगैरे...थोडसं स्वत:ला सुखावणारं.

तिला मी सांगितलं की असं असं झालयं. तिने थोडा वेळ विचार केला काही मग म्हणाली,"म्हणजे आता त्यांच्या घरातली माणसं अजून कमी झालीत. ह्म्म्म्म..." एकदम नॉर्मल टोन आणि एक्स्प्रेशन्स. "नशिब तू अजून आहेस."

माझा मुलगा थोडासा लाजाळु आहे.
कोणासोबतहि पटकन मिक्स होत नाही.
पाहुणे आले की हा शांत शांत एका बाजुला असतो.
कोनी बोललं तरी पटकन बोलत नाही.
मग हळुहळु तो कम्फर्टेबल होतो.
पण तोवर जर पाहुण्यांची जायची वेळ झाली असेल तर मग हा बाय करायला आम्च्या आधी. Uhoh
त्यातुन फारशी ओळ्ख नसलेल्या पाहुण्यामध्ये निगेटिव्ह मेसेज जात असेल. Sad

हा हा हा. झकासराव माझ्या लेकीने असा प्रकार केला आहे. अगदी एका वर्षाचीही नव्हती ती तेव्हा. नवर्‍याचे काका तिच्यासाठी खूप गिफ्ट्स घेउन आले. ते घरी आले तेव्हापासून बोलली मात्र अज्जिबात नाही. रांगत जाउन त्यांच्या सगळ्या पिशव्या फक्त ताब्यात घेतल्या. आणि 'निघतो' म्हणाले तर सगळ्यात पुढे जाऊन "टाटा" आणि ते पण अगदी तोंड्भर हसून.
सख्खे काका नवर्‍याचे... त्यामुळे आम्हि सगळेच मनापासून हसू शकलो. Happy

सिन : लोयोला शाळेत चिरन्जीवांची तोन्डी प्रवेश्परिक्षा.बरोबर मी आणि नवरा.
माझा नवरा तिथेच शिकलाय आणि नेमके त्याच्यावेळचे प्रिन्सिपॉल फादर मस्किटा मुलाखत घ्यायला. मला काळजी आमच रत्न त्यांच्या नावावरुन काहितरी म्हणेल. बर सान्गायला जाव तर उलट होणार याची खात्री! सदैव टकळी चालु कॅटॅगरीतला आमचा मुलगा पुर्ण मुलाखत्भर चकार शब्द न काढता गप्प. फादरनी वेगवेगळ्या प्रकारे बोलतं करुन पाहिल आणि मग विचारल , आता तु मला प्रश्न विचार. पडत्या फळाची आज्ञा घेउन ह्यानी विचारल 'तुम्ही तुमच्या पान्ढर्या झग्याच्या आत पॅन्ट घालता का? मी आणि नवरा हतबुद्ध. फादर खो खो हसत हसत म्हणाले - ' आय नो हिज फादर वॉझन्ट लाइक धिस! '
आता घ्या!

खरे तर पालकांचा सहभाग असतो मूल कसे, कुठे काय बोलते. किंवा पालक कसे घरी वागतात व बोलतात. मुले अनुकरण करतात. >>> अगदी अगदी खरं. १००% सहमत तुझ्याशी. मी धडा शिकले आहे हा.

माझं नाक extra extra सेन्सिटीव आहे. लिफ्टमधुन माझ्याआधी कोण गेलं असेल हे मला लिफ्ट मधे रेंगाळणार्‍या वासावरुन कळतं ( स्मोकिंग करणारा मित्र, मोहरीचं तेल अंगाला लावुन आंघोळीच्या आधी झटपट मुलीला स्कुलबसला सोडायला येणारी बिहारी मैत्रिण, निवियाचं डियो लिफ्टमधे असताना अंगावर स्प्रे करणारी पारसी शेजारीण किंवा एखादी मेड, हे मी अचुक सांगु शकते.) कामवाल्या बायकांना पावसाळ्यात कपडे नीट न वाळवल्यामुळे एक विशिष्ट कुबट वास असतो. हे मी माझ्या बोक्याकडे तकारीच्या सुरात २-३ वेळा म्हणाले. 'मेरे आखोंका तारा' माझ्याच रक्तातला गुण घेवुन आल्यामुळे कुत्र्यासारखे वास टिपतो. माझ्या कमेंटचा आणि त्या विशिष्ट वासाचा संबंध त्याने मेमरीत टाकलेला कळलाच नव्हता. एके दिवशी लिफ्टमधे आमच्या नंतर एक नेबर कपल शिरले. त्या काकांच्या कपड्यांना तोच कुबट ओलसर वास होता. त्यांनी माझ्या मुलाला लाडाने कडेवर घेतलं, तर तो त्यांना म्हणे - फारुख अंकल मुझे नीचे रखो. आपके शर्टको पुअर लोगोंकी स्मेल आ रही है. एवढे भले दांडगे अंकल एका फटक्यात त्या चतकोर पोराने चीत केले आणि आम्हाला अर्धमेलं केलं ते वेगळंच. त्यानंतर मी कुठल्याही आगावु कमेंटस त्याच्या समोर करायच्या नाहीत हे शिकले. Sad

माझं नाक extra extra सेन्सिटीव आहे. >>> मने, सेम पिंच! माझं तर आहेच पण माझ्या नवर्‍याचं नाक तर extra extra extra extra सेन्सिटिव्ह आहे. पुढे जेंव्हा केंव्हा आम्हाला रत्न/रत्नी होईल, तेंव्हा त्यांचे नाक कसे असेल, असा मला नेहमी प्रश्न पडतो. Proud सेन्सिटिव्ह नाकाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त... माझ्या एक काकू नेहमी नायलॉन टाईप साडी नेसतात. सुती कधीच नाही. उन्हाळ्यातही नाही. त्यामुळे त्यांच्या अंगाला घामाचा एक विचित्र वास कायम येत असतो. मी त्यांना खुप दिवसांनी भेटायला गेले, की प्रेमाने त्या मला जेंव्हा मिठी मारतात, तेंव्हा त्यांच्या वासाने मला उलटी यायचीच तेवढी बाकी राहते. तेंव्हा विचार येतो, लोकांच्या छोट्या छोट्या बाळांशी जेंव्हा आपण असेच जवळीकीने खेळतो, तेंव्हा आपल्या अंगाच्या, तोंडाच्या वासाने त्यांचा जीव किती हैराण होत असेल... ते छोटुकले, गोड म्हणून आपण त्यांना लवकर सोडत पण नाही... Sad असो, विषयांतर होतंय... जरा गंमतीशीर किस्सा सांगते, मुड बदलेल. Happy

पुण्याला आमच्या मामा-मामींसोबत आम्ही सगळे असेच फिरायला निघालेलो असतांना आम्ही पाहिले, एका ठिकाणी एक जुगलबंदीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम कशा स्वरुपाचा असतो, याची आम्हाला बिलकूल कल्पना नव्हती. म्हणून आम्ही त्या मोकळ्या मैदानात सहजच जाऊन बसलो. मला अजून आठवतंय, आनंद शिंदे की मिलिंद शिंदे आणि सोबत कोणीतरी एक नागपूरच्या बाई होत्या. कार्यक्रम संगीतमय होता. त्याला मस्त ठेका होता, त्यामुळे मी चांगलीच रमले होते. १०-१२ वर्षे माझे वय असेल बहुतेक तेंव्हा. पण पहिल्या ५ मिनिटातच माझे आई बाबा उठून आम्हाला, 'चला जाऊया' म्हणायला लागले. मला काही कळेचना, त्यांना का तो कार्यक्रम आवडला नाही. मी वैतागून मामा मामींना म्हणाले, आई बाबांना जाऊदे ते बोअर झालेत तर. आपण थांबू इथे अजून थोडावेळ. माझ्या मामेबहिणी तर अगदीच पिटुकल्या. त्याही थांबायचा आग्रह करु लागल्या. मामा मामींना आमच्या निरागसपणाची गंमत वाटली आणि ते हसतच थांबले आमच्यासोबत. त्या जुगलबंदीचा अर्थ मला तेंव्हा समजला नव्हता. सगळे लोक फारच खो-खो हसत होते. नंतर मोठी झाल्यावर मला ती गाणी कुठेतरी पुन्हा ऐकायला मिळाली. एवढा द्वयर्थी कार्यक्रम.... बापरे. मी या कार्यक्रमाला थांबायचा आग्रह मामा मामीला केला होता, या विचारानेच मला अजूनही हसू येतं. Lol

Pages