Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40
आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चैतन्य.. साक्षी.. "बाथरुम मे
चैतन्य.. साक्षी..
"बाथरुम मे आना पडेगा...
तुझको आंघोळ करना पडेगा...!" >> :हहगलो:.. चक्कर येईल हनी सिंगला..
कसले धमाल किस्से आहेत.
कसले धमाल किस्से आहेत.
त्या बहारो फूल बरसाओ
त्या बहारो फूल बरसाओ किश्श्यामुळे अर्ध्याहून जास्त हिंदी गाणी ऐकताना आता हसू येतंय.
बाथरुम मे आना पडेगा... तुझको
बाथरुम मे आना पडेगा...
तुझको आंघोळ करना पडेगा>> मस्त
माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा
माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा किस्सा -
दिवाळीत तिची आई आणि ती बसमधून गावाला जात होत्या. तिचा एक आठ-दहा वर्षाचा भाऊही सोबत होता.
आईने महिला कंडक्टरकडे दीड तिकिट मागितले. अर्धे तिकिट भावाचे आणि १ फुल तिकिट तिचे. कंडक्टरने आईला विचारले, "हिचे तिकिट घेतले का? किती वर्षांची आहे?"
आई, "नाही, तिला अजून तिकिट लागत नाही."
कंडक्टर, "किती वर्षांची आहे?"
आई,"चार"
मुलीची मैत्रिण, "काय गं आई? मी पाच वर्षांची आहे ना? शाळेत ओरलला आम्हाला हेच शिकवलं होतं ना? आणि आपण नाही का केक कापला होता माझ्या बड्डे ला? आणि तू सांगितलेस आता तू पाच वर्षांची झालीस! (आणि कंडक्टर मावशीला) मावशी, मी पाच वर्षांची आहे. आईचे काही ऐकू नका. तिला आठवत काही नसणार."
तिच्या आईला आणखी एक हाफ तिकिट घ्यावे लागले आणि पूर्ण प्रवासभर कानकोंडे होऊन बसावे लागले.
हाफ टिकीट दिवाळीच्या
हाफ टिकीट
दिवाळीच्या सुट्टीवरुन आठवल... यंदाच्या सुट्टीत विरारला मामा कडे गेलो होतो तेव्हा चिरंजीवां सोबत इतर बच्चा कं.ला घेऊन अर्नाळा बीच वर गेलो. तेव्हा कॅमलराईडच्या वेळी उंटा वरुन चिरंजीव बोंबलत होते.. "जोरात मत पलाव... जोरात मत पलाव"
पलाव >>>
पलाव >>>
गजानन, एक व्यंग्यचित्र आठवले.
गजानन, एक व्यंग्यचित्र आठवले. लहान मुलाला वय विचारल्यावर घरात सहा, शाळेत साडेपाच आणि बसमध्ये पाचच्या आत असे काहीतरी .
हा लाजवण्याचा किस्सा नाहीये,
हा लाजवण्याचा किस्सा नाहीये, तरी इथेच टाकते
नेहमी मी आनि नवरा काम वाटूनच करतो, पण शनिवारी माझ्या नवर्याला सुट्टी नसते, पण मुलाच्या नर्सरी ला आणि माझ्या ऑफिस ला सुट्टी असते. तर शनिवारी रात्री झोपण्याआधी मी मुलाला अथर्वला (३ वर्ष) विचारलं तुला पाणी हव का प्यायला तर नको म्हणाला तो. मग झोपल्यावर १० मिनिटांनी म्हणतो मला पाणी दे. तर मी त्याच्या बाबांना सांगितलं उठून त्याला पाणी देना , तर तो म्हणाला मी नाही देणार तूच दे, मी दमलोय आता. तर मुलगा लगेच म्हणतो, "पपा, आईने सकाळपासून जेवण बनवल, भांडी घासली, कपडे धुतले, मला भरवल, गोष्टीच पुस्तक वाचून दाखवलं, तर आता आई दमली आहे, तिला झोपू दे, तूच उठून मला पाणी दे."
मुलाचा बाबा एकदम गारच. मी लगेच एक तू. क टाकला आणि म्हंटल "बघ एवढ्याशा मुलांना समजत पण मोठ्यांना नाही समजत."
मग बाबाने मुकाट्याने उठुन पाणी दिल.
मग बाबाने मुकाट्याने <<<
मग बाबाने मुकाट्याने <<< सगळीकडे असेच असते
:) माझ्या मुलीचा किस्सा
माझ्या मुलीचा किस्सा सांगते.............वय ४ ते ४.५
आमच्या बिल्डिंगमधे एक काकू राहतात. त्यांचे वय जवळपास ६०. माझी मुलगी त्यांच्याकडे खेळायला जायची.
एक दिवस त्यांनी तिला बिस्कीटचा पुडा दिला आणि सांगितल, "हे घे तुझ्यासाठी आणला आहे." तर पठ्ठी म्हणते, "माझ्यासाठी आणला ना? मग तुमच्याकडे कशाला ठेवला? मला खाली घरी आणून द्यायचा ना............"
निशू
निशू
मला खाली घरी आणून द्यायचा
मला खाली घरी आणून द्यायचा ना...लई भारी!
मी एक्दा डॉ कडे गेल्यावर
मी एक्दा डॉ कडे गेल्यावर माझ्या मुली ला [३ वर्षे ]
एका बा ई ने विचारले की तु कुठे राह ते तर ती म्हटली "जंगलात '
मी अन भुष ण शॉक राहिलो
माझ्या दिरांचा बाबु ५ वर्षाचा
माझ्या दिरांचा बाबु ५ वर्षाचा आहे...त्याला हिंदीतच बोलायला आवडतं....माझा नवरा त्याला गोष्ट सांगत होता ती तेही हिंदीतुन....गणपती चा जन्म कसा झाला...त्यात पार्वती आंघोळीला जाताना बाप्पा ची मुर्ती बनवुन जाते......मग नवरा सांगु लागला....., " फिर उधरसे शंकर भगवान आते है.. और गणपती बाप्पा उसे बोलते है , रुको...अभी तुम अंदर नही जा सकते....... "
मग माझ्या नवर्याने विचारलं त्याला , " फिर शंकर भगवान क्या जवाब देते है? "
आमचा दिव्य छोटु बोलला... ' " शंकर भगवान बोलते है, ...अच्छा तो मै बाद मे आता हु....... "
आणि ही प्रतिक्रिया इतकी क्विक होती की आम्ही खुप वेळ जोरजोरात हसत होतो......
.अच्छा तो मै बाद मे आता
.अच्छा तो मै बाद मे आता हु.....>>.:)

आज आमच्या लेकाचा open day
आज आमच्या लेकाचा open day होता,त्याचे मराठी जरा ठाकठीकच आहे, इयत्ता ५ वी
त्याच्या miss नी त्याचा history चा पेपर दाखवला, आणि
झाले असे, पेपरमधे एक प्रश्न होता की,"मोहंजोदडो/हडाप्पा संस्क्रुती वर प्रकाश टाका."
बाळराजांनी उत्तरादाखल "मोहंजोदडो व हडाप्पा" असे पानाच्या एका कोपर्यात लिहुन समोर eveready चा टॉर्च काढला होता आणि त्यातुन निघणारा प्रकाश त्या अक्षरांवर टाकला होता.
नेत्रा, म्हणजे असा का?
नेत्रा, म्हणजे असा का?
नेत्रा मस्तच! आता तु त्याला
नेत्रा मस्तच!
आता तु त्याला खरोखर म्हणु शकतेस "बघु चिरंजीवांनी पेपरात काय प्रकाश पाडला आहे?"
मजेत म्हणाले रागावु नकोस लेकाला.
काल नवर्याने सुनिधीला बाहेर
काल नवर्याने सुनिधीला बाहेर फिरायला न्यायच्या अधी "सूसू करायची आहे का" असं विचारल्यावर लेकीने समजूतदारपणे ऐकवलं. "असं नाय बोलाचं, बॅड मॅनर्स.. म्हण, "मिस, कॅन आय गो टू द रेस्टरूम प्लीज"
है शाब्बास सुनिधी!
है शाब्बास सुनिधी!
>>बाळराजांनी उत्तरादाखल "मोहंजोदडो व हडाप्पा" असे पानाच्या एका कोपर्यात लिहुन समोर eveready चा टॉर्च काढला होता आणि त्यातुन निघणारा प्रकाश त्या अक्षरांवर टाकला होता.>>
मुलं काय डोकेबाज असतात!
प्रकाश चांगला टाकलाय्...काय
प्रकाश चांगला टाकलाय्...काय काय डोक्यात चालते मुलांच्या.
एक रुपयाला तीन पेरू तर ३ रुपयाला टींब टींब ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्या भावाने टींब टींब च्या जागी "किती?" असे प्रश्नार्थक दिले होते.
भुगोलाच्या प्रेप्रात तांदळाच्या जाती विचारल्यानंतर मीही फोडणीच्या भातापासून पुलावापर्यंत भाताचे प्रकार लिहिले होते...:)
सुमेधा दोन्ही प्रसंग म्हणजे
सुमेधा दोन्ही प्रसंग म्हणजे
नेत्रा.........एक नंबर आहे
नेत्रा.........एक नंबर आहे तुमचा लेक !!!

(No subject)
सुमेधा
सुमेधा
नेत्रा....सुमेधा....
नेत्रा....सुमेधा....:हहगलो:
भुगोलाच्या प्रेप्रात
भुगोलाच्या प्रेप्रात तांदळाच्या जाती विचारल्यानंतर मीही फोडणीच्या भातापासून पुलावापर्यंत भाताचे प्रकार लिहिले होते...स्मित >>>>
सुमेधा घरी बघायला मिळत होते कां पेपर त्यावेळी ?
काल माझे रत्न Dmart मधे
काल माझे रत्न Dmart मधे तिच्या बाबाला जोरात ओरडुन " बाबा तु टकलु आहे का?"
सुमे :हहगलो:
सुमे

Pages