मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांच्या मायबोलीचं माहित नाही पण उद्या लेक तिच्या हिंदी शाळेत ह्या गाण्याचा प्रचार करणार असं दिसतय. २-३ वेळा विचारलं आत्तापर्यंत की ते गाणं काय आहे?

आमच्या कन्यकेने एकदा "लुंगी डान्स" गाण्यामधल्या या गाण्यतलं पहिलं अक्षर "ढ" करून बरीच करमणूक केली होती.

मला आधी कळालच नव्हतं. परत वाचल्यावर कळालं
आता ते गाणं ऐकलं की हे च आठवणारं! ++१
माझ्या कधी डोक्यातही हे आले नव्हते . ( मराठी मिडीयम चा परिणाम. )

थोडे विषयांतर करतो, बहारो फुल बरसाओ च्या चालीवर, रफीनेच गायलेले ऑल्दो वुई हेल फ्रॉम डिफरंट.. असे शब्द असलेले इंग्रजी गाणे रेकॉर्ड झाले होते. शब्द छान आहेत. यू ट्यूबवर आहे. मुलांना जरूर ऐकवा.

बहारों फूल बरसाओचा किस्सा अल्टिमेट धमाल आहे! Lol

आलेल्या पाहुण्यांना चपला-जोडे कपाटात ठेवायला लावणारं सव्वावर्षांचं बाळ.. Lol

ओळखीतल्या एका जोडप्याने आपल्या १ वर्षाच्या बाळाला आणि ३ वर्षाच्या मुलीला ट्रीपवर नेलं होतं. इथे अमेरिकेत बर्‍याच हॉटेलमधे सकाळचा ब्रेकफास्ट असतो आणि तिथे प्लास्टिकचे Disposable काटे/चमचे ठेवलेले असतात.
हे जोडपं दुपारच्या जेवणाला एका चांगल्या Restaurant मधे गेलं मुलांना घेऊन. जेवण झाल्यावर वेटर म्हणाला, May I take the plates and stuff.

त्यावर त्यांची मुलगी म्हणते, No.. My mom wants to keep the spoons in her purse. She always does...

(लहान्याला बेबीफुड भरवायला, ती प्लास्टिकचे Disposable चमचे हॉटेलातून घेत असे)..

Rofl
अशक्य धम्माल किस्से आहेत हे नवे सगळेच. बूब तर बेस्ट्च. असेच आमच्याकडेही एका शब्दावरुन झाले हिते, पण आत्ता आठवत नाहीये.

यावरुन आमचा एक दुसरा किस्सा आठवला. आम्ही इथे आलो तेव्हा अग्दी पहिल्या महिन्यात माझं डेबिट कार्ड वगैरे आलं नव्ह्तं तेव्हा मला बारिकसारिक गोष्टी खरेदी करायला मुलींना घेऊनच जावं लागायचं. तेव्हा मी कॅश न्यायचे, पण अगदी आवश्यक तेवढ्याच वस्तू घ्यायचे सुरुवात होती म्हणून. त्यामुळं मुली हे घे, ते घे, असं मागे लागल्या की उगाच वाद कुठे वाढवा म्हणून म्हणायचे की आय कान्ट अ‍ॅफोर्ड इट नाऊ. तर असेच एकदा टारगेट च्या त्या १ डॉलर सेक्शन मधे काहीतरी बारकी वस्तू दाखवून धाकटी मोठी ला म्हणाली, आपण हे घेऊ शकतो का ? त्यावर मोठीने ४ लोकांत मोठ्या आवाजात साम्ङितले की आपली आई ते अफोर्ड करु शकत नाही म्हणून. एका इंडीयन बाईने वळून पण पाहीले व कहां कहां से आते है लूक दिला.

हा आणखी एक किस्सा त्याच वेळचा म्हणून आठवला,
आम्ही आलो तेव्हा सुरुवातीला महीनाभर हॉटेलवर राहून घरात शिफ्ट झालो, पण शिपिंग चं सामान यायला थोडा वेळ होता, तेव्हा घर रिकामं दिसायचं, अन काहिही वस्तू त्यांना हवी असेल की म्हणायचे की जरा थोडेच दिवस मग आपलं सगळं शिप मधून येतंय. तेव्हा या वरच्या किस्स्यानंतर मोठी तिला सांगत होती की मम्मा आता पुअर झालीय, ती बंगलोर ला मला या सगळ्या वस्तू घेऊन द्यायची. धाकटी पण इंटरेस्ट नी ऐकत होती. तेव्हा मोठीने पुढे सांगितले की पण तू काळजी करु नकोस, आपले पैसे शिप मधून येताहेत, मग आपण रिच होऊ.
माझ्या मनात एकदम आलं की खोकीच्या खोकी भरुन नोटांची बंडलं आली आहेत घरी डिलिव्हरीला, आणि लोकं ते मोठे मोठे बॉक्सेस उतरवून घरी आणून ओपन करुन देताहेत, व मी त्या नोटा मोजत आहे. Lol

मवा, दुकानातले किस्से आमच्याकडे पण सेम टु सेम झाले आहेत.

आत्ताच धाकटीला घेऊन सुपरमर्केट मध्ये गेले होते. त्यापूर्वी पोस्ट ऑफिस आणि दुसर्‍या एका दुकानात गेलो होतो. तिथे तिच्या आवडीचे डोराचे एक पुस्तक पण घेतले. मी काही वस्तू बघत होते. हिचे सतत 'हे पाहिजे, ते पाहिजे, डोरा वॉटरबॉटल पाहिजे' असे रडगाणे सुरु होते. एकदम पेशन्स ठेवुन मी तिला सांगत होते की आता मी काहीच घेणार नाही. पण शेवटी माझाही पेशन्स संपला आणि मी तिला म्हणाले, 'सारखं काय रडते हे पाहिजे ते पाहिजे म्हणून?' त्यावर ती म्हणाली , 'ओके आई! ऐक!' मग पुढे एकदम मोठ्या आवाजात गायला लागली,

'when people don't like their Princes waterbottle
They need another Dora waterbottle!
Mum need to buy it for her little daughter!'

'look I didn't scream for what I want I am singing! can we buy it now?'

दरम्यान ३-४ लोक जमलेच. गालातल्या गालात हसत होते.
परत मी सगळा पेशन्स गोळा केला आणि तिला शांतपणे सांगितले की आपल्याकडे अशीच प्रिंन्सेस वॉटरबॉटल असल्याने ही घेऊन काय उपयोग? आणि ४-५ वॉटरबॉटल्स आहेत!

'look I didn't scream for what I want I am singing! can we buy it now?' Lol

माझ्या मुलाला आदित्यला office सुट्ल्यावर पाळणाघरात घ्यायला गेले,तेव्हा तो आणी त्याचा मित्र सोहम खेळत होते,नेमकी त्याची आई पण त्याचवेळी त्याला घ्यायला आलेली,मी सोहम ला म्हट्ल्,चल आमच्याकडे मी आज Pizza करणार आहे,दोघे मिळुन खा,मज्जा करा.सोहमची आई माझी मैत्रीणच आहे,ती विचारात पडली की तु करुन देशील पण याला खायची आवड नाही,तीचा गोन्धळ वाढत होता आणी दोन्ही मुले खुश होत होती,एकत्र राह्ण्याच्या विचाराने.
शेवटी ती म्हट्ली राहु दे अग्,तुला शिवाय त्याला नेण्या आणण्याचा त्रास होईल्,यावर माझा ४.५ वष्राचा मुलगा म्हट्ला राहु दे,सोहम तु येउ नकोस्,तु तुझ्या आईला तुझ्या घरी Pizza करायला सान्ग किन्वा मागव्, माझ्या घरी आई मला करुन देइल. हा.का.ना.का Proud
आम्ही दोघी एकुन सर्द झालो,त्याच पुणेरी उत्तर एकुन दोघी हसायला लागलो.
अर्थात सोहम घरि आला,Pizza पण खाल्ला थोडा,मुलानी खुप धमाल केली.मजा आली.

>>'look I didn't scream for what I want I am singing! can we buy it now?'
हे जबरी आहे...

हा किस्सा मी सांगितलाय की नाही आठवत नाही..
माझा भाचा ६-७ वर्षांचा होता.
एकदा त्याला प्रातर्विधीला जायचं होतं.
जाताना माझ्या आईने त्याला विचारलं..
'तू एकट्याने मॅनेज करू शकशील ना'?
त्यावर त्याचं उत्तर-
''हो, मी एकटाच मॅनेज करतो. तू?''
आमची हसून हसून मुरकुंडी वळायची वेळ आली....:फिदी:

>'look I didn't scream for what I want I am singing! can we buy it now?'
कसली गोड आहे.

माझी कन्या ५ वर्षाची आहे. तीला लुंगी डान्स गाण प्रचंड आवडतं. परवा हे गाणं टी. व्ही. वर चालू होतं व ती आवडीने पहात होती. लेकीला आंघोळ घालूनच मी आंघोळ करतो. तीला तसच उचलुन बाथरुमात नेलं व आंघोळ घालू लागलो. तिच्या डोक्यात तो ठेका व लुंगीडान्सचे बोल चालूच होते. आंघोळ घालताना ते बोल असे होते...

"बाथरुम मे आना पडेगा...
तुझको आंघोळ करना पडेगा...!"

Pages