मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'फटी अलका (त्याच्या आईचे नाव), निकला चिनू (त्याचे स्वतःचे नाव)'
पोटाला हात लावुन 'पिकपिक वाजते पोटात' आणि मागे हात लावुन 'पुरपुर वाजते बंबुत'>>> दोन्ही महान Proud

'फटी अलका (त्याच्या आईचे नाव), निकला चिनू (त्याचे स्वतःचे नाव)'
पोटाला हात लावुन 'पिकपिक वाजते पोटात' आणि मागे हात लावुन 'पुरपुर वाजते बंबुत'>>> अवघडयं.. Proud Lol

'फटी अलका (त्याच्या आईचे नाव), निकला चिनू (त्याचे स्वतःचे नाव)'
पोटाला हात लावुन 'पिकपिक वाजते पोटात' आणि मागे हात लावुन 'पुरपुर वाजते बंबुत'>>> Rofl

मुल कधी-कधी विश्वास बसणार नाही अस काहीस बोलुन जातात...

ओळखीतल्या एका सद्गृहस्थांना काही (अनॉइंग) सवयी आहेत. अलाण्याफलाण्या नातेवाइकांचे त्यांच्याशी असलेले नातेसंबंध सांगणं आणि सल्ले-उपदेश देत राहणं. खूप बोलतात! त्यांची ६-७ वर्षांची नातही प्रचंड बडबडी आहे. एकदा ती बोलायला लागल्यावर आजोबांनी तिला थांबवून, 'बडबड्या धांदुल' नावाच्या कासवाची गोष्ट सांगितली. कासवाला जीव वाचवायला त्याचे बगळे मित्र मदत करतात. त्यांनी चोचित धरलेल्या काडीला तोंडात पकडून कासव त्यांच्याबरोबर आकाशातून जाऊ लागतं, पण मधेच कासवाला बोलायची हुक्की येते. आणि त्यामुळे अनर्थ होतो.. वगैरे सांगून झालं. या कथाकथनात नात अगदी टक लावून आजोबांच्या तोंडाकडे बघत होती. मग नेहमीप्रमाणे आजोबांनी कथेचं तात्पर्य विचारलं, "तर आता बडबडीमुळे काय होतं ते सांग बघू." नातीकडून निरागसपणे उत्तर आलं, "तुमची कवळी तोंडातून सारखी बाहेर येते."

Biggrin Biggrin Biggrin

सगळे पोरं भारी आहेत. Lol

मागच्या आठवड्यातील किस्सा.

गावी गेलो होतो.रात्रीचं जेवण झालेलं.
मी आणि मुलगा (वय ६ वर्षे) अंगणात शतपावली करत होतो.
आमचे फादर दारात उभे राहुन तंबाखु मळत होते.
पोराने ते पाहिलं आणि पहिला प्रश्न मला.
आजोबा काय करत आहेत?
मी बोल्लो ते तम्बाखु खात आहेत.
त्यावर एक मोठी "शी!!!!!!!!!! घाणं असतं तम्बाखु" अशी आकाशवाणी.
आणि आमच्या फादर समोरच मला ":तु म्हातारा झालास की तम्बाखु खायला शिकु नकोस" अशी आज्ञापण दिली मोठ्या आवाजात. मग नंतर आजोबांना लेक्चर मारलं.

झकासराव, मस्त आहे तुमचा मुलगा, आत्तापासूनच व्यसनमुक्ती जागृती करतोय. मीपण बाबांना लहानपणापासून तंबाखू खाऊ नका सांगायचे पण ८-१० वर्षाची असेन पण तुमचा मुलगा खूपच लहान आहे तरी सांगतो. गुड.

माझी मुलगी ३ वर्षांची असतानाची गोष्ट
तिचा वाढदिवस होता त्यावेळी शेजारी राहाणार्‍या मुलांना बोलवले होते. त्यांचे वय १२-१३.
ते येताना गिफ्ट म्हणून पकिट घेऊन आले. तर माझी कन्या सगळ्यांसमोर म्हणते "हे काय आणलत? गिफ्ट आणायच असत वाढदिवसाला येताना."

सगळेच किस्से मस्त आहेत आणि सगळी मुलेही अफलातून आहेत Happy
या मुलांची विचार करण्याची आणि बोलण्याची कुवत बघून अवाक व्हायला होतं!! यांच्या वयात तर सोडाच पण आत्ताही आपण किती बावळट्ट आहोत असं वाटतं Uhoh

आत्ताही आपण किती बावळट्ट आहोत असं वाटतं <<< त्याकरता हे किस्से कशाला वाचले पाहिजेत ? लग्न केलं की सगळ्या नवर्‍यांना हे ऐकू येतंच Lol

रिया कठीण आहे ही मुल्गी.. सगळ्ञांना आणि दादा म्हणते..कहीं वो तेरे ही साथ नहीं भटकती..:अओ:
सगळे किस्से जबरी Rofl

मला दोन सुपुत्र आहेत. नऊ वर्षांचा आर्यन आणि ७ वर्षांचा आत्मज. आर्यन समजदार, हुशार आणि आत्मज प्रचंड हट्टी. दिवसभर मारामाऱ्या करून घरभर धुडगूस घालत असतात. आत्मज खूपच चिडका आहे. स्वतः मोठ्या भावाला दणादण मारतो, पण त्याने ह्याला मारलं की म्हणतो, मला अजिबात नको असा मारकुटा भाऊ. दुसरा भाऊ आणून द्या. परवा म्हणाला, पोटात बाळ कुठून येतं? याला काय उत्तर देणार?

टोच्या, आत्मज नाव खुप सुंदर आहे. आणि क्र. २ नेहमीच असे चलाख आणि डोकेबाज असतात, त्याला तुमच्या घरात अपवाद कसा असेल Happy
त्याकरता हे किस्से कशाला वाचले पाहिजेत ? लग्न केलं की सगळ्या नवर्‍यांना हे ऐकू येतंच<<< Happy बिच्चारे नवरे Happy

दिनेश, थँक्स Happy
झकास, हुशार आणि धीट आहेत चिरंजीव Happy आजोबांची प्रतिक्रिया काय झाली मग लेक्चरवर?

एकदा आमच्या घरी मी, साबा, नवरा आणि माझा ४ वर्षाचा भाचा असे मिळुन नणंदेच्या लग्नाचा अल्बम बघत होतो. तेव्हा आम्ही माझ्या भाच्याला चिडवत होतो की बघ तुझ्या आई-बाबांनी कशी मज्जा केली? तुला नाही बोलावल, तुझा फोटोच नाहिये वगैरे वगैरे.... एकदा त्याने ऐकुन घेतल.... पुन्हा एकदा असाच प्रसंग आला आणि आम्ही त्याला चिडवायला लागलो.... तेव्हा तो म्हणाला "मी आई-बाबांच्या लग्नात नव्हतो कारण मी तेव्हा बनलो नव्हतो, त्यांच लग्न झाल्यावर मी बनलो" Blush आई गं आम्हाला काय कराव तेच कळेना.

सर्वच किस्से भारी आहेत....

आमचे चिरंजिव सध्य वय वर्ष १.३, नुस्ते दादा, बाबा, आजी-आई, जो-जो [म्हण्जे आज्जो] येवढेच बोलता येते....
आमच्या घरी आम्ही आत आल्या आल्या चपला-बुट काढुन आत कपाटात ठेवतो [TV showcase cum shoe rack] हे आदिनाथ [आमचे चिरंजिव] नेहमी बघतो, आणि घरात दुसरे कोणी आले, आणि त्यांनी चपला-बुट बाहेर च ठेवले की ओS ओS ओS असा आवाज काढ्तो, आणि shoe rack कडे बोट करतो......Best is...समोरचा जो पर्यंत ते उचलत नाही, तो पर्यंत ह्याचे ओS ओS ओS चालुच Happy

एकदा एका ऑफीसच्या फ्रेंड कडे गणपतीसाठी जमलेलो. दिवस असाच पुजा आरती प्रसाद जेवणं ह्यात गेला. संध्याकाळी जरा छोटासा ग्रुप राहीला होता. ७/८ मोठी माणस आणि ४/५ (बहुतेक ७/८ वयोगटातील असवीत) लहान मुलं. गप्पा मारता मारता गाणी म्हणन सुरु झालं. हिंदी मराठी आठवतील तशी गात होतो. बच्चे कंपनीला त्यात इटरेस्ट नव्हता आणि हींदी/मराठी कळतही नव्हतं. एकाने "बहारो फुल बरसाओ" सुरु केले. त्या बरोबर छोट्यान्च्या ग्रुप मधे खसखस पीकली. काय झालं काय झालं विचारल तर कोणी सांगायला तयार नव्हतं. पण प्रत्येक "मेरा मेहबुब आया है" ला न चुकता हसत होते. खुपच विचारल्यावर एकाने आइच्या कानात सांगितले. ही सेज बुब. आईला हसाव की रडावं तेच कळल नाही.

आदिती.... आई शप्पथ तिला बिचारीला.... लाजुन चुर होणे, धरणीमाता पोटात घेईल तर बर अस सगळ एकदम वाटल असेल ना?

आदिती, तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला आणि हसावे की रडावे अशी गत झाली. Lol ऑर्कीडला अनुमोदन.. आता हे गाणं ऐकताना नेहमी हे आठवणार! Proud

अदिती, वरचा किस्सा वाचून लेकीला (८ वर्षे) सहज गाणं म्हणून दाखवलं. तिची प्रतिक्रिया काय आहे हे बघण्यासाठी. Biggrin अगदी वर लिहलय तशीच प्रतिक्रिया आली.

तर 'मेहबुब' म्हटल्याबरोबर ती म्हणाली 'काय??? दॅटस अ‍ॅन इनअ‍ॅप्रॉप्रिएट वर्ड टू से!' आणि हसायला लागली. Biggrin तेव्हढ्यात धाकटी 'काय झालं?' म्हणून विचारायला लागली. तर थोरली म्हणे, आई, डोण्ट टेल हर दॅट इनअ‍ॅप्रॉप्रिएट वर्ड! पण तरीही तिला म्हणून दाखवले. धाकटी उगाचच हसत राहिली!

हसण्याचा भर ओसरल्यावर मात्र मोठीने 'मेहबुब' चा अर्थ विचारला. मी तिला 'लवर' असा अर्थ सांगितला. ती हिंदी शिकते आहे. त्यामूळे 'आया है' हे समजले. मग परत हसत होती. अर्थातच वेगवेगळ्या भाषा/त्यातील शब्द अशी चर्चा झाली. मग इंग्रजीतले 'हग' बगैरे वगैरे झाले Biggrin

मुलांची कुठे काल्पनिक मायबोली असलीच तर त्यातल्या 'मोठे लाजवतात तेंव्हा...' या बाफावर झकासच्या ईशानचा आणि आदितीचा किस्सा नक्की असेल. Lol

टोच्या, आत्मज नाव खुप सुंदर आहे.>>धन्यवाद सई.
आणि क्र. २ नेहमीच असे चलाख आणि डोकेबाज असतात, त्याला तुमच्या घरात अपवाद कसा असेल>> अगदी खरंय... कारण मी सुध्दा क्रमांक २ चाच असल्यामुळे घरात खूप लाडका होतो, आजही आहे. Wink

Pages