मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Rofl
"अरे आपली जी गर्ल असते ना तिचे आडनाव फडणीसच असते >>> Lol
मी लवकरच लग्न करुन टाकतो. आत्ताच करु का? म्हणजे तू म्हातारी होणार नाहिस" हाहा
आई-बाबा म्हातारे होणार ही कल्पना त्याला सहन होत नाही. त्याच्यावरचा हा ऊपाय!>>>> Happy अश्विनी.,.... जेव्हा जेव्हा मी माझ्या आईला बघते तेव्हा ती आणखी म्हातारी होणार ही कल्पना मला आताही सहन होत नाही

मनीमाऊ - मला कळली..पण मला कळलीये हे त्याला कळून दिले नाही....सुदैवाने अजून काही मुक्ताफळे उधळली नाहीत त्याने...आणि आमचे आम्हीच होतो म्हणून बरयं Happy

हो ना आशु. कधी कधी मुलांसमोर 'ढ' असण्याचं नाटक केलेलं बरं असतं. Happy

अश्विनी, Lol फक्त दप्तर आणि डबा? अगं लांबलचक यादी दिसली मला तुझ्या कामांची. परत त्यांची फुरसतीच्या वेळातली भांडणं? Happy

आशु Rofl

आशु Happy मुलाचे फंडे एकदम क्लिअर आहेत.

त्याच्या लग्नाच्या वेळेस तुमची गर्ल म्हातारी होऊ नये म्हणून आत्तापासून प्रयत्नशील आहे. Happy

हा माबोचा असा एक धागा आहे, ज्याने कधीही निराश केले नाही. जेव्हापण उघडला, मस्त मूड बनवणारे चार-दोन किस्से सापडतातच !
कुठल्याही वेळी चेहर्‍यावर हुकमी हास्य फुलवणार्‍या जगभरातल्या चिल्यापिल्यांचे मनापासून आभार मानतो ! Happy

कुठल्याही वेळी चेहर्‍यावर हुकमी हास्य फुलवणार्‍या जगभरातल्या चिल्यापिल्यांचे मनापासून आभार मानतो ! >>>
Happy
अजून हसण्यासाठी पिल्लू लोकांचा हा व्हीडीओ पहा.
http://www.youtube.com/watch?v=ZWHpcKXt-qQ&feature=related

आज सकाळचा किस्सा... टिवी वर क्रोकोडाईलची जाहीरात चालु होती..
मी सहज बोलले "माझा नावडता प्राणि क्रोकोडाईल आहे"
लेकीने (वय अडिच वर्षे) लगेच उत्तर दिले "नाही मम्मा, तुझा नावडता प्राणी पप्पा आहे " Uhoh Rofl
नवरा बघतच बसला आणि माझी हसुन हसुन वाट लागली Lol ( मी कधीच नवरयाला प्राणी बोलले नाहीये गैरसमज नसावा Happy )

आमचे चिरन्जिव वय वर्ष ५ असताना. शाळेतुन घरी आल्यावर म्हणाला - आमच्या टिचर्नी सान्गीतलय बाबा आईच्या पोटात ठेवतो बाळांना. आणि आपल्या आज्जीला माहितच नैये तीला वाटतय देव ठेवतो! Rofl

म्हणजे मला एका ऐवजी २ डबे आणि दप्तर भरावी लागतील....
शीssssला, शीssssला, शीssssला, शीssssला की जवानी"
"अरे आपली जी गर्ल असते ना तिचे आडनाव फडणीसच असते..."
तुझा नावडता प्राणी पप्पा आहे "
बाबा आईच्या पोटात ठेवतो बाळांना.>>>>>> अशक्य हसतोय smiley-bounce.gif ऑफीस मधले वेड्या सारखे बघतायत

Rofl Rofl Rofl
खतरनाक आहेत किस्से.

आमचे चिरंजीव. वय ४ वर्षे.
माझा वाढदिवस होता. बायकोने सरप्राइज गिफ्ट, केक आणि ग्रीटिन्ग असा प्लॅन केला होता.
तो घरी होता म्हणुन त्यालाहि हे खरेदी करताना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी न्यावे लागलेच होते. हा मला आल्यावर सांगेल म्हणुन बाबाला हे आणलेलं सांगायच नाही असं दोघानी ठरवल.
मी ऑफिसमधुन घरी आलो. अजुन खुर्चीत बसत नाहिये तोवरच गडी स्माइल देवुन बोलला की बाबा आम्ही तुझ्यासाठी ग्रीटिन्ग आणि गिफ्ट आणलेलं नाहि. . Biggrin

बाबा आईच्या पोटात ठेवतो बाळांना. आणि आपल्या आज्जीला माहितच नैये तीला वाटतय देव ठेवतो! >> अशक्य हसलो !!!

कालचा किस्सा :

माझी एमबीए ची परिक्षा चालु आहे.........
माझा लेक आणि मिस्टर सोडायला येतात आणि पेपर होईपर्यंत थांबतात.

काल लेकाने जातानाच बजावले........नीट पेपर दे, घाई करु नको, सिली मिस्टेक तर नकोच करुस्.....मी छान रहातो तुझा पेपर संपेपर्यन्त........... Happy

पेपर देऊन बाहेर पडले वेळे आधीच तर लेक विचारतो कसा अग ममा तु लिहिलस की नाही काही तशिच तर नाही ना आलीस्.......फेल व्ह्यायचे नाही नाहीतर तुला पन बोर्डींगला टाकायला लागेल...... पपा आता माझ्यापेक्षा वुमेन साठीची बोर्डींग शोधा तुम्ही....... Biggrin

Pages