मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

माझ्या मोठ्या लेकीला शाळेतल्या कँटिनमधुन काहीतरी खायचे होते म्हणुन तिने $२ मागितले. हो नाही करत मी आणि तिच्या मैत्रीणीच्या आईने प्रत्येकी $२ दिले.
दुपारी तिला घ्यायला गेले आणि विचारले काय खाल्ले आणि केव्हढ्याचे होते? तिने खाल्लेल्या पदार्थाची किंमत १ $ होती म्हणुन तिला विचारले उरलेला १$ कुठे ठेवला? तर म्हणाली टीचरच्या टेबलवर ठेवला होता आणि ब्रेन्डनने घेतला! मी आवाक झाले आणि म्हटले, असा कसा त्याने घेतला? आपला एक$ वाया नाही का गेला? तिने एकदम समजावुन सांगितले, आई, ब्रेन्डनने पण त्याचे काहीतरी खाल्ले मग वाया कसा काय गेला? मी खाल्ले तेच त्याने पण खाल्ले!
तिला काय समजावुन सांगावे हे मला समजले नाही!

आईग्गं वत्सला, सो इनोसंट!!! Happy

माझ्या भाचीने परवा होळीच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो असताना आपल्या आईने आपल्याला हवे त्या फ्लेवरचे आईसक्रीम द्यावे यासाठी आम्हा सर्वांसमोर ''मी ऐकलंय तू बाबाला आत बेडरूममध्ये काय सांगत होतीस ते सगळं.... तू हळूचकिनी त्याला खालून आईसक्रीम आणायला सांगितलेस ना... आणि ते देखील टू टू (दोन दोन) फ्लेवरचे.... मी ऐकलंऽ तुम्ही बोलत असताना....'' असे म्हणून लगेच पिस्ता आईसक्रीमनंतर मँगो आईसक्रीमची फर्माईश केली. आईबाबानेही लेक आता आणखी काही बोलणार त्याच्या आत तिच्यासमोर मँगो आईसक्रीम हजर केले! Lol

परवा पतीराज घरी होते. त्यामुळे लेकाला शाळेतून आणण्यास त्याने जावे असा मी आग्रह धरला. दारात कधी नव्हे ते बाबा दिसताच पिल्लू अत्यानंदाने उड्या मारत बाहेर आलं ते जोरजोरात ओरडतच "वैभव आला , वैभव आला!" टीचरने दटावलं की "असं बाबांना नावाने हाक नाही मारायचं. बाबा म्हण!" तर त्याने एकदा टीचर कडे पाहिलं आणि मग बाबाकडे नजर टाकून ओरडायला लागला "वैभवबाबा आला , वैभवबाबा आला!" (घरातही मला शुभाआई आणि बाबाला वैभवबाबा अशीच हाक मारतो!)

निंबे ____________/\____________

आज्जीला मोठी आई वगैरे म्हणतो का मग लेक?
>>
परीवारात खूपच आज्ज्या असल्याने सर्व आजींना उषा आजी, विजू आजी, मीना आजी, सुखदा आजी अशी नामकरणे झालेली आहेत. Happy
तेच आजोबा लोकांच्या बाबतीत पण जसे शाम आबा, मोहन आबा, बाबू मामाआबा इ.
(माझ्या वडीलांना "विजू आजीचे आबा" असे नामकरण राजसनेच स्वतः रुढ केले आहे.)

वैभव आला , वैभव आला>>>>>>>> याच सुरात आपल्या "वैभव आयरे" ला त्याची पोरं "वैभव आयारे" "वैभव आयारे" करत असतील Wink

आमच्या घरी एक टिक्कू म्हणून चार वर्षाची मुलगी येते. ती सहा महिन्यांची असल्यापासूनच आमच्याकडे येत असल्याने एकदम बिनधास्त असते.

एकदा मी, बायको आणि माझे बाबा जेवायला बसलेलो असताना ती सोफ्यावर उभे राहून अचानक नाचू लागली.

शीया
शीया की वानी
अ‍ॅम टू चेच्ची फायू
तेरेआत ना आनी

बाबा घास हातात ठेवून थिजून बघत राहिले होते

एकेकांचे किस्से वाचून्.....धन्य!
आता आमच्या चिरंजीवांचा सांगते-
परवा एकदा सहज बोलता-बोलता मी नवर्‍याला म्हटले, "अरे मुलांची लग्न वगैरे होईपर्यंत आपण तर म्हातारे होणार - ५५-६० वयाचे." हे त्याने ऐकले आणि डोक्यात काहीतरी विचार सुरु झाले असावेत. रात्री झोपताना मला म्हणाला, " आई, मी लवकरच लग्न करुन टाकतो. आत्ताच करु का? म्हणजे तू म्हातारी होणार नाहिस" Lol
आई-बाबा म्हातारे होणार ही कल्पना त्याला सहन होत नाही. त्याच्यावरचा हा ऊपाय! म्हणजे मला एका ऐवजी २ डबे आणि दप्तर भरावी लागतील....:-)

माझ्या भाच्याचा किस्सा-
एक दिवस बाहेर खूप खेळला आणि दमला होता त्यामुळे जेवण झाल्यावर बाहेर हॉलमधल्या सोफ्यावरच झोपला.
थोड्या वेळाने आवरा-आवर करून ताईने त्याला उचलून बेडरूममधल्या बेडवर ठेवलं.
तेव्हा नेमकी त्याला जाग आली आणि तिला म्हणाला, 'थँक्स फॉर द लिफ्ट' Proud

अजून एक म्हणजे,
वहीच्या मागे हल्ली एक छापील सर्टिफिकेट येतं. तिथे खुशाल-
धिस इज टु सर्टिफाय दॅट. नेम- मिस. कांचन मॅडम स्टडींग इन स्टँडर्ड-२, डिव्हिजन- मर्क्यूरी,
हॅस सक्सेस्फुली कंप्लीटेड द असाईनमेंट इन द सब्जेक्ट 'हिस्ट्री'
आणि खाली एस.आर.के म्हणून सही केली (त्याचं नाव शार्दूल राहुल कुलकर्णी आहे :))

आमच्या कन्यकेले त्या "शीला" गाण्याचा फालुदा केला होता

एकदा तिने आईला विचारले "बाबा कुठे गेले?"
"बाबा शी ला गेलेत"
ही लगेच "बाबा गेले शीssssला, शीssssला, शीssssला, शीssssला की जवानी"

Proud

आमच्या चिरजिंवाची तयारी (वय वर्षे ४)
एकदा शाळेतून घरी येत होतो तर त्याच्या वर्गातल्या एका मुलीने बाय...केले..मी सहज विचारले..नाव काय रे तिचे...तर म्हणे सना...
"आडनाव काय?"
"आडनाव म्हणजे....??"
"अरे आडनाव म्हणजे तुझे कसे दर्शन फडणीस..तसे तिचे काय?"
"तिचे आडनाव पण फडणीसच आहे..."
"चल, तिचं आडनाव फडणीस नाही काही तरी वेगळे आहे" (मला खात्री होती कारण त्याच्या वर्गात अजून कोणी फडणीस नाहीयेत)
तर त्यांनी बॉंब टाकला...म्हणाला
"अरे आपली जी गर्ल असते ना तिचे आडनाव फडणीसच असते..."
अरे देवा, मला दोन मिनिटे काय बोलावे तेच सुचेना...मग कसेतरी
"अरे आपली गर्ल वगैरे काही नसतं, तु आमचा बॉय म्हणून फडणीस आणि ती तिच्या आई-बाबांची गर्ल आहे..ती आपली गर्ल नाही..लक्षात ठेव..."
वगैरे काहीतरी सांगून वेळ मारून नेली Happy

"अरे आपली जी गर्ल असते ना तिचे आडनाव फडणीसच असते..."
अरे देवा, मला दोन मिनिटे काय बोलावे तेच सुचेना...मग कसेतरी
"अरे आपली गर्ल वगैरे काही नसतं, तु आमचा बॉय म्हणून फडणीस आणि ती तिच्या आई-बाबांची गर्ल आहे..ती आपली गर्ल नाही..लक्षात ठेव..."
वगैरे काहीतरी सांगून वेळ मारून नेली >>>>>

Rofl

Pages