मुलं लाजवतात तेव्हा !

Submitted by .. on 22 March, 2011 - 14:40

आपली दिव्य मुलं आपल्याला चार्-चौघात कधीकधी तोंड लपवायला लावतात, अश्या काही करामती करतात की आपल्याला धरणी दुभंगून पोटात घेईल काय असे व्हावे. तर आपल्या पोरांच्या अश्या अफलातून करामती इथे लिहूया.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मुलीबरोबर field trip ला गेले होते. तिथे गाईचे दुध कसे काढतात याचे प्रात्यक्षीत दाखवत होते. कन्या ( व.व. २) म्हणते, मम्मा that cow is नन्गुपन्गु. Uhoh

माझ्या मावशी ची मुलगी लहान होती तेव्हाची गोष्ट....आम्ही एका कडे पाहुणे म्हणुन गेलो होतो...त्यांनी चहा वगैरे घेणार न?? असे विचारले..... मावशी म्हणाली, " नाही आम्हाला आता लगेच निघायचं आहे, तेव्हा चहा बिहा करत बसु नका.."
तर पुर्वा म्हणाली , " ओ मी घेणार चहा." ( तेव्हा ३- ३ १/२ वर्शाची होती ) मावशी ने पटकन तिला डोळे मोठे करुन दखवले तरी ही ऐकेना...तर मावशिने तिला छोटासा चिमटा काढला....
तर पुर्वा बोलते कशी..
" आ ....... चिमटा काय काढतेस???? मला चहा हवाय ना.. "....आणि वरुन ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांचा कप पण फोडला तिने...
ते बिचारे वर वर हसत .. " असुदे ....असुदे...लहान आहे " असं काहीसं म्हणाले....कारण दुसरा ऑप्शन होता कुठे त्यांच्याकडे?? Wink

माझा भाचा ( मस्कत मधे राहतो ) आता आहे १० वर्षाचा पण जेव्हा तो ६ वर्षाचा होता तेव्हा भारतात आलेला...
(मी मस्तिखोर मावशी म्हणुन आवडती).....
मी त्याच्या बरोबार ताईकडे २ दिवस राहीले...मग घरी जाते वेळी त्याला वाईट वाटु लागलं की मावशी चाल्ली...
त्याने मला सांगितलं सर्वांसमोर .. " की तु माझ्या बाबांशी लग्न कर... " मी गार..............
मग त्याच्या आईने विचारलं " का रे?? "
वेदांग : - " मग मावशी इथेच राहील ..मग आम्ही खेळु"
मी : - " अर्रे तुझे बाबा मला आवडत नाहीत.."
वेदांग :- " मग तु माझा काकाशी लग्न कर..मग माझा कडे तु रहु शकशील"
मी : - "पण मला काका पण नाही आवडत"
वेदांग :- " मग तु माझ्या दादा आजोबांशी लग्न कर.."
मी : - "ते म्हातारे आहेत न.?? "
वेदांग :- " मग माझाशी तरी कर....नाहीतर तु इथे कशी राहणार?? आणि मस्ती कशी करणार आपण?? "
मी : - " तु लहान आहेस...मी गणेश काकांशी ( माझा नवरा ) लग्न करणार."
वेदांग :- ( रडत ) " नको ना गं.....ते छान नाहीत....इकडे राहत नाहीत......मग मला तुझा बाबु बनव... "

आता त्याचाच लहान भाउ मला बोलतो " ही मावशी माझी गर्लफ्रेंड आहे "

माझी आई माझ्या भावाच्या वेळी प्रेग्नंट होती तेव्हा ९ वा महिना होता.....माझी मावस बहिण विचारु लागली हे काय आहे??? मम्मी ने सांगितलं '' अगं बाबु आहे पोटात माझ्या '' तर ही शाहाणी सर्वांसमोर तिला बोलते '' मग साडी वर करुन दाखव....तु बॉलच लावला आहेस ''.....

ही मावशी माझी गर्लफ्रेंड आहे
मग साडी वर करुन दाखव....तु बॉलच लावला आहेस ''..... >>>>>>>>> Rofl अशक्य असतात ही पोर Proud

हे इथे लिहायला हवं

माझ्या मैत्रिणीची मुलगी ४ वर्षाची आहे. परी नाव तिचं..... त्यांच्या घरी गणपतीचं मंदीर आहे . बरेचसे कपल्स तिथे येऊन बसतात गप्पा मारत.

आता तिथे एवढे लोक्स येतात... पण ही कोणाकडेही जाणार नाही. कपल्स आले की मस्त पैकी त्यांच्या मध्ये जाऊन बसणार. तेही गोड छोटीशी मुलगी म्हणून तिला जवळ घेऊन बसतात. तिला प्रश्न विचारतात... "तुझं नाव काय? कुठे रहातेस??? चॉकलेट देऊ का वगैरे"... पोरगी तोंडातुन चकार शब्द काढत नाही..... त्या दोघांनी एकमेकांशी बोलायला सुरुवात केली की ही शांतपणे विचारणार.... "हा तुझा दादा आहे का????" Uhoh
त्यावर मुलगी हसुन नाही म्हणाली की म्हणणार," मग तू त्याच्या सोबत फिरायला कशी आलीस???, आईला सांगुन आलीस का???? "
मुलगी हो म्हणली की म्हणणार मग तुझी आई का नाही आली तुझ्यासोबत?? जा आता आणि आईला घेऊन ये.... आणि आताच्या आता आईला घेऊन ये म्हणून भोकाड पसरणार Uhoh
मुलगी नाही म्हणली की म्हणणार मग तुला तुझी आई मारत नाही का???? तुमच्यात लव्ह चालू आहे का??? Proud

आता या सगळ्या वेळेत मुलीनी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला तर जाणार नाही... आणी मुलाने जवळ घेतलं की लगेच दादा दादा करत त्याला चिकटणार.. आणि वरती मुलीला "दिदी तुला टुकटुक" अस पण म्हणणार...

खुप वेळ ती कटली नाही की मग त्यांचे प्रश्न सुरु होतात "आई कुठे आहे तुझी??? : तर म्हणणार ती घरात झोपलीये".... वेळ कधीही कितीचीही असो तिचं हे उत्तर ठरलेलं ...... परत वरती माझ्या आईच्या पोटात बाळ आहे ना... म्हणून ती झोपलीये अस सांगणार.... थोड्या वेळाने तिची आई तिला घ्यायला गेली की म्हणणार ही माझी आई नाहीच आहे :अओ:.... बघा तिच्या पोटात बाळ दिसतय का??" Uhoh
एक दिवशी तर एक कपल माझ्या मैत्रिणीला लहान मुलं चोरुन नेणारी समजुन पोलीसात द्यायला निघालेले... तेंव्हा शेजारचे तिथे आले आणी त्यांनी हिच त्यांची मुलगी अस सांगितल Proud

रोज हा असला प्रकार पाहुन आजकाल तिला बघुन आलेले कप्ल्स पळूनच जातात Proud

काय कारावं या मुलीचं या विचारात आम्ही सगळे आहोत...

एकदा तर हद्द केलेली... मैत्रीणीच्या मावस सासु समोर म्हणाली, " मम्मी संडेला तुझ्या पोटात बाळ होतं ना? आज कुठे गेलं??? Uhoh "

त्या मावस सासुला वाटलं की ही प्रेगनंट होती आणि नंतर अबोर्शन वगैरे केलं की काय..... त्यांना ही असच खोटं बोलते हे समजवता समजवता नाकेनऊ आलेले.... तरीही त्यांना ते पटलं असेल असं अजिबात वाटत नाही...

आणि हे फक्त एवढंच खोट बोलते....ममीच्या पोटात बाळ आहे हे एकच वाक्य खोटं आणी अनेकदा बोलते Uhoh

रिया,
कठीण आहे ही मुलगी! पण
त्यांना ही असच खोटं बोलते हे समजवता समजवता नाकेनऊ आलेले.... तरीही त्यांना ते पटलं असेल असं अजिबात वाटत नाही...>>>>>>>>>>> चार वर्षाच्या मुलांना खरं खोटं, चुक-बरोबर काहीही कळत नाही! आजुबाजुचं ऐकुन त्यांच्या मनात काहीतरी पक्कं होतं तेच धरुन बसतात. ती मुलगी बाहेर जाते तेव्हा आई काय करत असते? (चांगल्या अर्थाने घेणे). ४-५ वर्षापर्यंत मुलं फार निरागस असतात.
माझ्या धाकट्या लेकीला बाबा अतिप्रिय आहे सध्या. बाबा आला की माझ्याकडे ढुंकुनही बघत नाही. परवा अगदी गोड हसुन निरागस चेहर्‍याने मला सांगितले, I love Baba! Remember he is mine? When he is at office I love you! असं खरं खरं सांगुन टाकलं!

माझ्या साडेतीन वयाच्या भाचीचा किस्सा-

ती सारखी आजीला पाय लावत होती म्हणून तिची आई ओरडली, "मोठ्यांना पाय नसतो लावायचा."
त्यावर तिचं उत्तर, "मग ओंकार (तिचा धाकटा भाऊ) छोटाय ना माझ्यापेक्षा, त्याला लावू??"

माझ्या मुलाचा ६ वयाचा असतानाचा किस्सा,
सकाळी त्याला घेउन काही निमित्ताने बाहेर फिरायला निघालो. वाटेत एक पोटुशी कुत्री दिसली.
मुलगा: पप्पा हीला आता बेबीज होणारेत
मी: तुला काय माहित?
तो: माहीतेय मला, किती होणारेत सांगुका?
मी काही बोलण्याच्या आतच तो थोडा खाली वाकला, त्या कुत्री कडे बघुन काहीतरी काउंट केल आणि म्हणाला, हीला ८ बेबीज होणारेत Uhoh

माझी लेक अडीच वर्षांची असताना आम्ही भारतात चाललो होतो तेव्हा विमानात नुसती पळापळ सुरु होती. थोड्या वेळाने मी तिच्यामागे धाउन दमल्यावर तिला जबरदस्तीने बसायला लावलं तर समोरच्या सीटला धाडधाड लाथा मारुन पुढच्याला इतकं बेजार केलं की त्याने सीट बदलली. इतका वेळ तिचा दंगा पाहात होता त्यामुळे नशीबाने मला काही बोलला नाही.

रिया,
नाईस फिक्षन Proud नेक्स्ट टाईम कमी थापा मार.
तू लाजवलंस मला आज Wink
(प्लीजच टेक नोट. मुलं लाजवतात तेंव्हा असा धागाविषय आहे. रिया पिल्लूने मला लाजवले अशी माझी म्हात्तारी पोस्ट आहे)

काल ऑफीसमधून घरी आल्यावर मुलाने (वय वर्षे ५) अतिशय गंभीरपणे विचारले
बाबा तुला काय वाटते?
कशाबद्दल रे बाळा?
राधा कुणाशी लग्न करेल....????
माझा एकदम क्लीन बोल्ड...कोण राधा आता ही
त्यावर शी आपला बाबा कसा मागासलेला असा चेहरा करत स्पष्टीकरण आले...
अरे राधा ही बावरी मधली...तुला काय वाटते केदारशी करेल का गौतमशी का (अजून एक कुणीतरी होता बहुदा सौरभ) त्याच्याशी
मला तातडीने तो असाताना सिरीयल बंद ठेवण्याचा फतवा काढावा लागला..(अर्थात तो किती पाळला जाईल माहीती नाही)

बाप्पाला नमस्कार करताना, मध्येच थांबून, बाळकृष्णाकडे बघत, आमची कन्या म्हणे ( वय वर्ष तीन असताना) 'आई, बाप्पा जिन्मॅस्टिक करतोय' Lol

सगळ्यांचे किस्से अफलातुन आहेत.

हा माझ्या एका भावाचा..... टीव्ही वर माला डी ची जाहिरात लगलेली बघुन त्याने त्याच्या काकांना विचारलं की, ही गोळी का घेतात?? तर काका उत्तरले अरे ती डोकेदुखीची आहे.

काही दिवसांनी काकाचं डोकं दुखत होतं म्हणून ते ऑफिस ला गेले नव्हते. त्यांचे मित्र संध्याकाळी त्यांच्या घरी आले..... त्यांनी विचारलं असा आजारलेला का दिसतोस. काकांनी डोकेदुखीचं कारण सांगितलं तेव्हा हा बाबा तडक म्हणे.... 'मग बाबा सरळ माला डी घ्या की!!!'

हा खरंतर लाजवण्याचा नाही, धन्य धन्य वाटण्याचा किस्सा आहे.

ऑगस्टमध्ये कोल्हापूरला नणंदेकडे गेलो होतो आम्ही. घरच्या बहुतेकांचा श्रावणी सोमवारचा उपास म्हणुन सगळ्यांनाच नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी होती. मोठी भाची म्हणाली मी करते. अगदी मिरच्या-कोथिंबीरीपासून फोडणी, मीठ्-साखरेपर्यंत सगळं सगळं तिनंच केलं. माझ्या मुलाला (वय साडेपाच) खिचडी जीव की प्राण आणि हा बेत माहिती असल्यामुळे तो खिचडीची वाट बघत डायनिंग टेबलाशीच मुक्काम ठोकून होता. खिचडी मोठ्या प्रमाणावर म्हणुन कढईही मोठी, त्यात भाची जरा बुटकी असल्यामुळे तिला झारा नीट हलवता येईना, मला म्हणाली मामी जरा परत गं. बस्स! मी फक्त तितकंच केलं, तिनंच चव बघितली, काय कमी-जास्त ते सगळं सारखं तिनंच करून मी फक्त वाफवून कढई टेबलवर आणून ठेवली. तिनंच सगळ्यांना हाक मारली, डिशेस भरून दिल्या, पाणी ठेवलं. ८-१० जण टेबलाशी मावेनात म्हणुन मी आणि नणंद फक्त मागे उभ्या राहिलो. चिरंजीवांचं माझ्याकडे लक्ष गेल्यावर धावत बाहेरच्या खोलीतून स्टूल आणून आपल्या खुर्चीशेजारी ठेवलं आणि म्हणाला, आई, तू इथं ये आणि शांत बस बघू आता. केवढी खिचडी केलीयेस, दमली असशील तू!! Uhoh
सगळ्यांचा चमचा तोंडात जिथल्या तिथेच आणि तोंडून एकच उद्गार 'ए sss शहाण्या'! आणि हास्याचा धबधबा.. भाची म्हणाली जा मी बोलणारच नाही आता तुझ्याशी, पाठोपाठ नणंदेचा त्याच्या पाठीवर एक धपाटा आणि 'शहाण्या किती रे तुला आईचा पुळका..' Happy Lol
मला मात्र मनात जे काही वाटलं ते वाटलंच!

सगळ्यांचे किस्से मस्तच आहेत.
माझी लेक देविका ३ वर्षाची आहे. ती पण खुप वेळा मला लाज आणते. त्यातला एक किस्सा...
कुणी घरात नविन आले की हि तिला जेव्हढ काही येतय तेव्हढं सगळ त्यांना बोलुन दाखवणार आणि तेही कुणीही न सांगता. त्यात कविता, गाणी, गोष्टी सगळच आलं. तर यंदा गणपतीत माझी मानस बहीण आलेली तेव्हा हिने 'टिकटिक वाजते डोक्यात' (दुनियादारी) हे गाणं हातवारे करुन गायले म्हंजे 'डोक्यातला' डोक्याला हात, 'धडधडला' छातीला हात वैगरे. माझ्या बहिणीला खुप आवडले म्हणून ती सारखी सारखी हिला ते गाणं म्हणायला सांगत होती. ३-४ वेळा झाल्यावर देविकाने गाणं या प्रकारे गायलं......
पोटाला हात लावुन 'पिकपिक वाजते पोटात' आणि मागे हात लावुन 'पुरपुर वाजते बंबुत'
मी गार आणि सगळे जोरजोरात हसतायत Sad Sad Sad

हा किस्सा दिवाळीतला ...
देविका खिडकीत ग्रीलमध्ये बसण्याचा हट्ट करत होती. फटाके अंगावर उडतील म्हणून सासरे तिला तिथे बसवत नव्हते. कितीही समजावुन ती काही ऐकतच नव्हती. तितक्यात सासर्यांना खाली एक जाडी बाई दिसली म्हणून ते म्हणाले ' खिडकीत बसलीस ना तर तुला ती जाडी बाई ओरडेल' त्यावर माझी ही सुकन्या कशी बोलते 'कशी जाडी माझ्या मम्मासारखी का?'

साबुदाण्याच्या खिचडीवरून आठवले, लहान असताना माझे धाकटे बहिण-भाऊ आतेबरोबर गावाला कोकणात गेले होते, मी, आई आणि बाबा नव्हतो गेलो. भाऊ असेल ६-७ वर्षाचा, गावाला साबुदाणा-खिचडीचा बेत होता आणि ती खिचडी खाल्यावर माझा भाऊ सगळ्यांसमोर म्हणाला, माझ्या आईसारखी फर्स्टक्लास खिचडी कोणालाच करता येत नाही. तेव्हा गावाला बरेच नातेवाईक जमले होते. मग माझी आजी तो किस्सा आम्हाला सर्वांना सांगत होती, आजीला एकीकडे राग आपल्या खिचडीला नावे ठेवली म्हणून आणि एकीकडे नातवाचे कौतुक होते.

शेजारच्या घरात त्यांचे नातेवाईक आले होते. त्या घरातल्या काकू, त्यांच्या दोघी लग्न झालेल्या मुली आणि त्यांच्या अजून एक नातेवाईक बाई ह्या आमच्या मजल्यावरील कॉमन पॅसेजमध्ये गप्पा मारत उभ्या होत्या. विषय नुकत्याच पाहिलेल्या 'फटा पोस्टर निकला हिरो' सिनेमाचा चालला होता. जवळच खेळत असलेल्या काकूंच्या ८ वर्षांच्या नातवाला मध्येच कसलातरी झटका आला आणि त्याने जोरात 'फटी अलका (त्याच्या आईचे नाव), निकला चिनू (त्याचे स्वतःचे नाव)' असे बोलून उपस्थितांची तोंडेच बंद केली!

Pages