शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>विभक्तीचं अनेकवचन
'विभक्ती'च
जसे आरतीचे अनेकवचन 'आरती'च. - मी बर्‍याच ठिकाणी संदर्भ पाहिले पण प्रत्येक ठिकाणी आरत्या असेच अनेकवचन लिहिलेले आढळले. चुकीच्या माहितीबद्दल क्षमस्व.

पुस्तकी रुपात 'भजे खाल्ले' 'भांडे घासले' योग्य. बोली भाषेत भजं खाल्लं, भांडं घासलं. तेव्हा पुस्तकी एकवचनात शुध्द समजायला हवं असं वाटतं. बरोबर का?

>>भजे खाल्ले, भांडे घासले?

भजी खाल्ल्या, भांडी घासली

जसे आरतीचे अनेकवचन 'आरती'च. >> हे माहित नव्हतं. 'आरत्यांचे पुस्तक/ आरत्या म्हणणे' असेच कायम वापरलं होतं पुर्वी.

ए.व. : एक भजं तळलं/ एक भजे तळले
अ.व. : दहा भजी तळली.

हं, तळली/तळल्या यांत आता माझा घोळ होतोय.

दहा भजी तळली. वीस चकल्या तळल्या.

भजी खाल्ली, भांडी घासली, मुर्ती बघितल्या.

पुन्हा, आरतीचं अनेकवचन अनेकदा आरत्या असं ऐकलं आहे. पूजेला आलेले गुरुजी नेहेमी हाळी देतात, पाच आरत्या कोण म्हणणार ?

टमाटे >>> Lol इथे विषयांतर नको पण काही भाजीवाल्या/वाले टंबाटर अशी हाळी देताना ऐकले आहे.

चिनूक्स, नुसत्या तळल्या म्हणु नकोस, त्यातल्या काही खाल्ल्या असे पण म्हण Wink

मग भजी खाल्ली चं अनेकवचन भजी खाल्ली असंच होईल.

सिंडी, मी खातोय ना Proud

आमच्या विदर्भात टमाटे असंच म्हणतात Happy

चिन्मय, विदर्भात भेद्रं म्हणतात! Proud

(एक) भजं खाल्लं ह्याचं अनेकवचन भजी खाल्ली असं होइल. परंतु एकाचं होतं ते भजं आणि अनेकांच होतं ते ही भजं Happy

<मग भजी खाल्ली चं अनेकवचन भजी खाल्ली असंच होईल.
<>

भजी खाल्ली, हे अनेकवचनी रूपच आहे ना?

पुर्वीच्या काळी, काही जवाहिरी फक्त मोती विकत फिरायचे, त्या मोती विकनार्‍यांना 'मोतिये' असे म्हणायचे.
>>> केदार यासाठी काही संदर्भ? कारण सगळीकडेच माणिक्-मोत्ये किंवा मोत्ये-पोवळे असेच वाचण्यात आले आहे.

मोतिये हा शब्द हिंदीत मोगर्‍यासाठीही वापरतात....

'ना कजरे की धार..ना मोतियों के हार....' त्यातलं.

संदर्भ - खूप आहेत. एक आठवतो, बाबासाहेबांचे शिवछत्रपती (सुरतेच्या वेळेस) . नक्की ओळ, पान असे आठवत नाही, पण मी इतिहासाच्या पुस्तकात अनेकदा मोतिये वाचले आहे.

खर्‍यांच्या एका पुस्तकात, ' जेंव्हा बाबूजी नाईक पेशवा होतो' तेंव्हाच्या वेळी नानासाहेबाने, स्त्रिया व मोतियांकडून मोती विकत घेऊन (किंमत पण लिहीली आहे) ते शाहूला पाठवले व पेशवाई वापस मिळवली असा उल्लेख आहे.

मोतिया >>>> स्वामी मधे तसा संदर्भ आला आहे. राघोबा पेशव्यांकडुन खरेदी होते मात्र स्वतः माधवराव पेशवे काही घेत नाहीत असा काहीसा प्रसंग आहे. इतर कोठे असेल तर माहिती नाही.

विशाल, मोत्ये वेगळे आणि मोतिये वेगळे ना ?

>>परंतु एकाचं होतं ते भजं आणि अनेकांच होतं ते ही भजं
सिंडी Lol

>>भजी खाल्ली, हे अनेकवचनी रूपच आहे ना?
हो.. कॉपी पेस्ट करण्याच्या गडबडीतला घोळ

>>'आरत्यांचे पुस्तक/ आरत्या म्हणणे' असेच कायम वापरलं होतं पुर्वी.
बघायला लागेल. मला मूर्ती -मूर्त्या, आरती -आरत्या ही चुकीची म्हणून दिलेली उदाहरणं लक्षात आहेत. पण त्याचा नियम बघितलेला नाही. बघून परत सांगेन.
पण मूर्ती - मूर्त्या हे चूक नक्की.

पण मूर्ती - मूर्त्या हे चूक नक्की. > पण मूर्त्या बघितल्या हे बरोबर आहे असे का ? पण क्रियापद बहुवचनाप्रमआणे बदलायचे ना ?

मूर्ती बघितल्या.

मूर्त्या बघितल्या हे कसं काय बरोबर?

मला तरी मोतिये आणि मोत्ये शब्दप्रयोग वेगळे वाटंत नाहीत. दोन्हीही प्रचलित शब्द मोती साठीचे अनेकवचन असावेत.

तुकाराम गाथेतही "कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची " अशी एक अभंग ओळ आहे.

माझ्या वाचनात जे आले आहे त्यावरुन तरी मोतिया म्हणजे मोती विकणारा, मोतिये हे त्याचे अनेक वचन. मोत्ये हे मोती ह्या शब्दाचे अनेक वचन.

माझ्याकडे त्रिंबकजी डेंगळ्यांवरचे नासं इनामदारांचे 'झेप' आहे त्यात 'मोत्ये' किंवा 'मोतिये' बद्दलचा काही संदर्भ मिळतो का बघायला हवे.

मूर्ती बघितल्या.
मूर्त्या बघितल्या हे कसं काय बरोबर?>>अरे प्रश्नाचे उत्तर प्रश्नानेच काय देतोस ? तुझा सॉक्रेटिस झालाय का ? Lol काय ते उत्तर सांग कि.

मूर्ती बघितल्या.
हत्ती माजले.
मती गुंग झाल्या.

वरचं उत्तर, खालचा प्रश्न Happy
चिन्मय.. मती गुंग झाली चांगल्या वेळेस आठवलं हो! Happy

हत्ती माजले... मग हत्तीणी पण "माजल्या" का? Happy
जुन्या मायबोलीवरचा (हे असं अन त्या ओघाने तिथल पुन्हा बरच काही इथे लिहायची आजकाल फॅशन आहे म्हणून) वाद आठवला:
"ढेकर" पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी?
"ढेकरा" हे अनेकवचन बरोबर आहे का..?

जर तुम्ही पुल्लिंगी शब्दानुसार चालवत असाल तर अनेकवचन 'ते ढेकर'.
जर स्त्रीलिंगी म्हणून चालवत असाल तर 'त्या ढेकरा'.
मी तरी दोनही लिंगांनी जवळजवळ समप्रमाणात वापरताना पाहिलंय. तज्ज्ञ / अभ्यासू सांगतीलच तपशीलवार. Happy
ता.क. : जुन्या माबोवर झालंय का हे? काय निष्कर्ष होता मग?

>काय निष्कर्ष होता मग?
ते नक्की आठवत नाही... मायबोलीवरील प्रसिध्ध ढेकरसम्राट "कलंदर" सांगू शकतील. पण ते ईथून केव्हाच परागंदा झालेत.

आर्फी, 'त्या ढेकरा' की 'त्या ढेकरी' ? :p

Pages