Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कहानी मधे कसलाही घोळ नाहिये,
कहानी मधे कसलाही घोळ नाहिये, लोकांची समजण्यात गफलत होत असावी. रहस्य उलगडण्याची स्टाईल शेवटाकडून होते आणि उलगडण्याचं काम प्रेक्षकांना दिलय!
सही आहे तो, एकदा बघावाच असा!
मीरा जोरदार चालू आहे...
मीरा
जोरदार चालू आहे...
काल डान्सिंग जॅक उर्फ
काल डान्सिंग जॅक उर्फ जितेन्द्र ह्याच्या कुठल्यातरी पिक्चराचा शेवट पहायची संधी मिळाली. सर्वजण त्याला हातिम म्हणत होते. म्हणजे बहुतेक हातिमताई असावा. तर पिक्चर संपायला आलेला असल्यामुळे अमरिश पुरीची एक्झिट घ्यायची वेळ आली होती. त्याचा जीव एका पोपटात असतो. दिग्दर्शकाला खरा पोपट परवडला नाही की काय देव जाणे म्हणून यांत्रिक पोपट वापरला होता. तो पिंजर्यात असतो तेव्हा अमरिश पुरी जितेन्द्रकडून मार खात हसत असतो. रच्याकने, जितूभाईने गुलाबी रंगाचा शर्ट आणि गडद गुलाबी-जांभळ्या अश्या रंगाची पॅन्ट घातलेली असते. संगीता बिजलानी 'सिमी गरेवाल' टाईप्स पूर्ण पांढर्या वेषात. ही बहुतेक परी अस्ते कारण तिच्या पाठीला दोन मोठ्ठाले पंख असतात.
तर अमरिश पुरी त्या पोपटाला पिंजर्यातून मुक्त करतो आणि स्वतः एका उडत्या गालिच्यावर स्वार होतो. अर्थातच जितू त्या गालिच्यावर उडी मारतो. मग ते दोघे गालिच्यावर मारामारी करतात - म्हणजे एकमेकाला मिठ्या मारून गडाबडा लोळतात. ते व्हिलन आणि हिरो असल्याने आपण ही मारामारी आहे असं समजायचं. हीच गोष्ट जितू हिरॉइनबरोबर करतो तेव्हा तो रोमॅन्स असतो.असो. एव्हढं होऊन पण गालिचा ताठच्या ताठ राहून उडत असतो. बरं त्याला कुठे जायचं ते कोणीही सांगितलेलं नसतं तरी हा आप्ला उडतच असतो.
इथे बिजलानी त्या पोपटाच्या मागे लागलेली असते - आकाशातून उडत आणि उडताना आप्ले दोन्ही हात हलवत असते. बहुतेक ते पंख नुस्ते दाखवायला असतील. आता हातांनी उडायचा प्रयत्न केल्यावर काय स्पिड येणार नाही का? अर्थात पोपट जास्त फास्ट उडत असतो. तो पोपट पण मुर्ख लेकाचा. लवकर उडत जाऊन बाकी पोपटात मिसळायचं तर आपला सरळ उडत चाललेला असतो. शेवटी बिजलानी त्याला धरते. जितू तेव्हढ्यात अमरिश पुरीला गालिच्यावरून ढकलून देतो. तेव्हाही तो हसत असतो. पण बिजलानी वॉशींग पावडरच्या जाहिरातीत कपडे पिळतात तशी १-२ वेळा पोपटाची मान पिरगाळते (हा अनुभव पुढे निरमाच्या जाहिरातीत उपयोगी आला असावा) आणि पोपट, पर्यायाने पुरी मरतात.
मग जितू लॅन्ड होतो. खुप लोक जमाहोतात. बिजलानीची आणखी कोणी जुडवा बहन असते...ती पण परी असते तीही कुठूनतरी येते. एक नखशिखांत लाल कपडे घातलेला माणूस येतो. पिक्चरच्ता ह्या भागात कोणीतरी हिरवेपिवळे कपडे घातलेला माणूसही असतो पण तो अमरिश पुरी होता का आणखी कोण ते मला आठ्वत नाही.
बिजलानी एकदम 'अब्बाजान' म्हणून हाक मारते. तिचा अब्बाजान म्हणजे आलोक नाथ (ह्याला पंख नसतात. बहुतेक बायको परी असावी). लाल, गुलाबी, हिरवे, पिवळे असे सगळे रंग लोकांनी आधीच काबीज केल्याने हा निळ्या रंगाचे कपडे घालून येतो. आणि त्यने अंगात वर जे घातलेलं असतं त्याचा घोळ समोरून धोतराच्या सोग्यासारखा लो़ळत असतो. आणि मागून पोटर्या उघड्या. हा काय अजब ड्रेस आहे तोच जाणे! मला 'देढ हात लुगडी अने आधी टांग उघडी' हे कुठेतरी वाचल्याचं अचानक स्मरलं. आत आलोकनाथ शाळामास्तर, मुलीचा रंजलागांजला बाप, तत्त्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक वगैरे भूमिका करण्यात माहिर. त्याला एकदम परीकथेतल्या परीचा बाप केल्यावर त्याला तरी अॅक्टींग कशी जमावी? त्यामुळे तो ऐटीत शाही वगैरे चालायची अॅक्टिंग करतो ते साधारण जेवण जास्त झाल्यावर पोटाला लागलेली तड्स कमी करायला शतपावली घालणार्या माणसासारखा दिसतं.
इथे दिग्दर्शकाला आपली दया येते किंवा त्याच्याकडचे पैसे संपतात. कारण बिजलानी द्वयीपैकी एक आणि जितू ह्यांचे हात एकमेकांच्या हातात देण्यात येतात. कोणीतरी आणखी एक जोडी जमते. आणि पिक्चर संपतो.
त्यामुळे तो ऐटीत शाही वगैरे
त्यामुळे तो ऐटीत शाही वगैरे चालायची अॅक्टिंग करतो ते साधारण जेवण जास्त झाल्यावर पोटाला लागलेली तड्स कमी करायला शतपावली घालणार्या माणसासारखा दिसतं. >>>>>
रच्याकने, हातिमताई हा चित्रपट माझ्या निवडक दहात आहे.
शाही चालणे खतरनाक स्वप्ना
शाही चालणे खतरनाक स्वप्ना
तुझ्याकडे ग्रेट पॉवर आहे. But with great power comes great responsibility. त्यामुळे तुझ्यावर आता हा चित्रपट पूर्ण पाहून त्यावर स्वतंत्र बीबी उघडून लिहीण्याची जबाबदारी आली आहे.
स्वप्ना............. तु
स्वप्ना............. तु "तमाचा" नावाचा चित्रपट बघ...............नविन धागाच उघडावा लागेल त्यावर
छान
छान
स्वप्नाच्या सगळ्या पोस्ट
स्वप्नाच्या सगळ्या पोस्ट क-ड-क.
बाय द वे, 'कहानी'त काय झोल आहे सांगा की राव. मलाही काहीच चुकीचे वाटले नाही त्यात.
स्वप्ना, म-हा-न! फारेंडच्या
स्वप्ना, म-हा-न! फारेंडच्या पोस्टीला अनुमोदन. पूर्ण सिनेमा पहा की.
(No subject)
स्वप्ना >> बादवे, मलाही
स्वप्ना >>
बादवे, मलाही कहानीत काय घोळ आहे हे समजल नाही.
महत्वाचा
महत्वाचा प्रश्न................................
क्रिश या चित्रपटात........जर रितिक रोशन दोन वर्षे परदेशी राहुन त्याचा सुपर कंम्पुटर जर बनवत होता तर....... ९ महिन्याचा क्रिश कसा जन्माला आला ......
.
दिनेशदा | 17 April, 2012 - 16:00
तो आतंक हि आतंक, मला फुकटात बघायला मिळाला होता. एका सिडीमधे फ्री म्हणून ती सिडी होती.
अर्चना आणि तिची आई सुहास जोशी. आणि दोघींचा अस्सल को.ब्रा. लूक असताना
सिनेमात त्या मुसलमान होत्या. एवढी नृत्यनिपुण अर्चना, पण तिला चालू टाईप नाच
करायला लावला होता.
उदय, तसाच घोळ कहानी मधे पण आहे !!
.
........--------------------------------------------------............. हा घोळ होता
.
. अर्नब बागची १ महिन्यापुर्वीच भारतात आलेला असतो... सुरुवातीला पोलीसांना सांगताना बिद्या हेच सांगते .. :
.
.घोळ संपला.......... ही घोषणा करत आहे ...
.
मग हा घोळ तो एक वर्षांपूर्वी
मग हा घोळ तो एक वर्षांपूर्वी आला की एक महिन्यापूर्वी यावरून झाला होता का?
एक दोन योगायोगाने घडलेल्या गोष्टी सोडल्या, एखाद दुसरी पोलिसांना चेक करता येण्यासारखी गोष्ट सोडली (इमिग्रेशन रेकॉर्ड) तर मलाही मेजर घोळ दिसला नाही.
मोकीमी, स्वप्ना ......
मोकीमी, स्वप्ना ......
फारेण्ड, इमिग्रेशन रेकॉर्ड
फारेण्ड, इमिग्रेशन रेकॉर्ड चेक होतं की रे नंतर - सात्यकी राणा म्हणतो ना की तिकडची इकडची यादी पाहिली म्हणून
)
मला अजूनही काय घोळ आहे ते कळलेलं नाही. मी काल परत बारकाईने पहात होते पण कुठलाच मेजर तार्किक घोळ/ असंगती जाणवली नाही. एकच प्रश्न पडला की मुळातच 'त्या' बाजूची लोकं जे काही करतात ते का करतात? त्यांचे आपापसातले लागेबांधे कळले पण त्या घटनांमागची मूळ कारणं/ मोटिव कळले नाहीत
(इथे लिहिता लिहिता फारेण्डाने लिहिलेले 'मोटिव नसलेले अन्याय' आठवले
मला अजूनही काय घोळ आहे ते
मला अजूनही काय घोळ आहे ते कळलेलं नाही : +१
आता काणीचा विषय चाललाय तर मला
आता काणीचा विषय चाललाय तर मला पडलेला एक प्रश्न लिहिते. त्या शाळेतल्या, बाहेर उभ्या केलेल्या मुलाच्या शर्टावरचा लोगो आणि त्या हॉटेलातल्या मुलाच्या शर्टावरचा लोगो याचा काय संबंध होता त्या सिनेमात?
मामे, तू पर्दाफाश प्रश्न
मामे, तू पर्दाफाश प्रश्न विचारतेयस. मी तुला विपुत उत्तर देते
वोके वोके. पण एव्हाना
वोके वोके. पण एव्हाना सगळ्यांचा किमान एकदा तरी बघून झाला असेलच. मी बघितला म्हणजे सगळ्यांनी बघितला असणार.
नाही, कालच एका माबो मेम्बराचा
नाही, कालच एका माबो मेम्बराचा अजून बघून व्हायचाय हे कळलं म्हणजे आणखीही तसे कदाचित असू शकतील ना.. म्हणून विपुत उत्तर दिलंय
तो लोगो त्याला त्या वेळेस
तो लोगो त्याला त्या वेळेस दिसणे पण आधी एकदाही न दिसणे हा एक योगायोग. क्लायमॅक्स दुर्गापूजा मिरवणुकीच्या वेळेस येणे हा दुसरा.
वरदा - सॉरी मला इमिग्रेशन नाहीतर एअरलाईन रेकॉर्ड म्हणायचे होते.
फारेण्डा, मलाही तेच म्हणायचं
फारेण्डा, मलाही तेच म्हणायचं होतं (एअरलाईन रेकॉर्ड) हे तुझी पोस्ट बघून लक्षात आलं
मी पाहिला काल. मला अगदी नेमकं
मी पाहिला काल.
रिटायर झाल्यावरही प्रमोशन्स होतात हे माहिती नव्हतं. 
मला अगदी नेमकं आठवत नाहीये. पण त्या वाजपेयीची ओळख दाखवताना कॅप्टन वाजपेयी रिटायर्ड लिहिलेलं असतं ना स्क्रीनवर? (मला तो सीन ऑनलाइनही मिळत नाहीये. :()
पण सिनेमाच्या शेवटी विद्या त्याला 'कर्नल' म्हणते.
प्राची नाही गं बहुदा कर्नलच
प्राची नाही गं
बहुदा कर्नलच असत ते
कारण तो भास्करन पण त्याला कर्नलचं म्हणतो की
कहानीमध्ये काही घोळ नाहीये हो
मी अनेकदा पाहिलाय
रिटायर झाले तरी एखाद्याला
रिटायर झाले तरी एखाद्याला कर्नल म्हटले जाउ शकते.. कदाचित रिटायर्मेंट हे नाटकही असु शकेल.. आतले गुन्हेगारी सर्किट मोडण्यासाठी.
रिटायर झाले तरी एखाद्याला
रिटायर झाले तरी एखाद्याला कर्नल म्हटले जाउ शकते>>>
काय सांगता?
त्यात काय आश्चर्य? आपापसात
त्यात काय आश्चर्य? आपापसात बोलताना रिटायर्ड कर्नलला कुणी कर्नल म्हणत नाही का? संस्थानिक देखील अजुन राजे म्हणवुन घेतात. तिथे कर्नलचे काय घेउन बसलात
रिटायर्ड कर्नलला कुणी कर्नल
रिटायर्ड कर्नलला कुणी कर्नल म्हणत नाही का>>> रिटायर्ड कर्नलला म्हणतात हो. पण रिटायर्ड कॅप्टनला कर्नल कसे म्हणतील?
असो. मलाच नक्की आठवत नाहीये. आता परत बघावा लागणार सिनेमा.
येस्स... इकडे बघा. १९.४८ला
येस्स...
इकडे बघा.
१९.४८ला 'कॅप्टन प्रताप वाजपेयी रिटायर्ड ऑफिसर' असे नाव दाखवले आहे.
आणि इकडे बघा.
१७.४२ला ती 'कर्नल' म्हणते.
इतका विचार तर स्क्रिप्ट रायटर
इतका विचार तर स्क्रिप्ट रायटर ने सुध्दा केला नाही........ आपल्याला धन्यवाद सांगितला आहे त्याने....:)
..............६०० वा प्रतिसाद....:)
Pages