अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले की 'मेला' थेट्रात पाहिलेला मी एकटाच मेला.
>> मै हूं ना...

असेच जाहीर सत्कार हवे असतील तर........ आतंक ही आतंक,
>>
आतंक ही आतंक = गॉडफादर
ज्यात
डॉन व्हिटो = इशरत अली (सरकार मधे जो अभिषेकचा वफादार चश्मेवाला आहे ना... तोच हा..)
सॅंटिनो = सु प र स्टा र "रजनी"
मायकेल = आमिर

मी हा सिनेमा डीव्हिडी आणून पाहिलाय.
"संगीत" परमपूज्य सुवर्णप्रेमी भप्पीदा

टायटल्स च्या वेळी बॅकग्राऊंडला गाणं आहे-
रॅप रॅप रॅप, गुण्डा रॅप
आय अ‍ॅम मॅड, अ‍ॅन्ड आय अ‍ॅम बॅड
आय अ‍ॅम बॅड, अ‍ॅन्ड आय अ‍ॅम मॅड
रॅप रॅप रॅप, गुण्डा रॅप...

तसंच आमिर-जूही चं ही अ आणि अ गाणं आहे (आमिर ला भप्पीचा प्लेबॅक)
वी आर टुगेदर
लव इज फॉरेव्हर...

मायकेल सिसिलीला जातो त्याच्या पॅरलल सिच्युएशनला पूजा बेदी ही दर्शन देऊन जाते.

अन सर्वात अ आणि अ गोष्ट.
सु प र स्टा र "रजनी" ची पेअर - अर्चना जोगळेकरशी

शनि-रविवारी कधीतरी १० मिनिटं 'आराधना' सिनेमा पाहिला. नेमका तो शर्मीलाने मि. खन्नांच्या अंगावर पाणी टाकण्याचा प्रसंग चालु होता. तिने शर्ट वाळवण्यासाठी मागितला तेव्हा त्याने गुपचुप जॅकेट काढुन दिले, मग शर्ट काढताना त्याने शरमिंदा झाल्याचा अभिनय केला. तिने चेहरा फिरवला आणि मग त्यानेही तिच्याकडे पाठ करुन शर्ट काढुन दिला. नंतर साडीचा पदर लपेटुन घेतल्यासारखा टॉवेल घट्ट लपेटुन घेतला. मला हा शॉट अगदी लक्षात राहिला कारण पुरुषांना शर्ट बदलताना ( ते सुद्धा आत बनियन असताना) लाजायला काय झालं, हे मला कळलंच नाही. शिवाय सध्याचे उघडे हिरोज ( आठवा सलमान, अमिर, ह्रितिक Happy ) पहायची सवय, त्यामुले तो सीन या काळात अगदीच गंमतीशीर वाटला. तर पुढे.....

टागोर बाईंचे वडिल येतात, मग काही बोलणी चालणी, तिने शर्टला इस्त्री करणे, चहा देणे इ इ होते. मग तिने हातात शर्ट दिल्यावर तो सरळ टॉवेल टाकुन देतो आणि तीही चेहरा फिरवत नाही. तो तिच्यासमोरच शर्ट घालतो, आता दोघांनाही ऑकवर्ड होत नाही. दोघं आणि तिचे वडिल एकमेकांशी सहजतेने बोलत असतात. मधल्या काळात डायरेक्टर बुवा बहुतेक विसरले कि आधीच्या प्रसंगात लाजायला सांगितलं होतं. नै का?

महत्वाचा प्रश्न................................
क्रिश या चित्रपटात........जर रितिक रोशन दोन वर्षे परदेशी राहुन त्याचा सुपर कंम्पुटर जर बनवत होता तर....... ९ महिन्याचा क्रिश कसा जन्माला आला .......

तो आतंक हि आतंक, मला फुकटात बघायला मिळाला होता. एका सिडीमधे फ्री म्हणून ती सिडी होती.
अर्चना आणि तिची आई सुहास जोशी. आणि दोघींचा अस्सल को.ब्रा. लूक असताना
सिनेमात त्या मुसलमान होत्या. एवढी नृत्यनिपुण अर्चना, पण तिला चालू टाईप नाच
करायला लावला होता.

--

उदय, तसाच घोळ कहानी मधे पण आहे !!

अहो, कोणी तो गुंडा नावाचा चित्रपट बघितलाय की नाही?

त्यात rhythm ला भयंकर महत्व आहे..आणि तितकंच महत्त्व संवादांमध्ये यमक maintain करण्याला पण आहे..
सीन प्रेमाचा असो किंवा बलात्काराचा..

ज्या अल्पवयीन (एक वीत लाल चड्डी, मासे पकडण्याच्या जाळीसारखं एक जाकेट, अन् त्या आत एक वीत अंगरखा असं घालून उघड्या माळरानातून भर दुपारी कॉलेज ला जाणारी) मुलीवर बलात्कार होऊन खून झालं तिच्या भावाचे देखील संवाद अतर्क्य अन् यमीक आहेत!

मोहन जोशी, शक्ती कपूर आणि मिथुन दा आणि अशी अनेSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSक लोकं आहेत!

बघितला नसेल, तर कृपया बघा.

विशेषत: स्वप्ना!

गुंडा आणि लोहा हे ऑल टाइम क्लासिक आहेत. (अचाट आणि अतर्क्यसाठी हो)
मला त्या चित्रपटांची सीडी अजुनही मिळालेली नाहिये. मी शोधत होतो मॉलमध्ये.
एक लोहा मिळाला पण तो मला हवा असलेला मिथुनदाचा नव्हता. वेगळा होता.

महेश भट्ट ने मधे कारखानाच काढला होता. मी (केनयात, रविवारी दुपारी करण्यासारखे काहीच नसल्याने) ते चित्रपट थिएटरला जाऊन बघायचो.
त्यात एक होता चिता नावाचा (सरण नव्हे, चित्ता = प्राणी ) मिथुन आणि अश्विनी भावे
होते. अश्विनीचा एक सेड्यूस करणारा नाच होता (हो, अगदी राखी सावंत टाईप )
आणि एक जयश्री टी बरोबर नाच होता. कुक्कुड कू असे काहीसे शब्द होते आणि तो
माधुरीच्या चोली के पीछेची कॉपी होता.

त्याच्याच एका चित्रपटात, सुजाता मेहताचा पण कॅब्रे (हो रा.सा. टाईप) बघितलाय.
बाकी सिनेमे म्हणजे आनंदच असायचा.
वर्षा उसगांवकर आणि मोहसिन (तोच तो, रिना रॉयचा नवरा) यांचा साथी नावाचा पण चित्रपट होता. साथी कोई भूला, याद आया हे पौडवालबाईंचे जरा बरे गाणे, त्यात होते.

दक्षिणा ,
काय काय घोळ आहेत ते सांग ना . वर आणखी कुणी तरी म्हटलय .पण मला तर काहीच आठवत नाही . Sad
तसही आता पिक्चर बर्यापैकी जुना झालाय , त्यामुळे सस्पेन्स फुटला तरी प्रोब्लेम नसावा

गुंडा हे भारतीय चित्रपट्सॄष्टीला अपचन झाल्यावर पडलेले स्वप्न आहे. त्या सम तोच!

काय भन्नाट आहे हा धागा Lol
एकापेक्षा एक पोस्टी

स्वप्ने, तुझ्यामुळे, सगळेचजणं आता चित्रपट "वेगळ्या" नजरेने बघायला लागलेत बहुधा!
मनीची, मोकिमी ची प्रगती दिस्त्येय Biggrin

बध्ध्कोष्ट्या भारत भुषण >> कित्ती हसलेय, बापरे!!! Rofl

गुंडा हे भारतीय चित्रपट्सॄष्टीला अपचन झाल्यावर पडलेले स्वप्न आहे. >>> Rofl इथे प्रतिभा वाहून चाल्लीये .....

काल द ग्रेट " धडकन" दाखवत होते कोणत्यातरी चॅनेल वर. बघायची हिंमत नाही झाली.

कहानी मधला घोळ समजला नाही.

अश्वीनी भावेने एक हिना सोडला तर बाकीचे अगदी फालतु सीनेमे केले हिंदी मध्ये. वर्षा उसगंवकर ची तीच कथा. एक माधुरी आणि उर्मिला सोडल्या तर मराठी नट्या काहीच छाप उठवु शकल्या नाहीत.

मी फुंक पाहिला. सॉलीड हसले. रा.गो. व. चं डोकं फिरलं आहे. मांत्रिक काय, भिंतीं वरुन चालणं काय, करणी मज्जा होती नुसती. अश्वीनी पांडे त्यात खलनायिका असते. तिला सतत डोळे फिरवुन भयानक हसायला लावलं आहे. नंतर तर भीती सोडाच पण एक अत्यंतिक विनोदी सीनेमा पाहिल्याचं पुण्य लाभतं. काहीही लॉजीक नसलेला फालतु पण अतिषय रोमांचकारी विनोद असलेला सीनेमा!!!

आर्तक्य मध्ये काय फक्त बॉलीवुड आघाडी वर आहे असे नाही, हॉलीवुड पण काही कमी नाही. परवा रात्री " बिग स्नेक" असा सीनेमा पाहिला. त्यात तो स्नेक दिवसामाजी वाढत असतो. आणि नवी नवी माणसं खात असतो. रोज कात टाकत असतो. ती कात म्हणजे चक्क प्लॅस्टीक चा मोठ्ठा रोल दाखवला आहे. ( लो बजेट सीनेमा असावा). सगळे फॉरेस्ट ऑफीसर्स त्याला पकडायला जातात आणि मरतात. एक लेडी ऑफीसर आणि तिचा नव्याने झालेला बॉय फ्रेंड ( ज्याला तस्करी वरुन पकडलेलं असत) तो शेवटी त्या सापाचा गेम करतात. आणि ते ही फक्त एका चाकुने. गंमत म्हणजे तो बॉय फ्रेंड त्या सापाच्या पोटात जातो आणि आतुन त्याचं पोट फाडतो. आणि मजेत बाहेर येतो. म्हणजे हाय का नाय!!! येवढे येडे आधी त्या सापाने बुट, चपला, कपडे, पट्टे, बंदुका, पिस्तुलं ह्यांच्या सहीत गीळलेले असतात, त्यांना नाही सुचत पण आमच्या हीरोला सुचतं!!! वारे हॉलीवुड!!! खरं तर त्यांच्या कडुनच आपल्या हीरोंना आणि डायरेक्टरांना कल्पना सुचतात.

हॉरर मुव्हीत माहित असतं की घरात भुत आहे, लफड आहे, काय पण होवु शकतं, माणुस मरु शकतं. तरीही आई बापांपासुन पोरं एकटी वेगळ्या खोल्यांत झोपतात. कितीही मरायची पाळी आली तरी आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करणारच. मग आमच्या मुलाला भुताने झपाटलं तरी चालेल. बरं त्या खोल्या पण जवळ नाही, दुनियेच्या टोकाला!!!!! कशाला? झोपा की सगळ्यांनी एकत्र. काय भुत, डायनॉसॉर, वाघ, सिंह, साप यायचे आहेत त्यांचा एकत्र मुकाबला करु. पण नाही. आहे का नाही गंमत??

कितीही मरायची पाळी आली तरी आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो करणारच. मग आमच्या मुलाला भुताने झपाटलं तरी चालेल. बरं त्या खोल्या पण जवळ नाही, दुनियेच्या टोकाला>>> Lol

फुंक ३ >>> एका दमात किती फुंका मारू शकतो याचे रागोवचे लिमीट अचाट दिसते Happy

रागोवच्या कूठल्या सिनेमाबाबत आव्हान दिलं होतं. चित्रपटगृहात एकट्याने बघून दाखवा आणि ५ लाख मिळवा असं काहीतरी वाचल्याचं आठवतंय

ते बहुतेक फुंकबद्दलच होते.

ते खरेतर उलटे असायला हवे होते. चित्रपटगृहात एकतरी माणुस (डोअरकिपर सोडुन) शोधुन दाखवा आणि पाच लाख मिळवा..

एक सीनेमा बघीतला भट्ट कंपनी चा "हॉन्टेड" . सुपर कॉमेडी. ह्यात भुतं हवेत सायकल चालवतात. ह्यांच्या भुतांना एकदम इकडुन तिकडे जाता येत नाही, त्यांना हवेतुन जाताना सायकल चालवायला लागते. ह्यांच्या भुतांना हीरो ने मुक्का मारला तर लागतो. त्या सीनेमात सगळं होत. पुनर्जन्म, टाइम मशीन, भुत, चांगलं भुत, वाईट भुत, संगीतकार भुत. पण सगळी भुत ट्रॅव्हल करायला मात्र हवेतली सायकल वापरतात. शेवटी शेवटी मी आणि माझी मुलगी हसुन हसुन वेड्या झालो. भयानक सीनेमा. स्वप्ना ..... बघ ग एकदा तरी.

( स्वप्ना इथे तुला इतके नवे नवे सीनेमे सुचवले आहेत... तुझं पुढचं वर्ष आरामात जाइल. बघ बघ किती लोकांच्या अपेक्षा आहेत तुझ्या कडुन)

Proud मला आधी नागिन आणि बिन बादल बरसात पूर्ण बघायचेत. मग गुंडा आणि हॉन्टेड.....काही राहिले का?

मोहन की मीरा, तुमच्या हॉरर मुव्हीजवरच्या पोस्टीला अनुमोदन. Happy

Pages