Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्ना ....
आपण मनात म्हणतो की बाबा
आपण मनात म्हणतो की बाबा मिलनकी रात होती, ती पण १००० वर्षांनी आलेली, तर नाचत कशाला बसलास? उगा नमनाला घडाभर तेल! पण काय बोलणार? तर शेवटी नाग बहुतेक कुंवाराच मरतो.
माय गॉड........... कसे सुचते तुला हे सगळॅ???????/ अशक्य हसलेय मी वाचताना..
लोको, हे पहा इथे श्रद्धा ने
लोको, हे पहा इथे श्रद्धा ने ऑलरेडी त्याचे पोस्टमार्टेम केलेले आहे.
काल आई कडे होति तेव्हा हिंदीत
काल आई कडे होति तेव्हा हिंदीत डब मद्रासी चित्रपट भुलभुलैया चा शेवट बघत होते[एकदम डोक्यात गेला} , रजनी आणि ती नगमा ची बहिण [राजमा की काय माहीत नाही काय नाव आहे तिचे ]
तो डान्स झाल्या वर राजा रजनी त्या नर्तकाचे मुंडके उडवतो नंतर ता थै करतो तर ते धड २ मिन नाचते मग खाली पडते, मग तो लखलखलखलखलखलखलखलखलखलख असा अवज करतो तर ही बया घाबरते .........
मला तर अक्षय चा भुलभुलैया आवडला
स्वप्ने, अचाट आहेस, बयो _/\_
स्वप्ने, अचाट आहेस, बयो _/\_
ती पण १००० वर्षांनी आलेली, तर नाचत कशाला बसलास? >>
लखलख नाही ते कलकलकलकल असे
लखलख नाही ते कलकलकलकल असे आहे.
तो चंद्रमुखी षिणेमा.
स्वप्ना किती ते परीक्षण
स्वप्ना किती ते परीक्षण निरीक्षण..
ती पण १००० वर्षांनी आलेली, तर
ती पण १००० वर्षांनी आलेली, तर नाचत कशाला बसलास? >>
युरी गागारीन, नक्की पाहेनच
युरी गागारीन, नक्की पाहेनच
नंदिनी, वरदा, आगाऊ, फारएन्ड - पूर्ण चित्रपट पहायच्या तयारीनेच बसले होते पण ऐनवेळी वीज गायब झाली तिथे. परत पहायला मिळाला तर संधी सोडणार नाहिये मी
दिनेशदा, पूर्ण चित्रपट पहाता आला नाही ना त्यामुळे काही माहित नाही.
>>मला तर अक्षय चा भुलभुलैया आवडला
अगदी अगदी, १००० पट चांगला होता तो ओरिजिनल पिक्चरापेक्षा.
बाकी चन्द्रमुखी/भुलभुलैय्या, आमदनी अठन्नी खर्चा रुपैय्या, सूर्यवंशम, मालामाल विकली वगैरे चित्रपट दर विकांताला असतातच बहुतेक.
प्रिती माझा अक्षयचा भुलभुलैया
प्रिती माझा अक्षयचा भुलभुलैया राहिलाय...बरं झालं आठवण करून दिलीस...आता इस विकेंड को वापिस एक बार "विद्या" को देखना मंगता है...
कहानी ताजा आहे आणि आवडलाय....:)
मीसुध्दा भुलभुलैय्या लागला की
मीसुध्दा भुलभुलैय्या लागला की नेहमी पहाते. अक्षयकुमारने मस्त अॅक्टींग केली आहे. शेवटी मात्र विद्या बालनला मानसिक आजार दाखवावा का सरळ भुताने पछाडलेलं दाखवावं ह्या दुग्ध्यात पडल्याने कथानकाचा आणि पर्यायाने चित्रपटाचा पार विचका झालाय.
<< ती पण १००० वर्षांनी आलेली,
<< ती पण १००० वर्षांनी आलेली, तर नाचत कशाला बसलास? >>
अहो, असते एकेकात पद्धत.
भुलभुलैया मधे आपली रसिका ओक
भुलभुलैया मधे आपली रसिका ओक पण मजा आणते.
मिनाक्षीला अमजदखानजादुचे
मिनाक्षीला अमजदखानजादुचे कुंकू देतो.. ती ते जंगलात कुठेतरी उधळते... ते कुंकू उडत उडत डिंपलकडे येते आणि तिला मारते>>अचाट अत्यर्क नसुन याला अदभुत म्हणावे लागेल.
स्वप्ना , अगं युट्युबवर
स्वप्ना , अगं युट्युबवर मिळेल. बाकी भन्नाट लिहिले आहे!!!!!
सुनिधी, हो युट्यूबवर पहाणारच
सुनिधी, हो युट्यूबवर पहाणारच आहे एक्दा.....:-)
काल 'बिन बादल बरसात' नावाचा
काल 'बिन बादल बरसात' नावाचा एक चित्रपट दुपारी ब्लॅक अॅन्ड व्हाईट चॅनेलवर लागला होता. सस्पेन्स मुव्ही आहे असं आई म्हणाली म्हणून थोडा वेळ पाहिला. हिरो अर्थातच आमार शोनार बिश्वोजीत. ह्या वेळी आशा पारेखला साडेसाती चालू असावी म्हणून तिला हिरवीण केलं होतं. विश्वजीत नेहमीप्रमाणेच ठाकूर घराण्याचा वारस. त्याच्या तीर्थरुपांनी त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. ती म्हणे त्याने लग्न करायचं ठरवलं की त्याने उघडून वाचायची असते.
आज्ञाधारक बाळ आशाबेनशी लग्न करायचं ठरवतो तेव्हाच ती वाचतो, त्याआधी वाचत नाही. काय ते संस्कार! मला वाटलं तीर्थरुपांनी 'शहाणा असशील तर लग्न करू नकोस' वगैरे धोक्याचा लाल बावटा दाखवला असेल. पण नाही. बीस साल बाद मध्ये असतो तसा ह्या घराण्यालाही एक शाप असतो. घराण्यातल्या कोण्या माणसाने कोणा कबिल्याच्या सरदाराच्या मुलीला फसवलेलं असतं (ठाकूर्/जमिनदार लोकांचा मुख्य व्यवसाय हाच. बाकी जमिनदारी वगैरे वेळ मिळाला तर करतात) म्हणे. ती जीव देते वाटतं. घराण्याला सरदाराकडून शाप मिळतो की कुठलीही सून लग्न झाल्यावर एक वर्षाच्या आत मरेल. विश्वजीतच्या आजीसारखीच त्याची आईही अचानक मरण पावल्यावर त्याच्या वडिलांचा म्हणे विश्वास बसतो. ते तो कबिला शोधून काढायचा खूप प्रयत्न करतात. पण तो सापडत नाहि तेव्हा ही जबाबदारी ते मुलावर टाकतात. तो पण जमिनदार म्हणजे त्याला आणखी काही काम नसणार ही बापाला खात्री! मी म्हणते असला विचित्र शाप देऊन तो वंश पुढे चालू ठेवायची संधी देण्यापेक्षा लग्न झाल्यावर बायको मरेल किंवा निदान ६-७ महिन्यांनी मरेल असा शाप द्यायचा ना? न रहेगा बास, न बजेगी बासुरी.
मग काही सिन्सनंतर (त्यांचं वर्णन करायचा मोह आवरते) बाळ तो कबिला शोधतो. तर ७० वर्शांपूर्वी तो सरदार मेलेला असतो. सध्याचा सरदार शापातून सुटका नाही असं बजावतो. आशा पारेख आणि तिचे सायंटिस्ट (!) वडिल ह्यांचा अश्या गोष्टीवर विश्वास नसतो. आशा पारेख म्हणते माझाही विश्वास नाही. आणि शाप खरा असला तरी तुझ्याशिवाय मी किती जगू शकेन माहित नाही. त्यापेक्षा तुझ्यासोबत एक वर्ष आनंदाने जगेन. मी मनात म्हटलं बाई ग, ह्याच्यासोबत एक वर्ष काधलंस तरी डोक्यावरून पाणी. मग कदाचित तूच कंटाळून जीव देशील.
तर यथावकाश साखरपुडा ठरतो. त्या वेळी सरदार कबिल्यासोबत येऊन पार्टीत शामिल व्हायची परवानगी मागतो. त्याच्या कबिल्यातली एक मुलगी डान्स करते. मग दिवे जातात आणि समस्त कबिलावाले गाय्ब होतात. विश्वजीत खोलीवर येऊन कपाटातला एक फोटो काढतो. तो त्या नाचणार्या मुलीचाच असतो. ह्या मुलीला म्हणे त्याच्या पूर्वजांनी फसवलेलं असतं. मग तो परत सरदारकडे जातो तर तो सरदार आपल्या पेटीतून विश्वजीतचा फोटो काढतो. विश्वजीत म्हणतो हा फोटो मी क्धीच काढला नाही. सरदार म्हणतो हा फोटो तुझ्या त्या पूर्वजाचा आहे. तुझा हा पुनर्जन्म आहे आणि ती मुलगी सुध्दा पुन्हा जन्माला आली आहे. तू तिच्याशी लग्न कर म्हणजे शाप संपेल.
मी विचार केला की हा पिक्चर ६३ सालचा. सत्तर चर्शांपुर्वी म्हणजे १८९० सालच्या आसपास भारतात ह्या लोकांचे फोटो काढणारा कोण फोटोग्राफर होता? बरं जमिनदार विलायतेला जाऊन फोटू काढून आले असं म्हटलं तर सरदाराच्या मुलीचा फोटो काढला कोणी?
हा चित्रपट तूनळीवर उपलब्ध आहे
हा चित्रपट तूनळीवर उपलब्ध आहे असं दिसतंय - http://www.youtube.com/watch?v=tRo3dbUqLfs
स्वप्ना, काय काय बघतेस आणि
स्वप्ना, काय काय बघतेस आणि आमच्या डोक्याला ताप देतेस गं
तो पण जमिनदार म्हणजे त्याला
तो पण जमिनदार म्हणजे त्याला आणखी काही काम नसणार ही बापाला खात्री! मी म्हणते असला विचित्र शाप देऊन तो वंश पुढे चालू ठेवायची संधी देण्यापेक्षा लग्न झाल्यावर बायको मरेल किंवा निदान ६-७ महिन्यांनी मरेल असा शाप द्यायचा ना? न रहेगा बास, न बजेगी बासुरी.
मी विचार केला की हा पिक्चर ६३ सालचा. सत्तर चर्शांपुर्वी म्हणजे १८९० सालच्या आसपास भारतात ह्या लोकांचे फोटो काढणारा कोण फोटोग्राफर होता? बरं जमिनदार विलायतेला जाऊन फोटू काढून आले असं म्हटलं तर सरदाराच्या मुलीचा फोटो काढला कोणी?
>>>> आता असा बेसिकमध्येच राडा शोधायला लागल्यावर त्या सिनेमावाल्यांनी काय करायचं गं स्वप्ना? आँ???????
स्वप्ना पण मग शेवटी विश्वजीत
स्वप्ना
पण मग शेवटी विश्वजीत कोणाशी लग्न करतो तो सस्पेन्स काय आहे? बिन बादल बरसात तसा बिन कॅमेरा फोटो असणार तो. आणि फसवलेल्या स्त्रीसारखीच दिसणारी मुलगी म्हणजे तिचीच कोणीतरी असे धरले तर या विश्वजीत ची ती नातेवाईक निघायला हवी ना?
तेव्हाचे फिल्मी शापसुद्धा स्त्रियांच्या किती विरोधी होते बघा. म्हणजे फसवणार तो कोणी जमीनदार आणि मरणार भलतीच कोणीतरी
स्वप्ना, स्टोरी मस्तच आहे पण
स्वप्ना, स्टोरी मस्तच आहे पण त्याचा टायटलशी (बिन-बादल आणि बरसात) या तिघांशी नक्की काय संबंध??? तेही जरा विस्तृतपणे सांग.
स्वप्ना बिन बादल बरसात...
स्वप्ना
बिन बादल बरसात... भारीच
पण आपा तशीही मेलीच नसती. कारण सून म्हणजे मुलाची बायको. यात तर विश्वजीतशी ती लग्न करतेय म्हटल्यावर दोन दोन हिरविणी...
स्वप्ना, जाहिरातच केली की,
स्वप्ना, जाहिरातच केली की, आता हे सगळे तो सस्पेन्स शोधण्यासाठी तरी नक्कीच
तो सिनेमा बघणार..
मंडळी दिनेशदा, मलाही तो
मंडळी
दिनेशदा, मलाही तो पिक्चर पूर्ण पहायचा होता हो. पण मेल्या केबलवाल्याने दुपारी लावला. यूट्युबवर बघायचा नाहिये. बघू पुन्हा कधी योग येतो ते.
आणखी एक मजा म्हणजे त्यांच्या साखरपुड्याच्या वेळी बॅन्डवर 'सपने सुहाने लडकपनके' ह्या बीस साल बाद मधल्या गाण्याची धून वाजत असते. विशीबाबा रॉक्स!
स्वप्ना बिन बादल
स्वप्ना

बिन बादल बरसात>>>>>>>>>>
विशीबाबा रॉक्स!>>>>
स्वप्ना एक शेपरेट परीक्षण
स्वप्ना एक शेपरेट परीक्षण येउदे बिबाब वर
स्वप्ना भारीच्च लिहीलंय..
स्वप्ना भारीच्च लिहीलंय..
बिन कॅमेरा फोटू!!!!!>>> लईच
बिन कॅमेरा फोटू!!!!!>>> लईच भारी.
विशीबाबाला असले भूतबायकांचे शिनेमेच का मिळायचे? बिसाबा, येराफिनआ इ.इ.
स्वप्ना
स्वप्ना
Pages