Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिल अपना प्रित पराई -
दिल अपना प्रित पराई - मीनाकुमारी आणि २ ठोकळे - राजकुमार आणि नादिरा. ह्यातही शेवटी मॅरेथॉन आहेच. इतकी वर्ष हिंदी पिक्चरमधे ही मॅरेथॉन असूनही 'धावणे' हा क्रीडाप्रकार देशात फार प्रसिध्द का नाही बुवा
प्रतिक अरे तुच ना तो
प्रतिक
अरे तुच ना तो राजकुमारला वाईट म्हटल्यावर दुखावला गेलेला (पहा: ...तर तो/ती कुठल गाण म्हणेल भाग एक)
दूरदर्शनच्या सुरुवातीच्या वर्षात १९८० ते १९८४ चुक दुरदर्शन ७२ साली आल जेव्हा माझ आगमन नव्हत झालेल त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही.
८०-८४ चा काळ दुरदर्शन ब-यापैकी स्थिरावलेल त्याच दुसर भावंड ८२ मधे आलेल. याच काळात दुरदर्शनने समांतर चित्रपट नावाचा छळ मांडलेला. . मंथन त्रिकाल अंकुर असल्या नावाचे चित्रपट प्रदर्शित झालेले हे कळण्याचा तो काळ होता. मनावर दुस-या दिवशीच्या शाळेच सावट समोर हा असला वैचारीक अत्याचार रवीवार गढूळ करून टाकायचा.
मी हा पिक्चर पाहिला तेव्हा
मी हा पिक्चर पाहिला तेव्हा मला असं वाटलं की शेवटी राजेन्द्रकुमार मेलेला दाखवला नसता तर बरं झालं असतं. पिक्चर उगाच ओव्हर ड्रॅमेटिक झाला नसता, अशक्य वाटला नसता, मूळ संदेशाला धक्का लागला नसता आणि बदलत्या काळानुरुप (आणि बदलत्या मूल्यांतही!) 'कैच्या कै" वाटला नसता. अरेरे>>>>>>>>> अगदी अगदी. राजकपूरचा संगम बद्दलही माझं हेच मत आहे.. दुसर्या/साइड हिरोला/हिरवीनीला मारल्याशिवाय पहिलं जोडपं सुखाने जगुच शकणार नाही असं लोकांना का वाटायचं देव जाणे.

रच्याकने, 'संगम' हा एक कैच्याकै आणि ओव्हरहाइप्ड सिनेमा आहे असं मला वाटतं.. प्रचंड ओव्हरअॅक्टिंग, म्हातारे दिसणारे अॅक्टर्स, उथळ इमोशन्सचा भरणा असलेले कथानक... संगीत हीच एकमेव जमेची बाजु.
गुगु... दूरदर्शनचा भारतातील
गुगु...
दूरदर्शनचा भारतातील जन्म १९७० च्या आसपासच्या असला तरी त्याला व्यापक रूप लाभले ते १९८० नंतर; म्हणजेच आमच्या कोल्हापुरात त्याचे आगमन झाले ते १९८२ मध्ये तेही कृष्णधवलमध्ये. "छायागीत" "रंगोली" आदी फिल्मीबेस्ड कार्यक्रमातील गाणी (मूळ रंगीत असली तरी) कृष्णधवलमध्येच लोक पाहात. १९८५ च्या सुमारास रंगीत टीव्ही आल्यानंतर हळुहळू बदल होत गेले. माझ्या आजीच्या आठवणीतील तो जो काळ होता तो कृष्णधवलचाच.
ठोकळ्याचा पुतळा उभारण्याची ही
ठोकळ्याचा पुतळा उभारण्याची ही इतिहासातली पहिली घटना असावी. ......>>
स्वप्ना कहर आहेस..
स्वप्ना
स्वप्ना
प्रतिक तुझी बरोबर आहे कारण
प्रतिक
तुझी बरोबर आहे कारण मुंबईच्या जवळ असूनही बदलापूर मधे दुरदर्शन सुस्पष्ट साधारण याच सुमारस झाल.
चिंगी
संगम मलाही अजिबात नावडलेला सिनेमा. मला वाटत सिनेमा हे माध्यमही फारस माहीत नसलेल्या वयात पाहीलेला. तेव्हाही मावशीला मला राज कपूर अजिबात आवडला नाही हे ठासून सांगितलेल.
आजही तो पहाताना निव्वळ चिड येते.
या चित्रपटाच्या सुमारास वैजयंतीमाला राज कपूर प्रकरण जोरात होत. कृष्णा घर सोडून मुलांसकट हॉटेलमधे रहात होती. हा चित्रपट चालण्यासाठीचा स्टंट होता अस वैजयंतीमालाने आत्मचरीत्रात लिहीलाय. त्यावर चक्क ह्रुषि कपूर रागावला - काsssय माझा बाप कॅरेक्टरलेस नव्हता म्हणतेस तुझी हिम्मतच कशी झाली?
मलाही अजिबात न आवडलेला
मलाही अजिबात न आवडलेला चित्रपट आहे संगम्.तो इतका पॉप्युलर का झाला, हे कोडेच आहे.
संगमबद्दल माझ्यासारखीच मते
संगमबद्दल माझ्यासारखीच मते असलेली मंडळी पाहुन खुपच बरे वाटले. मी दुस-या कुठल्यातरी बीबीवर माझी मळमळ काढ्लीय बाहेर त्यामुळे इथे परत कॉपीपेस्ट करत नाही
माझ्या वडलांचे एक मित्र आमच्याकडे राहायला आले असताना एका रविवारी दुदवर संगम चालु होता. त्यांना त्या चित्रपटातले एकुण एक संवाद पाठ होते... मी चित्रपट पाहायचे सोडुन त्यांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहात बसलेले आणि ते माझे अस्तित्व विसरुन धडाधड एकामागोमाग एकेक डायलॉग आणि तेही तिघांचे, टाकत होते.....
स्वप्ना_राज अशक्य आहेस तू
स्वप्ना_राज

अशक्य आहेस तू
आता संगम, दिल एक मंदीर पहायचे
आता संगम, दिल एक मंदीर पहायचे धाडस करेन असे वाटत नाही. (अजून पाहिले नाहित मी !)
पण दोन्ही राकु असून, नायिकेने खाऊन टाकलेला सिनेमा म्हणजे मदर इंडिया.
रेडी सिनेमा पाहिला त्यात
रेडी सिनेमा पाहिला

त्यात असीन आणी सल्लु चा सीन.. सल्लु तिला एअर पोर्ट वर बॅग आणायची म्हणुन दुसरीकडेच घेऊन जातो.
आणी त्यात चालत्या गाडीची चावी असीन काढते आणी पुढचा अॅक्सिडंट चा सीन पाहुन भुरळ आली..
असीन बाई ४ व्हीलर(कन्व्हर्टीबल) मधुन ऊडून जातात आणी एका झाडावर लटकलेल्या असतात.. आणी खोल दरी
'संगम' हा एक कैच्याकै आणि
'संगम' हा एक कैच्याकै आणि ओव्हरहाइप्ड सिनेमा आहे असं मला वाटतं
हुश्श! असे मत असलेला मी जगात एकटाच नाही तर !
अॅक्सिडंट चा सीन पाहुन भुरळ
अॅक्सिडंट चा सीन पाहुन भुरळ आली>>>
आवळा, ते "भोवळ आली" असेल गं.
राकु चा ' गोरा और काला 'कुणी
राकु चा ' गोरा और काला 'कुणी पाहिलाय का?
मदर इंडियातल्या सुनील दत्त च्या अभिनयाची थेट कॉपी राकुने त्यात केलीय.
एक सहन होत नसताना पट्ठ्याला डबल रोल दिलाय त्यात.
स्वप्ना_राज यांची असले चित्रपट पहायची सहनशक्ती पहाता, ह्या चित्रपटाचे परीक्षण / समीक्षण लिहीण्याची आग्रहवजा विनंती करत आहे.
संगम बद्दल सगळ्यांना खूप खूप
संगम बद्दल सगळ्यांना खूप खूप खूप मोदक ! महारद्दड सिनेमा आहे हा !
स्वप्ना_राज, काल मी जुना
स्वप्ना_राज, काल मी जुना 'चलते-चलते' बघितला. तू बघितलायस कां? तुझ्या एक्सपर्ट कमेंट्स वाचायला आवडतील.
आऊटडोअर्स, योग आलेला नाही
आऊटडोअर्स, योग आलेला नाही अजून.
खरं तर इच्छाधारी नाग-नागीण
खरं तर इच्छाधारी नाग-नागीण वगैरे संकल्पनेवर माझा अजिबात विश्वास नाही. पण हॉटेलच्या टीव्हीवर कमी चॅनेल्स होती. जी दिसत होती त्यापैकी हेच एक चॅनेल बघण्यालायक चित्रपट दाखवत होतं - नागीन. मग काय? आलिया भोगासी असावे सादर.....मध्येमध्ये येणारे फोन्स अटेंड करता करता जेव्हढा चित्रपट पाहाता आला त्याची ही आखोदेखी हकीकत.....
चित्रपट सुरु तेव्हा आपला बलराज उर्फ सुनील दत्त एक दंबुक, म्हणजे बंदूक घेऊन रानावनात फिरत असतो. अचानक एका माणसावर गरुडाने हल्लाबोल केल्याचं त्याला दिसतं. त्याने जुना हिंदी चित्रपट नागीन (बहुधा टॉपलेस प्रदीपकुमारच्या भीतीने) पाहिलेला नसतो. कारण त्या माणसाच्या (जितेंद्र) वेशभूषेवरूनही तो नाग असल्याचं त्याच्या ध्यानात येत नाही. तो गरुडाला गोळी घालतो. मग जितेंद्र त्याचे आभार मानतो आणि इथे काय करतो आहेस वगैरे शिळोप्याच्या गप्पा सुरु करतो. सुनील दत्त लेखकू का काय असतो आणि इच्छाधारी नाग-नागीण वगैरे विषयावर काहीतरी पुस्तक लिहीत असतो. (तो तरी काय करेल बिचारा! म्हणतात ना, व्यासांनी सगळ्या विषयांवर आधीच लिहून ठेवलंय. त्यांच्या काळात इच्छाधारी नाग-नागीण नसावेत). त्यावर संशोधन करायला तो त्या जंगलात मरायला आलेला असतो. तरी तो आपला ह्या गोष्टीवर विश्वास नसल्याचं सांगतो. जितेंद्र लगेच त्याला हे खरं आहे आणि पौर्णिमेच्या रात्री नाग-नागीण नाच करतात वगैरे माहिती देतो. एव्हढं होऊनही सुनील दत्तच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. बघता बघता त्याच्यासमोरच जितेंद्र सापाचं रूप धारण करतो. त्याने माणसाच्या रूपात असताना घातलेले कपडे जमिनीवर पडायला पाहिजेत, हो की नाही? पण ते एकदम गायब होतात. आता हा पुढल्या वेळी माणसाचं रूप घेताना काय घालणार अशी भीती आपल्याला उगाच वाटायला लागते (नशिब त्या जुन्या नागीन मध्ये प्रदीपकुमार सपेरा असतो!). आत्ता सुनील दत्तला सत्य कळतं. मग तो अवाक वगैरे होतो.
एकदम् कुठल्याश्या झाडावर बसलेली नागीण उर्फ रीना रॉय दिसते. जंगलात तिला फॅशन मॅगेझीन्स कुठून बरं मिळाली असावीत ह्या विचारात आपण पडतो कारण नागीणबाईंनी लिपस्टिक, मस्कारा, नेलपेंट अगदी यथास्थित लावलेलं असतं. त्यामानाने बिचारा नाग अगदीच गावदी दिसत असतो. बहुतेक सगळे पैसे नागीणबाईंच्या मेकअपवर खर्च झाल्याने त्याला स्वस्तातले कपडे घ्यायला लागले असतील. आता हे दोघे झाडावर गाणं म्हणणार की काय असं वाटत असताना नागीणबाई झाडावरून उडी मारतात. आणि दोघे गाऊ लागतात - तेरे संग प्यार ये नही तोडना, चाहे तेरे पीछे पडे जग छोडना. आसपास भरपूर उजेड. पौर्णिमेच्या रात्री जंगलात इतका उजेड? आपण कन्फ्युज् होतो. तरी आपल्याला पुढे काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना येते.
दत्तासाहेब आपल्या मित्रांना ह्या मिस्टर एंड मिसेस नाग बद्दल सांगतात. मित्र म्हणजे कोण? कबीर बेदी (मला नागीणबाईना सांगावंसं वाटलं की बाई थोडे कपडे घाल अंगावर नाही तर तुझं काही खरं नाही), अनिल धवन (हा सगळ्यात ऑड मॅन आऊट असल्याने आधी मरणार हेही आपल्याला कळतं), विनोद मेहरा (शर्टाची वरची सगळी बटनं उघडी. नागाला मनुष्यरूपात सॉल्लीड कॉप्लेक्स येणार!), फिरोज व संजय खान (बाय वन गेट वन फ्री योजनेंतर्गंत!). प्रेम चोप्रा का नव्हता माहीत नाही. दत्तसाहेब त्यांना पौर्णिमेच्या रात्रीबद्दल सांगून स्वत: बघायला चला म्हणून सांगत असतात. अरेच्चा! म्हणजे मगाशी नाग-नागीण नाचत होते ती बहुतेक पौर्णिमेच्या रात्रीच्या शोची रंगीत तालीम होती म्हणायची.
तर यथावकाश रात्र येते आणि सगळी व्हिलनमंडळी झाडात लपून बघत असतात. फक्त नागीण मनुष्यरूपात असते. नाग मनुश्यरुपात यायच्या आधीच अचानक अनिल धवन गोळी घालतो. का? तर म्हणे त्याला वाटतं की तो नाग त्या मुलीला चावेल. माठ कुठला! लगेच नाग मनुष्यरूपात येतो. मग नागिणीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि 'हजार सालोमे ये अपनी पहली मिलनकी रात थी' असं काहीतरी दर्दनाक बोलतो. आपण मनात म्हणतो की बाबा मिलनकी रात होती, ती पण १००० वर्षांनी आलेली, तर नाचत कशाला बसलास? उगा नमनाला घडाभर तेल! पण काय बोलणार? तर शेवटी नाग बहुतेक कुंवाराच मरतो.
इथे दत्तसाहेब मित्रावर डाफरू लागतात की हे तू काय केलंस आता नागाच्या डोळ्यात आपली सगळ्यांची छबी असणार, नागीण ती पाहणार आणि आपल्या सर्वांना मारणार. अनिल धवन म्हणतो की हे सगळं बकवास आहे आणि खरं असलं तरी मी त्याला मारलंय म्हणजे फक्त मला धोका आहे. तुम्ही गप्गुमान झोपा.
नागीणबाई रडून झाल्यावर नागाचे डोळे उघडून बघतात. नागाने बाकीच्या व्हिलनमंडळींना पाहिलं नसतानाही सगळ्यांचे फोटो त्याच्या डोळ्यात असतात. अगदी सपष्ट. आणि इथे आम्ही नाईट मोडमध्ये अद्ययावत कॅमेर्याने काढलेले फोटोपण धुसर दिसतात. असो. नागाच्या डोळ्यात फ्लॅशबिश असावा.
अनिल धवनबाळ गाढ झोपी गेलेला असतो तर दरवाजा की खिडकी वर टकटक होते. गप् खोलीत बसावं की नाही पण हा शहाणा दार उघडून बाहेर येतो. तर बाहेर नागीन्बाई उभ्या. तरी हा आत पळत नाही. (हा बहुतेक नागीणबाईच्या तोकड्या कपड्यांचा महिमा असावा!) तो 'तुम् तो वही लडकी हो' असं काहीसं बोलतो. त्यावर ती आपण सपेरन होतो आणी नागाने आपल्याला कैद करून ठेवलं होतं वगैरे लोणकढी मारते. अनिलबाळाचं सारं लक्ष तिच्याकडे असल्याने त्याला काही धोक्याची जाणीव होत नाही. मग ती तिला सोडवल्याबद्दल त्याचे आभार मानते आणि आपण स्वत:ला त्याला समर्पण करायला आलो आहे असं सांगते. अनिलबाळ तिला खोलीत घेऊन जातो आणि सकाळी त्याची निळी पडलेली लाश मिळते. आता व्हिलनमंडळीची थोडी टरकायला लागते.
आता कोणाचा नंबर लागणार असा आपण विचार करत असतो एव्हढ्यात पडद्यावर योगिता बाली (हिची कंबर म्हणजे कमरा दिसत होती. तो टीव्हीचा प्रॉब्लेम नसावा कारण पूढे अरुणा इराणी आली ती नेहमीच्याच साईजमध्ये होती) आणि सुलोचना माउली अवतरतात. माउली विनोद मेहराची आई असते. हिंदी चित्रपटाच्या परंपरेला जागून त्याचे वडील आधीच देवाघरी गेलेले असतात. तिने मुलावरचं संकट दूर करायला गारुडी - जगदीप - बोलावलेला असतो. तो आल्याबरोबर योगिता बाली - विनोद मेहराची होणारी बायको - आत बाथरूममध्ये जाते. ही नागीण असावी की काय असा संशय आपल्याला येतो पण थोड्याच वेळापूर्वी तिने 'नागाच्या डोळ्यात मारेकर्याची छबी असते' ह्या संकल्पनेची टर उडवताना 'डोळे आहेत का कॅमेरा' असं म्हटलेलं असतं. नागीनिला बापडीला कॅमेरा काय ठाऊक म्हणून आपण गप्प बसतो. इथे गारुडी कुठल्याश्या टेबलाच्या कप्प्यातून नाग बाहेर काढतो. तो नाग आहे का नागीण ह्याची शहानिशा कोणीही करत नाही. गारुडी गेल्यावर योगिता बाली बाहेर येते. सुलोचनाबाई गारुद्याला पैसे द्यायला बाहेर जातात त्या नेमक्या योगिता बाली आणि विनोद मेहरा गुजगोष्टी करत असताना आत येतात...ते पण दारावर टकटक न करता. शोनाहो! तरी त्यांच्या नशिबाने ते दोघं फक्त बोलत असतात. हुश्श्!
योगिता बाली आणि विनोद मेहरा सन एन्ड सॅन्ड हॉटेलमध्ये जाण्याचे बेत करत असतात. माउली दुजोरा देते. दोघे निघतात आणि वाटेत कुठेतरी भिजतात. मग दोघांना हॉटेलच्या तोकड्या बाथरोबमध्ये पहायची वेळ आपल्यावर येते. आता विनोद मेहरा वरची वाट धरणार असं आपल्याला वाटत असतं तेव्हढ्यात एक फोन येतो. झालेलं असतं काय की खरी योगिता बाली शहरात नसते, ती माउलीकडे येते, माऊली कन्प्युज होते. 'तुम् यहा हो तो वो कौन थी' वगैरे विचारते. तेव्हढ्यात दत्तसाहेब तिथे येतात. त्यांच्या लक्ष्हात सगळा प्रकार येतो. ते विनोद मेहराला फोन करून सावध करायचा प्रयत्न करतात पण फोन योगिता बाली उचलते आण चक्क 'राँग नंबर' म्हणून ठेवते. बहुधा जंगलात 'कोकाटे फाडफाड' मिळत असावं. वर 'कबाब मे हड्डी' वगैरे शब्दही वापरते.
ती पुन्हा विनोद मेहराकडे आपला मोर्चा वळवणार एव्हढ्यात अरुणा इराणी आणि त्यांचे बाकीचे मित्र येतात. मग एक गाणं होतं त्यात नागीणबाई मॉडर्न नाच करतात. दत्तसाहेब, माउली आणि खरी योगिता बाली तिथे येतात ते पाहून नागीण विनोद मेहराला घेऊन सटकते. ते खोलीत पोचतात तेव्हा विनोद मेहरा मरून पडलेला असतो. माऊली टाहो फोडते. खरी योगिता बाली जराही का रडत नाही असा मी विचार करत असतानाच लाईट्स गेले आणि बाकिचा चित्रपट पहायचं माझं स्वप्न धुळीला मिळालं.
बीस साल बाद .. मिथुन मिनाक्षी
बीस साल बाद .. मिथुन मिनाक्षी डिंपल... बघा... मज्जाच मज्जा आहे ! डिंपल भूत असते.. हातात कसला तरी मोळा घेऊन मिथुनला मारायला उडत जात असते.... मिनाक्षीला अमजदखान जादुचे कुंकू देतो.. ती ते जंगलात कुठेतरी उधळते... ते कुंकू उडत उडत डिंपलकडे येते आणि तिला मारते
पुढच्या वेळेला पूर्ण चित्रपट
पुढच्या वेळेला पूर्ण चित्रपट बघच.
बाकी यामधे आंखोमे क्याजी... विनोद, सुनिल और अनिल असे एखादे गाणे हवे होते ना?
स्वप्ना, आधी हे सगळं तुझ्या
स्वप्ना, आधी हे सगळं तुझ्या अर्काईवमधे हलव बरं
तू पूर्ण पिच्चर बघच आमच्यासाठी म्हणून आणि सविस्तर रिव्यू लिही बरं
स्वप्ना जबरी लिहिलं आहेस, आता
स्वप्ना जबरी लिहिलं आहेस, आता हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. झी सिनेमाला सारखा लागतो ना?
स्वप्ना प्लीज सगळा सिनेमा पहा
स्वप्ना प्लीज सगळा सिनेमा पहा आणि एक फर्मास लेख येऊदे
स्वप्ना, त्यात मुमताज पण होती
स्वप्ना, त्यात मुमताज पण होती ना ? आणि रेखा पण ?
स्वप्ना, अशक्य आहेस. काय काय
स्वप्ना, अशक्य आहेस. काय काय बघून ठेवतेस गं आम्हां माबोकरांचे मन रिझविण्यासाठी
स्वप्ना मी हा चित्रपट दोन
स्वप्ना

मी हा चित्रपट दोन तीन वेळ पाहिलाय.
स्वप्ना फारेण्डाने चॅलेंज
स्वप्ना
फारेण्डाने चॅलेंज स्विकारले नाही. तू तरी बघ प्रयत्न करून..
मायबोलीवरच्या सिनेमाविषयक परीक्षणांची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. त्यांच्यासाठी एका निर्मात्याने आव्हान म्हणून हा सिनेमा बनवलेला आहे.
http://www.youtube.com/watch?v=G9VFusA_0zU
स्वप्ना उरलेला पाहून वेगळा
स्वप्ना
उरलेला पाहून वेगळा बाफच काढ. नागिनवर बहुधा आधीच एक बाफही असेल.
युर्या, कुठून काय एक एक
युर्या,
कुठून काय एक एक शोधून काढतो
Pages