निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरीशंकर हे प्रकरण पहिल्यांदाच ऐकले. आता कैलाशपतीचा संबंध शंकराशी जोडला असल्याने काही मंडळी त्याला (म्हणजे झाडाला) कदाचित गौरीशंकरही म्हणत असतील.. Happy

हो हो मलाही तसेच वाट्ते आहे. आणि सकाळ मध्ये फूलाच्या फोटो बरोबर जी माहिती दिली आहे त्यावरून कैलाशपतीलाच गौरीशंकर म्हणत असावेत असेच वाटते.

ही खरच गुलबक्षी आहे Happy सहीच आमच्या शेजारी जे चिनी आहेत त्यांच्याकडे ह्याची कुंडी अडकवलेली आहे. इतकी फुलली ना गुलबक्षी मस्तच हिंदाळते वार्‍यावर Happy

कुठल्या झाडाचे बी????

दिनेश, तुम्ही बिबट्याबद्दल जे लिहिलेत ते ऐशुचेही स्वप्न आहे. तिला बिबटे घरात पाळायचेत. आम्ही गेल्या आठवड्यात एक बोका आणलाय. सुरवात तिथुन केलीय आता एके दिवशी बिबट्याही आणु.. Happy

शोभा, तुला झब्बु घे गं माझ्या घरच्या गुलबक्षीचा...

आता वरची फुले पाहून मला वाटत आमच्या शेजारी जे चिनी आहेत त्यांच्याकडचे ते फुलझाड वेगळे.. शी काय गोंधळ होतो ना एकसारखी फुले पाहून Happy

naahitarI aataa bibaTe maanavee vasteejavaL yaayalaa laagalech aahet.
maitreechaa prastaav aaNat nasateel kashaavarun ?

बी, वर शोभाने टाकलेय ते ऑथेंटिक गुलबक्षीचेच फुल आहे. शोभाची ऑथेंटिक गुलबक्षी अगदी भडक अशा राणी रंगाची आहे (त्यात पांढराही येतो) पण जे मी टाकलेय ते दुरंगी गुलबक्षीचे आहे. ह्याला पांढरी, गुलाबी आणि एक/दोन पाकळ्या गुलाबी असलेली पांढरी फुलेही येतात. पण याचा गुलाबी रंग मुळ गुलबक्षी रंगाइतका भडक नाहीय. खुप सौम्य आहे. ही अजुनेक झलक...

हा फोटो जागुसाठी -

जागु तु बासमती पातीचे फोटो काढुन टाकलेस. खालचे रोप तु मला दिलेलेस, त्यातले अर्धे गडपले आणि एक मुळ उरलेले त्यातुन खालचे रोपटे आले - मला वाटते हेच आंबेमोहोर पात्/पानदान लिव्ह्स -

maitreechaa prastaav aaNat nasateel kashaavarun ?

आणत असतिलही. पण माणुस स्वतःच्या जीवाला खुप घाबरतो ना... साधा बिनविषारी साप दिसला तरी त्याला 'उगीच विषाची परिक्षा का??" म्हणुन ठेचायला निघतो.

ऐशुला घोडेस्वारीच्या वेळी असे शिकवलेले की घोड्याची आपल्याला कितीही भिती वाटली तरी भिती जरा बाजुला ठेऊन त्याच्या पाठीवर थोपटायचे. त्या स्पर्शातुन घोड्याला कळते की हा माणुस आपल्याला घाबरतोय. मग घोडा जरा नरमाईचे धोरण स्विकारतो आणि माणसाची भिती कमी करतो.

साधना... इथे सिंगापुरात ही मलय लोक त्यांच्या जेवणात पांदानाची पाने विपुल प्रमाणात वापरतात. आपण जसे कढीपत्ता आणि कोंथीबीर रोज वापरतो तसे त्यांचे असते पांदानच्या बाबतीत. एक सांग, तुला नक्की नक्की माहिती आहे का की पांदान म्हणजे आंबेमोहोर तांदुळच?

वर तू जे चित्र दिले आहे ते पांदानाच आहे. अगदी १०० % सांगतो.

गेल्या आठवड्यात घराशेजारच्या नर्सरीत गेले होते तिथे लाल कृष्णकमळ दिसले. फोटो मोबाईलने काढलेत त्यामुळे काही खास नाहीयेत.

लाल कृष्णकमळ फुले, पाने, कळे.

त्याच्या लिस्टवर इन्सुलिन् प्लांट होते. आहे का? म्हणुन विचारले तेव्हा त्याने हे दाखवले.

हे तर पेव आहे असे ज्ञान मी पाजळल्यावर तो म्हणाला की पेव वेगळे आणि हे वेगळे. त्याने पान खाऊन्बघा, आंबट लागते म्हणुन्सांगितल्यावर मी तुकडा चघळला. खरेच मस्त चिंचेच्या पानासारखे लागले. रोज सकाळी एक मोठा तुकडा चघळायचा, वर ग्लासभर पाणी प्यायचे. रक्तातली साखर काबुत राहते.

बी ही नीलकुरींजी आपल्या घाणेरीसारखी दिसताहेत...

एक सांग, तुला नक्की नक्की माहिती आहे का की पांदान म्हणजे आंबेमोहोर तांदुळच?

आंबेमोहोर तांदुळ नाही काय.. तर त्याचे ते लांब पान साधा भात शिजत असताना त्यात (आपण तेजपत्ता टाकतो तसे पण नो फोडणी) टाकायचे. त्यामुळे साध्या भाताला आंबेमोहोरासारखा वास येतो. (काहींच्या मते बासमतीसारखा)

इथे सिंगापुरात ही मलय लोक त्यांच्या जेवणात पांदानाची पाने विपुल प्रमाणात वापरतात. आपण जसे कढीपत्ता आणि कोंथीबीर रोज वापरतो तसे त्यांचे असते पांदानच्या बाबतीत

कसे वापरतात? कढीपत्त्यासारखे नंतर काढून टाकायचे का? मी फोडणीतला कढीपत्ता घरचा असतो तेव्हा खाऊन टाकते तर बाजारचा असतो तेव्हा काढुन टाकते आणि मग पदार्थ खाते.

दिनेशदानी जुन्या मायबोलीत चित्रकविते साठी गुलबक्षीचं चित्र टाकलं होतं
तेव्हा केलेली ही कविता.

सूर्य झुके पश्चिमेस
अन् घरट्यात परतती पक्षी
आकाशिही अवतरे सुंदर
सप्त रंगांची नक्षी
तरीही वाटे उदासीनता
वाढत्या अंधारासरशी
प्रफुल्लित करण्या आम्हाला
अंगणी फुलतसे गुलबक्षी

दिसता आता चुकून हे फूल
सांज आठवे बालपणीची
आता आपली शोकेस फक्त
खोट्या फुलांनी सजवायची
कुणी लाविली जरी खरी झाडे
मनात असते किती माया
शेंडे बुडखे कापून म्हणती
बघा या माझ्या बोन्साया

जागुतै...मी आजच्या सकाळ पुरवणीत वाचलं(हार्ड कॉपी)! शोधतेय मी पण नेटवर...थांबा!

http://epaper.esakal.com/Sakal/21Apr2012/Enlarge/PuneCity/PunePctoday/pa...

जागुतै आणि निगप्रेमींनो.. ..गौरीशंकराच्या फुलांसाठी ही लिंक बघा! स्मित>>>>>>

हो हो मलाही तसेच वाट्ते आहे. आणि सकाळ मध्ये फूलाच्या फोटो बरोबर जी माहिती दिली आहे त्यावरून कैलाशपतीलाच गौरीशंकर म्हणत असावेत असेच वाटते.>>>>>>>

यावर दिनेशदांनी मागील पानावरच जे म्हटले आहे ते बरोबर आहे - हे फुल "कुंभा" चे आहे, सकाळमधील बातमी चुकावी हे आश्चर्यच आहे......

सुंदर...

दिसता आता चुकून हे फूल
सांज आठवे बालपणीची
आता आपली शोकेस फक्त
खोट्या फुलांनी सजवायची
कुणी लाविली जरी खरी झाडे
मनात असते किती माया
शेंडे बुडखे कापून म्हणती
बघा या माझ्या बोन्साया

अग्दी खरे वास्तव... Sad

साधना पानदान/आंबेमोहोर पातच आहे ती. छान वाढलय. मी भात शिजवताना भातात डायरेक्ट टाकते. छान सुगंध दरवळतो घरभर.

गुलबक्षीची फुले सगळी सुंदरच. पुर्वी मी ह्या गुलबक्षीच्या वेण्या करायचे संध्याकाळी. माहेरी गुलाबी, पिवळी, पांढरी गुलबक्षी भरपूर यायची.

सकाळमधील बातमी चुकावी हे आश्चर्यच आहे......

अहो शशांक, ते लोक न चुकता चुकीची माहिती टाकतात. एक उदाहरण मी वर दिलेय. मागे एकदा एका पक्ष्याचे नाव चुकीचे टाकलेले.

पण जागु, तु दिलेला तोंडलं मात्र मला संभाळता आलं नाही. माझ्या आळसामुळॅ ते गेलं. पण नो वरी, कॉलनीत खुप जणांकडे आहे. जोगवा मागत फिरायला मात्र पाहिजे. तु दिलेले अळूही छान्वाढतेय.

माझ्या पण लहानपणी गुलाबी, पिवळी, पांढरी , पांढर्‍या पुलांवर ठिपके असलेली, व फिक्या केशरी रंगांच्या फुलांवर लाल ठिपके असलेली अशीविविध रंगी फुले होती. आमची आई आम्हाला वेण्या करून द्यायची. Happy
साधना, ती दोन रंगाची, गुलबक्षीची दोन रोपे, एकाच कुंडीत लावली म्हणून तर अशी दुरंगी नाही ना झाली? Happy

जोगवा मागत फिरायला मात्र पाहिजे.>>.>>>>>>>>>>साधने, तोंडाने, "जोगवा मागते, तोंड्ल्याचा जोगवा मागते" असं म्हण गं. Wink

साधना माझ्याकडेही तु दिलेल अ‍ॅडेनियम छान झालय.

तुझ्याच बरोबर मी पण तोंडल्याचा वेल लावला होता. मी आईकडून आणून ती रोप तयार केली होती. त्यातलेच तुला दिले होते. माझ्याकडे छान वेल वाढला आहे. परत आलीस की मी देईन तुला जर तुला तुझ्या कॉलनीत जोगवा नाही मिळाला तर.

जो_एस, छानच आहे कविता. मलाही ही गुलबक्षी बघीतली की बालपण आठवते. >> शोभा अगदी मला पण, माझ्या कडे पिवळ्या आणि केशरी रंगाची गुलबक्षी होती.

मला तरी वाटत बाजूबाजूला असल्यानेच अशी दुरंगी होते. कारण लहानपणी मी एकमेकांना एकमेकांचे रंग मिसळल्याचे पाहीले आहे.

Pages