अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मनात म्हटलं बाई ग, ह्याच्यासोबत एक वर्ष काधलंस तरी डोक्यावरून पाणी. मग कदाचित तूच कंटाळून जीव देशील. >>> Lol स्वप्ना तु टीवी पहातच रहा गं. सिरियल्स, असले टुकार सिनेमे. तुझे हाल पण आमची करम़णुक होते. Wink

मी पण स्वप्नासारखेच धडाधड सिनेमे बघायचो एकेकाळी. चक्क थिएटरला जाऊन. घरासमोरच थिएटर होते.

त्या काळात एक गीतांजली नावाचा सिनेमा बघितला होता. रेखाचा डबलरोल. (एक गीता, दुसरी अंजली !)

दुसरा एक आठवतोय, त्यात प्राण आणि आशा पारेख, नवरा बायको असतात. आणि
गोविंदा त्यांचा मुलगा. भाग्यवान का असेच काहीतरी नाव होते.

दोन्ही स्वप्नाने बघावेत, अशी फार इच्छा आहे.

सॉलीड धागा आहे.

एक सीनेमा होता राज बब्बर आणि डिंपल "इन्सानीयत के दुश्मन" स्वप्ना ने तो नक्की बघीतला पाहिजे. त्याच्यातले डान्स पण आचरट पणाचे कळस होते.

सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी चा एक सीनेमा होता. "धडकन" अग आई ग!!! आर्तक्य सीन्स ची लयलुट होती. हा सुनील आधी एक फालतु माणुस असतो आणि तो शेवटी भयानक श्रीमंत होतो. त्याच्या तोंडी एक डायलॉग आहे
" ३ साल पहिले मेरे पास एक फुटी कौडी नही थी. और आज... आज मेरे पास ५०० करोड की दौलत है"
हा असा कुठला बीजनेस करतो की ३ वर्षांत फुट्या कौड्यां चे ५०० करोड होतात. आम्हाला तरी सांगा ना ते गुपीत. आम्ही इकडे उगाचच खर्डेघाशी करत बसणार नाही.

एक फेमस सेनेमा आहे. मधुबालाचा " गेट वे ऑफ इंडिया". त्यात एक गाणं आहे " दो घडी वो जो पास आ बैठे" ह्यात मधुबाला बरोबर बध्ध्कोष्ट्या भारत भुषण आहे. त्या गाण्यात तिच्या तोंडी एका कडव्यात वाक्य आहे " दिल को एक दिन जरुर जाना था. वहीं पोहोचा जहा ठीकाना था" तेंव्हा ती अति प्रेमाने ह्याच्या कडे बघते, त्या वर त्याने येवढी गचाळ एक्स्प्रेशन दिली आहेत की त्या सीन नंतर कॅमेरामन ने जीव दिला असेल.

३ साल पहिले मेरे पास एक फुटी कौडी नही थी. और आज... आज मेरे पास ५०० करोड की दौलत है"
हा असा कुठला बीजनेस करतो की ३ वर्षांत फुट्या कौड्यां चे ५०० करोड होतात. आम्हाला तरी सांगा ना ते गुपीत.

दोन उदाहरणं तर पुण्यातलीच आहेत. पैकी एकाचा बाणेरला अमेरिकन प्रेसिडेण्टला लाजवेल असा बंगला आहे.

>>त्या गाण्यात तिच्या तोंडी एका कडव्यात वाक्य आहे " दिल को एक दिन जरुर जाना था. वहीं पोहोचा जहा ठीकाना था" तेंव्हा ती अति प्रेमाने ह्याच्या कडे बघते, त्या वर त्याने येवढी गचाळ एक्स्प्रेशन दिली आहेत की त्या सीन नंतर कॅमेरामन ने जीव दिला असेल.

शप्पथ Rofl

दोन उदाहरणं तर पुण्यातलीच आहेत. पैकी एकाचा बाणेरला अमेरिकन प्रेसिडेण्टला लाजवेल असा बंगला आहे.

अहो पण त्या इंडस्ट्रीतही ३ वर्षात इतके कसे होणार?? आधी बरीच वर्षे उमेदवारीत घालवावी लागतील ना..

काल स्वदेश बघितला .......आहे छान अप्रतिम आहे........... पण शेवटी उपग्रह सोडताना डिस्कवरी यान कसे दाखवले आहे....... मी तर अजुन कधीच बघितले नाही डिस्कवरी यान वापरुन उपग्रह सोडलेला Sad

>>तेंव्हा ती अति प्रेमाने ह्याच्या कडे बघते, त्या वर त्याने येवढी गचाळ एक्स्प्रेशन दिली आहेत की त्या सीन नंतर कॅमेरामन ने जीव दिला असेल.

Proud काय करणार तो तरी? मुल्लाकी दौड मस्जिदतक. त्याच्या अभिनयाची कुवतच तेव्हढी.

मंदार, मनिमाऊ Happy

>>दुसरा एक आठवतोय, त्यात प्राण आणि आशा पारेख, नवरा बायको असतात. आणि गोविंदा त्यांचा मुलगा. भाग्यवान का असेच काहीतरी नाव होते.

दिनेशदा, ह्या पिक्चरमध्ये भाग्यवान कोण हे विचाराय्ची मला भीती वाटतेय. Proud

स्वप्ना,
मेला नावाचे तीन चित्रपट येऊन गेले.
पहिल्यात दिलीप कुमार होता. ठिक होता तो.
दुसऱ्यात संजय खान, फ़िरोझ खान आणि मुमताज होते.
तोही बरा होता.
तिसरा मात्र अतिभयानक होता. त्यात आमिर खान, फ़ैझल खान,
ट्विंकल खन्ना आणि चक्क सूनबाई, ऐश्वर्या राय होते.
भयाण कथा, भयानक संवाद, त्याहून भयानक अभिनय.
आमिरला एवढे ताळतंत्र सोडलेले कधीच बघितले नव्हते मी.

दिनेश दा .......तुम्ही मेला बघितला.... ?????? मग तर तुमचा जाहीर सत्कार करायलाच हवा Lol
जेमतेम एक - दोन दिवसच काय तो चाललेला ते ही चुकुन माकुन असेल Happy
.
असेच जाहीर सत्कार हवे असतील तर........ आतंक ही आतंक, हेलॉ ब्रदर, रामजाने, हे चित्रपट बघा...... जबरदस्त आहेत ...

मेला मधे ऐश्वर्याचा गेस्ट अ‍ॅपियरन्स होता का? मी पण पाहिला होता टीवीवर. मला दिसल्या नाहीत मिसेस बच्चन.

मनिमाऊचा सत्कार नाही करता येणार. सूनबाई दिसल्या नाहीत याचा अर्थ सरळ
आहे, चित्रपट पूर्ण बघितला नाही !!

मनिमाऊचा सत्कार नाही करता येणार. सूनबाई दिसल्या नाहीत याचा अर्थ सरळ
आहे, चित्रपट पूर्ण बघितला नाही !!

Happy

मी टीवी ( सिनेमा अथवा सिरियल) कधीही एका जागेवर बसुन बघत नाही. कामं करत किंवा नेटवर काही वाचत असते. फक्त टीवीकडे बघणं मला जमत नाही. 'मेला' मी शेवटपर्यंत पाहिला होता, मग बच्चनबाई कधी आल्या आणि गेल्या कळलं कसं नाही. तेव्हा नेमकी उठुन कुठे गेली असणार.

माझा सत्कार चुकला या सुंदरीमुळे.

मेला नं.३ मध्ये मिसेस अक्षय कुमार अशक्य जाड दिसल्यात. काय म्हणून तो दुर्जन का कोण व्हिलन असतो तो तिच्यामागे लागतो ते तोच जाणे. त्यातलं ते एक गाणं आहे - रुपा, रुपा असे शब्द असलेलं - बहुतेक 'मेला दिलोंका आता है'. त्याचा मी भयानक धसका घेतला होता.

दिनेशदा, चंपाकली नावामुळे लक्षात राहिलीये ना? याच नावाचा एक खाद्यपदार्थ असतो! Happy

हा सिनेमा थेटरात पाह्यला होता. का म्हणून विचारायचं नाही. आमच्याकडे आमिरचा एक फ्रीझर होता, तिच्या हट्टापायी. आम्ही सर्व फ्रेंड्स एकत्रच पिक्चरला जायचो हीरो/हिरवीण कुणाचा का आवडता असेना. .

ते मेला दिलोंका गाणं चालू कुठे होतं आणि संपतं कुठे समजतच नाही. मधेच भारतमाताकी जय वगैरे पण काहीतरी आहे.

आमची एक मैत्रीण त्यानंतर कुणी चुकून मराठीतला "मेला" शब्द वापरला की लगेच म्हणायह्ची "आठवण करून देऊ नकोस. हार्ट अ‍ॅटॅक येता येता राहिलाय त्या दिवशी"

फैझल खान मदहोशीमधे छान दिसला होता. मेलामधे अतिभयाण दिसला होता. आता तर त्याला वेडच लागले आहे म्हणे. Sad

या मेला ची श्रेयनामावली सुरु होताना, ती बया झोपाळ्यावर बसलेली दाखवलीत. सुंदर दृश्य आहे ते.
ब्लॅक अँड व्हाईट मधले. पण जसजसा कॅमेरा तिचा कोजप घ्यायला जातो, तसा तिचा भयाण चेहरा
दिसू लागतो. आयशीचे नि बापसाचे काय्येक मिळालेले नाय हिला.

मनिमाऊ, चित्रपटात शेवटी सूनबाई, अक्षरश: आभाळातून टपकतात, आणि मग संत्राच्या फोडी खात खात, डोळे पुसतात.... तिथेच सिनेमा संपतो.

नंदीनी, थँक्यू व्हेरी मच! मला वाटले की 'मेला' थेट्रात पाहिलेला मी एकटाच मेला.
रच्याकने, 'मेला दिलों का' गाण्याची सुरुवात हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठा सलग शॉट आहे म्हणे.

बध्दकोष्ट्या भारत भूषण>>>> Biggrin

शिरीष कणेकरांचे शब्द आठवले... ये मेरे नैन कुंवारे तेरी अखियां देख के हारे ????? मधुबालाचे कुंवारे नैन, भारतभूषण जे थिजलेले नैने देखके हारे?????? Biggrin

Pages