Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भन्नाट, आता पहावाच लागेल
भन्नाट, आता पहावाच लागेल पिच्चर.
त्याला कायम सर्दी झालेली असे
त्याला कायम सर्दी झालेली असे का ? >>>> राकु चे आणि सर्दीचे काय लॉजिक आहे??
मला हे वाचून भिंतीजवळ जाऊन शेंबुड पुसणारा राजेंद्र कुमार डोळ्यासमोर आला.
निंबुडे, दिनेशदा हे आधी
निंबुडे, दिनेशदा
हे आधी वाचलं असतं तर तो भिंतीजवळ जाऊन शेंबूडच पुसतोय असं वाटलं असतं मला. ब्यॉक!
केपी, माझ्याही आईचा राजेंद्र
केपी, माझ्याही आईचा राजेंद्र कुमार फेव्हरेट. मी एकदा विचारलं होतं, त्याला कायम सर्दी झालेली असे का ? तर आईने.. त्याचे सगळे पिक्चर हिट जायचे त्याचे काय ? असे विचारले होते !!
>>>>>>
कायम सर्दी (सुकी की ओली ते ठरवा) असणारा = राजेंद्रकुमार
ऑफिशियली आणि सदासर्वदा शेंबुड पुसणारा = दिलिपकुमार
शेंबुड दिसू नये म्हणून चेहरा झाकणारा = भरतकुमार ऊर्फ मनोजकुमार
याला सर्दी व्हायला हवी असं वाटायला लावणारा = भारतभुषण
दुसर्यांना सर्दी, डोकेदुखी, आणि नाचायला लागला तर (हसल्यामुळे) पोटदुखी देणारा = राजकुमार
हिरॉईनला सर्दी झालेय की काय हे बारकाईनं निरखून बघणारा = प्रदिपकुमार
मामी, प्रदीपकुमार राहिला.
मामी, प्रदीपकुमार राहिला.
आपला लाकडा ... सॉरी लाडका
आपला लाकडा ... सॉरी लाडका प्रकुपण अॅड केला ग, स्वप्ना.
हे सगळं त्या मामी MAMI
हे सगळं त्या मामी MAMI चित्रपट महोत्सववाल्यांनी वाचलं तर उत्सवाचं नाव बदलतील
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना अल्टिमेट
स्वप्ना अल्टिमेट
स्वप्ना आता मालिकांसारखे
स्वप्ना आता मालिकांसारखे चित्तरपटांवर टीप्पण्णी देण्यासाठी नवीन धागा काढच येड लागलं तुझी पोस्ट वाचून
(आतली बातमी तू लिहिलेल्या पोस्ट्स मी लिहिल्या आहेत समजून अभिनंदन केलं गेलंय माझं ..माबोकरांना हा डु आयडीचा प्रकार तर नाही ना वाटत ..तरी मी सध्या तुझ्या लिखाणाला अनुमोदन देणं बंद केलंय ...पण आत्ता राहावलं नाही )
स्वप्नाने 'साथी' बद्दल जे
स्वप्नाने 'साथी' बद्दल जे लिहिलंय ते भन्नाटच आहे, यात दुमत नाही.... पण एका सरळ, सज्जन, सुकुमार, सुजाण, सुंदर अभिनेत्याला 'दगड' म्हटले याचे प्रचंड वाईट वाटले. असो.
(अवांतर : युनो ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या 'दगड' अभिनेत्यांच्या यादीत जान्या अब्राहमचा प्रथम क्रमांक लागला आहे....तो जर नदीत पडला तर त्या दगडाला पाहून सारे मासे जमिनीवर येतील...घाबरून !!)
>>माबोकरांना हा डु आयडीचा
>>माबोकरांना हा डु आयडीचा प्रकार तर नाही ना वाटत
मी तुला मागेच ही शंका बोलून दाखवली होती की नाही?
असो. हा जाईन तिथे किमान एक तरी दुसरी 'स्वप्ना' असण्याचा प्रकार मला नवीन नाही आणि तुलाही नसेलच. 
प्रतीक, राकु असेलही सरळ आणि सज्जन. त्याचा त्याच्या अभिनयाशी काय संबंध? अभिनय करता येत नाही ते सगळे दगडच. आणि तो 'सुकुमार, सुजाण, सुंदर'?
हा जाईन तिथे किमान एक तरी
हा जाईन तिथे किमान एक तरी दुसरी 'स्वप्ना' << मलाही नवीन नाही हा प्रकार फारच कॉमन नाव ठेवलंय बाई आपल्या मायबापानी
मेल्म लग्नानंतरही नवर्याने बदलंल नाही 
स्वप्ना अल्टिमेट
स्वप्ना अल्टिमेट
मामी खरंच अता ते अभिनेते
मामी खरंच अता ते अभिनेते पहाताना तुम्ही म्हणताय तसंच वाटत राहिल...:हाहा:
स्वप्ना मस्तच!! येऊ दे अजून
स्वप्ना मस्तच!! येऊ दे अजून नविन सिनेमे
'बरसात की रात' या चित्रपटातील
'बरसात की रात' या चित्रपटातील नायक कोण आहे? मक्ख चेहर्याने 'जिंदगी भर नही भूलेंगे वो बरसात की रात' गाण सादर करताना पाहिलं साहेबांना.
भाभु उर्फ भारत भुषण - ह्या
भाभु उर्फ भारत भुषण - ह्या पिक्चरच्या काळात मधुबालेला बहुधा साडेसाती असणार. दोघांना एकत्र बघताना अनंत यातना होतात
स्वप्ना! _/\_
स्वप्ना! _/\_
अमित, aashu29,मामी,
अमित, aashu29,मामी, दिनेशदा,कांदापोहे,अक्षरी तुम्ही सगळे तो राजेन्द्रकुमारचा भिंतीशी गुप्तगू करण्याचा सीन पहाच. Highly Recommended! पेंट लावायला आलेला गवंडीदेखील भिंतीच्या एव्हढा जवळ जाऊन उभा राहणार नाही. भिंतीला चालता येत असतं तर तीच बाजूला झाली असती.
"कौन है जो सपनोमे आया" ह्या सुंदर गाण्यात पण ह्या ठोकळेबहाद्दरांनी असंच स्टिअरिंग व्हील फिरवलंय. मी आईला विचारलंसुध्दा की ते स्टिअरिंग व्हील निखळून येऊन त्याचा अपघात होतो का म्हणून.
>>>
सही स्वप्ना, कदाचित तो सीन शॉट करताना राजेन्द्रकुमार आपण आंधळे नाही आहोत हे विसरला असावा,
त्यामुळे भिंतीच्या एवढ्या जवळ उभा राहिला.
दगड असला तरी .. >>
दगड असला तरी .. >>
स्वप्ना, अशक्य >>>>दगड असला
स्वप्ना, अशक्य

>>>>दगड असला तरी तो तळाला जात नाही, हे आश्चर्यच.>>>> हे म्हणजे टू मच
राकु च्या नावानं ! तूम्ही
राकु च्या नावानं !
तूम्ही त्याचे गूँज उठी शहनाई मधले हौले हौले घुंघट पट खोले, हे पण गाणे बघा.
वसंत देसाईंची उत्तम चाल, लता रफी चे सुंदर गायन, गुजराथी लोककलाकारांचे जोशपूर्ण नृत्य.. या सगळ्याला नजर लागू नये म्हनून राकु साहेबांचा नाच !!
या सगळ्याला नजर लागू नये
या सगळ्याला नजर लागू नये म्हनून राकु साहेबांचा नाच !! >>>
(No subject)
स्वप्ना केवळ अशक्य...बापरे
स्वप्ना केवळ अशक्य...बापरे हसून हसून गडाबडा लोळलो मी...
काय सॉलीड लिहीलेयस तु....
सर्वांच्या आग्रहास्तव आता घेच पाहू तु लिहायाला....
>>सर्वांच्या आग्रहास्तव आता
>>सर्वांच्या आग्रहास्तव आता घेच पाहू तु लिहायाला....
घेतलं असतं पण मला टिव्हीचा रिमोट रात्री १२ वाजता हातात मिळतो 
अरे तिने फक्त शेवट पाहून
अरे तिने फक्त शेवट पाहून लिहलाय. आणि तुम्ही सगळे तिच कौतुक करत सगळा पिक्चर पहा सांगताय.
कौन है जो सपनोमे आया वर कोणीतरी लिहीलय मागे.
त्याचे ते बालवाडीतले हातवारे ...
अरे कोणीतरी प्रतिकला जरा चांगले चित्रपट दाखवा.
आधी राजकुमार आता राजेंद्रकुमार... कुमार कुमार करत गौरवही आवडत असेल.
मी तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करेन... GET WELL SOON
गुगु.... अहो....मी दोन्ही
गुगु....
अहो....मी दोन्ही राकु आवडतात असे म्हटले नाही, कुठेच....देवाच्यान. फक्त आमच्या घरी थोरल्या राकुचे दोन ज्येष्ठ चाहते आहेत, आणि आजीला धाकटा राकु (स्वप्नाचा दगड) आणि माला सिन्हा हे जोडपे फार फार प्रिय आहे (होते). ती सांगे दूरदर्शनच्या सुरुवातीच्या वर्षात १९८० ते १९८४ या काळात राजकुमार मीनाकुमारी अभिनित 'दिल अपना प्रित पराई' आणि मकु (उर्फ भारत) व माला सिन्हाचा 'हरियाली और रास्ता' यांचा हरेक शनिवारी रतीबच असे आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्हीच्या त्या काळात तिचे घर "प्रेक्षकां'नी हाऊसफुल्ल होत असे म्हणे. यांच्या बोलण्यातून प्रदीप, राज, राजेन्द्र या कुमारांविषयी त्याना किती 'प्रेम' असे हे जाणवते. आज आजी हयात नाही पण ज्या ज्या वेळी यापैकी कुणाही "अभिनय सम्राटा"चा चित्रपट कोणत्याही चॅनेलवर लागला तर मला हटकून तिची याद येते....(अर्थात आजकाल कृष्णधवल चित्रपट जास्त दाखविलेही जात नाहीत.)
राहता राहिला 'कु.गौ.' चा प्रश्न.....सो आय बेटर डॅश टु साऊथ पोल....दॅन टु टॉक ऑन दॅट वेल शेव्हड कलर वॉल..!
'दिल एक मंदीर है' - पिक्चर
'दिल एक मंदीर है' - पिक्चर पाहिला नसल्यास पुढील पोस्ट वाचू नये. कारण निदान मीनाकुमारीसाठी तरी बघणेबल आहे.
ह्यात मीनाकुमारीचं नशीब फार वाईट. प्रेम असतं ते नेमकं राजेन्द्रकुमारवर. पण लग्न होतं राजकुमारशी. प्रेक्षक हळहळतात. पण तिचं मात्र 'पतिव्रता भारतीय नारी' प्रमाणे लगेच नवर्यावर प्रेम जडतं. मग त्याला काहीतरी आजार होऊन ती त्याच्या तावडीतून सुटायची आशा प्रेक्षकांना निर्माण होते. तेव्हढ्यात राजेन्द्रकुमार तडमडतो. तो म्हणे डॉक्टर असतो. ह्या असल्या रडव्या चेहेर्याच्या डॉक्टरला पाहून सर्दीसाठी औषध आणायला गेलं तरी आपल्याला टर्मिनल कॅन्सर झालाय असं वाटणार. असो. भारतातले तमाम डॉक्टर्स तेव्हा कुठे जातात देव जाणे पण हाच नेमका त्या राजकुमारवर ऑपरेशन करणार असतो. दोन ठोकळ्यांची होते हॉस्पिटलात भेट!
मग मीनाकुमारी त्याच्यावर आरोप करते की मला मिळवायला तू माझ्या नवर्याचं ऑपरेशन यशस्वी करणार नाहीस. त्यामुळे राजेन्द्रकुमारच्या नाजूक हृदयावर आघात होतात. तो ते ऑपरेशन यशस्वी करतो पण पेपरात छापून येतं त्याप्रमाणे "हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने" त्याचं निधन होतं. मग राजकुमार कुठेतरी त्याचा पुतळा उभारतो. ठोकळ्याचा पुतळा उभारण्याची ही इतिहासातली पहिली घटना असावी. त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी हिरोच्या आयांची ट्रेडमार्क पांढरी साडी नेसून आणि शालबिल ओढून राजेन्द्रकुमारची आई येते. दुतर्फा लोक उभे राहून त्याचा जयघोष करत असतात. राजकुमार आणि मीनाकुमारी तिला नमस्कार वगैरे करतात. मग ती त्या दोघांना आपल्या २ बाजूला घेऊन गर्दीला एखाद्या नेत्याच्या थाटात नमस्कार वगैरे करते. बॅकग्राउन्डला 'दिल एक मंदिर है' हे गाणं लागलेलं. तमाम जनतेचे डोळे डबडबलेले आणि मनात 'त्याग, प्रेम, करूणा, कर्तव्यपूर्ती' वगैरे शब्दांची गर्दी.....
मी हा पिक्चर पाहिला तेव्हा मला असं वाटलं की शेवटी राजेन्द्रकुमार मेलेला दाखवला नसता तर बरं झालं असतं. पिक्चर उगाच ओव्हर ड्रॅमेटिक झाला नसता, अशक्य वाटला नसता, मूळ संदेशाला धक्का लागला नसता आणि बदलत्या काळानुरुप (आणि बदलत्या मूल्यांतही!) 'कैच्या कै" वाटला नसता.
Pages