Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आगावा, तो हीरो विजयकांथ आहे,
आगावा, तो हीरो विजयकांथ आहे, रजनीपेक्षा अचाट सीन्स आहे त्याचे, युट्युबवर vijaykanth ने सर्च देणे
हा तो रक्तापासुन आग निर्मितीचा सीन.
http://www.youtube.com/watch?v=8OKE1pUnkoQ
काल एक भयंकर द्रूष्य
काल एक भयंकर द्रूष्य पाहाण्यात आले........ मनोज कुमार अभिनित (?) कुणी दिग्दर्शित केलय माहीत नाही..... पण पहा आणि डोळे तृप्त करुन घ्या........
http://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg&feature=share
एक मॅजिक रोबो नावाचा डब
एक मॅजिक रोबो नावाचा डब केलेला सिनेमा पाहिला(पुर्ण नाही... थोडासा). त्यात काय नाही ते विचारा.... कालीमातेचे चमत्कार, भुते, झपाटलेली कार, रोबोच्या करामती, झपाटलेली मुलगी, काळी जादू यासोबत नेहमीचा मसाला म्हणजे बदले की आग, बाष्कळ विनोद, इ.इ. काही म्हणजे काही शिल्लक ठेवलं नाही घुसडायला
आजकाल बहुतेक सगळ्याच मूव्ही
आजकाल बहुतेक सगळ्याच मूव्ही चॅनेल्सवर या डब(डा) सिनेमाचा रतीब अस्तो...
अगदी अगदी.....!!!
स्वाती मनोज कुमारचा हा पिक्चर
स्वाती मनोज कुमारचा हा पिक्चर त्यानेच दिग्दर्शित केला आहे . त्याची निर्मीती त्याचा मुलगा राजीव गोस्वामी याला लॉन्च करण्यासाठी केली होती. तो आपटला हे सांगायलाच पाहिजे का?
आधीच्या प्रसंगाने मीच निपचित
आधीच्या प्रसंगाने मीच निपचित पडलो असल्याने >>>
आगावड्या, मी हसून हसून बेज्जार झाले तुला निपचित पडलेला इमॅजिनून
परवा झी सिनेमावर कुठलासा
परवा झी सिनेमावर कुठलासा ८०च्या दशकातला सिनेमा होता. (बहुतेक जानी दुश्मन)
खलनायकाच्या तळघरात ब्लड बँक असते. परविन बाबीला पकडुन तिच्या डॅडीची ही करतुत दाखवायला हे लोक घेउन जातात तो सिन : स्ट्रेचरवर तळमळत पडलेले लोक्स आणि एक डॉक्टर की काय तो इन्जेक्शनने रक्त काढुन बाटल्यांमधे टाकतोय.
काल कोणत्याश्या चॅनेलवर
काल कोणत्याश्या चॅनेलवर 'साथी' नावाचा पिक्चर लागला होता. शेवट पहायला मिळाला. कलाकार वैजयंतीमाला, ठोकळा/दगड उर्फ राजेन्द्रकुमार, एव्हरओल्ड सिमी गरेवाल आणि संजीव कुमार. हा पिक्चर कोणी अजून पाहिला नसेल आणि पहायचा असेल तर पुढील पोस्ट वाचू नका कारण ती पिक्चरच्या शेवटाबद्दल आहे.
तर राजेन्द्रकुमार आंधळा झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यांचं ऑपरेशन होतं. वैजयंतीमाला ही त्याची पहिली पत्नी अस्ते पण काही कारणाने ते दुरावलेले असतात. त्याचं दुसरं लग्न सिमी गरेवालशी झालेलं असतं - एक तडजोड म्हणून. वैजयंतीमाला ही नर्स शारदा बनून त्याची सेवा करत असते. तिच्यावर संजीव कुमार खूश असतो. राजेन्द्रकुमार तिला संजीव कुमारशी लग्न करण्याबाबत विचारतो. त्यामुळे आणि राजेन्द्रकुमारचे डोळे परत आल्यावर तो आपल्याला ओळखेल म्हणून त्यागमूर्ती वैजयंतीमाला घरातून निघून जाते. तो वैजयंतीमालाच समोर आहे असं समजून तिचा आणि आपला फोटो तिला दाखवतो तो तिथे आलेली सिमी गरेवाल पहाते. ती संजीव कुमारला ह्याबद्दल सांगते. तोही त्या खोलीत येऊन तो फोटो पहातो आणि राजेन्द्रकुमारला सांगतो की त्याची पहिली बायकोच ती नर्स होती आणि आता निघून गेली आहे.
झालं! राजेन्द्रकुमार लगेच आपल्या डोळ्यावरची पट्टी खसकन ओढून काढतो. "अब धीरे धीरे आखे खोलिये" व्गैरे काहीही न होता पटकन डोळे उघडतो. त्याला सगळं काही स्पष्ट दिसतं. मग सुरु होते हिंदी पिक्चरची फेमस मॅरेथॉन. राजेन्द्रकुमार गाडी घेऊन वैजयंतीमालाला शोधायला निघतो. ह्या हिरो लोकांनी कधी आयुष्यात गाडी चालवली होती की नाही देव जाणे कारण ते स्टिअरिंग व्हील एक्दा डावीकडे आणि एकदा उजवीकडे फिरवलं नाही तर गाडी चालणार नाही ह्या समजुतीतून गरगर फिरवतात.
बरं इथे वैजयंतीमाला आगगाडीच्या रूळांवरून धावत असते. राजेन्द्रकुमार बरोबर तिला शोधतो आणि तिच्यामागून धावत सुटतो. एव्हढ्यात ट्रेन येते. चांगली ट्रेन आलीच आहे आयती तर तिच्याखाली जीव देऊन टाकावा हे आपल्याला सुचतं बरं का, पण तिला नाही. ती ट्रेनच्या शेजारून धावत जाते आणि कुठेतरी पाण्यात उडी मारते. राजेन्द्रकुमार पाठोपाठ उडी मारतो. दगड असला तरी तो तळाला जात नाही, हे आश्चर्यच. दोघे पाण्याबाहेर येतात. सिमी गरेवाल आणि संजीव कुमार गाडीत जीपीएस फॅसिलीटी असल्यासारखे नेमके तिथे आलेले असतात.
मग खोलीत वैजयंतीमाला झोपलेली, तिच्या आजूबाजूला सिमी गरेवाल आणि संजीव कुमार. कोपर्यात राजेन्द्रकुमार भिंतीशी गुप्तगू करत असतो. वैजयंतीमाला उठून 'मुझे जाने दो' वगैरे 'अग अग म्हशी' टाईप बोलते. मग सिमीबाई उदार मनाने तिचा हात आपल्या नवर्याच्या हातात देतात. बिच्चारी वैजयंतीमाला! चांगला संजीव कुमार मिळाला असता तर ही पीडा परत तिच्या मागे लागते.
मग एक्दम डॉक्टरच्या वेशातल्या सिमीबाई 'बेटिया घरसे जाती है मा, बहुए आती है, तुम्हारी बहू आ गयी" असा ड्वायलॉग टाकून कुठल्याश्या अॅम्ब्युलन्स्मध्ये बसून निघून जातात. आणि आपण वैजयंतीमाला सिमीच्या आईची बहू कशी झाली आणि आता ते दोघे सिमीच्या आईबाबांच्या घरी रहाणार का क्कॉय ह्या विचारात असताना पिक्चर संपतो.
ह्याच पिक्चरमध्ये वैजयंतीमाला पावसाने ओली झालेली साडी नेसून एका पाईपवरून चढून राजेन्द्रकुमारच्या खोलीत जाताना दाख्वली आहे. त्याला म्हणे ताप आलेला असतो आणि ते इंजक्शन दिल्ं नाही तर तो मरणार असतो. हा कुठला ताप बुवा? वर केमिस्ट डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन वगैरे काहीही न विचारता तिला ते इंजक्शन देतो. जाउ देत!
दगड असला तरी तो तळाला जात
दगड असला तरी तो तळाला जात नाही, हे आश्चर्यच>>
स्वप्ना, महा धमाल लिहीले आहे
स्वप्ना, महा धमाल लिहीले आहे :). तू पूर्ण चित्रपट बघून त्याचा रिव्यू सेपरेट लिहीच.
दगड असला तरी तो तळाला जात नाही, >>>
स्टिअरिंग व्हील एक्दा डावीकडे आणि एकदा उजवीकडे फिरवलं नाही तर गाडी चालणार नाही >>>
भिंतीशी गुप्तगू करत असतो. >>>
ती मेरा प्यार भी तू है वगैरे चांगली गाणी यातलीच का?
भिंतीशी गुप्तगू करत असतो.
भिंतीशी गुप्तगू करत असतो. >>>>
हे चित्र अगदी डोळ्यांसमोर आलं...
'अग अग म्हशी' टाईप बोलते. >>>>

चांगला संजीव कुमार मिळाला असता तर ही पीडा परत तिच्या मागे लागते. >>>>>
तू पूर्ण चित्रपट बघून त्याचा रिव्यू सेपरेट लिहीच >>>>
प्लीजच हे काम मनावर घे स्वप्ना
स्टिअरिंग व्हील एक्दा डावीकडे
स्टिअरिंग व्हील एक्दा डावीकडे आणि एकदा उजवीकडे फिरवलं नाही तर गाडी चालणार नाही ह्या समजुतीतून गरगर फिरवतात>>
धन्स मंडळी! फारएण्ड, हे गाणं
धन्स मंडळी!
फारएण्ड, हे गाणं त्यातलंच आहे. कधी पाहिलाच हा पिक्चर पूर्ण तर नक्की पोस्टेन रिव्ह्यू 
स्वप्ना संपुर्ण पोस्ट
स्वप्ना संपुर्ण पोस्ट
स्वप्ना धम्माल!!!
स्वप्ना धम्माल!!!
श्या!!! स्वप्ना काय लिहिलय्स
श्या!!! स्वप्ना काय लिहिलय्स गं. तु प्लीजच सगळ्या सिनेमांच्या ष्टोर्या लिहित जा. हसून हसून मेले मी!
१. एव्हरओल्ड सिमी गरेवाल
२. चांगली ट्रेन आलीच आहे आयती तर तिच्याखाली जीव देऊन टाकावा हे आपल्याला सुचतं बरं का, पण तिला नाही. ती ट्रेनच्या शेजारून धावत जाते आणि कुठेतरी पाण्यात उडी मारते. राजेन्द्रकुमार पाठोपाठ उडी मारतो. दगड असला तरी तो तळाला जात नाही, हे आश्चर्यच.
३. राजेन्द्रकुमार भिंतीशी गुप्तगू करत असतो
४. चांगला संजीव कुमार मिळाला असता तर ही पीडा परत तिच्या मागे लागते.
OMG!!!!! खुद्द राजेंद्रकुमारनी वाचलं ना तरी तो हसून मरेल आणि त्याला आपल्या कियेपर लाजही वाटेल.
स्वप्ना, प्रत्यक वाक्याला
स्वप्ना, प्रत्यक वाक्याला हसलो. गाणी छान होती, ते माहीत होते.. पण सिनेमाही छानच होता ते नव्हते माहित !!
दगड असला तरी तो तळाला जात
दगड असला तरी तो तळाला जात नाही>>>
दगड असला तरी तो तळाला जात
दगड असला तरी तो तळाला जात नाही
===
अमित, aashu29,मामी,
अमित, aashu29,मामी, दिनेशदा,कांदापोहे,अक्षरी
तुम्ही सगळे तो राजेन्द्रकुमारचा भिंतीशी गुप्तगू करण्याचा सीन पहाच. Highly Recommended! पेंट लावायला आलेला गवंडीदेखील भिंतीच्या एव्हढा जवळ जाऊन उभा राहणार नाही. भिंतीला चालता येत असतं तर तीच बाजूला झाली असती.
"कौन है जो सपनोमे आया" ह्या सुंदर गाण्यात पण ह्या ठोकळेबहाद्दरांनी असंच स्टिअरिंग व्हील फिरवलंय. मी आईला विचारलंसुध्दा की ते स्टिअरिंग व्हील निखळून येऊन त्याचा अपघात होतो का म्हणून.
स्वप्ना शॉल्लेट
स्वप्ना शॉल्लेट
"कौन है जो सपनोमे आया" ह्या
"कौन है जो सपनोमे आया" ह्या सुंदर गाण्यात पण ह्या ठोकळेबहाद्दरांनी असंच स्टिअरिंग व्हील फिरवलंय. मी आईला विचारलंसुध्दा की ते स्टिअरिंग व्हील निखळून येऊन त्याचा अपघात होतो का म्हणून." >>
स्वप्ना तु खरच कठीण आहेस..
दगड असला तरी तो तळाला जात
दगड असला तरी तो तळाला जात नाही, हे आश्चर्यच<<<
स्वप्ना, भारी.. प्लीज अख्खा सिनेमा पाहा आणि सेप्रेट बीबीवर लिही.
मी आईला विचारलंसुध्दा>>>
मी आईला विचारलंसुध्दा>>>
आमच्या घरी आईला असे विचारले तर हाताला लागतील ते ठोकळे हाणेल. भयंकर पंखा आहे ती राजेंद्रकुमारची. त्यात वैजु (हो वैजुच. जसे काही आमच्या घरी धुणेभांडी हीच करते) म्हणजे बोलायला स्कोपच नाही. गुपचुप बघायला लागेल.
पेंट लावायला आलेला गवंडीदेखील
पेंट लावायला आलेला गवंडीदेखील >>>
स्वप्ना, अगं पेंट लावणारा रंगारी असतो गं. गवंडी नव्हे
त्या ठोकळ्याला पाहून तुझी मती भ्रष्ट झालेली दिसते
स्वप्ना
स्वप्ना
निंबुडे, हो बरोबर ग. केवळ
निंबुडे, हो बरोबर ग. केवळ शेवट काय होतो ह्या उत्सुकतेपोटी पाहिला मी....कांदापोहे, सुदैवाने आमच्या घरी हीमॅन धर्मेन्द्र हे दैवत आहे त्यामुळे मी राकुला खुशाल दगड वगैरे म्हणते.
प्लीज अख्खा सिनेमा पाहा आणि
प्लीज अख्खा सिनेमा पाहा आणि सेप्रेट बीबीवर लिही.>>> सहमत. सेपरेट बीबी उघड. येथे नंतर सापडत नाही पटकन. मस्त जमले आहे वरचे वर्णन.
स्वप्ना...धम्माल लिहिलयस! ते
स्वप्ना...धम्माल लिहिलयस! ते स्टियरींग वै. तर एकदम भारी.
श्रद्धा, फारेण्ड ला सहमत! असा सेपरेट बीबी झालाच पाहिजे.
केपी, माझ्याही आईचा राजेंद्र
केपी, माझ्याही आईचा राजेंद्र कुमार फेव्हरेट. मी एकदा विचारलं होतं, त्याला कायम सर्दी झालेली असे का ? तर आईने.. त्याचे सगळे पिक्चर हिट जायचे त्याचे काय ? असे विचारले होते !!
Pages