पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी इडल्या केल्या त्यावेळी साच्यात खाली मटार, कच्चं गाजर किसून आणि कच्चं बीट किसून घातलं आणि जरा रंगिबेरंगी बनवल्या :

i1.jpg

आणि पेपर नॅपकीन्सच्या गुंडाळ्या करून बनवलेली ही गुलाबाची फुलं :

i2.jpg

इडल्या आणि फुले दोन्ही मस्त्.बीट जास्त रसदार नसावे असे वाटते आहे.कोरडा किस व घट्टसर इडली मिश्रण असेल तरच अशी शक्यता ..पण रंग सुरेख जमले आहेत.

बीटाची मलाही भिती होती. पण नाही पसरलं ते. आणि कोरडंही नव्हतं खरंतर. पण अगदी बारीक किसलं होतं. इडल्याही मऊ होत्या हो! ठोकळे नव्हते काही .... Wink Proud

मामी, व्हिटीला 'सुविधा' रेस्टॉरंटमध्ये कांचीपुरम इडली मिळते, तीत अशी सजावट असते. गाजर-बीटाचा कीस, मटार दाणे आणि काजू!! एकदम मऊमऊ वाफाळती विलोभनीय इडली मटकावून वर कडक फिल्टर कॉफी मस्ट!!!

अनुसया, आधीचा केक बहुतेक सगळ्यांनी खाऊन संपवला. त्यामुळे आता पुन्हा करून टाकतेय. Happy
दिसायला लागला का केक?

मंजूडी, कांचीपुरम मस्तच लागते.
>>>>>> वर कडक फिल्टर कॉफी मस्ट!!! >>>>> दे ट्टाळी! Happy

पार्टी मधे ग्रीन सॅलड सर्व करण्याच्या काही आयडिया सांगा ना..
म्हण्जे.. काय होतं ना.. कि सगळं लवकर मिक्स करुन ठेवलं तर मग खाणं सुरुवात करे पर्यन्त त्यातला पालक, चार्ड, लेट्युस अश्या हिरव्या भाज्या मऊ पडतात..करकरीत पणा जातो..
सॅलड ड्रेसिंग कधी घालवे?..कोणत्या टाईप ची भांडी वापरावीत (मी इथे सगळी कडे वूडन utensils च बघितली आहेत सॅलड सर्व करताना)?..
कोशिंबीरीची सजावट आणि मांडणी जमते.. सॅलड स्वतः पुरते करायचे असेल तर काही नाही वाटत..
पण असं छान पैकी सर्व करताना काहीतरी चुकल्या सारखं वाटतं

मामी मस्त आहेत त्या इडल्या. आवडल्या एकदम.
रुतु ,
तयार सलाडची पॅकेट्स (लेट्युस आणि बेबी स्पिनॅचची मिळतात बघ) ती आणायची आणि ती ऐनवेळी पाहुणे आले कि काचेच्या बोलमध्ये ओतायची. करकरित पण रहातात आणि फ्रेश पण. सॅलड ड्रेसिंग घरच असेल तर फ्रीजमध्ये तयार करुन ठेवायच . ऐनवेळी सॅलडवर ओतता येत.
मी टोमॅटो कापुन न घालता त्या ऐवजी चेरी टोमॅटो वापरते. स्ट्रॉबेरी समर सॅलड वगैरे करणार असेन (किंवा कोणतही फ्रुट असलेल सॅलड) तर फळ अर्धा अगोदर तास कापुन फ्रीजमध्ये ठेवते. ऐनवेळी लेट्युस मिक्स करते.
घरी सॅलड करताना लाकडी bowl वापरते पण पाहुण्याम्साठी काचेचा मोठ सॅलड bowl वापरते.

लाजो, सीमा .. थॅंक्स ..छान आहेत सूचना
आता वेळ मिळाला की लाकडी, काचेच्या सॅलड बोल ची खरेदी करेन .. मग फोटो टाकेन लवकरच

हे माझे 'कोकोनट आईस' लाडु Happy लेकीला शाळेत करुन दिले होते नापौ च्य दिवशीच तिचा न्युज डे होता आणि एखाद्या फेस्टिवल बद्दल बोलयचे होते Happy

मी ६० एक लाडु केले होते....मुलांनी आणि टिचर्स नी मागुन मागुन खल्ले Happy ... ऑल फिनीश्ड... लेक पण खुष Happy

IMG_2088.jpg

वावावा.. कांचीपुरम इडल्या काय, हमनाम चे केक्स काय, इडलीचा स्नो मॅन काय्,दहीपोह्यांवर अनारदाणे.. ब्यूटीफुल डेकोरेशन.. अ‍ॅपिटायझिंग ..
या धाग्याच्या जन्मदात्री ला कोटिकोटि प्रणाम ..
या धाग्यामुळे कित्येकांमधील आर्टिस्टिक गुण उजागर होतायेत..
धन्स लाजोजी.. (अर्री 'लाजोजी म्हटलं कि ती हमलोग मधली अनिता कँवर आठवली का??)
पण आपली लाजो वेगळी आहे..सर्वगुणसंपन्न, एकदम हटके..

लाजो,
"हे घ्या मिच टाकते माझ्या आंबा पेढ्यांचे फोटु" >>>> एकदम सही!!!!!!!!

मला रेसिपी हवी आहे, गणपतीला करीन म्हणते.

Pages