माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीप्या Lol

'माझं काय चुकलं' चा हा बहुतेक पहिला बकरा.... Wink

दीप, कूकरमधे शिजवताना एक थेट पद्धत असते. म्हणजे डब्यात ( सेपरेटर ) मधे पदार्थ न ठेवता तो थेट कुकरमधे ( जाळी न ठेवता ) शिजवायचा. अख्खे मूगही या पद्धतीने शिजतील. त्यासाठी, कूकरमधे थोडेसे तेल घालायचे ( एक टेबलस्पून ) त्यात धुवुन घेतलेले मूग, ( एक कप ) घालायचे, थोडेसे परतून त्यात अर्धा टिस्पून हळद आणि तेवढाच हिंग घालायचा. तीन कप पाणी घालायचे आणि कूकरचे झाकण लावायचे. आच प्रखर करायची. शिट्टी ( वेंट वेट ) मधुन आवाज यायला लागला, व ती गोलगोल फिरु लागली कि आच मध्यम करायची. मग घड्याळ बघुन सात मिनिटानी गॅस बंद करायचा. कूकरमधे कुठलाही पदार्थ शिजवताना वेळच मोजायची असते, शिट्या नाहित. ( सहसा कूकरबरोबर जे पुस्त्क मिळते त्यात या वेळा दिलेल्या असतात, शिट्या खचितच दिलेल्या असतात ) प्रखर आच असेल तर शिट्या भराभर होतात, व पदार्थ शिजत नाही. एखादा पदार्थ शिजायला किती वेळ लागेल याची कल्पना नसेल तर आपल्या अंदाजापेक्षा दोन मिनिटे आधीच कूकर बंद करावा. पदार्थ कमी शिजला असेल तर परत शिजवता येतो.
कूकर मग आपोआप थंड होउ द्यावा. गरम असताना शिटी वर करुन वाफ जाउ दिली तर पदार्थ, खास करुन ज्यात जास्त पाणी आहे तो पदार्थ वर उसळतो. जर फारच घाई असेल तर पूर्ण कूकर थंड पाण्याखाली धरावा मग झाकण काढावे.
वरील मूग मग जरासे घोटून त्यात मीठ, तूप व मिरीपुड किंवा तिखट घालून छानसे वरण तयार होईल. याच प्रकारात तांदूळही एकत्र करुन खिचडि करता येईल. या प्रमाणात एक कप तांदूळ व एक ते दिड कप जास्तीचे पाणी घालावे लागेल. उकळी आली कि मीठ घालून ढवळून झाकण लावायचे.

मंजु Happy

धन्यवाद दिनेशदा .
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

दीप,
स्नेहलता दातार यान्चे " पुरुषांसाठी सोपे पाकतन्त्र" पुस्तक छान आहे खूप मी वापरतोय कारण ऑफीस कँटीन आणी मेसचं खाऊन कंटाळा आलेला.

मी कुकरला अक्खे हिरवे मुग कुकरच्या भांड्यात शिजवते की. कधीच मला प्रॉब्लेम आला नाही. मी मुगाचे भांडे खाली आणि भाताचे बर लावते दोन्ही व्यवस्थीत शिजतात फ्युतुर मधे २० मिनीटे. १० मिनीटाने कुकर मध्यम आचेवर ठेवते. मला वाटते की ते मूग जरा जास्तच शिजतात.

दीपूर्झा
मूग मंद गॅसवर भाजून घ्यायचे ...जळणार नाहीत इकडे लक्ष द्यायचे. व कुकरमध्ये २/३ शिट्ट्या काढून गॅस बारीक करून ३/४ मिनिटांनी बंद करायचा. मूग छान शिजतात व भिजत घालायची गरज नसते.

मध्यंतरी मी दही करण्याबद्दल, विरजणाबद्दल लिहिलं होतं. माझं ते दही चांगलं झालंच पण त्यानंतर केलेलं दही चांगलं होतंय. (ऑरगॅनिक लो फॅट दही विरजणाला वापरुनही)

सायो good :)कीप इट अप.
horizon च organic कुठलही दही वापरल तरी लागायलाच पाहिजे दही कारण त्यात live cultures असतात. लिहिलयच त्यावर तस स्पष्ट. ओव्हन मध्ये (बंद करुन)१८० temp वर ठेवल तर winter मध्ये सुद्धा होत दही. मी यावर परत लिहिलय कारण मला फार आनंद झालेला पहिल्यांदा दही लागल्यावर Happy

सिंडे, हो तसं गोड असतं. पण चांगलं लागतं चवीला. मी दही करायला लागल्यापासून नवरा घरचं दही आहे का विचारतोय Wink
मला स्वतःला प्रचंड आंबट दही आवडतं. भारतात मी घरच्या दह्याचा आधी वास घेते नी मगच खायचं की नाही ते ठरवते.
सीमा, आज दही लावताना ऑरगॅनिक दही न वापरता देसी स्टोअरचं दही वापरलंय. बघुया, कसं होतंय ते.

काल मी रसगुल्ले केले.पनीर व रवा टाकून्,पन खुप कडक झालेत्,,,,,,माझ काय चुकल?
आणि आता ते रसगुल्ले फेकुन द्यावे लागतील?
प्लीज्,,,मदत करा.....

रवा जास्त झाला. पनीर मळले नाही, पाक कडक झाला, ( पाणी कमी पडले ) किंवा जास्त शिजवले गेले.
फेकण्याची गरज नाही, ते तळून कोफ्ता करी करता येईल. फारच कडक असतील तर फोडून, पनीर भुर्जी करता येईल. ( त्या आधी थोडा वेळ साध्या पाण्यात ठेवायचे म्हणजे गोडवा कमी होईल )

दिनेशदा,खूप खूप धन्यवाद्,कोफ्ता करी जुन्या हितगुजवर असेलच,,,,,
धन्यवाद पुन्हा एकदा....

कडधान्यांना चांगले मोड कसे आणावेत?
हे मोड प्रकरण मला अजिबात जमत नाही. भारतात असताना नेहेमी विकतचे आणायचे. लाज वाटायची पण आणायचे.आता इकडे मात्र फार त्रास होत आहे. खूप कष्टाने मूगाचे मोड जमले पण मटकी आणि मसूर मला अजिबात दाद देत नाहीत. रात्री भिजत घालते, सकाळी उपसून चाळणी मधे १ तास निथळत ठेवते आणि मग सुती फडक्या मधे घट्ट बांधून ठेवते. मग १०-१२ तासानी पाहिले तर अगदी छान चिकट झालेले असतात. का ते माहित नाही. आईला विचारले तर ती म्हणाली निथळायला कमी पडते..तर जरा वेळ फडक्यावर पसरुन ठेव आणि मग बांधून ठेव. पण तरी परत पुढच्या वेळेस तीच कथा.अगदी चिकट झालेले असतात. खराब झाले असेच वाटते. आणि एका पण दाण्याला १/१०० इंच पण मोड नसतो.माझे काय चुकते? कोणी सांगू शकते का?हवा म्हणावी तर सध्या हवा पण छान आहे स्प्रिंग चालू असल्याने.

मी पण रात्री भिजत घालते. सकाळी उभट चाळणीत निथळुन त्यातच घट्ट झाकण लावुन ठेवते. खाली एखादी ताटली ठेवते पाणी गळत असेल तर. संध्याकाळपर्यंत छान मोड येतात. ते फडक्यात बांधण्याचं मला पण साधलं नाही कधी.

एमबी, कडधान्य रात्रभर भरपूर पाण्यात भिजत घाल. सकाळी चाळणीत निथळून हवं तरी धुवून घे. आणि मग साध्या, सुती फडक्यात घट्ट बांध आणि वर एखादी जड वस्तू ठेव. मी कुकरमध्ये पाणी भरुन ठेवते. अशाने मोड यायलाच हवेत.

माझी मटकीला मोड आणायची पद्धत :
रात्रभर मटकी पाण्यात भिजवायची. भिजवतांना अगदी थंड (फ्रीजमधल्यासारखे) पाणी नाही वापरायचे. रुम टेंपरेचरला तरी आलेले असावे.
सकाळी मटकी चाळणीत ५ मि. निथळत ठेवायची. त्याच वेळात ओव्हन १५० फॅ. ला गरम करुन घ्यायचा. (गरम झाले की बंद करायचे आठवणीने)
चाळणीतली मटकी एका सुती कापडात सगळी घट्ट बांधायची गाठोड बांधल्यासारखी आणि ओव्हनमध्ये एका भांड्यात हे गाठोडं ठेवुन द्यायचे.
दुसर्‍यादिवशी (२४ तासाने) सकाळी मस्त २-३ सेमी लांबीचे मोड आलेले असतात. दरवेळी हा प्रयोग हमखास यशस्वी झालाय.
सकाळी ओवनमध्ये मटकी ठेवल्यावर संध्याकाळी (१२ तासात) मोड येत असतील तर माहित नाही, मी कधी चेक केले नाही. कधी कधी चुकुन जास्त वेळ राहिली मटकी तर एकदी ३-४ सेमी लांबीचे मोड येतात.

करुन बघेन हा प्रयोग नक्की.

माझ्याकडे स्प्राऊट मेकर आणल्यापासून त्यात्च मोड काढले जातात. मध्ये मध्ये पाण्याचा हबका तेवढा मारत रहाते. त्याचा एक फायदा म्हणजे ३ कप्पे असल्याने तीन कडधान्य एकदम भिजवून, मोड काढले जातात.

मी रूनीसारखेच करते. फक्त मायक्रोवेव्ह मधे ठेवते. त्यानेही व्यवस्थित आले आहेत मोड..

www.bhagyashree.co.cc

कडध्यान्य भिजत घालण्यापुर्वी नीट धुतली पाहिजेत. ( बुळबुळीत होण्याचे कारण बॅक्टेरिया असतात ) खरे तर फडक्यात बांधायची गरज नाही, एखाद्या कोलँडर मधे ठेवले तरी चालेल. हवा लागायला हवी आणि ते भांडे एखाद्या पाणी भरलेल्या भांड्यावर अंतर ठेवून ठेवायचे. नीट मोड यायला अंधार हवा. कडधान्ये सकाळी भिजत घालून रात्री मोड काढण्यासाठी ठेवावे. दुसर्‍या दिवशीच्या दुपारच्या जेवणाला उसळ होते.

चोवीस तास ठेवायचे असेल तर अवन प्री-हीट करायची गरज आहे का ? मी तसेच ठेवुन देते अवनमधे. गेल्यावेळी विसरले आणि २४ तास ठेवले गेले तर भले लांब मोड आले होते.

अवन आधी तापवुन घ्यायची गरज पडत नसावी, पण मी 'ऑन सेफर साइड' असे म्हणुन तापवुन घेते. Happy

मी देसी दुकानातून आणलेल्या कडधान्याला...स्पेशली हिरव्या मुगाला धड मोड येतच नसत कधी. एका मैत्रिणीने सांगितल्यापासून होल फूड्स मधूनच आणते सगळं कडधान्य. काय सुरेख मोड येतात. ओव्हन गरम करायची, फडक्यात बांधायचीही गरज नाही पडत. भिजलेलं कडधान्य प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून्,थोडं उघडं ठेवते झाकण. मस्त मोड येतात अगदी. पहिल्यांदा तर विश्वासच बसेना ते मोड बघून Happy
---------------------------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.

माझ्या एका अमेरिकन(मेक्सिकन) मित्राने असेच एकदा बोलता बोलता सल्ला दिला होता कि, आम्लेट बनवताना त्यात थोडे दुध घातले कि...छान रंग येतो आणि आम्लेट फ्लफी होते म्हणुन!
बर्‍याच दिवसांनी योग आला ते बनवायचा.....पहिल्यांदा मी अंड फेटल्यावर त्यात थोडे दुध घातले...काही खास बदल नाही वाटला.मग दुसर्‍या खेपेला अजुन जास्त घातले....खुपच असह्य पदार्थ तयार झाला होता! Sad

कोणी नक्की सांगेल का कि, किती दुध टाकावे ? कि तसे काही करु नये !! Uhoh

माझ्या माहितीप्रमाणे एका ऑम्लेटकरता साधारण १ चमचा (छोटा चहाचा चमचा) दूध टाकतात.
तुम्हाला फ्लफी म्हणजे इडली सारखे फुगेल असे (चुकुन) वाटले असेल तर तसे काही होत नाही. Happy

ह्म्म्म ! Happy मी समप्रमाणापर्यंत पोहोचलो होतो...मला वाटलं म्हैसुर रवा डोश्यासारखं मस्त फ्लफी होइल.(त्याने सांगीतले होते मिटक्या मारंत असे तर!)

धन्यवाद !

सगळ्यान धन्यवाद...दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता मटकी नीट धुवून भिजत घातली आहे.रात्री अवन मधे किंवा नुसतेच चाळणी मधे ठेवून पहाते. या पण वेळेस नाही आले तर मात्र अवघड आहे.
सायोनारा, स्प्राऊट मेकर खरच घ्यावा का?कसा आहे? आई येणार आहे तिला आणायला सांगेनच्.किती मोठा असतो तो?

मी कडधान्य रात्री पाण्यात गार ( नळाच्या ) पाण्यात भिजवते अन सकाळी चाळणीत ओतून घेते. पाणी निथळल्यावर ( पाचेक मिनिटे ) चाळणीच्या खाली एक ताट अन वर चाळणीच्या जाळी एवढीच ताटली ठेवते. त्यावर एक जड दगड ठेवते अन हे सगळं ओव्हन मधे २४ तास ठेवते. मस्त मोड येतात. पूर्वी पंच्यात बांधणे वगैरे करत असे, पण मग तो पंचा वेगळा हाताने धुणे कटकटीचं होतं म्हणून ही चाळणीची पद्धत सुरू केली. चाळणी, ताटली सगळं डिश वॉशर मधे घालता येतं. हा का नी ना का

अंडे नीट फेटून घ्यायचे अन मुख्य म्हणजे तो बॉल एकदम कोरड घ्यायचा. अंडे फेटले की २ अख्या अंड्यास २ TBS असे दूध घालायचे. मस्त फुलते. तो फ्रीटाटा असाच बनवते मी भाज्या टाकून. हवे तर बेक करा.

मोड यायला इतके कष्ट नाही पडतं(वरचे एवढे वाचून वाटले). नुसते धूवून चाळणीत निथळत ठेवले अन वरून एक ओलसर पेपर टोवेल टाकून रात्री ठेवून द्यायचे तसेच चाळणीत खाली बशी ठेवून. मस्त लांब मोड येतात.
मी तर ओवन मध्ये पण कधी नाही ठेवले NJ ला असताना. धान्यच खराब असेल.

एमबी, स्प्राऊट मेकर मोठा नाहीये आकाराने. कुकरपेक्षाही लहानच आहे आकाराने.

Pages