माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुरभी -

आणि नंतर ते खराबच झाल. फ्रिजमध्ये ठेवले होते का?? की तसे ठेऊनही खराब झले?? म्हणजे मला काळजी घ्यायला बरे.. Happy

*****&&&*****
What others think about me is none of my business Happy

ओल्या खोबर्‍याचा किस कसा करायचा? आणी तो भरपूर दिवस ठेवायला काय करायचे?
--------------
नंदिनी
--------------

नंदू, ओल्या खोबर्‍याचा कीस म्हणजे खवलेलं ओलं खोबरं गं. नाहीतर करवंटीपासून कधी कधी नारळ सुटून येतो तेव्हा तो झक्कत किसावा लागतो Proud खोबरं मी हवाबंद प्लॅस्टीकच्या डब्यात घालून फ्रिझर मधे ठेवते. महिना महिना पण रहातं.
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

नंदीनी, ओल खोबर एअर टाईट डब्यात किंवा घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात ठेवून डिप फ्रिजर मधे ठेवल तर एक आठवडा टिकत. फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची.

१. डब्यात भरताना किंवा वापरा साठी काढुन घेताना कोरड्या चमच्याचा वापर करायचा (ओला चमचा किंवा बोटांच्या चिमटीने घेतल तर लवकर खराब होत)
२. अस डिप फ्रिजर मधे ठेवलेल खोबर वापरायच्या २० मि. तरी आधी बाहेत काढून ठेवायचं म्हणजे त्याचा थंड पणा, कोरडे पणा कमी होतो
३. किंवा ठेवतानाच, छोट्या छोट्या डब्यांमधुन ठेवायच म्हणजे जास्त हाताळल जाणार नाही

म्हणजे मल ते खोबरे खवाअय्चे मशिन घ्यावे लागेल बहुतेक. Happy
--------------
नंदिनी
--------------

अगं विळीला असते की खवणी. बाकी 'अंजली' चं मी घेतलं होतं पण एका हाताने नारळाची वाटी त्याच्यावर दाबून धरायची व दुसर्‍या हाताने हँडल फिरवायचं हा प्रकार मला नाही जमत. नाहीतर सोप्पंय! २-३ नारळ आणून टाकायचे व धुणी भांडी करणार्‍या बाईलाच थोडे पैसे देवून खवून घायचे Wink . वेळ नसेल तर अशी अ‍ॅडजस्ट्मेंट करायची.
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

अस डिप फ्रिजर मधे ठेवलेल खोबर वापरायच्या २० मि. तरी आधी बाहेत काढून ठेवायचं म्हणजे त्याचा थंड पणा, कोरडे पणा कमी होतो

मी पण असे करते...पण सगळॅच एकदम वापरले जात नाही आणि सतत थंड गरम झाल्याने शेवटी ते खराब होतेच.... एक उपाय म्हणजे छोटी छोटी पॅकेट्स करुन ठेवणे..

नाहीतर खोब-याच्या वाटीला आतुन मीठाचे बोट फिरवायचे आणि मग फ्रिजमध्ये ठेवायचे (फ्रिजरमध्ये नाही). हवे तेव्हा किसुन घ्यायचे, उरलेल्या वाटीला परत मीठाचे बोट फिरवायचे. (वेळकाढु काम :()

*****&&&*****
What others think about me is none of my business Happy

विळीवर खोबरं खिसायला सोपं जातं त्या मशिनवर खिसण्यापेक्षा.. पण सवय नसेल तर मशिनच वापरलेले बरे..

खोवायचा कंटाळा/ किंवा विळी नसेल तर सरळ नारळ अर्धा करुन, खाली पेपर ठेऊन वरच्या करवंटीवर बत्त्या हाणायचा (फार जोरात नाही हा नाहीतर फरशी तुटायची) म्हणजे तुकडे होतात खोबर्‍याचे, मग ते मिक्सर मधुन काढायचे (थोडे बारिक/ काचर्‍या करतो तसे करुन टाकायचे मिक्सर मधे नाहीतर खडखड खुप होते)

अश्विनी १ म. खरच टिकत का? मी नाही ठेऊन बघितलय इतक?

विळीवर खोबरं खिसायला सोपं जातं त्या मशिनवर खिसण्यापेक्षा.. पण सवय नसेल तर मशिनच वापरलेले बरे..>>. तात्या एकदम सहमत

टण्या, पण त्यात जाम वेळ जातो आणि वाटी धरलेला डाव्या हाताचा पंजा पटकन सरळ होतंच नाही, तो कॉन्वेक्सच रहातो.
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

वाटी धरलेला डाव्या हाताचा पंजा पटकन सरळ होतंच नाही, तो कॉन्वेक्सच रहातो. <<< :d

लालू, भारी नमन केलैस. :d

मिक्सरमधून काढायचा उपाय सोपा आहे, पण त्यात खोबर्‍याची साल म्हणजे ते मागचे काळे पण बारीक केले जाते आणि खोबर्‍यात मिक्स होते. त्याने खव पांढराशुभ्र दिसत नाही. 'सुगरण' बाई जेव्हा खोबरे खवते तेव्हा त्यात एकही काळा कण दिसत नाही म्हणे! त्यामुळे सुगरण बनायच्या प्रयत्नात असशील तर ही युक्ती नको. Happy
----------------------
एवढंच ना!

अग एक खवणी मिळते, विळीवर असते ना तशीच, हातात धरायची. त्यानी मस्त खवता येतं. नवर्‍याला देवु शकतेस करायला. टीव्ही बघत बघत मस्त खवला जातो. नारळाच्या वड्या करायच्या असल्या की आई अन मी भावाला द्यायची. तो तर अगदी एक्स्पर्ट झाला आहे आता नारण खवण्यात.

आशु, त्यावर उपाय म्हणुन मी एकदा चक्क त्या तुकड्यांची पाठ आधी सोलाण्याने सोलली बटाट्याची साल सोलतात तशी. पण त्यात वेळ जातो हे बरीक खरे Happy

ती सोलाण्यासारखी हातात धरून नारळाला खाजवल्यासारखं करुन खवायची खवणी ना? ती फक्त मी आयत्यावेळेस (खोबरं तयार नसेल तर) डायरेक्ट पातेल्यातल्या पदार्थात खोबरं घालायचं असेल तर वापरते पण त्याने जरा जाड खवले जाते.
कविता, आत्तापण माझ्या फ्रिझरमधे १ महिन्यापुर्वी खवलेलं खोबरं जस्संच्या तस्सं आहे. फक्त मी ते बाहेर आधी काढून ठेवत नाही. मी आयत्या वेळेसच काढून पाहिजे तेवढे खोबरे सुरी भोसकून कापून काढते (वडी सारखे) आणि परत फ्रिझरमधे ठेवते.
************
परमेश्वराचा संकल्प म्हणजेच आदिमाया, शुद्धविद्या, ललिता, राधा. तर इंद्रियशक्तींच्या सहाय्याने मानव ज्या वासना उत्पन्न करतो व वाढवतो, त्या वृत्ती म्हणजेच्'मन' म्हणजेच मानवी संकल्प म्हणजेच 'माया' - 'अविद्या'.

आशु ह्या विकेंड ला तस ठेवुन बघते आणि तुझी सुरी भोसकून आयडिया ट्राय करते

कोणी वांग (भरताच) भाजलय का मायक्रोवेव्ह ग्रिलर मधे? मी वेगवेगळी कॉम्बिनेशन्स ट्राय केली दरवेळी ते शिजल्या सारख होत साल निघते पण खमंग पणा नाही तेय जो डायरेक्ट गॅस वर भाजल्यावर येतो तो.

लालू, प्रस्तावना एकदम सही! Rofl

खोवलेले खोबरे जास्त दिवस टिकावे म्हणून lalitas यांनी जुन्या मा. बो. वर पुर्वी सांगितल्याप्रमाणे आईसट्रे मध्ये क्युब्स करुन झिपलॉक मधे डिपफ्रिझरला ठेवता येते. त्यामुळे हवे तेव्हा हवे तेव्हढेच वापरता येते.
अश्याच प्रकारे मी नारळाच्या दुधाचे पण क्युब्स करुन ठेवते.

धन्यवाद.. Happy आता हे सर्व प्रकार ट्राय करते. खोबरे चांगले टिकेल की पुढच्या महिन्यात वड्या करेन, या वीकेन्डला करायचा कंटाळा आलाय..
--------------
नंदिनी
--------------

मी तर सरळ ओल्या खोबर्याचे तुकड्यान्चे कवच काढून टाकते. बारिक काप करुन घेते आणी मिक्सर च्या मोठया भान्ड्यात टाकुन हलकेच फिरवून घेते.
अगदी खोवल्या सारखा खिस मिळतो Happy

केदार, रव्याचे अनेक प्रकार बाजारात आहेत. लापशी नव्हे तर त्यापेक्षा कमी जाड असलेले.
अगदी बरिक रव्याला जेवढ्यास तेवढे पाणी पुरते आणि अगदी जाड रव्याला दिड्पट ते दुप्पट पाणी लागते.
पाणी कमी झाले तर गुठळ्या होतात तसेच रवा नीट भाजून घेतला नसला तरी होतात. पाणी उकळले नसले तरी गुठळ्या होतात. जो रवा पाण्यात मिसळतो तो पटकन पाणी शोषून घेतो आणि गुठळीच्या आतल्या रव्याला पाणी न मिळाळ्याने, तो तसाच राहतो. मग साखर घातली तरी त्यात शिरत नाही.
म्हणून साधारणपणे कुठल्या रव्याला किती पाणी लागते ते लक्षात ठेवावे.

सुरभी, टिनमधले पदार्थ शक्यतो ठेवू नयेत. टिन उघडल्यावर हवेशी संपर्क आल्यावर लगेच त्यावर बॅक्टेरियांची प्रक्रिया सुरु होते. तसेच फ्रीजही पूर्णपणे निर्जंतूक असतो असे नाही. अधूनमधून फ्रीज पूर्ण रिकामा करुन स्वच्छ करणे आवश्यक असते. यावेळी कोमट पाण्यात सोडा वा व्हीनीगर घालून सर्व फ्रीज पूसून घ्यावा.

पन्ना, इडलीच्या पिठात सोडा घातला असेल तर रंग असा येतो. पिठ बाहेर ठेवले असेल तर त्यातही कधीकधी बुरशी होते. त्यानेही असा रंग येतो.

लालू, मला तर हि कविताच वाटली होती.

अरे मला पण कोणीतरी उत्तर द्या. मी वांग्याबद्दल विचारलय!

मायक्रोवेव्ह मधे काय साध्या ओव्हनमधे देखील वांगे खमंग भाजले जात नाही ( असा माझा अनुभव ) सर्वात उत्तम भाजले जाते ते कोळश्यावर. थेट गॅसवरही नीट भाजले जाते पण त्याचा रस बर्नरच्या बाजूला ओघळतो. लोखंडी तव्यावर झाकण ठेवूनही भाजता येते.
वांग्याची साले काढून तूकडे त्याला मीठ लावून ठेवायचे. काळा राप निघून गेला कि तूकडे कोरडे करुन शॅलो फ्राय करायचे. अश्या तूकड्याचे भरीत छान लागते.

थेट गॅसवरही नीट भाजले जाते पण त्याचा रस बर्नरच्या बाजूला ओघळतो.>>. अगदी अगदी म्हणुन माय्क्रोमधे ट्राय केले, पण काही मजा नाही आली पुन्हा आपला गॅस बरा म्हणायची वेळ आली. गॅसवर ठेवायला एक जाळी मिळते त्याने थोडा जास्त वेळ लागतो पण बर्नर खराब होत नाही. सध्या तेच करतेय.

तुम्ही दिलेल्या पद्धतीने एकदा करुन बघेन, तुकडे करुन मीठ लाऊन शॅलोफ्राय करुन.

कविता, मलातरी वांगं ओव्हनमध्ये वगैरे भाजलेलं आवडतं नाही. गॅसवरचा जो जळकट खमंग वास वांग्याला येतो त्याची बरोबरी ओव्हन कशी करु शकेल. त्यामुळे माझी तरी जुनी पद्धत झिंदाबाद.

नंदिनी, वड्यांसाठी खोबरं ताजंच खवलेलं घ्यावं असं माझं मत आहे. बाकी भाज्यआमट्यांमध्ये फ्रिजमधलं खोबरं घातलं तरी चवीत फारसा फरक पडत नाही. पण वड्या करताना ताजं खवून वापरलं तर खोबर्‍याचा अंगचा नरमपणा आणि स्वाद त्यात उतरतो. सोलकढीसाठी किंवा इतर कधी नारळाचं दूध घ्यायचं असेल तर फ्रिजमध्ये ठेवून बाहेर काढलेलं खोबरं वापरलं तर त्याचं दूध दाटसर जसं हवं तसं येत नाही.

दिनेशदा मी इडलीच्या पीठात सोडा घातला नव्हता. अन बुरशी पण आली नव्हती. (काल रात्री त्या इडल्या खाऊन आज सकाळी सगळे ठणठणीत आहोत). पहील्या २ घाण्यांना कलर आला अन तिसरा सकाळी काढला तर पांढर्‍या शुभ्र झाल्यात इडल्या Uhoh

नलिनी, नारळाच्या दुधाच्या क्युब्स करायची आयडीया मस्त आहे. मी तशा प्रकारे हिरवी चट्णी करुन ठेवते.

बाप रे. इथे पण गर्दी होते आहे. अजून धागे लागतील. पदार्थ टिकवण्याबाबत एक बीबी होता पूर्वी तसा 'टिकेल का हो?' आणि 'हे करुन पहा', 'कसे करावे?' वगैरे काढले पाहिजेत. Happy
लागतील तसे नवीन तयार करा कोणीही म्हणजे एका ठिकाणी गर्दी होणार नाही.

मस्त आहे आयडीया खोबर्‍याचे क्यूब्ज करून ठेवायची.
पन्ना, तुझीही. हिरव्या चटणीच्या क्यूब्जची.

Pages