माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल अर्धा किलो खव्याचे गुलाबजाम केले. त्यासाठी सहा वाट्या साखर घेऊन त्यात तीन वाट्या पाणी घालून छान एकतारी पाक केला. पण तळलेले गुलाबजाम त्यात सोडल्यावर पाकाची साखर व्हायला लागली. तसेच सगळे गुलाबजाम पूर्ण केले. मग परत एक वाटी साखर घेऊन त्यात एक वाटी पाणी घालून एकच उकळी काढली आणि तो कच्चा पाक त्या गुलाबजाममध्ये ओतला. मग सगळं व्यवस्थित झालं. पण त्या पाकाची साखर का व्हावी?

पाकातले पाणी आटत आले कि त्याची साखर बनणारच. हे नैसर्गिक आहे. ते टाळण्यासाठी त्यात थोडासा लिंबाचा रस टाकायचा किंवा लिक्वीड ग्लुकोज टाकायचा.

म्हणजे पाणी कमी पडलं का?? अर्धा किलो खवा असेल तर पाक तयार करण्यासाठी साखर आणि पाण्याचा पक्का अंदाज काय घ्यायचा?

मंजूडी, मी पाकाबद्दल सविस्तर लिहिले आहे. तिथे पाण्याचे प्रमाण वगैरे आहे.

माझा कूकरात शिजलेला भात पाणी कमी घातलं तर गच्च होतो. म्हणजे एक एक शित दिसतं नाहीत. असे आणि का?

रसगुल्ला करण्यासाठि पनीर केले, पण गोळे पाण्यात टाकल्याबरोबर विरघळुन गेले. Sad काय चुकल असेल? पनीर साठि कोणते दुध चांगले गाईचे कि म्हशीचे ? मी आरेचे गाईचे दुध वापरले होते.

मैदा घातला नव्हता का?
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...

रसगुल्ल्याच्या पनीरसाठी गाईचे, साय काढलेले घ्यायचे.
छान्यातले पानी पुर्ण काढले नव्हते, मैदा वा रवा घातला नव्हता, पाक फारच कच्चा होता, यापैकी एक कारण असणार.

बी, मी केलेला भातहि असाच गच्च होतो....
मोकळा भात कसा करायचा???

भात लावताना तांदळात पाणी थोडे कमी घालायचे आणि अर्धा चमचा तेल टाकले तरी मोकळा भात होतो. Happy

रसगुल्ला करण्यासाठि पनीर केले, पण गोळे पाण्यात टाकल्याबरोबर विरघळुन गेले. काय चुकल असेल? पनीर साठि कोणते दुध चांगले गाईचे कि म्हशीचे ? मी आरेचे गाईचे दुध वापरले होते.>>>>>>
मी रसगुल्ले असे करते,१ लिटर (गाई)दुधाला १ लिंबू वापरुन पनीर करते,पनीर ५ ते १० मिनिटे कपड्यात बांधुन ठेवते,तोपर्यंत कुकरमध्ये २ कप पाणि आणि १ कप साखर टाकून उकळवायला ठेवते.
पनीर अगदीच कोरडं करायचं नाहि.थोडं गरम असतानाच हलक्या हातानं मळुन घेते.मग त्याचे गोळे करुन कूकरमधे टाकते,(गोळ्यांना चिरा पडता कामा नये).१ शिट्टि झालि कि गॅस बंद करुन ५-१० मिनिटात रसगुल्ले बाहेर काढुन फ्रिजमध्ये ठेवुन दुसरयादिवशि खाते Happy

नाहि मी मैदा किंवा रवा टाकला नव्हता. त्याचे प्रमाण द्याल का ?
रुपा, १ लिंबू वापरुन पनीर आंबट तर होणार नाहि ना आणि तुझ्या कृति प्रमाणे केल्यावर बाहेरच्या सारखे सॉफ्ट होतात ना?

नाहि होत आंबट्.खरतर्,मी पनीरचा जाड थर जमेपर्यंत लिंबु पिळते,तेंव्हा १ लागतेच्,
पण छान होतात्.काल केले तेव्हा चुकुन पनीरमधिल जास्त पाणि काढलं,पनीर खुप कोरडं झालं,गोळेच होत नव्हते.मग मागे मनुस्विनिने सांगितल्याप्रमाणे १ वाटिला १ चमचा रवा घालुन मळले.छान झाले.

व्हेज्-कटलेट खुट्खुटित होण्यासाठी काय करावे?मी केलेले कटलेट चविला चांगले होतात पण सैल आणी मऊ पडतात्.गार झाल्यावर हे कटलेट अगदिच
अलवार बनतात.कुणि चांगलिशी रेसिपि देवु शकेल का?

तू वेज कटलेट मध्ये काय काय टाकते त्यावर अवलंबून आहे खुटखुटणे. Happy
बीट,गाजरं टाकतेस का? कशी टाकतेस? म्हणजे किसून शिजवून वगैरे?
इथे आहे एक रेसीपी माबोवर.

मने! मी भाज्या जस गाजर्,फरसबी,मटार्,कॉलिफ्लॉवर्,कोबि ई बारिक कापुन किंचित तेलावर परतुन घेते मग गार झाल कि उकडलेले बटाटे smashकरुन टाकते.बाकी मिठ,मसाला टाकुन कटलेट करुन शॉलो फ्राय करते.
मला भारतिय रेस्टॉरंट स्टाईल व्हायला हवेत जरा जाड आणी वरतुन छान क्रिस्पि होणारे..आता सांग काय टिप्स आहेत तुझ्या??

प्राजे,
मी गाजरं,बीट,फरसबी तिरकी कापलेली तुरे नुसते जरासेच मायक्रोवेव मध्ये वाफवून घेते, शिजवायचे तर अजिबात नाहीत.मटार व कॉलीफ्लॉवर वेग वेगळे वाफवून(२ एक मिनीटेच) नुसते ठेचून घेते. बटाटे अर्धे कच्ची उकडवून किसून टाकते. कोबी नाही टाकत,नरम पडतो व पाणी सोडतो(हे एक कारण झाले नरम पडायला). सगळे मिक्स केले की कोरडी आले,लसूण चटनी, पुदीना किंचितसा(चव मस्त लागते) बारीक करून, कोथिंबीर वगैरे,चाट मसाला, दुसरा जो काही मसाला असे झाले मिक्स की किंचित एक चमचा कॉर्नस्टार्च टाकते(भरपूर नाही), मग चपटे बदामी आकारात कटलेट केले की पुन्हा किंचित कॉर्न स्टार्च मध्ये घोळून व ज्यास्तीचे झाडून कटलेट तापलेल्या तव्यावर टाकते. (हि बहुतेक हाटलातील रेसीपी आहे). चेंबूरचे एक फेमस हॉटेलचे मालक स्वत असे बनवायचे.

(हि रेसीपी नाहे दिलीय, फक्त टिप आहे. जरा मोठी झालीय टिप ):)

प्राजक्ता
तू कटलेट तळण्यापूर्वी साधा रवा किंवा मक्याचा जाडसर रवा (polenta नावाने मिळतो) यात घोळवुन नाही का घेत?
त्यामुळे चांगले क्रिस्पी होतात.

रुनि मी रव्यात घोळते आणि मिनोति प्रमाणे ब्रेड्क्रमही घालते पण, मनु म्हणते तस बहुतेक कोबि घातल्याने मिश्रण सैल होत आणी अपेक्षित चव येत नाहिये.
आता पुढिल वेळेस या टिप्स फॉलो करुन बघते.
सगळ्यांना धन्यवाद!

मी कटलेट करताना त्यात थोडा भातही टाकते अन ब्रेड्चा पांढरा भागही. आवडत असेल तर तळण्या आधी कटलेट अंड्यात बुडवून ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून तळले तर अगदी खुटखुटीत होतात.

लोखंडी कढईत करतेस का भाजी? त्याने काळपट पडते.
भाजीत हिरवी मिरची घाल (तिखट घालत असशील तर त्या ऐवजी) आणि हिंदालियमच्या कढईत कर.. छान हिरवी होईल भाजी.

मंद विस्तवावर करावी. अन गोडा मसाला घालू नये, त्याऐवजी धनेजिरेपूड घालावी. कढीपत्ता मिरची फोडणीत घालून परतून परतून केली की मस्त होते.. Happy

वा वा 'जिव्हा'ळ्याच्या गोष्टी चालल्या आहेत का? आम्हाला पण बरंच शिकायला मिळेल... हा धागा सुरु केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! प्रस्तावना जबरीच!

आवडत असेल तर सगळ्यात शेवटी वाफ देण्यापुर्वी थोड साजुक तुप सोड मस्त लागतात>> रवा साजुक तुपातच खमंग भाजून घेतला की आणखीनच चविष्ट लागतो...

दोनदा उपम्याचं 'कल्याण' करून झाल्यावर तिसर्‍या वेळेस इरेला पेटून असला बहारदार केलाय ना...
पदार्थ बिघडल्यानंतर पुढच्या वेळी खुप छान होतो हे माझं प्रामाणिक मत! Happy (आणि मी प्रत्येक वेळी पदार्थ बिघडला की हे गंभीर चेहर्‍याने माझ्या नवर्‍याला पटवून देते Lol )

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

Pages