माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
माझा आलु
माझा आलु पराठा कायम फाटतो नि सारण बाहेर येऊन सगळे चिकट होते..मी शिजवलेला बटाटा किसुन, मग त्याला फोडणी देऊन, पुदिना, कोथिंबीर घालुन वरखाली करुन ,एक वाफ काढते..असे सारण तयार करते...थोड सारण घालुन पराठा नाही लाटता येत, मोठा करताना/लाटताना फाटतो...सारण तयार करायला चुकतय? का लाटायला??
तुला पोळी
तुला पोळी लाटून त्यात सारण भरलेलाच पराठा आवडतो का? तसं नसल्यास असं करुन बघ. मी अशा पद्धतीनेच करायला लागलेय हल्ली.
बटाटा उकडून किसून घे. कांदा बारीक चिरुन घे. बाकीही जो मसाला हवा असेल तो ही तयार ठेव. एखाद-दीड चमचा तेल तापव. त्यात किंचित जिरं,हिंग्,हळद घालून फोडणी करुन. त्यात बारीक चिरलेला कांदा,किसलेला बटाटा घालून परत. एक वाफ काढ त्यात हवे असलेले मसाले,कोथिंबीर वगैरे घालून पुन्हा एक चांगली वाफ काढ. आणि गॅस बंद करुन सारण गार कर.
एकीकडे कणकेत मीठ, हिंग, हळद, लाल तिखट वगैरे मिसळून घे. आणि वरील सारण गार झालं की त्यात घालून अगदी किंचित पाणी घालून घट्ट कणिक भिजव. आणि लगेच पराठे लाटलेस तरी चालेल.
(मी ह्यात किसलेलं पनीर, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली फरसबीही घालते)
सायो मी
सायो मी सगळे पराठे तुझ्या पद्धतिनेच करते कारण मला सारण भरुन पोळी लाटता येत नाही, सारखी फुटते.
सारण भरुन पोळी फुटते म्हणुन तसे केले जात नाहीत, आणि तसे केलेच जात नाहीत म्हणुन सरावाअभावी स्टफ्ड पराठे करता येतच नाहीत. हेच चक्र चालू आहे. सराव करायला हवा.
मला
बटाटा
बटाटा उकडून घेतला असेल तर पुन्हा वाफ द्यायची गरज नाही. तसंच हे सारण थोडं आधी करून ठेवलं म्हणजे जरा कोरडं होतं. मग कणकेत थोडं बेसन घालून नेहमीपेक्षा जरा घट्ट भिजवली की झालं.
घट्ट की
घट्ट की सैल?
सैल हवी ना कणीक म्हणजे मग लवकर पसरेल पोळी. पुरणपोळीसाठी सैल मळतात ना. की ते वेगळं आणि हे वेगळं.
बरोबर आहे
बरोबर आहे स्वाती. कणिक सैल भिजवली गेली असेल तरीही लाटताना पराठे फाटतील.
छोटी पोळी
छोटी पोळी लाटुन त्यात भरपुर सारण भरुन वरतुन बंद करायचं आणि बंद केलेला भाग वर ठेऊन पराठा लाटायचा खालुन पिठ जरा जास्त टाकायचं, अजिबात फुटत नाही. जास्त सारण भरल्याने सगळीकडे एक सारखं पसरतं.
कणिक खुप
कणिक खुप सैल पण नको आणि खुप घट्ट पण नको, कणिक नेहमी आतिल सारणाच्या कन्सिस्टंसीप्रमाणे भिजवावी.
कणिक खुप
कणिक खुप सैल पण नको आणि खुप घट्ट पण नको, कणिक नेहमी आतिल सारणाच्या कन्सिस्टंसीप्रमाणे भिजवावी.>>> सहमत..
उंडा भरुन फुटत असेल तर दोन पुर्या लाटाव्या त्याच्यामधे सारण ठेवुन कडा जुळवाव्या मग लाटावे, शक्यतो फुटत नाहि याप्रकारे केल्यास(पण, सारण अगदि कडे पर्यंत नाहि जात)
रुनी ने
रुनी ने सांगितलेल्या प्रकारे साबूदाणा भिजवायचा प्रयत्न केला. प्रयत्नच म्हणावा लागेल. रुनीने सांगितलं होतं की साबूदाणा बरोब्बर एक तास पाण्याने काठोकाठ भरलेल्या भांड्यात भिजवावा. मग सगळं पाणी काढून टाकून भांडे ३-४ तास झाकून ठेवले की हमखास चांगला भिजतो. मी पण साबूदाणा पाण्याने काठोकाठ भरलेल्या भांड्यात भिजत घातला. पण मग निवांतपणे ३-४ तास झोप काढून उठलो. तेव्हा कुठे भांडंभर पाण्यात भिजत घातलेल्या साबूदाण्याची आठवण झाली. मग काय.. जीरे आणि मीठ टाकून साबुदाणा सूप प्यायला लागलं. असो.. 'मी केलेला वेंधळेपणा'मधे टाकायला पाहीजे पण तिथे संदर्भ लागेल की नाही म्हणून इथं टाकलं.
आलू पराठा साठी कणिक घट्ट मळून घेतो मी आणि भरपूर सारण भरतो. बिलकूल तूटत नाहीत पराठे किंवा सारणही बाहेर नाही येत.
पुढच्या
मग लगे हाथ
मग लगे हाथ साबुदाण्याचा पापड्या करायच्या की. हा.का.ना.का.
आणि त्या
आणि त्या पापड्या काय पावसात वाळवायला ठेऊ?
त्या पेक्षा सूपच चांगलं.. जिर्याचा स्वाद उतरलेलं गरम गरम सूप म्हणजे काय स्वाद वर्णावा महाराजा!
वाफवलेल्या साबूदाण्याच्या पापड्या आठवतात का कुणाला? एक पापड जरी तेलात टाकला की भराभर फूगून अख्खी कढई भरून जात असे. आणि त्यातही जिरे टाकले जात असंत. तळल्यावर ते पापडही एकदम मस्त लागतात. आमच्याकडे तर फक्त मला आवडतात म्हणुन बनवले जातात!
दिपाली,
दिपाली, कणकेत थोडा मैदा मिसळ म्हणजे अजिबात फाटणार नाही. अर्थात बटाट्याच मिश्रण कोरड असावं.
मी इथे दही
मी इथे दही लवण्याचा अनेक वेळा असफल प्रयोग केला आहे.
कोमट दुध्,मुद्दाम इन्डियन सटोअर मधून आणलेल्या दह्याच विरजण,ओव्हन मधे ठेवण इ इ.पण जमुन येतच नाही.घट्ट पणा च नसतो.आम्बट तर आजिबातच होत नाही. अस का बर होत मला सन्गाल का प्लिज.
दूध पातळ
दूध पातळ आहे का ? पावडरचे दूध वापरता का ? आंबटपणा येण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. साधारण थंड हवामानात सात आठ तास लागतील. तूरटी वापरुन बघितली का ? त्याने दही खात्रीने घट्ट जमेल. विरजण घातले कि तूरटीचा खडा मिश्रणातून सात आठ वेळा गोल फिरवायचा.
तोशावी,
तोशावी, माझे ४ पैकी २ प्रयोग सफल आणि दोन असफल झाले आहेत. पहिले दोन सफल प्रयोग ऑरगॅनिक दूध(होल) आणि ऑरगॅनिक दही (लो फॅट) वापरुन केले. आणि असफल प्रयोग ऑरगॅनिक दूध आणि एकदा देसी दही(होल) आणि ऑरगॅनिक दही (होल्+क्रिम ऑन टॉप) वापरुन केलेत.
सफल प्रयोगः दूध उकळी येण्यापूर्वीच बंद करुन साधारण गार केलं. अगदी कोमट नाही. त्यात छोटा चमचाभर दही घालून १८०फॅ . ला प्रिहिट करुन बंद केलेल्या ओव्हनमध्ये लाईट लावून रात्रभर ठेवलं. दुपारी बाहेर काढून फ्रिजमध्ये ठेवलं.
असफल प्रयोगः देसी दही वापरुन केलेल्या प्रयोगात दही झालंच नाही. दोन दिवस ठेवूनही लिक्वीडच दिसत होतं म्हणून शेवटी फेकून दिलं. बहुतेक मी जरा जास्तच गरम दुधात दही घातलं असावं असा अंदाज.
दुसर्या वेळी (क्रिमी दही) केलेल्या प्रयोगातही दही झालं पण टेक्श्चरही क्रिमीच आलं.
मी व्होले
मी व्होले मिल्क च लवते,पण सध्या,ऑरगॅनिक दूध नहि वपरल,वपरुन बघते,
तुरटी चा प्रयोग ही मस्त वाटतोय.....
प्रयत्ने वाळुचे........................
दिनेश, ही
दिनेश, ही तुरटी इथे मिळते की नाही काही कल्पना नाही. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये?
तूरटी
तूरटी म्हणजे Alum. किचनच्या भाषेत काही वेगळा शब्द असेल तर कल्पना नाही.
चायनीज
चायनीज दुकानात बघीतली आहे मी तुरटी विकायला.
देशी
देशी दुकानात पण पाहिली आहे. पण हिंदी नाव आठवत नाहीये.
पराठा
पराठा लाटताना सारण भरलेला उंडा किंचित पीठ लावून हातानी पसरायचा... भाकरीचा दोन्ही हातावर थापतात तसा. सारण कडापर्यंत पोचते आणि शक्यतो पराठा फाटत नाही.
--------------
नंदिनी
--------------
@
@ दिपाली,
आलु पराठ्यासाठी ... आलु पराठा करण्यासाठी बटाटे उकडुन फ्रीजमध्ये कमीत कमी १ तास (आदल्या दिवशी ठेवले तर अधिक चांगले ) ठेवायचे आणि नंतर सारण बनवुन पोळीत भरायचे. सारण बाहेर येणार नाही
ही माझी युक्ति आहे
(चुकुन शोध लागलेली.)
मी बटाटे उकडुन सरळ हातानेच कुस्करते आणि त्यात हवे ते जिन्नस टाकुन पराठे बनवते. त्यातल्यात्यात हाच एक पदार्थ आहे की जो माझा कधीच बिघडत नाही आणि माझ्या हातचा सगळ्यांना आवड्तो (हं सगळ्यांना म्हणजे अगदी साबांना सुद्धा
)
...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...
तुरटी ला
तुरटी ला हिंदीत 'फिटकरी' म्हणतात.
**********************
उडियो ना डरियो
कर मनमानी..
आलू
आलू पराठ्याबाबत प्रिन्सेसने सांगितलेले बरोबर आहे. बटाट्याच्या सारणात पाण्याचा अंश जास्त राहिल्यास पराठा नीट लाटता येत नाही. त्यासाठी,
१.बटाटे उकडल्यावर लगेचच कूकरमधले काढून पाणी निथळून घ्यायचे,तसेच थंड होऊ द्यायचे. आणि तासाभराने मग सारण बनवायचे. कटलेटसाठीही असेच करायचे.(इति: आमच्या मेसचा कूक.)
२.सारण आधी बनवून ठेवणार असशील तर त्यात मीठ न घालता बनव. ऐनवेळी मीठ घाल.
३.माझ्या एका पंजाबी मैत्रीणीने सांगितल्याप्रमाणे बटाटा अगदी गिच्च न शिजवता अंमळ कच्चाच ठेवायचा.
एकंदरीत काय तर सारण गिच्च न होता जरा सुटेसुटे बनवायचे.
तरीही जमले नाही तर उंडा न बनवता आधी एक छोटी पुरी बनवून घे, मग दुसरी पुरी लाटून घे. त्यावर सारण पसरून पहिली पुरी त्यावर ठेवून सगळीकडून नीट दाबून घे आणि लाट. मी सुरुवातीला पुरण पोळीही अश्शीच बनवायचे.
**********************
उडियो ना डरियो
कर मनमानी..
तुरटीला
तुरटीला इंग्रजी मधे अॅलम आणि हिंदीत फिटकरी म्हणतात. बॉक्साईट आणि सल्फ्युरिक अॅसिड च्या प्रक्रियेने ती तयार होते. तिचे अनेक उपयोग आहेत. दाढी केल्यावर जंतूनाशक म्हणूनही ती वापरता येते. तूरटी वापरुन पनीर करता येते. चण्याची डाळ तळताना जर ती भिजवताना तूरटी वापरली तर डाळ हलकी होते. बटाट्याचा किस पण हलका होतो.
आणि अर्थातच मु़ख्य उपयोग, पाणी शुद्ध करण्यासाठी होतो.
आणि चायनीज दुकानात असेल तर ती स्नेल ( गोगलगाय ) सारखे प्राणी साफ करण्यासाठी असेल.
Thanks all.... सॉरी,
Thanks all....
सॉरी, हे लॉग-इन मी वापरत नाही....आता चुकुन प्रपिसाद लिहिला गेला ह्यातुन....
सायोनारा,
सायोनारा, स्वाती, प्रीती, अविकुमार, प्राजक्ता,आर्च, नंदिनी, प्राची,
सगळयांचे आभार.....
चला आता पुन्हा trail n error..
Thanks Friends...
Pages