माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झ़क्की, आलेपाक आणि आल्याच्या वड्या ह्यात काय फरक आहे? मला माहित नाहि म्हणून विचारतेय.
आल्याच्या वड्या चालणार असतील तर होल फूडस मध्ये 'क्रिस्ट्ल जिंजर' म्हणून मिळतात ह्या वड्या. चांगल्या आहेत चवीला.

झक्की माबोवर कृती नाहीये का? नसेल तर माझ्याकडे कृती आहे ती थोड्यावेळाने टाकते.
माझीपण साबुदाण्याची खिचडी नेहमी बिघडायची यावर माझ्या बहीणीने सांगीतलेला उपाय करते. त्यानंतर एकदाही अगदी चुकुनही खिचडी बिघडली नाही.
साबुदाणा धुवुन एका मोठ्या भांड्यात घ्यायचा. त्यात थंड पाणी काठोकाठ भरायचे. बरोबर एकच तास तसे ठेवायचे. मी नेहमी एक तासाचा टायमर लावते साबुदाणा पाण्यात भिजत घातल्यावर विसरु नये म्हणुन.
नंतर पाणी पूर्ण काढुन टाकायचे आणि साबुदाणा झाकुन ठेवायचा. साधारण २ तास तरी ठेवावा. जास्त वेळ ठेवला तरी फरक पडत नाही.

रुनी, माझ्या मावशीचीही हिच पद्धत आहे.

<<आलेपाक आणि आल्याच्या वड्या ह्यात काय फरक आहे? >>
असे कठीण प्रश्न विचारू नका मला. मी फक्त खातो! चांगले लागले, करायला सोपे असले, नि बायकोला करायला वेळ नसला तर करून पहाण्याचा इरादा आहे. फक्त पसारा नि भांडी जास्त लागणार नाहीत ना?

माझे एक पुणेकर मित्र आहेत, ते बसल्या जागी घट्ट दह्यात चमचा बुडवून ढवळून, पात्तळ करून सोडतात, वेळ जावा म्हणून. चवीत तर काही फरक पडत नाही ना, मग करायचे काय घट्ट दही?

त्यापेक्षा आलेपाक किंवा आल्याची वडी केलेली काय वाईट?

रैना, सायोनारा, रुनी, दिनेशदा धन्यवाद, दिनेशदा, बारिक असलेला साबुदाणा घरात कुणालाच आवडत नाही. मी आपला नेहमीचाच वापरते.तुम्ही सर्वानी लिहिल्याप्रमाणे प्रयत्न करेन आता.

.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/82315.html?1163111231

झक्की काका आलेपाकाची रेसीपी इथे सापडेल पहा. आणि हा उद्योग करु नका हा एक सल्ला पण! कारण कमीत कमी एक पातेले, १ चमचा येवढे तरी कचर्‍याच्या टोपलीत जाईल याची गॅरंटी. दह्यात चमचा घालुन मोडण्याइतके सोपे नाही Wink

दिवे घ्यालच!

झक्की,
अगदी सोपी कृति, जेवढी पेस्ट घ्याल तेवढीच साखर घ्या. दोन्ही एकत्र करुन जरावेळ ठेवा. मग कढईत थोडेसे तूप टाकून मिश्रण शिजवत ठेवा. पहिल्यांदा अधुनमधुन व नंतर सतत ढवळत रहा. थोड्या वेळाने गोळा जमू लागेल. तसे झाले कि ताटात ओतून घ्या. ताट आपटुन मिश्रण समपातळीत आणा. थंड झाले कि वड्या कापा. यात साखर जास्त वाटली तरी वड्या टिकतील.
जास्त चवदार आणि कमी टिकाऊ वड्या हव्या असतील तर साखर पाउणपट घ्या व पाव वाटी साय किंवा दूध पावडर घ्या. बाकि कृति तशीच.
आलेपाकाची सविस्तर कृति आहे मायबोलीवर. हि खास तूमच्यासाठी.

नमस्कार झक्की,

तुम्ही अजुन आलेपाक/वड्या केल्या नसतील तर एक सजेशन...

बाटलीतल्या आल्याच्या, वड्या करू नका....त्यात प्रिजर्वेटीव्ह असते, त्यामुळे वड्यांना एकप्रकारचा वास येतो...स्वानुभव......:(

काल मी पहिल्यांदाच घरचं दही करायला रात्री दूध बर्‍यापैकी गरम करुन(उकळायच्या आधीची स्टेज) करुन जरा कोमट झाल्यावर एक ते दीड टीस्पून दही घालून विरजण लावलं. एकीकडे ओव्हन १८० फॅ. ला प्रीहीट करुन बंद केला व त्यात हे विरजण लाईट लावून ठेवलं रात्रभर. अजूनही घट्ट दही लागलेलं वाटत नाहीये. हलवल्यावर हलतंच आहे. तर आता माझं काय चुकलं असावं?

सायो विरजायला दही कुठलं वापरलंस? इथल्या योगर्ट मधे अ‍ॅक्टिव कल्चर्स नसतात. २ दिवस ठेवलंस तरी नाही लागणार दही. Happy विरजणासाठी माझ्या सौदिन्डियन मैत्रिणी भारतातून दही घेऊन आलेल्या आहेत अन ती कल्चर्स त्यांनी वर्षानुवर्षे जगवलेली आहेत!! अर्थात मी असल्या फंदात पडले नाही अजून पर्यन्त.

इथलंच ऑरगॅनिक वापरलं. लोकं भारतातून दही/विरजणं घेऊन येतात हे माहितेय मला. पण मग ह्यावर दुसरा काहीच उपाय नाही?आणि मी लावलेलं दही घट्ट वडी पडत नसली तरीही खाण्याच्या लायकीचं नाही का?

इथे देशी दुकानात देशी दहि म्हणून जे मिळतं त्याने चांगलं लागतं विरजण . किंवा देशी रेस्टॉरंटमधून वा इतर देशी लोकांकडून घ्यायचं. यालाच प्रॉपोगेटिंग द इंडियन कल्चर म्हणतात Wink

ग्रीक दही मिळत. क्रोगर किंवा व्होल फुड मध्ये त्यान सगळ्यात मस्त लागत दही.
सायो horizon च फुल्ल fat दही वापरले असेल तर लागायलाच पाहिजे दही. मी मेथड लिहिली आहे ती वापरुन पाहिलीस का?

आता त्या न लागलेल्या दह्याचे लागलेले दही कसे करायचे हे मात्र कोणीच सांगत नाहीये Happy

मिष्टी दोय करून टाक. equal quantity मध्ये ते दही, condensed milk आणि दूध घालून २५० वर बेक कर केशर, वेलची घालून. श्रिखंडासारख होईल बघ. बदामाचे भिजवून सालं काढून कापपण घाल. मस्त स्वीट डिश.

नाहीतर सरळ मँगो लस्सी. (जर ते खराब झाले नसेल तरच दही वापर. नाहीतर असे न लागलेले दह्याला एक वेगळाच भयानक वास जाणवतो मला). Happy

अजून माझ्या अर्धवट, न लागलेल्या दह्याची एवढी भयानक वासमारी अवस्था झालेली नाहीये. त्या दह्याला बाहेर काढून अजूनही वठणीवर येण्याचा एक मौका मी देतेय.
पुढच्या वेळेपासून देसी स्टोअरचं दही आणून करुन पाहीन.
सीमा, होरायझनचं लो फॅट दही होतं.
आर्च, गोडाचं नावही काढू नकोस. फ्रिजमध्ये खीर लोळतेय अजून परवाची.

त्या पुस्तकांसारखी विरजणं इथून तिथे मेल होऊ शकत नाहीत का? Wink

सायोनारा, मझ्याकडे हल्ली दही २ ते अडीच दिवसात लागते.. तोवर नाही लागत आणि मस्त लागते. तरी मी ओव्हन गरम पण करत नाही.. तर त्याला अजुन चान्स दे १ दिवस.

नाही, इथल्या स्टोअरमधले दही विरजण म्हणून वापरले असेल तर आठवडाभर ठेवलेस तरी लागणार नाही. आजच बाहेर काढ आणि पर्यायी पदार्थ करून टाक.
देशी विरजणाचे दही योग्य पद्दतीने लावल्यास, चार तासात लागायला हवे. उकळवून मग बोटाला सोसवेल इतक्या गरम दुधात देशी विरजण घालून खूप हलवायचे आणि ओव्हनमध्ये (ओव्हन गरम करायची गरज नाही) लगेच झाकण लावून ठेवले तर रात्री लावल्यास सकाळपर्यंत अतिशय घट्ट कवडीसारखे दही लागते. (गेल्या दहा वर्षांचा अनुभव) Happy

दही घालून दूध ढवळून घ्यायचं असतं? मी दही घालून लगेच डबा बंद केला न हलवताच Sad

अग शोनूने मागे लिहीले होते ना की तिने अवचटांच्या पुस्तकात वाचले म्हणून की दूधात विरजण घातल्यावर एकाच दिशेने ५०-६० वेळा चमच्याने ढवळायचे

अग त्या विरजणावर इतक्या पोस्ट होत्या की मी महत्वाचं तेच विसरले Proud

काल भात आणि मुगाचं वरण लावलं होत कुकर मधे , भात तीन शीट्ट्यातच शिजला पण मुग (दाळ नाही) नाही शिजले . मग परत आठ-दहा शिट्ट्या होऊ दिल्यावर थोडे शिजले , पण पुर्ण शिजले नाहीत . वरण लावताना त्यात अजून काही टाकतात का तीन-चार शिट्ट्यात शिजण्यासाठी ?

(सध्या घरी एकटाच असल्यामुळे स्वयपाकाचे प्रयोग चालू आहेत Happy )

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

डाळ शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे कुकरला लावायच्या आधी थोडा वेळ भिजत घालून पहा.

ह्म्म्म अस आहे का !
आता ह्यापुढे तसच करीन , धन्यवाद Happy
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

दीप, तू मुग दाळ नाही ना लावली कुकरला, अख्खे मुग लावलेस ना? जर अख्खे मुग (शाबुत हिरवे मुग) लावले असशील तर ते तुला आधी तीन चार तास तरी भिजवायला हवेत आणि नंतर कुकरमध्ये शिजवायला हवेत. नाहीतर दगड शिजतील आठदहा शिट्ट्यात पण कडधान्य नाही Happy

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

हो मी आख्खे मूगच लावले होते ! कळली चूक Proud

नाहीतर दगड शिजतील आठदहा शिट्ट्यात पण कडधान्य नाही >> Lol अगदी ...
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

दीप,
मूगाची डाळ शक्यतो गॅस वरच शिजवावी. शिजवायच्या आधी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवायची. मग पातेल्यात डाळ आणि त्याच्या साधारण अडीचपट पाणी अस गॅस वर ठेवायच. मध्यम आचेवर डाळ शिजवायची. मधुन मधुन वरती आलेला फेस काढुन टाकायचा आणि डाळ एकदा घोटायची. वरचा फेस काढुन टाकल्यामुळे डाळीचा उग्र वास कमी होतो. अश्या पद्धतीने डाळ लवकर शिजते.

Pages