मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या.. मागच्याच मार्च मधे श्रद्धाने टारफुला वर लिहीले होते..
http://www.maayboli.com/node/1473

नाव वेगळं असल्यामुळे लक्षात राहीले आहे हे पुस्तक.. वाचले पाहीजे..

सध्या मी ही अधर्मयुद्ध वाचतो आहे. तेलियाने पण आणले आहे. '...इतिहास' आधीच वाचले होते आणि आवडले ही (जुन्या हितगुज वर लिहीले होते त्याबद्दल). अधर्मयुद्ध ही वाचनीय दिसते.

मी सध्या मीना प्रभूचं 'इजिप्तायन' वाचते आहे. सुंदर लिहिले आहे. प्रवासाची आवड असणार्‍या सर्वांना आवडेल. मला मीना प्रभूची सर्वच पुस्तकं वाचायची आहेत.

~~~
A day without laughter is a day wasted!

हं अधर्मयुद्ध परवा पाहिले होते पण त्याऐवजी प्रवीण दवणेंची २ पुस्तके घेऊन आलो... अधर्मयुद्ध कसे आहे?
bsk,
टारफुला त्या लिंक वरून तरी छान वाटतय

कालच जयवंत दळवींचे प्रदक्षिणा वाचले..मला आवडले..

नाटककार आणि त्याच्यावर भाळुन आपले शिक्षण अर्धवट सोडलेली नायिका, तिला कायम वाटत असलेली त्याबद्दलची हळहळ, पुढे तिच्या मुलीच्याही नशिबी तशीच परवड वगैरे खुप काही आहे त्यात..

नाती खुप नीटपणे मांडली आहेत. आधी वाचलेल्या त्यांच्या कादंब-यात काही गोष्टी परत परत येताहेत असे कधी वाटले पण ह्या कादंबरीत काही वेगळेच वाटले. वाचताना मी एवढी गुंतुन गेले होते की नायिका घरातुन पळुन जाते हे वाचल्यावर थोडा वेळ पुस्तक बाजुला ठेऊन मी हळहळत बसले.. जणु माझ्या जवळचेच कोणीतरी अविचाराने घरातुन पळाले होते...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

रमेश इन्गले उत्राद्कर यानची 'निशाणी डावा आन्गथा' वाचली. सुन्दर काद्म्बरी. साक्शरता अभियानाची उडवलेली खिल्ली, त्यातील राजकारण, ग्रामीण जीवन, तेथिल ईरसाल नमुने ह्याचे सुरेख चित्रण. विनोद, उपहास , अनेक गमती जमती ह्यानी भरलेली कादम्बरी. हे पुस्तक सर्वानी जरुर वाचावे.

मलाही आवडले होते निशाणी डावा अंगठा.

पर्व चे इंग्लिश नाव काय आहे? गुगल वर शोधल पण कळल नाही.

'पर्व'चं इंग्रजी भाषांतर के. राघवेंद्र राव यांनी केलं आहे. Parva : A tale of war, peave, love, death, God and man असं त्याचं नाव आहे.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

धन्यवाद... पर्वच नाव आहे का !!!!

होय, पर्वच नाव आहे. कुठल्याही पु.प्रदर्शनात जर साहित्य अकादमी चा स्टॉल असेल तर तिथे मिळते. सूट घसघशीत असते.

आजच डॅडी लाँगलेग्ज वाचल... छान पुस्तक आहे. अनाथाश्रमात राहणार्या जेरुषा ला एक अनामिक विश्वस्त पुढच्या शिक्षणासाठी मदत करतात, आपली प्रगती पत्राद्वारे त्यांना कळवायची ह्या अटीवर. अनाथ जेरुषाची ही पत्र आपल्या डॅडी लाँगलेग्ज ना लिहीलेली ह्या पुस्तकात आहेत.... शेरलॉक होम्स कोण हे सुध्धा माहित नसलेली ही मुलगी उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणून स्कॉलरशिप सुध्धा मिळवते.
खरोखर एक मस्ट रीड.

'प्रोव्होकड' वाचले. सुन्न व्हायला होते. ती गोष्ट २०-२५ वर्षांपुर्वीची आहे. पण आजही या गोष्टी आजुबाजुला घडताहेत हे जाणवुन वाईट वाटतं.
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....

हे टण्याच पार्ल्यातलं आजचं पोस्ट

मी काय वाचतो ह्याचा पत्ता मी आइ-बाबांना कधीच लागू दिला नाही. त्यामुळे शाळेत असताना अनेक ( गोष्टी वाचल्या. सुशि ते नाझी भस्मासूर आणि धारप ते देवधर (भाषांतर झिंदाबाद).. मग १०वीच्या सुट्टीत कोसला मिळाली लायब्रीत. ती वाचून मी पछाडलो. आणि वडिलांना म्हणालो, 'बाबा आपल्या घराच्याच नावाची एक जबरी कादंबरी आहे.' त्यावर ते हसले आणि त्यांनी मला बिढार वाचायला सांगितली
त्याच सुट्टीत एम टी आयवा मारु वाचली. ह्या पुस्तकाचा माझ्यावर जेव्हडे दिवस प्रभाव होता तेव्हडा अजुन कुठल्याही पुस्तकाचा नसेल. ह्या पुस्तकाची लायकी, भाषा वगैरे सगळे माफ होते माझ्यासाठी. त्रयस्थपणे बघितल्यास कदाचित ते मला आवडणार नाही. पण तेव्हा ते आवडले. मी ते पुस्तक दुसर्‍यांदा कधीच वाचले नाही.
मग हळुहळु पेंडश्यांच्या जबरी आणि क्वर्की व्यक्तिरेखा आणि दळवींचे वेडे भेटले. एकदम जीए सापडले कधितरी (स्वामी आणि वीज आणि कैरी आणि तुती झिंदाबाद). गंधर्व सारखे अनवट लघुकथासंग्रह सापडले. माडगूळकर, अरुण साधु, विंदा, आरती प्रभु, खानोलकर, भारत सासणे, अवचट, रेगे (मातृका), उचल्या, आमचा बाप अन आम्ही असे अनेक रथी-महारथी भिडले. संघाच्या बौद्धिकांच्या तयारीसाठी बंच ऑफ थॉट्स, धुमसते बर्फ, इस्रायल छळाकडून बळाकडे हेदेखील वाचले.
साहित्य अकादमीच्या भाषांतरीत पुस्तकात अनेक गुजराथी, पंजाबी, बंगाली, कानडी लघुकथा वाचल्या. राग दरबारी सारखी भारतातली सर्वोत्कृष्ट उपहासात्मक कादंबरी तर अंताजीची बखर सारखी त्याच तोडीची मराठीतली कादंबरी मिळाली. एकदा 'एक सैनिक दोन जनरलांना खाउ घालतो त्याची गोष्ट' असे शीर्षक असलेली आणि अश्या अजुन २-५ कथा असलेले रशियन लघुकथांचे मराठीत भाषांतरीत पुस्तक मिळाले.
मग एकदा पुण्यात लकडी पुलावर १९८४ फुटपाथवर मिळाले. खिशात ५० रुपये शिल्लक राहिले, म्हणुन दुसर्‍या दिवशी पॅसेंजरने मिरजेला गेलो (तेव्हा पॅसेंजरचे तिकीट ३८ रुपये असायचे आणि १४ तास लागायचे). किर्लोस्करवाडीच्या आसपास येइतोवर पुस्तक वाचून झाले होते. मी पुस्तक खाली ठेवले. डब्यात सगळी अधल्या-मधल्या गावात शिरलेली खेड्यातली लोकं भरलेली होती. त्यातल्या एकाने बिडी दिली आणि मी ती शिलगावली. आणि त्या क्षणाला मला खरच मी प्रोल्सच्या वस्तीत बसून रोजची विक्टरी सिगारेट (कागदाच्या सुरळीतून तंबाखू बाहेर सांडणारी) सोडून कामगारांची बिडी पितोय असा भास झाला. कोणत्याही क्षणी एखादी बाई यंत्रावर तयार झालेले गाणे म्हणायला सुरुवात करेल असे वाटून गचकन दचकलो होतो.
मग पुढे गॉडफादर हाताशी आला आणि वेग वाढला. मग रोआर्क, डॉमनिक, वेनंड आणि टूही अनेक दिवस ठाण मांडून बसले होते. पुढे नायपॉल भेटला तर कधी भर तळपत्या उन्हात ओसाड रस्त्यावर उभे असलेले लूत भरलेल्या कुत्र्याचे मुखपृष्ठ असणारे डिसग्रेस सारखे जबरी पुस्तक देणारा कोएट्झी भेटला. थेरॉ तर जबरीच. मॉस्क्विटो कोस्ट ते डार्क स्टार सफारी. हॉटेल होनोलुलु आणि प्रेमभंग अश्या संयोगातून वारी लिहायला देखील सुरुवात केली. मार्क्वेझ, ऑल क्वाएट, ऑन द रोड, कॅच २२ अनेक अनेक.
म्हातारा आणि समुद्र तर खासच. गोल्डिंगचे बेट आणि त्यावरची मुले. ती रुपके. रास्कॉलनिकोव्ह, राझुमिहीन आणि त्यांचा खुळा बाप दस्तोयव्हस्की. तसाच आणि एक येडा चेकॉव्ह.
आणि हो, स्ट्रेंजर, प्लेग, ले मो, बिइंग अँड नथिंगनेस - दुसर्‍याच्या डोक्याचा भुगा करणारे फ्रेन्च द्वय, सार्त्रे आणि कामु. आणि कडी म्हणजे किडा झालेला ग्रेगर साझ्मा.

आठवायला गेलं की अनेक पुस्तकं डोळ्यासमोर नाचायला लागतात. मी पुढे, मी पुढे म्हणत 'एखाद्या जादुच्या कार्यक्रमात जादुगाराने स्टेजवर येण्यासाठी कोण येणार असे विचारल्यावर शाळेतली लहान मुले कशी हात वर करुन पुढे पुढे करतात' तशी अनेक पुस्तके एकमेकांना ढकलून, ढोपराने खुपसुन पुढे पुढे येतात. एखाद्या लेखकाचे हेच तर सर्वोच्च यश नसेल ना?

..

जस्ट ग्रेट Happy

**************************************************
कल रात मेरे हाथ से फिसलकर गिरा था मेरा चश्मा
आज सुबह से दुनिया लकीरों में बँटी दिखती है II
...कहते हैं, काँच और दिल का रिश्ता बड़ा पुराना है II
**************************************************

सुरेख! कौतुकास्पद आहे टण्या!

मित्र आहेत हे आपले, जीवाभावाचे, पुस्तकं आणी लेखकही.
कारण, प्रत्येक पुस्तकात लेखक भेटतोच, त्याच्या जाणीवा, अनुभव, विचार -- जगलेले, पाहीलेले असले तरच ते लीखाण भिडतं. म्हणुनच, बरीचशी पुस्तकं, सिनेमासारखी, पाहील्यासारखी आठवतात, फक्त शब्द नाही!
टण्या, हे वाचनाचं वेड आपलं विश्व कीती समृध्द करतं,
आणि हे मनातलं, मनापासुन लिहीलेलं वाचताना छान वाटलं.
आता, ह्यातली न वाचलेली पुस्तकं शोधुन वाचेन म्हणतो!
आभार.

भालचंद्र नेमाडेंच्या "कोसला" बद्दल इथे काही चर्चा झाली होती का पुर्वी ? असेल तर कोणीतरी लिंक द्या प्लीज .

**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

आपली मराठी मुलगी ऋतुजा दिवेकर लिखित " Don't lose your mind, loose your weight"
या पुस्तकाबद्दल फेमिनामध्ये वाचले. लगेच क्रॉसवर्डमधून विकत घेतले. भरभर वाचून काढले. आता एकदा नीट वाचायचे आहे. या पुस्तकाला foreword करीना कपूरचा आहे. ती आपल्या फिटनेसचे(आणि अर्थातच फिगरचेही(झीरो साईझ!!) सर्व श्रेय या ऋतुजाला देते. फेमिनमध्ये हे सर्व वाचून अभिमान वाटला. पुस्तकातला विचारही चांगला आहे.
पण मला एका ठिकाणी लेखिकेची थोडी गल्लत झालेली आहे असे वाटते. जाणकारांनी आपले मत द्यावे.
ती म्हणते " We have to learn to experience mitahar
. What's that? Mitahar loosely translated means sweet food or diet. "
पुढे पहा संधी कशी सोडवली आहे "mita : sweet and ahar : food"
या पुढील काही वाक्ये हीच चुकीची कॉन्सेप्ट विशद करतात. पुढे पहा"What I am saying that eating should always lead to a 'sweet feeling'. In the manner in which you exclaim, "oh such a sweet boy or oh so sweet! . -----------------Similarly we have to learn to eat only to a point where our experience with food is sweet or pleasent. -----------------To experience this sweetness or mitahar we will need to employ all our senses - tounge,nose, eyes, ears and skin.
या शेवटच्या ओळीतला विचार बरोबर आहे. पण मुळात मिताहार म्हणजे मित + आहार म्हणजेच सीमित(limited)/योग्य तितकाच/थोडा आहार. आपण म्हणतो ना की पोट भरायला दोन घास कमी खावे. आपण मितभाषी या शब्दाची फोड कशी करतो? कमी बोलणारा/री . मित चा अर्थ जर गोड असा घेतला तर मितभाषीचा अर्थ गोडबोल्या असा होईल. जो तसा नाही.
तर असे पुस्तक लिहिताना मराठी मुलीने अशी चूक करावी हे बरोबर नाही. या मिताहारावर हाच अर्थ गृहित धरून तिने एक पूर्ण चॅप्टर लिहिला आहे. ढोबळ मानाने त्यातला विचार बरोबर आहे. पण ही चूक मला खटकली.
जाणकारांनी मत द्यावे.

मी नविन वाचक आहे.. मला चांग्ल्या कादंबरी सुचवा ... अगदि जड डोक्यवरुन जाणार्या नको.

मिताहार आणि मिष्टाहार मधे गल्लत झालीय का ? मिताहार म्हणजे माझ्या मते तरी कमी व मोजून मापून खाणे. मितभाषी, म्हणजे हि कमीच बोलणारा.
तरीपण पुस्तक आपल्या माणसाचे आहे. वाचायला पाहिजे.

हो दिनेश
पुस्तक छानच आहे. खूप चांगल्या गोष्टी सुचवल्यात. उदा. मांडी घालून जेवा, कमोड जास्ती वापरू नका. आपला भारतीयच () वापरा वगैरे. मला वाटते मराठीशी/संस्कृतशी फारशी ओळख नसल्या मुळे / पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून शिक्षण व त्याच प्रकारच्या वातावरणात वाढल्यामुळे कदाचित ही गल्लत झाली असावी.

मी खुप दिवसान्पुर्वी 'दहशतीच्या छायेखाली' नावाचे एक पुस्तक वाचले होते. काश्मीर मधे पन्डीतान्वर (अनुस्वार कसा लिहायचा ?? Sad ) ९० च्या दशकात झालेल्या अत्याचारावर आहे. एका पोलीस अधिकार्‍याला एका घरात एक डायरी सापडते. ती तो त्याच्या एका लेखक मित्राला देतो. त्यावरुन हे पुस्तक लिहिलेले आहे. लेखक बहुतेक सध्या अज्ञातवासात राहतात. वाचताना खुप वाईट वाटते नी रागही येतो. एकदा जरुर वाचण्यासारखे आहे.

अनुस्वार देतांना M किंवा .n वापरा
किंवा= kiMvaa
थांब = thaaMba

अलका मांडके यांचे ह्रदयस्थ वाचलं नीतु मांडके यांचा जीवनपट फारच चांगल्या रितिने उलगड्लाय.

Pages