मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंड्रेला, तेरुओ बद्दल सहमत. ते वनमाळी प्रकरण तर भयानक. वाचवत नाही.

जॉन ग्रिशामचं "रेनमेकर" वाचतेय. जाता जाता : या आधी त्याची "पार्टनर" आणि "टेस्तामेंट" वाचल्यावर आणि तिथे लोक धडाधड खटले भरतात या ऐकीव माहितीमुळे अमेरीकेत सगळे वकील शार्क मधल्या स्टार्क किंवा बोस्टन लिगल मधल्या अ‍ॅलन शोअर(आह!), डॅनी क्रेन आणि मंडळींसारखेच असतात की काय असा प्रश्न पडला होता.

त्यात एक paralawyer आहे एकदम lol joke

मुलुंड आणी भांडुपच्या आसपास कोठे लायब्ररी असेल तर कोनी सांगेल का प्लीज ?

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

वनमाळी प्रकरण दुस्तर हा घाट मधे आहे, तेरुओ मधे नाही.

हो. तेरुओ तील दुस्री गोस्ट ती अ‍ॅड्वाल्या बाइची म्हनून प्रेमाने वाचली होती. तितकीच पीळ आहे. दु.हा.घा . पन वाचले आहे. सगळ्यात पीळ ते चंद्रिके ग सारीके ग. ती सूहास चान्गल्या मित्राला सोडून येते आणी मग एकटी राहते ते. भारावून जावुन वाचले सर्व पण नन्तर सर्व रीपीट होत गेले आहे असे वाटले. मी ते वनमाळी सार्खे लोक पाहिलेत( दुरून) त्यान्च्या वागण्याला काहिहि justification नाही.

nutanj हे पहा http://www.friendslibrary.in कदाचित उपयोगी पडु शकेल. दुपारी २ वाजे पर्यंत नोंदणी केल्यास त्याच दिवशी पुस्त्क घरपोच देतात.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

I don't know how she does it- Allison Pearson

खल्लास चिक-लिट प्रकारातील पुस्तक. जरा wisecracky आहे. पण मस्तय. Kate Reddy हि ३५ वर्षीय फंड मॅनेजर, दोन मुलांची आई. Working Motherhood and Joys of Having it all.. वर आहे.
घरी राहणा-या करियर मदर्स, आणि त्यांचे organized Muffia (शब्दासाठी टाळ्या !!!), पोरांना सांभाळणारी नॅनी पॉला (I want her to love them like her own children, yet when she does...., Am I not guilty of the same double standards? I bribe Ben with apple juice just to buy a few moments of peace.), तिचा नवरा स्लो रिचर्ड (Richard no longer looks at me as if I am merely mad), तिची वाढतावाढता वाढणारी टास्क लिस्ट (Must Remember: Almost Everything, must have a proper present drawer like an organized mother वगैरे), ग्लास सीलींग, तिचे शॉवेनिस्टीक पुरुष सहकारी, सहकारी बायका-
-Did all those women fight for liberation just so we could spend as less time with our children as a man ?
-Just how rancid does a dishcloth have to be for someone in this house to discard it?
-The women in the offices of EMF [Kate's firm] don't tend to display pictures of their kids. The higher they go up the ladder, the fewer the photographs. If a man has pictures of kids on his desk, it enhances his humanity; if a woman has them it decreases hers. Why? Because he's not supposed to be home with the children; she is !
-What kind of mother is afraid of her own children ?
- Emily's questions don't shock me as much as the fact that I am allowed to give her any answer I want.
- There they are "women jogging for their lives", as much as I don't want to be me sometimes, I definitely don't want to be her.
- Return snowwhite to the library. The fine on the DVD now exceeds original production cost.

कहर आहे. Laugh Riot. Sharp wit. Cynical, and makes us wonder about the price we pay for trying to have it all.
जरा ब्रिजेट जोन्स सारखी शैली वाटते Happy

swabhav-vibhav by Anand Nadkarni, vachayla survat keli aahe, Rational Emotive Behaviour Therapy var aahe. vachun zala ki abhipraya deto.

संस्कार कोणी वाचलं आहे का?

चौघीजणी आणि महाश्वेता वाचली. मला अनुवादित पुस्तकं फारशी आवडत नाहीत वाचायला. कारण बर्‍याच अशा पुस्तकांना विशेषतः इंग्रजीतुन मराठीत आलेल्या पुस्तकांना एक कृत्रिम भाषेचा टोन असतो तो खटकतो. उदा: "माझ्या लाडक्या..." (oh dear किंवा sweetheart). प्रसंग जसाचा तसा उभा करण्यासाठी असे करत असावेत का ?

चौघीजणी मधे ती कृत्रिम भाषा बरीच कमी प्रमाणात आहे. सुरुवातीला इंग्रजीचा प्रभाव जाणवतो आणि नंतर दूसर्‍या भागातही पुष्कळ ठिकाणी तसे जाणवते. एक कुटुंब, वेगवेगळ्या स्वभावाच्या चौघी बहिणी (इथे मात्र मी पक्कं रिलेट करु शकले Happy ), त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्याची आई-बापाची धडपड, थोडी फार संकटं आणि अत्यंत गोड शेवट असे साधारण कथानक. पुस्तक वाचताना वाटत होते की हे शाळकरी वयात कदाचीत फार आवडले असते Happy दूसरा भाग मी नीट वाचला नाही, जरा कंटाळवाणा होतो. साधारण बहिणींची आयुष्य काय मार्गाने गेली ते (भराभरा पानं उलटुन) बघितलं आणि संपवला.

महाश्वेता विषयी लिहिते थोड्या वेळाने Happy

सिंड्रेला, अगं चौघीजणी खरचं तू ९वी-१०वी त वाचलं असतसं तर प्रचंड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड आवडलं असतं. मला तेव्हा आवडलं आणि तेव्हाच्या सगळ्या आठवणींमुळे अजूनही फार फार आवडतं.
प्राजक्ता

हायला- शिंडी- चौघीजणी आवडलं नाही अशी तू पयली.
तू म्हणतेस तसेही असू शकेल (बालपणी न वाचल्यामूळे). मी इंग्रजी लिटील वुमेन आणि शांताबाईंचे चौघीजणी विसेकवेळा नक्की वाचलेय. अजून या वयात बेथच्या मृत्यूच्या प्रसंगी डोळ्यातून पाणी येते.
इतक्या चांगल्याबिंगल्या जगावरही आता खरंतर माझा विश्वास नाही, तरी त्यातला रम्य भाबडेपणा अजून सोडवत नाही. समुद्राकाठी गाज ऐकत बसावं, तसं वाटतं.

चौघीजणी नववीत वाचलेलं. प्रचंड आवडलं होतं. बेथच्या मृत्यूनंतर खूप वाईट वाटलेलं आणि अ‍ॅमीचा थोडा रागही आलेला पुस्तक वाचताना.
थोडे दिवसांपूर्वी Little Women वाचायला घेतलं होतं पण कंटाळा आला.

चौघीजणी मागच्या हिवाळ्यात पहील्यांदा वाचलं.. खुप म्हणजे खुपच रटाळ वाटलं.. विशिष्ट वयात न वाचल्यामुळे असेल पण नाही आवडलं..

मी सध्या वाचतेय चौघीजणी तेही पहिल्यांदाच (लहानपणी वाचायला हव होते का?). आधी सिनेमा बघायचा अयशस्वी प्रयत्न केला होता टीव्हीवर.
ठीक ठीक वाटतय, अगदी उत्कंठावर्धक वगैरे अजिबातच नाहीये आणि भाषा जरा जास्तच कृत्रीम वाटतेय. सिंडे मला चौघीजणीतच असे वाटतेय म्हणजे महाश्वेतात अजून जास्त आहे का, महाश्वेता म्हणजे सुधा मूर्तींचेच ना?

काही काही पुस्तके वाचताना त्या त्या वयात वाचली तर बरे असे वाटते - चौघीजणी त्यातलेच एक असावे.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

सध्या मुलगी आणि मी वाचतोय लिटिल वुमेन. तिला ते 'स्पेशल' पुस्तक वाटतंय.

वयाचा परीणाम दुसरे काय?? माझ्या मुलीने चौघीजणी चारदा वाचलंय आणि अजुनही वाचतेयच. मी वाचायला घेतलं आणि मग भराभरा पाने उल्टुन् संपवलं..

माझं असं सेम कोसलाबाबत झाले होते. कॉलेजमध्ये असताना काही भाग वाचला होता तेव्हा भारीच आकर्षक, झपाटले वगैरे वगैरे झाले होते. तेच मग पस्तिशी पार केल्यावर वाचले तर अगदी कंटाळा आला. त्याउलट आहे मनोहर तरी... तेव्हा कंटाळवाणे वाटलेले. तेच आता खुप आवडले. परत एकदा वाचायचे आहे.

त्या त्या वयात त्या व्यक्तींचे वागणे बोलणे याच्याशी आपण रिलेट करु शकतो. आपण त्या वयात नसलो तर मग त्यामागचा फोलपणा/भाबडेपणा किंवा जे काही असेल ते जाणवते आणि मग रस राहात नाही.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

>>संस्कार कोणी वाचलं आहे का?
यू आर अनन्तमूर्तींचे का? मी वाचले आहे.

श्री.संजय जोशी यांचे 'नचिकेताचे उपाख्यान' वाचले.वपुंचे लिखाण वाचायचे थांबवल्यानंतर त्याच ’दर्जा’चे भंपक लिखाण हेच वाचले.एकंदरीत शैली ही वपु आणि हमोंचे हायब्रीड आहे. अत्यंत उथळ तत्वचर्चेने भरलेले आणि भरकटलेले पुस्तक.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

निशाणी डावा अंगठा : must read category मधले पुस्तक. सरकारी योजनांवर इतके अचूक बोट ठेवणारे पुस्तक मी तरी वाचलेले नाहि. माझी आई बीओ असल्यामुळे ह्यातले बरेचसे प्रसंग-घटना एकदम डोळ्यासमोर आल्या. सिंडीबाय धन्यवाद.

परवा मोनिका गजेंद्रगडकर यांचे 'भूप' हा कथासंग्रह वाचला. वाचताना सतत निगेटिव्ह फीलिंग येत होते Sad एकही कथा पॉसितिव्ह नोट वर नव्हती. अगदी ५-६ कथा वाचुन इतकी मरगळ आली ना मनाला. याला उतारा म्हणुन मग आता मी परत किमया घेतलेय वाचायला.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

नेगल-२, एका रानवेड्याची शोधयात्रा वाचुन झाले मधे. नेगल बद्दल मी काय लिहिणार चिन्मय ने सगळे लिहिलेच आहे इथे. येवढ्या धावपळीच्या आयुष्यात मूक प्राण्यांबरोबर येवढी दोस्ती करणे म्हणजे खरोखर आवड असल्याशिवाय होणे नाही.

एका रानवेड्याची शोधयात्रा पण असेच अगदी खिळवुन ठेवते. मला काही लोकांकडुन पुस्तक खुप विस्कळीत आहे. नीट सुसंगत वाचत नाही वगैरे ऐकले होते. पण एका मायबोलीकरणीने मला 'उलट विक्सळीत आहे म्हणुनच मला आवडले' असे सांगितल्यामुळे वाचायला घेतले. आणि कधि एकदा पुढचे वाचतेय असे वाटत होते वाचताना. मस्त आहे एकदम.

सध्या 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' हे प्रतिभा रानडे यांचे पुस्तक वाचायला घ्यावे म्हणतेय. कोणी वाचले आहे का?

सध्या 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' हे प्रतिभा रानडे यांचे पुस्तक वाचायला घ्यावे म्हणतेय. कोणी वाचले आहे का?>>अर्थातच Happy . फक्त हे एका बैठकीत वाचण्यासारखे पुस्तक नाही, खरच गप्पा मारताना मैफल जमते तसे हळू हळू वाचण्यासारखे वाटले मला.

असामीला अनुमोदन. वाचच.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' हे प्रतिभा रानडे यांचे पुस्तक मी वाचलंय. मला आवडले, पण हलके-फुलके वाचणार्‍यांना त्याचा कंटाळा येईल.

निशाणी डावा अंगठा - लेखक कोण आहेत?

गौरीचेच काय पण कुठलाही लेखक घेतला तर त्या लेखकाचे सर्वच पुस्तकं काही छान नसतात.

तेरुओ मलाही आवडले नाही पण बेटीचे ते लाडके पुस्तक आहे असे ती म्हणाली म्हणून मीही वाचून पाहिले. नंतर जीडींचे सर्वच पुस्तक वाचून काढल्यानंतर मला दुस्तर हा घाट, एकेक पान गळावया, आहे हे असे आहे, दिवाळी अंकामधून तिनी लिहिलेले लेख आणि कथा - जेवढे मिळवले तेवढे - सर्वच छान वाटले.

निशाणी डावा अंगठा - लेखक कोण आहेत?

रमेश इन्गळे उत्रादकर
***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

Pages