मी वाचलेले पुस्तक

Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या काही दिवसात वाचलेल्या पुस्तकांबद्दल इथे लिहायचं राहूनच गेलं...

उसगावत असताना शोनूच्या कृपेने मिळालेलं मारूती चित्तमपल्लींचं रातवा वाचलं... त्यांचे पूर्वी लेख लोकसत्ताच्या पुरवणीत असायचे त्याच स्वरूपाचे लेख आहेत.. छोट्या छोट्या लेखांमधून जंगलातल्या गोष्टींबद्दलची माहिती मस्त दिलीये... चित्तमपल्लींच आत्मचरित्र असलेलं चकवाचांदणं मागे वाचलं होतं रातवा चं मोठं version ते आहे असं वाटतं..

दि.बा. मोकाशी ह्यांची कथा हे पुस्तक वाचलं.. मोकाशींच्या लघूकथा आहेत.. कथा बर्‍याच जुन्या काळातलं आहे..साधारणं ६० च्या दशकातल्या... पण शैली छान आहे.. ह्यातला रोमच्या सुताराची गोष्ट ह्या कथेवर मागे पुरुषोत्तम मधे एकांकीका झाली होती.. ती कथा कथा पण मस्त आहे.. ! पण ही कथा वाचून त्यावर एकांकीका कराविशी कशी काय वाटली काय माहित? Happy

जगन्नाथ कुंटे ह्यांनी लिहिलेलं नर्मदे हर हे नर्मदा परिक्रमेवरच पुस्तक वाचलं.. लेखकाने आपले अनुभव मस्तच लिहिलेले आहेत.. पण अर्ध्यानंतर खूप तोच तो पणा येत जातो.. त्यामुळे कंटाळवाणं होतं जातं..

बेट्टी मेहेमुदी चं अनुवादित Not without my daughter वाचलं.. बहूतेक ह्याबद्दल मी आधी लिहिलं होतं.. फारच सुंदर आहे.. !

विणा पाटलांचं प्रवास जगाचा हे पुस्तक वाचलं.. लोकसत्ता किंवा सकाळच्या पुरवण्यांमधे येणारे केसरीच्या जाहिरातींचे लेख एकत्र करून छापल्यासारखं आहे.. ठिक ठिकच आहे एकूणात.. !

आणि अगदी आत्ता मीना प्रभूंचं माझं लंडन वाचलं.. ! त्यांच हे पहिलंच पुस्तक.. मलातरी आवडलं.. मधे मधे इतिहासाचा ओव्हरडोस होतो.. पण लंडन मधल्या लहानलहान गोष्टींबद्दलचे बारकावे छान टिपले आहेत.. एकूण त्यांच्या पुस्तकांवर कितीही टिका होत असली तरी त्यांचे सगळे प्रयत्न अभ्यासपूर्ण असतात हे मात्र नक्कीच.. !

आता अर्धवट राहिलेलं Into the wild आणि टेनिसपटू आर्थर अ‍ॅश चं आत्मचरीत्र अशी दोन पुस्तके पाईपलाईनमधे आहेत.. Happy

शोनूच्या कृपेने रेणू गावस्करांचे गोष्टी जन्मांतरीच्या' वाचले. सुरुवातीला लहन मुलांच्या गोष्टीचे वाटलेले पुस्तक कुठे आणि कशी पकड घेते तेच समजत नाही. आता मला गुरुदेव टागोरांच्या गोष्टी मिळवुन वाचाव्यात अशी इच्छा झालीय. बघु कधी जमतेय ते.
भारतात पुस्तके घेतली पण वजना आभावी आणता आली नाहीत ती पुस्तके मग दिवसरात्र जागुन तिथेच वाचुन काढली त्यातली -
नर्मदे हर हर बद्दल अ‍ॅडमशी सहमत निम्म्या पुस्तकात तेच तेच लिहिल्यासारखे वाटते. आणि काहीकाही ठिकाणी आत्मप्रौढी देखील वाटते. कदाचीत लिखाणाचा तो उद्देश नसेलही पण जाणवते एवढे खरे.

डॉलर बहू - प्रचंड एकतर्फी लिखाण. अगदी कथा/कादंबरी म्हणले तरी सुधा मुर्तींकडुन असल्या पुस्तकाची अपेक्षा नव्हती.

पुढचे हाती घेतलेले पुस्तक - 'अमृता'नुभव - अमृता प्रीतम यांच्या लघुकादंबर्‍यांचा मराठी अनुवाद.

मिनोती, 'अमृता'नुभवचा अनुवाद कोणी केला आहे? आणि प्रकाशन कोणते आहे?

शनिवार च्या चतुरंग मध्ये डॉ.प्रकाश आमटे ह्यांच्या 'वाट यशाची' ह्या पुस्तका बद्दल आलय. हा त्यातला एक भाग.. पुस्तक छान असाव अस वाटतय.
http://www.loksatta.com/daily/20090510/lr09.htm

मिनोती,
अमृतानुभव वाचलंय मी, आता बराच काळ गेला मध्ये, फार आठवत नाही पण पुस्तक चांगलं आहे. Happy

सध्या मी Malcolm Gladwell चं, टिपिंग पॉईंट वाचतेय. १९ पानं झाली आहेत झालं की सांगेन कसं वाटलं . (हे पुस्तक माझ्या बॉसने रेफर केलंय मला, नाहीतर मी होऊन असल्या पुस्तकांच्या वाटेला कधी जात नाही. :हाहा:)

"सध्या मी Malcolm Gladwell चं, टिपिंग पॉईंट वाचतेय."
हे पुस्तक वाचून शेतकर्‍यांच्या आत्महत्या का मोठ्या प्रमाणात होउ लागल्यात त्याचा उलगडा होतो, ना?
नकारात्मक, वाईट बातम्या रोजच्या रोज पाहून आणखी काय काय सामाजीक परीणाम होत असतिल देव जाणे! Sad

गिरीश कुबेरांचे "अधर्मयुध्द" -
"हा तेल नावाचा इतिहास आहे" नी "एका तेलियाने" याच ओळीतले पुढचे पुस्तक...

क्रुड ऑईल, त्यावरून झालेले राजकारण आणि वाढलेला दहशतवाद यावरील उत्तम पुस्तक!!!

व. पुं. चे "घर हरवलेली माणसे" कथासंग्रह - मूळच्या सहा कथा ज्या फार आधी प्रकाशीत होत्या पण कुठे मिळत न्हवत्या नी नवीन सहा ज्या unedited आहेत अशा १२ कथांचा संग्रह - मुंबईतील नी एकूणच संसारातील कुचंबणावर आधारीत

चाऊ,
अजून तितकं समजलं नाही मला पुस्तक... Sad पण तसं आहे का ते? अरेरे! Sad

मुम्बईच्या महपौर शुभ राउत यानी रुग्वेदावर एक पुस्तक लिहिले आहे... कुणाला माहीत आहे का ?

नुकतच माधूरी शानबाग ह्यांचा पुनर्वसन नावाचा कथासंग्रह वाचला.. माधूरी शानबाग ह्यांच्या बर्‍याच गोष्टी हल्ली मासिकं आणि दिवाळी अंकांमधे वाचायला मिळतात... त्या स्वत: (बहूतेक) बेळ्गाव ला प्राध्यापिका असल्याने विद्यार्थी आणि तरूणाई ह्यांच्याशी रोजचाच संबंध.. त्यामूळे विद्यार्थी, नुकतीच नोकरीला लागलेली यंग जनरेशन ह्या बद्दलच्या त्यांच्या कथा एकदम रिआलिस्टीक वाटतात.. !
हा कथासंग्रह पण चांगला आहे...

अवांतर : मधे मोबाईल च्या कॉलेज मधल्या वापरा बद्दलचा त्यांचा रविवारच्या पुरवणीतला लेख मस्त होता..!

हो अडम, बेळगावलाच असतात त्या. मी त्यांची पुस्तकं काही वाचलेली नाहीते पण दिवाळी अंकातल्या आवडत्या लेखिका आहेत त्या माझ्या.

त्या शास्त्र या विषयातल्या प्राध्यापिका आहेत (चुभुद्याघ्या) त्या सायन्स फिक्शन पण लिहितात. पाककृति पण वाचल्यात मी त्यांच्या. एकंदर मस्तच लिहितात त्या.

शुभा येरी ह्यांची 'बहार' कादंबरी वाचली. ही कादंबरी पुर्वी, म्हणजे बहुतेक २००२ किंवा २००१ च्या मेनका दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. आता मेनका प्रकाशनानेच पुस्तक रुपात बाजारात आणली आहे. एकदा वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्यावरच पुस्तक खाली ठेवावं इतकी अप्रतिम सुंदर कादंबरी आहे. प्रेम, त्याग, राजकारण, मैत्री अश्या बहुतेक सर्व रंगांनी रंगवलेली ही 'बहार' कादंबरी शेवटी 'त्यागातच प्रेम आहे' हा संदेश मात्र देऊन जाते.

संजय सोनावणींनी लिहिलेले "असुरवेद" नावाचे पुस्तक कोणी वाचले आहे का? वाचनीय आहे?

असुरवेद हे पुस्तक गेल्या आठवड्यातच वाटले. खूप आवडले... मनातील बर्‍याच शन्का मिटल्या.. ती एक कादम्बरी आहे. पण मूळ विषय शैव धर्म आणि वैदिक धर्म अशा दोन भिन्न धर्मान्च्या मिश्रणाने आजचा हिन्दु धर्म तयार झालेला आहे, हा आहे.... जरूर वाचा...

मिन्स्ट्रल्सनामक ईपत्रयादीवर प्राप्त झालेल्यांपैकी मला आवडलेल्या कवितांचा (ईंग्रजी) संग्रह मी केला आहे. तो आता एका हटमल पानात रुपांतरीत केला आहे. त्याचा टिचको (टिचकी देण्याची जागा) कुठे द्यावा हे न कळल्याने येथे नमुद करतो आहे. तो अन्यत्र कोठे असावा हे दर्शविल्यास तेथे स्थलांतरीत करता येईल.

http://www.astro.caltech.edu/~aam/poems/index.html

त्या कवितांबद्दल (आणि वर) मग चर्चा देखिल करत येईल.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

रविन्द्रनाथ टागोरांची गीतांजली'(इन्ग्लिश) वाचली. त्यानीच भाषान्तर केलेय. पण फारच कृत्रिम वाटली. भाषान्तरात तिचे सगळे सौन्दर्य गेले वाटते. मूळ बंगाली लिरिकल आणि यमक युक्त आहे.

तुम्हाला बंगाली वाचता येतं हूड ?
हे मी पण ऐकलं होतं, पण मला तरी ईंग्रजी आवडलं कारण बंगालीचा गंध नाही. आताच्या युगाच्या मानाने भावूक वाटल्या होत्या तेव्हा कविता. पण आता काही जास्त आठवत नाही. Happy

जरा टाका पाहू एखाद दोन हूड.

रैना, बहुदा त्याने मी वर दिलेल्या टिचकोतुन ती वाचली असावी.
टागोरांबद्दल मी एक ईंटरेस्टींग मत काही वर्षांपुर्वी वाचले होते. बहुदा अर्ग्युमेंटेटीव्ह ईंडियन मध्ये. लिहीन त्याबद्दल २-४ दिवसात.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

ह्या इथे पुस्तक वाचायला काय मजा येईल

British Museum Reading Room Panorama Feb 2006.jpg
Size of this preview: 560 × 191 pixels

मेघना पेठेंचे 'आंधळ्याच्या गायी' कुणी वाचलय का? मी वाचते आहे. खुप ऐकले होते म्हणुन वाचायला घेतले. पण काही खास वाटले नाही. काही कथांमधुन काय सांगायचे आहे ते कळतच नाही.
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

कसला फोटो आहे हा माणसा?? आणि आहे कुठे

'आंधळ्याच्या गायी' चांगलेच पुस्तक आहे. त्यांचे नातिचरामि मात्र फसले. पेठे न्ची पुस्तके वाचताना सारखे जी ए कुलकर्णी आठवत राहतात. कारण दोघांचीही थीम नियतीने छळलेली दुर्देवी माणसे , मोडलेली .पिचलेली अगतिक माणसे. अर्थात हे साम्य इथेच संपते. बाकी शैली आणि मांडणी यात फरक आहेच.

'आंधळ्याच्या गायी' चांगलेच पुस्तक आहे >> चांगले आहे पण कथा वाचुन झाल्यावर फा$$$$$$$$र उदास वाटते.
जी ए नी पेठेंच्या मान्ड्णीत नी शैलीत बराच फरक आहे. जी एंची पुस्तके कधीच एव्हढी उदास वाटत नाहीत.
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्‍याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------

मलाही आंधळ्याच्या गायी नातिचरामी पेक्षा जास्त आवडलं होतं.

रॉबिन, दक्षिणा, धन्यवाद. बघतो वाचून आता. आधीच आणले होते पण नातिचरामी वाचून डेअरिंग झाले नाही हे दुसरे वाचण्याचे Happy

"not without my daughter" var koni movie tayar kela aahe ka

मला हे असुरवेद पुस्तकच मिळत नाहिये. पुण्यात, अप्पा बळवंत चौकात मिळत नाही म्हणजे कमाल आहे!

नॉट विदाऊट माय डॉटर वर १२ वर्षांपूर्वीच सिनेमा आला होता.( इंग्रजीमधे आहे )

Pages