Submitted by admin on 17 July, 2008 - 15:56
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
भाग २ - धागा - http://www.maayboli.com/node/41038
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्यासाठी मागे चर्चा झाल्यावर
ह्यासाठी मागे चर्चा झाल्यावर असे ठरले होते की काही लिहिणार असाल तर प्रत्येक पुस्तकाचा एक बाफही चालेल. त्याप्रमाणे काही निघाले. पण लायब्ररीथिंग सारखे मायबोलीवर काही करता आले तर मजा येईल.
रेटींग साठी मी देखील मायबोलीकरांचे टॉप १०० टाईप एक बाफ उघडला होता ( . . पण पुढे त्यावर काही झाले नाही.
केदार, कुठे आहे तो बाफ?
केदार, कुठे आहे तो बाफ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/8409
कोणी Niall Ferguson चे
कोणी Niall Ferguson चे Civilization वाचले आहे का? .. ...
https://docs.google.com/sprea
https://docs.google.com/spreadsheet/ccc?key=0AvMRDb6BU70kck5VbTh1bFg4RVF...
माणसानी दिलेली वरील लिंक सुरुवात म्हणून चांगली आहे.
अॅडमीनने तिथे म्हंटले होते की यादीची सुविधा लवकरच मिळेल. त्याबद्दल कुणाला काही माहीत आहे का?
जर असा काही उपक्रम चालू असेल
जर असा काही उपक्रम चालू असेल तर या यादीचा काही उपयोग होईल का बघा - किमान टंकलेखनाचा त्रास वाचेल.
https://docs.google.com/spreadsheet/ccc?key=0ArIZBiO9x-2RdHFLV2NTZnpSOHl...
अप्रतिम चर्चा नंदन, तुझ्या
अप्रतिम चर्चा
नंदन, तुझ्या पोस्टी नेहमीप्रमाणेच सुंदर.
मला विचारशील तर आयुष्य अॅब्सर्ड आहे आणि माझे या पसार्यातील स्थान नगण्य आहे ही जाणिव माझ्या मनात मुळातच प्रचंड स्पष्ट आहे. >>> आगावा, अनुमोदन. (म्हणजे तुझ्या मनात ही जाणीव आहे हे मला माहित आहे असं नाही; पण माझंही असंच मत आहे. पण हे मला कदाचित अशा शब्दांत मांडता आलं नसतं.)
पण मी काफ्का वाचलेला नाही.
मी ह्या वेळी भारतातून मौजचा
मी ह्या वेळी भारतातून मौजचा २००७ चा दिवाळी अंक विकत घेतला.. पाऊण किमतीमधे! आज तो वाचायला काढला. अंकाच्या शेवटी मीना वैशंपायन ह्यांचा 'मुक्काम अँटवर्प' असा एक लेख आहे. सुरवातीला मला वाटतं हा लेख मीना प्रभुंनी लिहिलेला आहे. म्हणून मी तो वाचायचा टाळला! मधेच मला अंधुकपणे आठवलं की हॉलंड वरुन ब्रसेल्सला जाताना माझी बस अँटवर्पला थांबली होती.... तीन तास. मग मात्र पुस्तक हाती धरुन तो सगळा लेख लंचमधे वाचून काढला आणि तो लेख मीना प्रभुंनी नाही लिहिला आहे हे वाचून अधिकच आनंद झाला. मीना वैशंपायन खूपचं छान लिहितात. बरेच बारकावे टिपतात.
ह्याच अंकात पहिलाच लेख सुलभा ब्रह्मनाळकर ह्यांचा आहे - 'लडाखची पाषाणशिल्पे'. मला लेह-लडाखमधे जाऊन लोक नक्की काय करतात ह्याचे नेहमी कुतुहल वाटत आलेले आहे. कारण तिथे फक्त बर्फ, रंगीत पताका, मैत्रेय बुद्धाची मुर्ती - येवढीच चित्रे मी पाहिली आहेत. सुलभाताईंची शैली अप्रतिम आहे. वाचक कुठेच थांबत नाही इतका तरल वेग त्यांच्या लेखनीतून जाणवतो.
हे पहिले नि शेवटचे दोन लेख वाचून मला आज फारच ताजेतवाने वाटत आहे.
१) 'The Nobel Book of
१) 'The Nobel Book of Answers' या पुस्तकात ७ ते १० वयोगटातील मुलांना पडणार्या प्रश्णांची उत्तरं डायरेक्ट त्या त्या विषयातल्या नोबेल पारितोषीक विजेत्यांकडून घेतली आहेत. जसे की दलाई लामा, मिखाईल गोर्बाचेव्ह, शिमॉन पेरेझ इत्यादी.
२) 'What Einstein Told His Barber' या पुस्तकात अनेक रोजच्या घटनांमागच शास्त्र अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आहे.
@ अंशा धन्यवाद. जरुर वाचून
@ अंशा
धन्यवाद. जरुर वाचून पाहीन.
@बी
मौजेचे अंक छानच असतात. माझ्याही वाचनात आलेत.
आता 'मिलिंद बोकिल' यांची 'शाळा' परत वाचत आहे. मस्त पुस्तक...!
जमलं तर सिनेमा पण पहायचा विचार आहे...
i too had a lovestory एकदम
i too had a lovestory
एकदम मस्त पुस्तक आहे
मी सध्या http://mylibrary.in/
मी सध्या http://mylibrary.in/ ही ऑनलाइन लायब्ररी लावली आहे.... ऑनलाइन पुस्तकं सिलेक्ट करायची आणि ते घरपोच आणुन देतात.... आपल्या सोयीनुसार पॅकेज घेता येते.....बरी आहे सर्विस!
नुकतीच वाचलेली काही पुस्तके:
"लपविलेल्या काचा"..... काही काही लेख चांगले जमले आहेत.... एकदा वाचण्याजोगे...नक्कीच!
"एक होता गोल्डी"..... खुप सुंदर चरित्र.... पकड घ्यायला वेळ लागला नंतर मात्र सोडवले नाही
"आहे कार्पोरेट तरी"..... काही काही गोष्टी/किस्से फारच बाळबोध वाटले... पण अजिबात आवडले नाही असेही नाही
"एका स्टुडिओचे आत्मवृत्त".... चांगली संकल्पना.... खुप सार्या नवीन गोष्टी कळल्या जयप्रभा स्टुडिओबद्दल
सादिक हिदायत चे '' The Blind
सादिक हिदायत चे '' The Blind owl ''
A must read Book it is!
एक सुंदर पुस्तक वाचनात
एक सुंदर पुस्तक वाचनात आलं,
चेहेरे- लेखक, छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष
त्यांनी कढलेले photo तर सुंदर असतातच पण गौतम राजाध्य्क्ष एक चांगले लेखकही आहेत.
त्यांनी लिहीलेले प्रत्येक व्यक्तीचित्र सुरेख आहे.
डॉक्टर विश्वास मेहेंदळे याचं
डॉक्टर विश्वास मेहेंदळे याचं "मला भेटलेली माणस" पुस्तक सध्या वाचतेय. पुस्तक १९९५ मध्ये प्रकाशित झालं आणि मी अजून वाचालच कस नाही अस वाटल
.पुस्तक खूपच छान आहे . आर्थिक दृष्ट्या अगदी कनिष्ठ वर्गात जन्मलेल्या/ वाढलेल्या माणसाने केलेली प्रगती वाचून विस्मयचकित व्हायला होत. त्यांना आलेल्या विविध अनुभवांचे त्यांनी इतके सुरेख वर्णन केले आहे. माणसांचे स्वभाव , त्यांचे गुण-दोष कुठल्याही व्यक्ती बद्दल "आकस" मनात न ठेवता त्यांनी विषद केले आहेत. हि गोष्ट खूप कठीण आहे. पण त्यात ते यशस्वी झाले आहेत . आणि यातच पुस्तकाच यश आहे. (पुस्तकाच्या तीन आवृत्या निघाल्या आहेत )अतिशय वाचनीय पुस्तक 
सुधीर फडकेंचे अपूर्ण
सुधीर फडकेंचे अपूर्ण आत्मचरित्र 'जगाच्या पाठीवर' वाचले. आधीपासूनच त्यांच्या गाण्यांमुळे, सुरेल आवाजामुळे, किंवा स्वच्छ शब्दोच्चारावर भर देणारा एकमेव संगीतकार अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्याविषयी आदर होताच, आता तो अजूनच वाढला. त्यांच्या स्वच्छ-स्वाभिमानी-समाधानी वृत्तीचा पदोपदी परिचय होतो. किती चिकाटीचा माणूस होता, आणि त्यावर कडी म्हणजे किती 'खरा' माणूस होता, हे पाहून अचाट व्हायला होतं. अपूर्ण आत्मचरित्र आहे हे माहित असूनही शेवटी उगाच चुटपूट लागून राहिली.
चरित्रात्मक पुस्तके वाचायला आवडत असतील तर नक्कीच वाचा, असं सांगेन.
चेहरे खरंच खूप छान पुस्तक
चेहरे खरंच खूप छान पुस्तक आहे. मलापण खूप आवडलेल..
'जगाच्या पाठीवर' वाचून मला
'जगाच्या पाठीवर' वाचून मला सुन्न व्हायला झालं होतं. तोपर्यंत माझ्या पिढीला सुधीर फडके म्हणजे उत्तमोत्तम गाणी, संगीत, गीतरामायण, त्यामुळे मिळालेली अमाप प्रसिध्दी इतकंच माहित होतं. पण त्या प्रसिध्दीपाशी पोचण्यापूर्वी त्या माणसानं किती कष्ट केले, किती हालअपेष्टा सोसल्या ते पुस्तक वाचल्यावर कळलं.
छत्रेकाकुंना अनुमोदन. जगाच्या
छत्रेकाकुंना अनुमोदन.
जगाच्या पाठीवर मधली ती भूक आणि उपासमार.. भडभडुन येतं अगदी.
धारा, ललिता, रैना >> +१ अतिशय
धारा, ललिता, रैना >> +१
अतिशय सुंदर पुस्तक.... वाचताना खुपदा डोळे भरुन येतात अक्षरश:.... मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजवणार्या या माणसाने एकेकाळी दुकानांच्या फळ्यावर झोपून रात्री काढल्याचे आणि रोजच्या जेवणासाठी वणवण केल्यचे वाचताना गलबलून येते अगदी..... ध्येयनिष्ठा आणि सचोटी शिकावी तर या माणसाकडून.... आणि ज्या लोकांमुळे ही उपेक्षा पदरात पडली त्यांचा सुद्धा किती संयत उल्लेख!
'जगाच्या पाठीवर'ला अनुमोदन.
'जगाच्या पाठीवर'ला अनुमोदन. किती कष्ट सोसावेत.. इतके हाल सोसूनही त्यांचं संगीत मात्र आनंद देणारं आहे.. ते कष्ट, हाल ह्यांचं प्रतिबिंब त्यांच्या चालींमध्ये उगाचच सतत डोकावत रहात नाही हेच मला अलौकिक वाटतं!
'जगाच्या पाठीवर,.....
'जगाच्या पाठीवर,..... धारा<<<अपूर्ण आत्मचरित्र आहे हे माहित असूनही शेवटी उगाच चुटपूट लागून राहिली.>>>अनुमोदन.
माझ्या संग्रहातले आवडते पुस्तक.
'हॅनाची सुटकेस' वाचले... ते
'हॅनाची सुटकेस' वाचले... ते लहान मुलांसाठी चांगलं पुस्तक म्हणून विकत आणलं होतं.... इथे माबोवरच कुठेतरी कळालं होतं.
फार हृदयस्पर्शी पुस्तक...
वाचल्यावर मीच इतकी रडले की काय सांगू? कितीही मोठ्या मुलाला वाचून दाखवणे मला तर अजिबातच शक्य नाहिये.
श्री. ना. पेंडसे यांच्या
श्री. ना. पेंडसे यांच्या तुंबाडचे खोतचा पहीला खंड वाचतोय.
कुसुमाग्रजांवरून आठवण झाली.
कुसुमाग्रजांवरून आठवण झाली. त्यांचे सगळ्यात धाकटे भाऊ के.रं. शिरवाडकर हे तत्वज्ञानाचे फार ख्यातनाम प्राध्यापक होते. त्यांनी नुकतंच मराठीत सर्व जगातील प्राचीन ते अर्वाचीन तत्वज्ञानाचा (विशेषतः युरोपीअन) थोडक्यात आणि सुगम आढावा घेणारं पुस्तक लिहिलंय.
इंग्लिशमधे क्लिष्ट विषयांची रीडर्स किंवा कम्पॅनिअन्स अशा स्वरूपाची पुस्तकं असतात - त्या विषयाची अत्यंत तज्ज्ञ व्यक्तींनी सोप्या भाषेत करून दिलेली तोंडओळख असते ती. त्यामुळे मूळ विषय कळायला खूप मदत होते. मराठीत मात्र अशी परंपरा नाही (निदान मी कधी पाहिलं नाहीये). हे पुस्तक अशा स्वरूपाचं पहिलंच आहे.
अतिशय सहजसोप्या भाषेत सर्व तत्वप्रणालींची आणि तत्वचिंतकांची ओळख वाचताना हा विषय अजिबात अगम्य रहात नाही. अशक्य महान काम आहे हे इतक्या सोप्या भाषेत लिहिणं... आपण सगळ्या मराठी वाचकांनी कायमचं ऋणी रहावं असं..
आपले विचारविश्व - के. रं. शिरवाडकर
अरे वा घेतले पाहिजे.
अरे वा घेतले पाहिजे.
अनुमोदन
अनुमोदन वरदा.
के.र.शिरवाडकरांचे कुसुमाग्रजांवरचे 'तो प्रवास सुंदर होता' हेही उत्तम आहे. विवेकी आहे.
त्यांचे शेक्सपियरच्या नाटकांवरचेही चांगले आहे म्हणतात.
नुकतच 'युगांत' वाचले. महाभारत
नुकतच 'युगांत' वाचले. महाभारत हा विषयच इतका अवाढव्य आहे की त्याबद्दल जितके वाचावे तितके नवीन कळत जाते, अनेक गोष्टी उलगडत जातात. प्रत्येक लेखकाचा/लेखिकेचा या विषयावर असलेला दृष्टिकोन वाचल्यावर समृद्धीत भर पडते
दुर्गाबाई भागवतांचं 'व्यासपर्व' देखील सुरेख आहे.
आत्ता 'अंताजीची बखर' घेतलेय वाचण्यास.
नुकतेच "एका दिशेचा शोध"
नुकतेच "एका दिशेचा शोध" वाचले. (ले. संदीप वासलेकर). माझ्या एका परिचिताने जबरदस्त कौतुक केल्याने पुस्तक विकत आणून वाचले. पुस्तक चांगले आहे. भारताच्या समस्यांचे योग्य विश्लेषण केले आहे. पण त्यावर फारसे प्रॅक्टिकल उपाय सुचविलेले नाहीत. तसेच लोकसंख्या वाढीसारख्या मूलभूत प्रश्नाची दखलही घेतलेली नाही. पण तरीही वाचनीय.
व्यासपर्व - दुर्गा भागवत या
व्यासपर्व - दुर्गा भागवत
या पुस्तकामुळे महाभारतातल्या व्यक्तीरेखा कळायला मदत झाली.
'मृत्यंजय', 'युगंधर' वाचून कृष्ण आणि द्रौपदीबद्दल आणखी वाचावंसं वाटत होतं,
यातल्या 'पूर्णपुरुष कृष्ण' आणि 'कामिनी' या लेखांनी हे कुतुहल शमलं.
Pages