भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
सचिन प्रत्येक सामन्यात निराशा
सचिन प्रत्येक सामन्यात निराशा करतोया. त्याचं महाशतक गेलं खड्ड्यात. त्याने निदान प्रत्येक सामन्यात ४०-५० धावा तरी कराव्यात हीच अपेक्षा.
आता ऑस्ट्रेलिया सोडून परत
आता ऑस्ट्रेलिया सोडून परत भारतात यावे. अजून भारतात हवा फारशी गरम नसेल, त्रास होणार नाही. मग एप्रिलमधे आय पी एलचे सामने थंड हवेच्या ठिकाणी ठेवावेत. तिथे श्रीमंत लोक येतात. तिकीटाचे दर चौपट केले तरी हरकत नाही. शिवाय खेळ फुकटच्या चॅनेल्स वर न दाखवता पैसे घेऊन दिसेल अश्याच काही चॅनेलवर दाखवावेत, म्हणजे आणखी पैसे!!
जडेजाला १० कोटी तर सचिनला किती? धोणीला किती?
>> आजचा पराभव अतिशय लाजिरवाणा
>> आजचा पराभव अतिशय लाजिरवाणा आहे.
आजचाच का? इंग्लंड व ऑसीजनी टेस्टमधे ४-० धुतला. पहिल्या वनडे मधेही वाईट मार खाल्ला. ते का नाही लाजिरवाणे म्हणे?
>> त्याने ५ एकदिवसीय सामन्यात एकूण १८ धावा केल्यात.
सचिनने त्याच्यापेक्षा जास्त केल्यात. सचिन झिंदाबाद!
>> गांगुलीच्या काळात एक दोनदा हरले की नंतर एकदम पेटत.
काहीही काय? आठव तो फेमस वर्ल्ड कप!
सेहवाग पाहीजे होता असं कुणीच कसं म्हंटलं नाही?
८ वीत असताना माझ्या वर्गाच्या
८ वीत असताना माझ्या वर्गाच्या टीम विरुद्ध माझ्या कॉलनीची टीम अशी मॅच ऑर्गनाईज केली होती. २० ओव्हर्स मध्ये पहिले बॅटिंग घेऊन माझ्या कॉलनीच्या टीमने ११३ धावा केल्या. आमच्या वर्गाच्या टीमने बॉलींग केल्यावर थकून गेल्यामुळे व आपल्याकडून ११४ धावा निघत नाहीत हे आधीच माहित असल्यामुळे कॉलनीच्या टीमला ५ रू देऊन टाकले. व बॅटींग घेतलीच नाही. शाळेची टीम महान होती कारण त्यांना विचार करता येत होता. त्यांनी लगेच बाजूच्या लिंबूटिंबूशी दुसरी मॅच घेतली १० ओव्हरस्ची अन ती जिंकली. हिशोब टोटल खेळ ४० ओव्हर्स, एक जिंकने एक हार, पण निघतानाची मॅच जिंकली. , पैसे ५ दिले, ५ घेतले.
तस्मात - भारतीयांनी तिथून वापस यावे. सर्व मॅच सोडून देऊन अन बांग्लादेश (सॉरी नवीच आलेले अफगाण) ह्यांच्यासोबत मॅच घ्याव्यात. म्हणजे परत कॉन्फिडन्स की काय तो येईल.
अगदीच राहवले नाही म्हणून ..
जातील हे ही दिवस जातील.
येण्या आधी सगळ्या खेळाडूंनी
येण्या आधी सगळ्या खेळाडूंनी आय पी एल मधे मिळालेल्या पैशातून ऑस्ट्रेलिया नि श्रीलंकेला लाच देऊन उरलेले सगळे सामने जिंकावेत. मग परत यावे. कदाचित आय पी एल वाले आणखी पैसे देतील, जिंकून आले म्हणून.
म्हणजे कपिल सिब्बल म्हणतो तसे 'झिरो सम'!
परत आल्यावर अफगाण नि बांगला देशला भारतात बोलवावे, आपण तिकडे जाउ नये. आपल्या घरी आपल्याला खेळणे जमते. मग सचिनचे महाशतक, आणि कुणाचे काय विक्रम राहिले असतील ते आटपून घ्यावेत, मगच पाकीस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका इकडे लक्ष द्यावे.
कारण काय आहे, सध्या भारतापुढे सचिनचे महाशतक, क्रिकेटमधे जिंकणे हे सर्वात जास्त महत्वाचे प्रश्न आहेत, त्यापुढे चार कसाब येऊन गेले, काश्मीर गेले, चीनकडे काय किंवा पाकीस्तानकडे काय, काही फरक पडत नाही!
काहीही काय? आठव तो फेमस
काहीही काय? आठव तो फेमस वर्ल्ड कप!>>> कोणता चिमण? २००३ चा? तेव्हा सुरूवातीला हरल्यावर सलग ८ जिंकले नव्हते का फायनल पर्यंत. मी ४-५ उदाहरणे देऊ शकतो.
सचिन अशा मूडमधे असला तर रणजी
सचिन अशा मूडमधे असला तर रणजी मधे सुद्धा फेल होईल, नाहीतर ऑस्ट्रेलिया काय किंवा आफ्रिका काय, काही फरक पडत नाही.
सचिन अशा मूडमधे असला तर रणजी
सचिन अशा मूडमधे असला तर रणजी मधे सुद्धा फेल होईल, नाहीतर ऑस्ट्रेलिया काय किंवा आफ्रिका काय, काही फरक पडत नाही. >> +1
तो अचानक एखाद्या शेल मध्ये गेल्यासारखा वाटतोय. येईल बाहेर सप्टे पर्यंत.
फारेन्डा, सॉरी! मला वाटलं
फारेन्डा, सॉरी! मला वाटलं २००७ पण गांगुलीच होता कॅप्टन!
पाँटींगने पहिल्या ५ एकदिवसीय
पाँटींगने पहिल्या ५ एकदिवसीय सामन्यात एकूण १८ धावा (सर्वोच्च ७) केल्याने त्याची ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघातून हकालपट्टी झाली आहे. तो एकदिवसीय संघात परत येण्याची शक्यता जवळपास नाहीच. काल त्याने खेळलेला त्याच्या कारकीर्दीतला बहुतेक शेवटचाच एकदिवसीय सामना!
भारताने या दौर्यात फारसं काही मिळविलेलं नसलं तरी पाँटिंगची एकदिवसीय कारकीर्द कायमची संपविण्यात व शॉन मार्शची किमान २ वर्षे तरी संघाबाहेर हकालपट्टी होण्यात यश मिळविलेलं आहे. हेही नसे थोडके!
>>> जातील हे ही दिवस जातील.
>>> जातील हे ही दिवस जातील.
नक्कीच जातील. मला पूर्ण खात्री आहे.
>>> सेहवाग पाहीजे होता असं कुणीच कसं म्हंटलं नाही?
रोहीत शर्माच्या ऐवजी सेहवागला घ्यावा. तसाही तो पुढच्या सामन्यात कर्णधार म्हणून आत येणारच आहे.
>> त्याची ऑस्ट्रेलियाच्या
>> त्याची ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघातून हकालपट्टी झाली आहे.
अरेरे! आपल्याला हमखास मिळू शकणारी एक विकेट गेली?
धोनीला बसवल्यामुळे शेवटी जिंकून कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
>>> धोनीला बसवल्यामुळे शेवटी
>>> धोनीला बसवल्यामुळे शेवटी जिंकून कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यात काहीच प्रश्न नाही. धोनी नसल्यामुळे, सहज जिंकत असलेला सामना अत्यंत अवघड करून, प्राण कंठाशी येऊन शेवटच्या १-२ चेंडूत सामना जिंकण्याची वेळ न येता भारत सामना २-३ षटके शिल्लक ठेवून अजिबात अवघड न करता अगदी आरामात जिंकेल.
भारताने पहिल्या पाचही सामन्यात पहिले क्षेत्ररक्षण केले आहे. निदान उद्या तरी नाणेफेक जिंकून फलंदाजी घ्या. उद्या धोनी नसल्यामुळे कदाचित नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागेल.
उद्या ब्रिस्बेनला संपूर्ण
उद्या ब्रिस्बेनला संपूर्ण दिवसभर पावसाची जोरदार शक्यता आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करणार्या संघाला डकवर्थ्-लुईस पद्धतीचा फायदा मिळून सामना जिंकण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारेल असे वाटते.
खराब कामगिरीमुळे एकदिवसीय सामन्यांच्या संघातून वगळल्यामुळे व वाढत्या वयामुळे एकदिवसीय संघात परत येण्याची अजिबात शक्यता नसल्याने पाँटिंग लवकरच खेळाच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. उद्या त्याची पत्रकार परिषद आहे.
आज कोणीच नाही?
आज कोणीच नाही?
थिरिमाने, थिरिमाने!!! जंग जंग
थिरिमाने, थिरिमाने!!!
जंग जंग पछाडले बीसीसीआय च्या गोलंदाजांनी, श्रीलंकेला ३०० धावा करून देण्यासाठी. पण नाही जमले!
आता डकवर्थ लुइस ची प्रार्थना करा!!
रोहीत शर्माच्या ऐवजी सेहवागला
रोहीत शर्माच्या ऐवजी सेहवागला घ्यावा.
घेतले सेहवागला. एक चेंडू खेळला. पण मग कंटाळा आला. पुरे आता म्हणून परत गेला.
चला. तेंडूलकरहि गेला. आता
चला. तेंडूलकरहि गेला. आता झोपावे.
उद्या सकाळी ११ वाजता भेटू, साडेअकरा धरा.
लोक शोकसभेला गेलेत की
लोक शोकसभेला गेलेत की काय?
मास्तरा, धोनी नसला की आपली इनिंग कशी लवकर संपते ते पाहीलस ना?
अरे काय झाले काय इथे? भाउ,
अरे काय झाले काय इथे? भाउ, मास्तुरे, असामी, केदार, फारेंडा, गेलात कुठे सगळे?
भाउ जरा एक चित्र टाका ना? तेव्हढीच गंमत, सामने बघून नैराश्य येते!
बोलण्यासारखे काहिच नव्हते,
बोलण्यासारखे काहिच नव्हते, नीट हरलो शेवटची मॅच.
थिरामणीच्या विरुद्धा अपील मागे घेणे हा शुद्ध मूर्खपणा होता. अशा प्रकारे बाद करणे हे ICC rules प्रमआणे योग्य आहे त्यामूळे त्यात spirit of the game वगैरेचा प्रश्न कुठे आला ? सेहवागचे कारण तर अतिशय हास्यस्पद आहे, त्यात तेंडुलकरचा सहभाग असेल तर त्यातून आपण कसे शिकत नाहि हे उघड होते. श्रीलंकेच्या matthews ने शेवटचा no ball टाकून सेहवागचे शतक पूर्ण होउ दिले नव्हते तेंव्हा spirit of the game कुठेहि अडकले नव्हते ? एव्हढे सगळे करुन ह्या प्रकारावर जयवर्धनेची टिप्पणी काय तर म्हणे तर "मूळात अपिलच करायला नको होते ?".
तेंडूलकरने high point वर retire व्हायला हवे ह्याबद्दल कपिलने लिहिणे, रैनाला short pich balling बद्दल गंग्याने सल्ला देणे, धोनी काही cricketers अधिक support करतो ह्याबद्दल गंग्याने बोलणे (हरभजन, युवराज, झहीर ही नावे आठवतात का त्याला ?) अशा गोष्टी सुरू असल्यावर आपल्यासारख्या पामरांनी काय बोलावे ? सगळे आपापले जुने पुराणे हिशेब कोणा-कोणाचे हिशेब कोणाकोणाच्या माध्यमातून चुकते करायला लागले आहेत
... "गिदड कि जब मौत आती है तो सब कौव्वे जमा हो जाते है" असे काहितरी होते ते आठवले.
सगळे आपापले जुने पुराणे हिशेब
सगळे आपापले जुने पुराणे हिशेब कोणा-कोणाचे हिशेब कोणाकोणाच्या माध्यमातून चुकते करायला लागले आहेत >>
थोडक्यात त्यांची मायबोली झाली आहे.:)
झक्कीजी, 'इंडियन पब्लिक'ला
झक्कीजी, 'इंडियन पब्लिक'ला तुमच्यासारखी चांगली स्मरणशक्ती नसते, या पक्क्या गृहितकावर तर राजकारणातले खेळ आणि खेळातलं राजकारण इथं रंगत, फोफावत असतं !!!
बाकी सध्या खेळापेक्षा,
बाकी सध्या खेळापेक्षा, खेळातले राजकारण, हेच जास्त मनोरंजक आहे. खेळ गेलाय खड्ड्यात!
बाकी इतर राजकारण, ज्यात शरद पवार, सोनिया, कपिल सिब्बल, दिग्विजय, राहुल इ. लोक आहेत, ते सर्वात जास्त भयानक आहे.
त्यामुळेच जनता खेळातील राजकारणाकडे जास्त लक्ष देते.
>>त्यामुळेच जनता खेळातील
>>त्यामुळेच जनता खेळातील राजकारणाकडे जास्त लक्ष देते.
ईतकी वर्षे गुर्हाळातून रस निघत होता तेव्हा बाजूचा "चारा", "शेण" व "चोथा" पब्लिक ला दिसला नाही... किंवा दिसला तरी दुर्लक्ष केले होते. आता रस आटल्यावर या बाकीच्या गोष्टी नजरेत येवू लागल्या आहेत.
बॅट चा ऊस झाला की (दोन्ही अर्थाने!) की आणखिन काय वेगळे होणारे..?
आपलाच ग्लास आणि आपलेच ओठ
>>थोडक्यात त्यांची मायबोली झाली आहे
"अनुल्लेख" शिकले तर बरे होईल..
दुसरीकडे सचिन ने अजून किती (वर्षे?) खेळावे या चर्चेला पेव फुटले आहेच- हे म्हणजे मुळात अजून किती वर्षे क्रिकेट या खेळाला(च) फक्त आपण डोक्यावर चढवावे असे विचारण्यासारखे आहे. सेहवाग, लक्षमण, व ईतरांची वाढती शारिरीक वलये पाहता त्यांची जागा गल्ल्यावर किंवा गल्लीत असायला हवी. रणतुंगा ची फिगर ठेवून क्रिकेट सामने जिंकण्याचे दिवस इतीहासजमा झालेत. च्यामारी खेळात फिटनेस च निकष नाही लावणार तर काय सरकारी कार्यालयात लावणार का? असो हेही प्रकरण "आपलेच दात..." या कॅटेगरीतील आहे.
why this vaadaavaadi D? 
बाकी गांगुलीने फिल्डींग बद्दल बोलणे म्हणजे कॅटरीना ने मराठी/हिंदी व्याकरणाबद्दल बोलण्या सारखे आहे. त्याचे काय एव्हडे "आता" त्याला बोलायचे पैसे मिळतात- शास्त्री व सन्नी नंतर परंपरा पुढे चालवायला तयार झाला आहे.
रिकी ला बाहेरचा दरवाजा दाखवला ऑसी ने. आपल्याकडे असता रिकी तर तेंडूलकर खेळतोय तोवर तूही खेळ (म्हणजे विक्रमाची बरोबरी होत नाही तोवर) म्हणून त्याला आत ठेवला असता. "विक्रमा"दित्यांचे आम्हा भारतीयांना भारी वेड नाही. अगदी चांदोबा/किशोर पासून ते ट्विटर पर्यंत आम्हाला विक्रमादित्य हवेच असतात. मग आता भोगा लेको...
योग, गांगुली फिल्डिंगबद्दल
योग, गांगुली फिल्डिंगबद्दल बोललाय? जरा लिन्क देतोस का? मला वाटले फिल्डिंगबद्दल बोलायचेही श्रम घेणार नाही तो
पण तो सचिनबद्दल योग्य बोलला आहे - गेली १-२ वर्षे सचिन फक्त अधूनमधून वन डे खेळतोय. आधी त्याला वर्ल्ड कप पर्यंत फिटनेस ठेवायचा होता तोपर्यंत ठीक होते. पण आता त्याने(च) ठरवायला हवे की वन डे खेळायचे की नाही. टीम एक दोन सिरीज खेळते आणि मग अचानक तेंडुलकर लाईन-अप मधे दिसतो. त्याने इतरांचाही गोंधळ होत असेल. त्याने वन डेत ती राहिलेली दोन शतके मारून मोकळे व्हावे व मग फक्त टेस्ट्स खेळाव्यात. नाहीतरी आता वन डे मधे अजून काय करणे बाकी आहे?
अजून बराच काळ खेळणार असेल तर आम्हाला हवेच आहे. पण मग पुन्हा "धुलाई मोड" मधे खेळावे, आता काही त्याच्यावर एवढे अवलंबून नाही. गावसकर ने कारकीर्दीच्या शेवटच्या एक दोन वर्षात जसे क्रिकेटची मजा घेण्यासाठी खेळणे चालू केले होते (वन डेत) तसे काहीतरी.
अरे आणि हो.. आता पुढीलपैकी
अरे आणि हो.. आता पुढीलपैकी एखाद्या एकदिवसीय सामन्यात सचिन ने ते विक्रमी शतक केले (ठोकले लिहीणार होतो पण भावनांना आवर घातला!) की पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
मग मथळे झळकतीलच. silencing critics with his bat.. वगैरे वगैरे.. हे सर्वच सो कॉल्ड आपणच बनवलेले "देव" जेव्हा गाभारा सोडून कळसावर बसू पाहतात तेव्हा केमिकल लोचा होतो हेच खरे
>>त्याने वन डेत ती राहिलेली दोन शतके मारून मोकळे व्हावे व मग फक्त टेस्ट्स खेळाव्यात. नाहीतरी आता वन डे मधे अजून काय करणे बाकी आहे
त्याच साठी तर त्याला "आत" ठवले असेल रे ईतका काळ.. पण आता काळापेक्षा कळा सोसवेना झाल्या आहेत.
>>गावसकर ने कारकीर्दीच्या शेवटच्या एक दोन वर्षात जसे क्रिकेटची मजा घेण्यासाठी खेळणे चालू केले होते (वन डेत) तसे काहीतरी.
बस का! विश्वचषक जिंकल्यावर सचिन नेमका त्याच मूड मध्ये खेळतोय असे मी गृहीत धरत होतो.. पण झोल असा झालाय की त्या विक्रमापायी वि. संघ व आपण निव्वळ मजा पहात आहोत. असो. त्याच्याबद्दल काहीही न बोलणे हा त्याच्या भक्तांचा नियम भक्तांनी बर्यापैकी बराच काळ पाळला आहे. तरी "विठ्ठलमूर्तीने" आता पावले ऊचलावीत अशी किमान अपेक्षा! आणि ते करायला क्रिकेट च्या नव्या पंढरी (ऑसी) शिवाय दुसरे योग्य ठिकाण नाही.
फारएण्ड, अगदी पटलं.
फारएण्ड, अगदी पटलं.
तरी "विठ्ठलमूर्तीने" आता
तरी "विठ्ठलमूर्तीने" आता पावले ऊचलावीत
पंढरीनाथा, झडकरी आता, पंढरी सोडून चला, विनवते रखुमाई विठ्ठला!
(आम्ही जुने. आम्हाला मराठी कविता, गाणीच आठवतात. भारतातल्या मराठी लोकांना आजकाल उर्दू शेर, फ्रेंच गाणी वगैरे आठवतात. तेंव्हा क्षमस्व!)
टीम इंडीयामध्ये जबरदस्त खदखद
टीम इंडीयामध्ये जबरदस्त खदखद चालू आहे. काही खेळाडूंमध्ये युद्ध पेटले आहे.
http://www.espncricinfo.com/ci/content/current/story/554885.html
आपण वारंवार हरत आहोत त्यामागे हेसुद्धा एक कारण असणार.
सगळे उठून सचिनला निवृत्त व्हायचा सल्ला का देत सुटलेत? कपिलने किंवा गांगुलीने असा सल्ला देणे म्हणजे "लोका सांगे ब्रह्मज्ञान . . ." असला प्रकार आहे. आपण कधी निवृत्त व्हावे हे सचिनलाच ठरवू दे. इतरांनी त्यात लुडबुड करण्याची अजिबात गरज नाही. तो जर संघाच्या उपयोगाचा नसेल तर त्याला संघातून वगळावे. त्याला वगळायला कोणी अडवले आहे? उगाच नको त्यात नाक खुपसून भोचकपणे न मागितलेले सल्ले कशाला द्यायचे?
"मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा श्रेष्ठ खेळाडू आहे. कुठे थांबायचं, हे त्याला अचूक ठाऊक आहे आणि योग्य वेळ आल्यावर तो स्वतःच आपले पॅड उतरवेल. या विक्रमवीराला कुणीही निवृत्त होण्याचं शहाणपण शिकवायची गरज नाही, असे खडे बोल टीम इंडियाचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरनं सुनावले आहेत. सचिनची जागा घेऊ शकणारा एकही खेळाडू आत्ताच्या संघात नसल्याचंही त्यानं निक्षून सांगितलंय.
>>> श्रीलंकेच्या matthews ने शेवटचा no ball टाकून सेहवागचे शतक पूर्ण होउ दिले नव्हते तेंव्हा spirit of the game कुठेहि अडकले नव्हते ?
तो मॅथ्युज नव्हता. तो गोलंदाज रणदीव(टा) होता. संगक्कारा व दिलशानच्या सल्ल्यावरून त्याने नोबॉल टाकला होता.
>>> तेंडूलकरने high point वर retire व्हायला हवे ह्याबद्दल कपिलने लिहिणे, रैनाला short pich balling बद्दल गंग्याने सल्ला देणे, धोनी काही cricketers अधिक support करतो ह्याबद्दल गंग्याने बोलणे (हरभजन, युवराज, झहीर ही नावे आठवतात का त्याला ?) अशा गोष्टी सुरू असल्यावर आपल्यासारख्या पामरांनी काय बोलावे ? सगळे आपापले जुने पुराणे हिशेब कोणा-कोणाचे हिशेब कोणाकोणाच्या माध्यमातून चुकते करायला लागले आहेत ... "गिदड कि जब मौत आती है तो सब कौव्वे जमा हो जाते है" असे काहितरी होते ते आठवले.
सहमत! गांगुली कॉमेंट्री करताना "रनिंग बिटवीन द विकेट" बद्दल सल्ले देत होता. हे म्हणजे कलमाडीने भ्रष्टाचार कसा करू नये असे सांगण्यासारखे किंवा मुद्देसूद कसे बोलावे असे पिग्विजयने सांगण्यासारखे आहे.
>>> पण झोल असा झालाय की त्या विक्रमापायी वि. संघ व आपण निव्वळ मजा पहात आहोत.
मला नाही वाटत की सचिन स्वत: महाशतकाबद्दल एवढा कासावीस झाला असेल. त्याच्या महाशतकाचा मोठा इश्यू मिडीयानेच जास्त केला आहे. या व इंग्लंडच्या दौर्यावर इतर सर्वांप्रमाणेच तोही अपयशी ठरलेला आहे. जिथे संपूर्ण संघच अपयशी ठरलेला आहे, तिथे त्याला एकट्यालाच दोष देऊन कसे चालेल? त्याच्याबद्दल असं दिसतंय की तो डावाची सुरूवात अतिशय चांगली करतो. अतिशय निर्दोष फटके मारून २०-२५ पर्यंत पोचतो. नंतर अचानक काहीतरी विचित्र फटका मारायला जाऊन बाद होतो. इंग्लंड दौर्यात आणि इथेसुद्धा तो अनेकवेळा २० ते ४० या दरम्यान बाद झाला आहे आणि बहुतेक वेळा विचित्र पद्धतीने बाद झाला आहे.
संघात काहीतरी खदखद सुरू आहे हे पण, तो आणि इतरजण अयशस्वी ठरण्याचे एक कारण असणार.
Pages