भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
मला वाटते, आपणच सगळे सामने
मला वाटते, आपणच सगळे सामने फार गंभीरपणे घेतो. प्रत्यक्ष खेळणारे काहीतरी दुसरेच विचार करत असतील. जिंकल्याबद्दल जास्त पैसे मिळणार नसतील तर कशाला उगीच त्रास, असा विचार करून, खेळत असतील. म्हणून मग चुका झाल्या तरी पर्वा इल्लै!
जडेजा ला आयपीएल मधे मिळालेले
जडेजा ला आयपीएल मधे मिळालेले बिलिंग मलाही झेपले नाही. तेवढा काही भारी वाटत नाही तो.
एक "Fan's instinct" असते त्यावरून हा हीरो फार मॅचेस वगैरे जिंकून देइल असे वाटत नाही
हे भारताच्या मॅचेस च्या बाबतीत खोटे ठरले तर मला आनंदच होईल.
अरे नवीन खेळाडू सर्वच चांगले
अरे नवीन खेळाडू सर्वच चांगले फिल्डर्स आहेत. रैना, विराट अगदी रोहित शर्मा पण. आता असे आहे की फिल्डींग चांगली असणे जरूरी झाले आहे. त्यामुळे त्याला पर्याय असणारे चांगले फिल्डर्स उपलब्ध आहे. केवळ फिल्डीग ह पर्याय ठेवला तर कैफुला पण घ्या की राव > > केवळ तोच पर्याय ठेवला वगैरे नको रे. पूर्ण संघाचे construction बघ. अश्विन fail गेला तर जडेजा पर्याय ठरतो. परत तो एकमेव orthodox left handed spinner आहे. इरफानला आत आणायचे तर चार medium fast ballers होणार (झहीर हवाच, उमेश impact baller म्हणून, नि विनय कुमारला lottery लागलीये) असा सगळा विचार होत असणार रे. परत जडेजाची fielding खरच इतरांपेक्षा उजवी आहे. close-in नाहितर outfielding पण चांगली आहे. मोठ्या ground वर ह्या गोष्टीने किती मोठा फरक पडतो बघ ना. उद्या जर विनय कुमार मार खाउ लागला तर त्याच्या प्रवीण कुमार येईल ना.
भाऊ, गंभीरच्या धोनीबद्द्लच्या comments बद्दल धोनीचे विचार वाचलेत का ?
http://www.espncricinfo.com/commonwealth-bank-series-2012/content/curren...
Its taken in right spirit.
जडेजा ला आयपीएल मधे मिळालेले
जडेजा ला आयपीएल मधे मिळालेले बिलिंग मलाही झेपले नाही. तेवढा काही भारी वाटत नाही तो.>>ते थोडा अतीशोयक्त आहे (bidding च्या क्रुपेने) हे मान्य करुनही तू मुख्य मुद्दा विसरू नकोस. IPL is won by teams who have better domestic players. हि bench strength ज्यांची चांगली आहे त्यांचे पारडे नेहमीच वरचढ असणार. एखादा परदेशी खेळाडू एखाद्या दिवशी मॅच एकहाती काढूनही देईल पण overall picture बघ. जडेजा देशात फार effective ठरतो नि जेव्हढ्या मॅचेस लहान स्वरुपाच्या तेव्हहा त्याच्या limited balling चा effectiveness अधिक वाढतो. त्यामूळे त्याचे बिलिंग अधिक झालेय.
असामीजी, लिंकबद्दल
असामीजी, लिंकबद्दल धन्यवाद.मी खरंच गंभीरला भारतीय दंड संविधानाचीं कलमं लावायला नव्हतो निघालो; माझाही तो आवडता खेळाडू आहे व नवीन पिढीचा खुलेपणा मलाही मनापासून भावतोही. पण गंभीर तसा 'सिनियर' वर्गाच्या उंबरठ्यावर आहे व त्याच्यापुढे मोठी कारकिर्द आहे म्हणून त्याने कांही पथ्यं पाळणं त्याच्याच हिताचं आहे असं वाटलं, इतकंच. गंभीरच्या विधानाबाबत धोनीला जाहिरपणे समर्थन द्यावं लागणं हें सहज टाळतां आलं असतं;<< Its taken in right spirit. >> That's nice of Dhoni and speaks highly of his maturity but does not necessarily justify Gambhir's impetuosity, असं नाही वाटत ?
ठराविक वयानंतर माणूस 'कटकटी' बनतो म्हणतात; माझ्यात तीं लक्षणं स्पष्ट दिसायला लागलीत !
<< धोनीने गंभीरचा पुरस्कार
<< धोनीने गंभीरचा पुरस्कार बळकावयाची ही दुसरी वेळ.........पण तरीसुद्धा गंभीरचीच कामगिरी जास्त सरस वाटते. >> मास्तुरेजी, आज जयवर्धने व मायकेल क्लार्क यांनी " सहाव्या क्रमांकावर येऊन सातत्यपूर्ण कामगिरी " करणार्या "कूल" व उत्कृष्ट "फिनीशर" धोनीचं भरभरून कौतुक केलंय ; जयवर्धनेने तर कालच्या सामन्याचं श्रेय धोनीलाच असल्याचं नि:संदिग्धपणे म्हटलंय !! तेंव्हा, काल धोनीला " मॅन ऑफ द मॅच " देण्याच्या निर्णयाला संशयाचा फायदा [ Benefit of doubt ] तरी द्यायला हरकत नसावी !!
मलाही वर्ल्ड कप फायनल व या एक
मलाही वर्ल्ड कप फायनल व या एक दोन मॅचेस मधे गंभीर व धोनी दोघांची कामगिरी चांगली असली तरी मॅच संपविणे याला जास्त क्रेडिट द्यायलाच पाहिजे. विशेषतः तो खेळाडू जेव्हा मैदानावर आला तेव्हा विजय नक्की नव्हता. त्यामुळे धोनी योग्यच आहे.
आमची धोनीबद्दल एकच तक्रार आहे की तो फार क्वचित धोनीसारखा खेळतो
गंभीरच्या त्या वाक्याबद्दल मला फारसे काही वाटले नाही. सडेतोड बोलायची पद्धत आपल्याकडे आली तर चांगलेच आहे.
<< आमची धोनीबद्दल एकच तक्रार
<< आमची धोनीबद्दल एकच तक्रार आहे की तो फार क्वचित धोनीसारखा खेळतो >> फारेण्डजी, कदाचित, तो सहावा येतो व तेंव्हा बहुधा सामने यशापयशाच्या सीमेवर घुटमळत असतात, हें कारण असूं शकेल !
<< सडेतोड बोलायची पद्धत आपल्याकडे आली तर चांगलेच आहे.>> मला मनापासून वाटतं कीं गंभीरच्या विधानाबद्दलची माझी भूमिका मी आतां गंभीरपणे पडताळून पहाणं खरंच आवश्यक आहे !
>>> मलाही वर्ल्ड कप फायनल व
>>> मलाही वर्ल्ड कप फायनल व या एक दोन मॅचेस मधे गंभीर व धोनी दोघांची कामगिरी चांगली असली तरी मॅच संपविणे याला जास्त क्रेडिट द्यायलाच पाहिजे. विशेषतः तो खेळाडू जेव्हा मैदानावर आला तेव्हा विजय नक्की नव्हता. त्यामुळे धोनी योग्यच आहे.
गंभीर ओपनिंगला किंवा १ गडी बाद झाल्यावर येतो. धोनी ५ व्या ते ७ व्या क्रमांकावर परिस्थितीनुसार येतो. त्यामुळे धोनी अखेरपर्यंत नाबाद राहण्याची, सामना संपविण्याची व सामना जिंकताना तो मैदानात असण्याची शक्यता गंभीर तिथे असण्यापेक्षा खूपच जास्त आहे. पण या दोन्ही सामन्यात धोनीला शिखरावर ध्वज फडकावता आला तो गंभीरने रचलेल्या मजबूत पायामुळे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २ बाद ३१ वरून गंभीरने ९७ धावा करून भक्कम पाया रचला होता. तो जेव्हा बाद झाला तेव्हा शेवटच्या १०-१२ षटकात अंदाजे ६० च्या आसपास धावा हव्या होत्या. म्हणजे भारताला अतिशय सुस्थितीत नेल्यावरच तो बाद झाला. पण सामनावीर धोनीला केले.
कालच्या सामन्यात सुद्धा एका बाजूने पूर्ण गळती लागलेली असताना गंभीर एका बाजूला पाय रोवून उभा राहिला व स्वतःची चूक नसताना तो जेव्हा बाद झाला तेव्हा भारत अत्यंत सुस्थितीत होता (जिंकायला ५९ चेंडूत ५९ धावा हव्या होत्या). पण धोनीने व जडेजाने सोपा सामना अवघड करून टाकला व नंतर प्राण कंठाशी आल्यावर धोनीने जोरदार फलंदाजी करून तो जिंकला. पण गंभीरने रचलेल्या भक्कम पायाकडे पूर्ण दुर्लक्ष करून धोनीलाच सामनावीर केले.
गंभीरच या दोन्ही सामन्यांसाठी योग्य सामनावीर होता असे माझे मत आहे.
गंभीरच या दोन्ही सामन्यांसाठी
गंभीरच या दोन्ही सामन्यांसाठी योग्य सामनावीर होता असे माझे मत आहे. >> World Cup Final बद्दल अनुमोदन. मी तेंव्हाही म्हटले होते कि ह्या खेळीचे झाले व्हायला हवे तेव्हढे कौतुक झाले नाहि. It was high octane final with too much on the line. Two of our best match winners were back already. Gambhir was playing with relative rookie under very intense pressure situation and he absorbed it all to come up with match winning total. Dhoni deserved equal credit but for me Gambhir's innings was much more monumental in that match.
That's nice of Dhoni and speaks highly of his maturity but does not necessarily justify Gambhir's impetuosity, असं नाही वाटत ?>> ह्याउलट विचार करुन बघितला तर गंभीर हा भावी कप्तान होण्याची संधी आहे. असा स्पष्ट विचार करू शकणारा नि absolute no-nonsense no-gossip style मधे मांडू शकणारा कप्तान का नाहि आवडावा ? अशा प्रकाराने दर वेळी एखादा खेळाडू rest किंवा drop केला कि त्यातून निर्माण केली जाणारी controversy टाळली जाईल. धोनीसुद्धा बरेचदा असे public forum मधे बोलतो आणी सुरूवातीला ते धक्कादायक वाटले तरी ते नीत वाचायची नि समजायची सवय हळू हळू लागलीच आहे
असामीजी, अहो, गंभीरच्या
असामीजी, अहो, गंभीरच्या विधानाबाबत मी प्रांजळपणे कबूल केलंय ना <<माझी भूमिका मी आतां गंभीरपणे पडताळून पहाणं खरंच आवश्यक आहे ! >> !
माझी भूमिका मी आतां गंभीरपणे
माझी भूमिका मी आतां गंभीरपणे पडताळून पहाणं खरंच आवश्यक आहे >> तुम्ही तुमचे मत बदलावे म्हणून नाहि तर त्याच गोष्टीचा असाही विचार होउ शकतो हे दाखवण्यासाठी लिहिले होते. मता-मतांमधे फरक असणारच.
<< तुम्ही तुमचे मत बदलावे
<< तुम्ही तुमचे मत बदलावे म्हणून नाहि ...>> असामीजी, कुणी वेगळा विचार मांडला , तो मला पटला, तर माझं मत मी बदलावं यासाठीच तर चर्चा असते ना ! विश्वास ठेवा, उपरोधिकपणे नव्हे तर खरंच मनापासूनच मी म्हटलं होतं तसं . आणि , विशेषतः खेळावरच्या चर्चेत जर तेवढीही खिलाडूवृत्ती नसती माझ्याकडे तर आलोच नसतो ना मी इथं !!
आज लंकेला सामना जिंकण्याची
आज लंकेला सामना जिंकण्याची जबरदस्त संधी आहे. पावसामुळे सामना ४१ षटकांचा होणार आहे. ऑसीजची आतापर्यंत २८.५ षटकांत ७ बाद ९५ अशी घसरगुंडी झालेली आहे.
नेहमीप्रमाणे ऑसीजनी लढा
नेहमीप्रमाणे ऑसीजनी लढा दिलेला आहे.. १३१-८ झालेत आणि अजून ५ ओव्हर बाकी आहेत..
लंकावाले जवळपास जिंकत आलेत.
लंकावाले जवळपास जिंकत आलेत. ३२ षटकांच्या आत १५२ धावा केल्या तर अतिरिक्त बोनस गुण सुद्धा मिळेल. आता फक्त १८ धावा हव्या आहेत आणि १९.३ षटके शिल्लक आहेत. त्यामुळे श्रीलंकेला ५ गुण (सामना जिंकल्याचे ४ + १ बोनस गुण) मिळणार हे नक्की.
या सामन्यानंतर अशी स्थिती असेल.
भारत (४ सामन्यात) - १० गुण (२ विजय, १ बरोबरी, १ पराभव)
ऑस्ट्रेलिया (४ सामन्यात) - ९ गुण (२ विजय, २ पराभव)
श्रीलंका - ४ सामन्यात - ७ गुण (१ विजय, १ बरोबरी, २ पराभव)
तिन्ही संघांचे अजून ४-४ सामने शिल्लक आहेत (प्रत्येक जण एकमेकांशी दोनदा खेळणार). निव्वळ धावगतीत ऑस्ट्रेलिया १ ल्या, श्रीलंका २ र्या व भारत ३ र्या क्रमांकावर आहे.
धावगतीत भारत ३ र्या
धावगतीत भारत ३ र्या क्रमांकावर आहे.
धोणीला माहित आहे का हे?
समजा धावगतीत ३ रा क्रमांक असेल पण एकूण गुण, सध्या जसे सर्वात जास्त आहेत, तसे राहिले तर भारतच जिंकेल ना?
मुख्य म्हणजे खेळात जिंकायचे, चांगली कामगिरी करायची वगैरे आपल्याला वाटते. प्रत्यक्ष खेळणारे म्हणतात - टेन्शन नही लेनेका यार, हॅव फन!!
<< टेन्शन नही लेनेका यार, हॅव
<< टेन्शन नही लेनेका यार, हॅव फन!! >> पण कांहीं वेळां हाच मंत्र जादूही घडवून आणतो; १९८२च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिलने नेमका हाच मंत्र दिला होता आपल्या सहकार्याना, आपल्या 'पेप टॉक'मधे !!!
जडेजा ला आयपीएल मधे मिळालेले
जडेजा ला आयपीएल मधे मिळालेले बिलिंग मलाही झेपले नाही.
अहो तसे आपल्यासारख्या गरीब लोकांना वाटते. आपण हुंडाय नि होंडा घेणारे लोक. फेरारी नि लॅम्बर्घिनी च्या किमती आपल्याला झेपत नाहीत. साहाजिकच आहे.
पण मी आजच वाचले की:
Two IPL teams are auctioned at Rs.3300 corers
आणि अशा किती टीम्स असतात आय पी एल मधे? म्हणजे किती एकूण रक्कम आहे त्यांच्याकडे?
त्यापुढे 'आयपीएल लिलावात १० कोटी रूपयांना विकत घेतलेल्या जडेजाने' काही केले तरी कीं फर्क पैंदा पापे?!
आपण या सगळ्या गोष्टी एव्हढ्या गंभीरपणे का घेतो? ते लोक वेगळे, त्यांचा धर्म, त्यांचे राजकारण, अर्थकारण, त्यांची सांस्कृतिक मूल्ये हे सगळे आपल्याहून फार फार वेगळे. जणू परग्रहावरून, नव्हे, दूर दूरच्या गॅलॅक्सी तून आलेल्या लोकांसारखी.
एकदिवसीय मालिकेतले निम्मे
एकदिवसीय मालिकेतले निम्मे सामने संपलेले आहेत. तिन्ही संघांची अशी परिस्थिती आहे.
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
नेहमीप्रमाणे आपल्या लोकांनी
नेहमीप्रमाणे आपल्या लोकांनी आज घाण केलेली आहे... ऑस्ट्रेलियाची चांगली गोची झाली होती गेल्या दोन मॅचेस मध्ये.. त्यांना सूर सापडून दिलेला आहे..
आजचा पराभव अतिशय लाजिरवाणा
आजचा पराभव अतिशय लाजिरवाणा आहे.
गरम हवेचा त्रास झाला
गरम हवेचा त्रास झाला म्हणे.
आता दोन महिन्यात आय पी एल आहे. एप्रिल महिन्यात भारतात, म्हणजे सगळे सामने काश्मीर, माथेरान, महाबळेश्वर इथे ठेवावे.
धावगती तरी वर गेली का?
आणि धोणी ला एक सामना बंदी? ती कशाबद्दल? संथगतीने षटके टाकण्याबद्दल का?
म्हणजे गोलंदाजी, फलंदाजी आरामात! वा, वा!
खरे तर इतके दिवस घरापासून दूर रहायचे म्हणजे स्ट्रेस येतोच. त्यातून जिंकलेच पाहिजे अशी अपेक्षा म्हणजे आणखी स्ट्रेस.
उगाच भारताचे नाव बदनाम करण्यापेक्षा बीसीसी आयचा संघ असेच म्हणा.
आजचा पराभव अतिशय लाजिरवाणा
आजचा पराभव अतिशय लाजिरवाणा आहे.
>>
आखिर आ गये ना औकातपे !
सचिनने आज स्वतःहून विकेट
सचिनने आज स्वतःहून विकेट फेकली. त्याचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपलेला दिसतोय. रोहीत शर्मा दौर्याच्या सुरवातीला फॉर्मात होता. ४० दिवस बसवून ठेवल्यानंतर आता त्याचा फॉर्म पूर्णपणे गेलेला दिसतोय. ४ कसोटीतल्या ६ डावात १०० हून अधिक सरासरीने ५५० धावा करणार्या पाँटींगला (त्यात ३ अर्धशतके, १ शतक आणि १ द्विशतक) दोन आकडी धावा करणेही अवघड झालंय. त्याने ५ एकदिवसीय सामन्यात एकूण १८ धावा केल्यात. तर कसोटीत जवळपास पूर्ण फेल असलेला धोनी एकदिवसीय सामन्यात अचानक फॉर्मात आलेला दिसत आहे. विनयकुमारला पूर्ण १० षटके देण्याचा, जडेजाला अजिबात गोलंदाजी न देण्याचा, उमेश यादवला पहिली २० षटके गोलंदाजी न देण्याचा व नंतर त्याला फक्त ७ षटके देण्याचे धोनीचे निर्णय अनाकलनीय आहेत. पुढच्या सामन्यात बहुतेक सेहवाग, तिवारी व प्रवीणकुमार्/मिथुन आत येतील (सचिन, रोहीत व विनयकुमारच्या जागी).
एरव्हीचा सचिन अशा आउट
एरव्हीचा सचिन अशा आउट होण्यानंतर पुढच्या डावात पेटून खेळला असता. आता कदाचित रोटेशन मुळे तो नसेल लंकेविरूद्ध. आजची त्याची इनिंग मी पाहिली नाही पण परवा तर इंटरेस्ट नसल्यासारखा खेळत होता.
यापेक्षा त्याने धुलाई करावी. आउट झाला लौकर तरी यापेक्षा वेगळे काय होणार आहे.
माझ्या आठवणीत ही पहिलीच सिरीज आहे की ज्या सचिन सुरूवातीला चांगला खेळत होता (मेलबर्न आणि सिडनी च्या कसोटीतील पहिले डाव आठवा) आणि त्याचा खेळ नंतर घसरला.
गांगुलीच्या काळात एक दोनदा
गांगुलीच्या काळात एक दोनदा हरले की नंतर एकदम पेटत. या टीमला पेटणे बिटणे काही माहीतच नाही. तो एक खुन्नस फॅक्टर असतो तो यावेळेस दिसतच नाही. आफ्रिका सिरीज मधे मला वाटते तो शेवटचा दिसला होता.
>>> आजची त्याची इनिंग मी
>>> आजची त्याची इनिंग मी पाहिली नाही पण परवा तर इंटरेस्ट नसल्यासारखा खेळत होता.
त्याचा आजच्या सामन्यातला इंटरेस्ट परवाच्या सामन्यापेक्षाही कमी होता. तो बाद झाला त्याच्या आधीच्याच चेंडूवर कोहलीचा थर्डमॅनला उंच उडालेला झेल डोहेट्रीने सोडला. त्यावर कोहलीने एक धाव घेतल्यामुळे सचिन स्ट्राईकवर आला. पुढचा चेंडू सचिनने थेट थर्डमॅनला डोहेट्रीच्याच हातात मारला. जाणूनबुजून विकेट फेकण्याचाच हा प्रकार.
हरण्या जिंकण्याचा प्रश्न
हरण्या जिंकण्याचा प्रश्न दुय्यम; खटकतं हें कीं [ शेक्सपीअरची क्षमा मागून], there is no method in their madness !!
आतापर्यंतचे एकूण गुण :
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
Pages