वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज सकाळी एका टेंपोच्या मागे वाचलेलं - " पाव्हणं ! नाद करायचा न्हाय ! "
[ लगेच नंबरप्लेट पाहीली. गाडी कौलापूरचीच व्हती. Proud ]

काल एका रिक्षाच्या मागे हे वाचलं:
"साईबाबांना साकडे घालूनही जर का मिळाले नाही प्रश्नाचे उत्तर"
शोधून काढा ऑटो नं. तीनशे सत्तर"
रिक्षाचा नं ३७० होता हे वेगळे सांगणे न लगे! Wink

परवा सिग्नलला थांबले असताना एका टेंपोच्या मागे तब्बल ३१ मुलामुलींची नावे पेंट केलेली दिसली! पुरती वंशावळ जणू!
शिवाय सर्वात खाली 'हॉर्न ओके प्लीज', 'बुरी नजरवाले' वगैरे नेहमीची वाक्ये होतीच!!

काही वाहनांच्या मागे पाहिलेली वाक्यं:

१. पतीने किया बेसहारा टॅक्सीका मिला सहारा (हे रिक्षाच्या मागे होतं)
२. शाम हो रही है, लाली छा रही है
देख भानु, ३६२७ आ रही है
(हा नक्की नंबर आठवत नाही. पण तो त्या ट्रकचाच नंबर होता. भानु कोण काही पत्ता नाही)
३. Brake down van

गेल्या काही दिवसात पाहिलेली ही काही वाक्यं:

१. खुदा खुश रखे गाडी बनानेवालेको
घरसे बेघर कर दिया गाडी चलानेवालेको

२. नुस्तं भिरकिट Uhoh

३. ख्वाजा का हिंदुस्थान जिंदाबाद

४. भगवे वादळ

५. पाच कैदी

एका रिक्षामागे लिहिले होते.

तुमच्या वाहनांत ऊस , कापुस , कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं.

एक ईनोवा २/४ वेळा नेहेमीच्या रूट वर दिसली बहुधा कोणी थोरातांच्या मालकीची असावी
मागे मोठ्या अक्षरात लिहिले आहे "मी बाई थोरातांची...." .
हे असे लिहायला कसे काय सुचते ? Sad

एका milk van वर लिहिलेले "फिर वही दुध लाया हु "

"मी बाई थोरातांची...." .>> सामी मी कालच ही गाडी पाहिली आहे- इनोवाच होती ती, ऐरोली पुलावर, टोलनाक्याच्या अलीकडे Proud

Pages