वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या इथे एक किराणा मालाचं दुकान आहे, त्यावर एक स्वतंत्र पाटी लिहिली आहे कि" आमच्या इथे बालकामगार काम करत नाहीत"

I know this is not related to vehicle but still I have not seen such type of note in any shop.

गेल्या आठवड्यात एका ट्रकच्या मागे लिहिलेलं पाहिलं.

ये दुआए मांकी बेपनाह कयामत है
मै सफरमे रहता हू, हादसा नही होता.

वर पाटीवर जिथे 'मेरा भारत महान' लिहिलं होतं त्याच्याच बाजूने आणखी एक ओळ होती "हर हालमे खुश'. हे मात्र पटलं Proud

विकांताला एका ट्रकच्या मागे ही ओळ पाहिली:

हम पांच ही ओंजळ रेखाची

म्हटलं ह्या रेखाला ५ पोरं आहेत की काय. पण मग ह्यातलं 'हम पांच' हे ट्रकच्या एका बाजूला आणि 'ही ओंजळ रेखाची' हे दुसर्‍या बाजूचं वाक्य आहे हे लक्षात आलं. 'हम पांच' ठीक आहे. पण 'ही ओंजळ रेखाची' हे प्रकरण काय आहे हे गूढ मात्र कधीच उकलणार नाही Proud

आणखी एका ट्रकच्या मागे लिहिलेला एक शेरः

फिक्र मत कर बंदे ये दिनभी गुजर जायेंगे
हसी हसनेवालोके चेहेरे उतर जायेंगे

हा शेर धोनीला एसएमएस केला पाहिजे Proud

एक गाडी धुळीने भरलेली रस्त्यावर उभी होती. त्यावर लिहिले होते. "मला पुसा नाहीतर विका" Lol

साजिरा | 29 September, 2008 - 02:33

मीही एका ट्रकवर बघितलंय हे, पण थोडंसं वेगळं..
कृष्ण करे तो रासलीला,
हम करें तो कॅरेक्टर ढिला!
------------------------------------------->>
ओह्, म्हणजे सल्लुभाई इंस्पायर्ड बाय धिस ट्रक Wink Proud

"India is Grate"
"Milk not for sail"

(हे आधीच कोणी टाकलं असेल तर पुनरावृत्ती बद्दल दिलगीर आहे)

>>एक गाडी धुळीने भरलेली रस्त्यावर उभी होती. त्यावर लिहिले होते. "मला पुसा नाहीतर विका"

मीही एका गाडीवर असंच लिहिलेलं पाहिलं - एक तर पुसा नाहीतर विका. मोबाईलवर फोटो काढून घेतलाय. मग अपलोड करेन इथे.

आजच एका रिक्षाच्या मागे आणखी एक वाक्य पाहिलं
Donated
Sussanne Roshan

'by' हा शब्द गायब झाल्याने रिक्षावाल्याने सुझन रोशनलाच दान केलं Proud

Pages