वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढे जाणार्‍या ट्रकच्या मागे लिहिले होते
" शिस्तीने देश मोठा होतो!!!"
पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता.
शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर
पुढच्या बाजुला लिहीले होते....
" हे असचं चालायचं......!!!!"

>>> शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते....
" हे असचं चालायचं......!!!!"
Lol या पोष्टात 'जीवणातील विरोधाभास' ठासून भरला आहे... Happy

  ***
  टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

  एका ट्र्क वर लीहीलेल होत.....

  कितनेभी जमा कर हीरे मोती,
  लेकीन, याद रख
  कफन मे जेब नही होती

  एका रिक्षावरील वाक्य::::

  'स्त्रियांकडे पाहताना ती तुम्हाला सीता दिसत असेल
  तर तुमच्या मनात एक रावण दडला आहे'

  _________________________
  -Man has no greater enemy than himself

  हॉर्न ! ओके !! प्लीज !!!
  हे घ्या यासंबंधीचं कलेक्शन..!
  http://www.maayboli.com/node/2221
  --
  हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
  सुंदर साजिरा, श्रावण आला..!

  अँकी.... अशक्य हसले... Lol

  UK मधल्या एका गाडीवर वाचलं:
  Wife and dog missing. Reward for finding the dog.

  बर्‍याच ट्रक च्या मागे "१ १३ ७" म्हणजे "एक तेरा साथ" लिहिलेले वाचले आहे

  युके चे ट्रकवाले एवढे काही हुषार नही वाटले बुवा.
  सापडलेल्या कुत्र्यानेच मग वासाचा माग काढत वाईफलाही शोधून काढले तर?
  --
  हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
  सुंदर साजिरा, श्रावण आला..!

  आजच पाहिलं- एका वॅगनआरच्या मागे लिहिलं होतं 'So many pedestrians! So little time!!'-
  हे मला झेपलं नाही! So little time for what? वेळ असता तर त्याला चालणार्‍या लोकांचं काय करायचं होतं? Uhoh
  --------------------------------------
  अताशा असे हे मला काय होते
  कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..

  पीएसजी, तुम्ही त्यावेळी pedestrian नव्हतात ना? होमिसायड्ल टेन्डन्सी असलेला ड्रायव्हर असणार तो कारण बहुधा सगळ्या pedestriansना निजधामी पाठवायचा त्याचा एककलमी कार्यक्रम असावा असं वाट्तं Happy

  आपल्या देशातल्या वाहनचालकांना लायसन्सबरोबर आरटीओने हे स्टिकर फ्री द्यायला हवं Happy लायसन्ससाठी पैसे द्यावे लागतातच निदान स्टिकर तरी फ्री द्या म्हणावं Happy

  बर्याच रिक्शावर "येता का जाऊ" असं लिहिलेलं असतं

  बर्‍याच ट्रकवर 'जलो मगर दीप जैसे ' हे लिहिलेल असतं ..
  ****************************
  Proud

  'जलने वाले जला करे , हम तो चले शान से' अस पण लिहील असत Happy

  दिपूर्झा, अथक, तुम्ही फारच मवाळपंथी ट्रकवाले बघितलेत हो.
  मी बघितलय- 'आग लगे तरी दौलत को'
  आता बोला.
  --
  हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
  सुंदर साजिरा, श्रावण आला..!

  कम्यूनिस्ट ट्रकवाला असावा, किंवा त्याच्या मित्राचे नाव दौलत असावे Happy

  >>किंवा त्याच्या मित्राचे नाव दौलत असाव>>>>
  फारेन्ड, मित्राचे नाही, गर्लफ्रेंडच्या बाबांचे असावे.... Proud

  एका ट्रक च्या मागे लिहले होते.......

  "बचेंगे तो फिर मिलंगे"

  Proud

  काल एका ट्रक च्या ड्रायव्हर सिटच्या दरवाज्यावर लिहीले होते... "पहले राम बोल, फिर दरवाजा खोल"

  मला आवडलेले काही बंपर स्टीकर्स,
  Men are from Earth, Women are from Earth, Deal with it.
  Does every job suck or only mine?
  Objects in mirror are dumber than they appear.
  When there's a will, I want to be in it!

  इथल्या एका कार वर वाचलेला बंपर स्टिकरः
  Women are natural leaders. You are following one.

  रुनी.... एकदम मस्त... Lol

  एका ट्रकवर लिहिले होते :
  "मी पळतो तर तू का जळतो? " Proud
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
  क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

  रुनी :):-) पहिला तर खटाखटच !

   ***
   Skating away on the thin ice of the new day...

   मी वाचलेलेली काही विधाने.

   १. पक्षी भरारी मरतो उंच आकाशात,
   ८२७६ फिरते भारताच्या नकाशात.
   २. लावा तम्बाखुला चुना,
   आज मुंबइ उद्या पुना.
   ३. Horn OK Please
   ४. मेरा भारत महान.

   US मधे बर्‍याच कार च्या मागे हे लिहिलेले वाचलेले आहे.
   My Boss is a Jewish Carpenter

   Are you a haemorroid? then get off my aX#

   रुनी, Objects in mirror are dumber than they appear हे वाक्या जिम केरीच्या (चित्रपटातील) गाडीवर असे आहे- a#* h@#$s in mirror are closer than they appear Wink

   मी एका टेम्पोच्या मागे "अनार कल्ली घर को चल्ली" असे सगळे शब्द वेगवेगळे लिहिलेले वाचले होते.

   Women are natural leaders. You are following one. >>> मी पण बरेचदा वाचले आहे Happy

   गर्दीतुन खुप स्लो चाललेल्या एका जुनाट खटारा गाडीवर लिहीलेले वाक्य
   'my other car is Rolls-Royce'

   हे पहा एका ट्र्कमागचे वाक्य...

   pati.jpg

   Pages