मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स नीधप.... "बाई" ह्या नावानेच त्या समस्त नाटकवाल्यांमध्ये प्रसिध्ध आहेत. त्या वेळचे अनेक डायरेक्टर आता नाहित. NCPA ची वास्तु ही एक "प्रसिध्ध" व्यक्तिमत्व आहे. अशा खुप कमी जागा असतात ज्यांना "व्यक्तिमत्व" असतं. NCPA ही त्यातिल एक व्हावी. मी कधी कधी उगीचच त्या वास्तु मध्ये फिरुन येत असे. प्रत्येक भिंत काहितरी सांगते आहे असा आभास होत असे. अनेक कार्येक्रम त्या काळात मी तिकडे पाहिले. मी consultant असल्याने मला कुठेच आड्काठी न्हवती. आठवड्यातुन एक दिवस माझा तिकडे जायचा असायचा. मी खुप आतुरतेने वाट बघायचे. काही कार्येक्रम नसला तरी नुसतं तिकडे जायला, त्या पारसी लोकांशी गुजराथीतुन बोलायला, इकडे तिकडे फिरायला मला फार आवडायचं. तिकडच काम तसं थोडच होत. त्या मुळे इतर धंदे करायला वेळ मिळायचा.

दुसरी अशी वास्तु म्हणजे "बॉम्बे हाउस". जे लोक टाटा ह्या समुहाशी कुठुन तरी संबंधीत आहेत त्यांना हा अनुभव असेल.

मी भेट घेवू शकले अश्या काही ग्रेट व्यक्ती...
कुसुमाग्रज - मी त्यांच्या काढलेल्या पोर्ट्रेटवर सही आहे त्यांची.
पं. कुमार गंधर्व - घरी आले होते आमच्या
उस्ताद अल्लारखांसाहेब - सपत्नीक घरी आलेले होते आमच्या. माझ्या हाताने जेवण करून वाढले होते मी ..
ज्यांना प्रत्यक्ष भेटायला खूप आवडले असते...तसे आजही भेटतो...त्यांच्या गाण्यातून...पं.वझेबुवा...माझे पणजेसासरे.
अब्दुल कलाम, रतन टाटा - आमच्या कंपनीत आले होते काही वर्षांपूर्वी...

लहानपणी शरद तळवळकर एकदा व्याख्यान मालेत आले होते.. तेंव्हा त्यांची सही घेतली होती... शरद त अशी त्यांची सही होती.

नव्या पिढीला शरद तळवळकर कोण हे माहीत तरी आहे का.. Sad

मायबोलीवरच्या चमकणा-या ता-यांची यादी खूप आवडली आणि पटली ..

या यादीत डॉ ज्ञानेश पाटील, जळगाव ( ज्ञानेश ) यांचं नाव असायला हवं होतं. त्यांच्या गझलांबद्दल सर्वत्र बोललं जातंय, तेही इतक्या लहान वयात.. कौतुकास्पद आहे.

मामींची मी फॅन आहे Happy

मला बर्‍याचदा हा प्रश्न पडतो की
अमुक पार्टीत हाय हॅलो केलं, कार्यक्रमानंतर स्वाक्षरी घेतली, हस्ते चुलतभावाने बक्षिस घेतलं, सव्वातीन मिनिटं एकाच लिफ्टमधे एकत्र होतो, विमानात मागच्या सीटवर अमुक बसले होते, अमुक आमच्या कॉलेजमधे आले होते, तमुकच्याकडे काही डॉक्युमेंट पोचवायला गेलो होतो, कार्यक्रमाला आले होते तिथे बरोबर फोटो काढून घेतला इत्यादी प्रकारात झालेल्या भेटींचं इतकं महत्व का वाटतं? नक्की अश्या भेटींनी आपल्या आयुष्यात काय फरक पडतो?
(कोणाच्याही अनुभवांना कमी लेखायचं नाहीये.)

मी गंगाधर महांबरेंकडे जायचो. खूप साधेसे होते (राहणीमानाच्या बाबतीत ).
>>>>>>>>>>>>>>>>>>

म्हणजे किरण्यके खराखुरा आहे तर Biggrin Rofl

अरे भुंग्या म्हणजे काय ?

खराखुरा असल्याशिवाय का एव्हढा अस्वस्थ झालेलास ? Wink
काय बरं ते ? काय बरं ? ( आपला तो नोबॉल रे )... पंचाईत होत असेल तर नकोस सांगूस. जौदे Proud

अजून आठवलं तरी हसायला येतं खूप...

>>>> अमुक आमच्या कॉलेजमधे आले होते, तमुकच्याकडे काही डॉक्युमेंट पोचवायला गेलो होतो, कार्यक्रमाला आले होते तिथे बरोबर फोटो काढून घेतला इत्यादी प्रकारात झालेल्या भेटींचं इतकं महत्व का वाटतं? नक्की अश्या भेटींनी आपल्या आयुष्यात काय फरक पडतो?
(कोणाच्याही अनुभवांना कमी लेखायचं नाहीये.) <<<<<
काये ना, की समजा मी रस्त्यावरुन चाललोय हा असा गाडिने, अन मागुन येणार्‍या बेफाम वेगाच्या गाडीने मला धडकुन उडवुन देतादेता अगदी इन्चासेन्टीमीटरने मी वाचलोय, तर तेव्हा स्वतःच्या मृत्युस प्रत्यक्ष भेटल्याचे जे भितीयुक्त समाधान(?) माणसास मिळेल, कदाचित तशाच प्रकारे अशा काही प्रसिद्ध व्यक्ति भेटल्यास "परमेश्वर" भेटल्याचे समाधान मिळत असेल, अन जितका "मृत्युचा क्षण" भेटल्यावर एकुणच विचारसरणी अन पक्षी वागणूकीत फरक पडेल, तसाच फरक असे "आयकॉन" भेटल्यावर/दिसल्यावर पडत असेल. (आता "परमेश्वर" म्हणल्यावर कुणी आग पाखडु नका, मला अजुन सुयोग्य उपमा सुचली नाही... त्या तरुण वयातील परलिन्गी आकर्षणाबद्दल इन्ग्रजी शब्द आहे, आठवत नाहीये नेमका, तो टाकायचा होता, एक धागाही होता त्यावर)
यावर दुसरी तुलनाच करायची झाली, तर अजुन एक करता येईल ती म्हणजे (चुकुन माकुन) तुम्ही पाचसहा दिवसान्चे उपाशी असाल वा दिवसभर उन्हात भटकुन थेम्बभरही पाणी न मिळाल्याने तहानेने व्याकुळ झालेले असाल, अन अशा वेळेस तुमच्यापुढे "सुग्रास अन्न" वा "थन्डगार वाळ्याचे पाणी" दिसले तर जो आनन्द होईल, तोच तसाच आनन्द रोजच्या पोटार्थी स्वार्थी पशुवत निर्बुद्ध यान्त्रिक पद्धतीने "जगण्यामुळे" आलेल्या बौद्धिक/मानसिक हताशतेतुन, उपासमारीतुन असे काही यशस्वी व्यक्तिमत्वे भेटल्यावर होत असेल. असे निदान माझे तरी मत आहे.
कदाचित, जे बनायची/घडायची माझी सूप्त इच्छा होती, पण नानाकारणे जमले नाही, तेच तसेच कुणामधे तरी घडलेले समोर बघता आनन्द व्हावा असे काहीसे असावे.
अन कदाचित असेही असू शकेल बर्‍याचदा, की बघा, माझ्या कित्ती कित्ती ओळखी आहेत थोरांमोठ्यात, कित्ती कित्ती राबता आहे प्रसिद्ध लोकांत हे दाखवुन कॉलर ताठ करुन घेण्याची खुमखुमी असेल, कुणी सान्गाव? असेलही! Proud

नीधप..

काही काही मंडळी आपल्या आयुष्यावर खुप प्रभाव टाकतात. कळत नकळत पणे आपल्या जगण्यावर त्यांचा प्रभाव असतो. अशी मंडळी नुसती दिसली तरी काहीतरी अचिव्हमेंट केल्या सारखे वाटते. मग ते लेखक असतिल, नट असतिल, विचारवंत असतिल.... अशी मंडळी मग त्या त्या माणसासाठी सेलेब्रिटी बनतात. परत ही रीलेटीव्ह गोष्ट आहे. मला जो प्रसिध्ध वाटेल तो तुम्हाला फालतु वाटेल. उदा: एका सेमिनार ला चंदा कोचर(ICICI M.D) आणि माधवी पुरी-चीब (ICICI ) ला पाहुन मला खुप भारावल्यासारखं झालं होत. माधवी शी दोन शब्द बोलता आले हे मला खुप ग्रेट वाटलं, कारण माझ्या क्षेत्रात ती माझी रोल मॉडेल आहे. पण हेच जर तुम्ही एखाद्या ICICI च्या Back office employee ला विचाराल तर तो शिव्या देईल. ( ती Back office ची हेड आहे)

तुम्ही अशा प्रसिध्ध लोकांत रहाता. त्यांच्याशी तुमची मैत्रि आहे. त्या मुळे तुम्हाला त्याचे अप्रुप नाही. विचार करा की सत्यजीत राय आज आहेत, तुम्हाला एका पार्टीत भेटले आणि ते तुमच्याशी दोन मिनिटे बोलले. तुमची काय भावना असेल? मागे NCPA ला नसीर जी दिसले होते. कोणी तरी ओळख करुन दिली. तेंव्हा मला खुप आनंद झाला होता. तोच आनंद मला संजय दत्त ला बघुन नाही झाला. एकदा तर जहीर खान विमानात माझ्या शेजारी होता. (मला क्रिकेट मधलं काहिच कळत नाही) जो तो येत होता तो त्यांच्या कडे पहात होता, सह्या घेत होता. माझ्या काहिच गावी न्हवत. शेवटी उतरताना तो माझ्याशी गोड हसला. मी पण हसले. खाली उतरल्यावर त्याच नाव कळल. माझ्या पुतण्याने मला कोपरापासुन हात जोडला.

नीधप तुम्ही स्वतः स्टार असल्यामुळे तुम्हाला अशी माणसे रोजच भेटत असतील... पण इतर लोकाना असे लोक भेटणं हे एक अप्रूप अस्तं..

सेलेब्रिटी म्हणजे

ज्यांनी काही करून दाखवलय, ट्रेण्डस सेट केलेत असा अर्थ घेऊयात का ?

उद्या मिकासारखा कुणी भिकार सेलेब्रिटी सही देतो म्हणून मागे लागला तर त्याला हुडूत करून लावीन मी.

राजाला दिवाळी ठाऊकच नसते. आमच्यासारख्या पामरांना कुणी थोर भेटले/नुसते दिसले तरी मस्त वाटते. हा धागा अश्याच पामरांसाठी आहे. आता कोणासाठी कोण थोर, कोण नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.

झालेल्या भेटींचं इतकं महत्व का वाटतं? नक्की अश्या भेटींनी आपल्या आयुष्यात काय फरक पडतो?
(कोणाच्याही अनुभवांना कमी लेखायचं नाहीये.)>> तसा आयुष्यात काहीच फरक पडत नाही. वर तसं कुणी म्हटल्यासारखे वाटले नाही. (मी सेलेब्जबद्दल बोलतेय)

मी २००९चा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला गेले होते. त्यामुळे सगळीच फिल्म इंडस्ट्री "बघितली" आहे. Happy त्याखेरीज कित्येक ईव्हेंट्सना वगैरे तर किती स्टार्सना भेटले असेन, मात्र त्यातले काही खास नमुने मात्र लक्षात राहिले आहे.

त्याचबरोबर काही माणसं जी फार मोठी आहेत किंवा ज्याचाबद्दल आपल्या मनात इमेज असते त्याच्या अगदी विरूद्ध वागताना दिसतात अशा माणसे लक्षात राहतात. नाना पाटेकरला मी जेव्हा प्रत्यक्ष बघितलं, तेव्हा तो जसा वागताना दिसला ते बघून नंतर कधी तो भेटला तर मी त्याच्या पायावर डोकं ठेवणार आहे. तो किस्सा मी कुठल्यातरी बीबीवर लिहिला होता.

@ नीधप
तुम्ही तुमच्या व्यवसायानिमित्ताने ज्या ठिकाणी "सेलेब्रिटी" चा वावर असतो त्या वातावरणात वावरता असे इथे प्रकटलेल्या काही प्रतिक्रियावरून जाणवत आहे, आणि मग ते सत्य असेल तर मग तुम्ही वरील प्रतिसादात प्रकटलेले विचार हे अन्यांशी {जे सर्वसामान्य दिनक्रमात, ज्याला रटाळही म्हणू शकतो, गुंतलेले असतात} जुळणार नाहीत हे उघडच आहेत. हे मान्य की, आला आहे गावात शूटिंगनिमित्य एखादा नट वा गौरव सामन्यासाठी क्रिकेटर, तर त्याने तिथे उसळलेल्या गर्दीत दिलेल्या सही दिली म्हणून आयुष्यभर ती आठवण जपून ठेवण्याच्या लायकीची नसते. पण होते असे की, आपण पुढे कुणीतरी 'मोठे' व्हावे असे स्वप्न पाहात असतो आणि आपल्या पुढेही अशीच कुणीतरी वही पुढे करून स्वाक्षरी मागावी असे वाटून घेत असतो. हे स्वप्नांचे रंगीबेरंगी फुगे पाहणे एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यात वावगे काही नसल्याने मग त्या दरम्यान वेळोवेळी सामोरे येणार्‍या सर्वसामान्यांपेक्षा आगळ्यावेगळ्या व्यक्तींची कुठल्याही निमित्ताने समोरासमोर गाठ पडली तर ती आठवणीच्या कप्प्यात जाऊन बसल्यास त्यात वावगे काही नसावे ("गुड्डी" गावात शूटींगसाठी आलेल्या हीरो धर्मेन्द्रची सही अनुपमाच्या लीफलेटवर घेते आणि त्या आठवणीवर "आता मी त्याची पत्नीच झाले" असे मनी म्हणते. हा प्रकार षोडशवर्षीय बालिकेच्या बाबतीत घडत असतोच). सबब पुढे अशा रितीच्या चर्चेच्या निमित्ताने तो कप्पा उघडला जाऊन त्या आठवणीचा सुगंध पुन्हा एकदा ताजा करणे क्रमप्राप्त मानले जावे.

अर्थात यात 'मूर्खपणा' करणारेही असतातच. उदा. इथे कोल्हापुरात गल्लीबोळातील काही दादा मंडळी गावात राज्य/देश पातळीवरील कोणत्याही पक्षाचा नेता आला की त्याच्या गाडीच्या मागे धावून तो सभेसाठी स्टेजवर जाण्यापूर्वी त्याला हार घालतात आणि आधीच नेमलेल्या फोटोग्राफरकडे स्वतःचे बत्तीस दात दाखवित फोटो काढून घेतात. त्या नेत्याला हा गबरू कोण हे ठाऊकही नसते. पुढे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत या फोटोंची एक मालिकाच होर्डिंग बोर्डवर अवतरते अन् तिथे "अमुकतमुक दादा, भाऊ नेतेमंडळीत किती लोकप्रिय आहेत ते पहा' अशी बेअकली जाहीरातही. अशा आठवणींना केराचीही किंमत देऊ नये.

तुम्ही अशा प्रसिध्ध लोकांत रहाता. त्यांच्याशी तुमची मैत्रि आहे. त्या मुळे तुम्हाला त्याचे अप्रुप नाही. <<<
अरे अशी एकदम कन्क्लुजन्स नका काढू.
या बाफवर कुणाला कशाचं अप्रूप वाटलं तर त्यावर नाक मुरडायला/ आक्षेप घ्यायला हा प्रश्न विचारला नव्हता. मी सेलेब, स्टार, राजा इत्यादी काहीही नाहीये. असे कुणाचे गैरसमज असतील तर ते त्यांच्यापाशी. एकदम हा बाफ माझ्यासाठी नाही इथपर्यंत कशाला जाताय लोकहो? Happy

लहानपणी सगळे घेतात म्हणून कधी कधी स्वाक्षर्‍या वगैरे घेतल्या होत्या कुणाकुणाच्या तेव्हापासून हा प्रश्न आहे मला. अनेकांच्या स्वाक्षर्‍या तेव्हा होत्या वहीत. त्यातल्या बहुतेकांबद्दल वाचलं, ऐकलं होतंच पण तरी स्वाक्षरी कशासाठी घ्यायची असते? त्याने नक्की काय होते हा प्रश्न पडायचाच. एक दोन सव्वातीन मिनिटाच्या भेटीत ना तो माणूस तुम्हाला कळतो ना तुम्ही त्याला कळता. ना काही अनुभव मिळत, ना काही चर्चा, गप्पा होत. मग टिकमार्क केल्यासारखी ही धावती भेट/ दर्शन नक्की काय देते एखाद्याला?

नीधपला अनुमोदन.
>>>> स्वाक्षरी कशासाठी घ्यायची असते? त्याने नक्की काय होते हा प्रश्न पडायचाच. एक दोन सव्वातीन मिनिटाच्या भेटीत ना तो माणूस तुम्हाला कळतो ना तुम्ही त्याला कळता. ना काही अनुभव मिळत, ना काही चर्चा, गप्पा होत. मग टिकमार्क केल्यासारखी ही धावती भेट/ दर्शन नक्की काय देते एखाद्याला?>>>> ह्या स्वाक्षर्‍या घेणं मलाही जमलं नाही. इतर जणं घ्यायचे म्हणून पीअर प्रेशरपायी मीही घेतल्या असतील. घरी आल्यावर तत्परतेनं गहाळ व्हायच्या. बाकीच्या वाक्यांना प्रचंड अनुमोदन.

एखाद्या व्यक्तीचा, तिच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे आणि अशा व्यक्तीला तुम्ही भेटणं वेगळं. त्यावेळचा क्षण खरंच भारलेला असणार. तसंच खूपच उत्तुंग व्यक्तीमत्त्व अचानक त्यांच्यातल्या 'जमिनीवर असलेल्या पायांची' अनुभूती देतात किंवा त्यांच्यातलं माणूसपण अचानक जाणवतं, त्यांची एक वेगळी बाजूही खूप सुखद अनुभव देऊन जाते असे अनुभवही जपण्यासारखे असतात. पण उगाचच ओझरतं दर्शन घडलेल्या, जाता-येता दिसलेल्या व्यक्ती 'भेटल्या' म्हणून म्हणणे जरा धाडसाचेच ठरेल. तसंच केवळ एक सेलेब्रिटी दिसली म्हणून हुरळून जायचंही एक वय असतं. त्यानंतर केवळ ते चेहरे टिव्हीवर, सिनेमात दिसतात म्हणून हरखून जाणं माझंतरी होत नाही. कदाचित हे व्यक्तीसापेक्ष होत असेल. माहित नाही.

मला फार पूर्वीची स्वाक्षर्यांची वही सापडली परवा. मजा आली वाचताना. घुसून घुसून मिळवलेल्या सह्या आणि संदेश वाचताना नॉस्टॅल्जीक पण व्हायला झाले. कोणाकोणाच्या सह्या होत्या म्हणून सांगु...पं वसंतराव देशपांडे, पं भिमसेनजी, डॉ. काशिनाथ घाणेकर, जयमालाबाई, राम कदम, वपु काळे, राजा गोसावी, अभिषेकीबुवा व अनेक अनेक जण..जेव्हा सह्या घेतल्या तेव्हा ह्या लोकांची उंची पण जाणवली नव्हती एवढे लहान वय होते माझे...तेव्हा सगळे घेतात म्हणून काही सह्या घेतल्या होत्या...पण त्यातही मजा वाटली होती.....आता ह्यातले बरेच जण नाहीत आपल्यात...तरी सहीच्या रुपाने परत एकदा आठवतात्... बालपण जागवतात. ह्या आठवणींनी सुद्धा आयुष्यात चांगलाच फरक पडतो माझ्या...भले त्या कोणाशीही चर्चा, किंवा गप्पागोष्टी नसतील झाल्या....

अमिताभ बच्चन इतका मोठा माणूस असूनही त्याचं वागणं इतकं विनम्र असतं, त्याचा व्यासंग हे सगळं जाणवतं. त्याचबरोबर राजेश खन्ना, शाहरूख खान अशा स्वतःवरच खूष असणा-या लोकांना ते यशाच्या कुठल्याही शिडीवर गेले तरी भेटून उपयोग नसतो. यांच्याकडून शिकण्यासारखं काही असेल तर ते इतर लोकांच्यातही भरपूर असतं. याउलट यांच्यात शिकू नयेत असे गुण भरपूर आहेत.

माणूस मोठा झाले कि त्याचे गुण अवगुण हायलाईट होत असतात. पूर्वी सिनेअभिनेते हे आयडॉल्स होते. त्याआधी स्वातंत्र्यसेनानी हे लोकांचे आयडॉल्स होते. पूर्वी सेलेब्ज म्हणजे आकाशातले ता-यांसारखे दुर्मिळ होते. आता रोजच त्यांचं जाहीरात, चॅनेल्स, न्यूज यामधून दर्शन होत असतं. दीड कोटी घेऊन शाहरूख सारखा सुपरस्टार लग्नात नाचायला उपलब्ध आहे. कतरिना कैफ ठुमके लगावायला उपलब्ध आहे. हे लोकांना माहीत आहे. पूर्वी पडद्यावर दिसणारी श्रीमंतीच्या खाणाखुणा आता ब-यापैकी लोकांच्या दिवाणखान्यात दिसून येतात. कपड्यांमधे , केशरचनेमधे फारसा फरक राहीलाय असं वाटत नाही. आता सेलेब्जला लोक आयडॉल म्हणून डोक्यावर घेत असतील असं वाटत नाही.

आजचे आयडॉल्स म्हणून चेतन भगत, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, डॉ एपीजे अब्दुल कलाम, डॉ विजय भटकर, डॉ वर्गिस कुरियन, डॉ स्वामीनाथन इ. इ. स्थापित झालेले आहेत. सेलेब्जपैकी देखील अमिताभ बच्चन सारखे लिव्हिंग लिजंड, परफॉर्मिंग आर्टिस्ट्स, ए आर रेहमान, सोनू निगम, लताजी, आशाजी इ. इ. आजही आयडॉल्सच आहेत. काहींना आवाजाची दैवी देणगी आहे, काहींकडे दैवी संगीत आहे... त्यासाठी लोक त्यांचे दिवाने आहेत. केवळ टीव्हीवर चेहरा दिसतो म्हणून नाही.

हे माझं वैयक्तिक मत. ( वेळ जात नाही, दुसरा कुठला बाफ पेटलेला नाही म्हणून इथं मुक्काम )

माझी पण सुरवातीला निधप सारखीच प्रतिक्रिया होती . अरे यात काय एवढे ?<< कार्यक्रमाला आले होते तिथे बरोबर फोटो काढून घेतला इत्यादी प्रकारात झालेल्या भेटींचं इतकं महत्व का वाटतं? नक्की अश्या भेटींनी आपल्या आयुष्यात काय फरक पडतो?>> पण सुमेधा - व्ही म्हणाली तशी <<राजाला दिवाळी ठाऊकच नसते. आमच्यासारख्या कुणी थोर भेटले/नुसते दिसले तरी मस्त वाटते. >> हे पण पटले
मी पण माझी यादी जरा सवडीने टाकीन. कारण नीधप प्रमाणेच बर्याच लोकांना बर्याच वेळा भेटलेली आहे. बरीच लोक माझ्या सख्या नात्यात आहेत. सगळ्यांचे फोटो माझ्याकडे आहेत
जामोप्या शरद तळवलकर माझ्या नवर्याचे सख्खे मावसोबा लागतात. आता लिंबू म्हणतो तशी कॉलर टाईट करून घेऊ का मी ? आणि कोण कोण सेलिब्रिटीज माझे सख्खे नातेवाईक आहेत सांगू का ? Proud

माझी पण सुरवातीला निधप सारखीच प्रतिक्रिया होती . अरे यात काय एवढे ?<<<
गैरसमज होतोय का?
माफ करणे पण माझा प्रश्न या बाफला प्रतिक्रिया म्हणून नव्हता. आणि यात काय एवढे असा सूर पण नव्हता माझा. कुणालाही कशाचंही महत्वा वाटण्याबद्दल मला काही 'यात काय एवढे' नाहीये.
मला केवळ समजून घ्यायचं होतं. जाउदेत.

लोकांचे अनुभव वाचून, "यात काय एवढे?" वाटले म्हणूनच समजून घ्यावेसे वाटले की लोक का इतके वाटून घेतात... आणि वर म्हणायचे की मला कोणाच्या अनुभवाला "यात काय एवढे " नाही म्हणायचेय.. Wink

माझ्या माहेराच्या गावी नवरात्र व्याख्यान मालेत गो. रा. खैरनार आले होते. त्या वेळेस त्यांची सगळी कडे धूम होती, आणि माझ्या मनात त्यांच्या साठी अतिशय आदर होता. मी अगदी गर्दीत घुसून त्यांची स्वाक्षरी घेतली होती. ती मी खूप दिवस अगदी भक्तीभावाने सांभाळून देखील ठेवली होती. कालौघात खैरनार आणि त्यांची स्वाक्षरी कुठे हरवले कळलंच नाही.

२००७ मध्ये मी San Francisco ला university मध्ये शिकत असतानाची ही आठवण. मी आणि माझी तेलगु मैत्रीण सकाळी union Square वरून Powel Street कडे चालत जात होतो.

एका सिग्नल ला आम्ही थांबले होतो. बघते तर माझ्या बाजूला आशा ताई उभ्या होत्या. मी फक्त हसले त्यानी सुधा असच स्मित केल. आत्ता अजून पुढे जाऊन त्यांच्या बरोबर खोट खोट मला तुमची सगळी गाणी आवडतात वगैरे बोलावस न्हवत वाटत. पण तेव्हाच माझ्या ताई चा विचार आला मनात. तिला पिडण्याची एक उत्तम संधी म्हणून मला आशा ताईन बरोबर बोलयला हव असा एक स्वार्थी विचार सुधा लगेच मनात आला (माझी ताई शास्त्रीय संगीत शिकत होती आणि अजून ही शिकते आहे)

मग ते पुढचे काही Blocks मी आणि मैत्रीण त्यांच्या बरोबर असंच बोलता बोलता चालत होतो. मला मराठी बोलताना पाहून त्याच मग बोलयला लागल्या. नाव काय, मुळची कुठली, SF मध्ये काय शिकतेस, आवडते का इथे, मग बोलता बोलता मी त्यांना सांगीतल "माझ्या ताई कडे मी तुमचा ऋतू हिरवा हा अल्बम ऐकला आहे आणि त्यातील जय शारदे हे गण मला आवडल". मी पण त्यांना विचारल तुम्ही इथे कशा साठी आलात? तुम्हाला आवडत का SF? मी त्यांना बोलता बोलता फ्रेश donuts कुठे मिळू शकतील ते सांगीतल.
इतका वेळ माझ्या मैत्रीणीला वाटत होते की मला कोणीतरी मराठी काकू भेटल्या आहेत आणि त्या नवीनच आहेत USA मध्ये म्हणून मी त्यांना माहिती देते आहे.
मला त्या एकदम मस्त वाटल्या. बोलयला एकदम मृदू आहेत ......आणि हा अजून एक गोष्ट त्यांची उंची माझ्या पेक्षा कमी आहे Happy हा हा हा

(अजून काही व्यक्ती आहेत संशोधन क्षेत्रातील. त्यांच्याबद्दल सुधा लिहायचा विचार करते आहे. बघूया जमत का)

गो रा खैरनार माणूस खराच. व्यवस्थेचा बळी. अरूण भाटिया आणि खैरनार हे खरंच आयडॉल्स आहेत. खैरनार कसे बळी गेले हे आजकाल मैत्रीच्या बातम्या कुठल्या नेत्यांबद्दल छापून येताहेत ते पाहिल्यावर सहजच कळून येतं. एखाद्याचा खैरनार झाला असा वाकप्रचार रूढ व्हायला थोड्याफार प्रमाणात आपणही जबाबदार आहोत.

@ भुंग्या

जमलं कि नाही अजून ? तुला मेल केलेली ना रे मी आधीच ? तुला मॅच्युअर्ड समजत असतानाच्या काळातली रे ! Biggrin

कि मी पण सांगून टाकू "ते" इथंच ? तुझ्या अस्वस्थतेचं कारण रे ! काय म्हणतोस ? कि सेपरेट थ्रेड टाकू ? मज्जा येईल बघ ! Rofl

Pages