मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोच्या पुराव्यासकट इथे पोस्ट टाकण्याचा सर्वप्रथम मान माझाच का ?

कार्यक्रम संपल्यावर अमिताभ दोन फूट अंतरावरुन निघुन गेले. आम्ही दारात गर्दी करुन उभे होतो. बोलायला मिळाले नाही.

अनिल, ही माहिती नवीन आहे. आश्चर्यकारक आहे.

एल्टी, अमिताभ बच्चन अनेक पथ्यं पाळतात असं त्यांच्या एका मुलाखतीत वाचलं आहे.
कोणतंही व्यसन, एअरेटेड पेयं, मांसाहार, बाहेरचं खाणं/जेवण, साखर, चहा, कॉफी, बहुतेक भातसुद्धा, आणि जागरण, ह्या सर्व गोष्टी गेली कित्येक वर्षं बंद आहेत असं त्यांनी सांगितलं होतं त्यात. शक्य तिकडे घरूनच जेवण-खाणं नेतात ते.

अनिल, वरती तारखेत गडबड झाली आहे आणि अतिथींचं नावही लिहिलेलं नाही तुम्ही. फोटोसुद्धा लांबून आहे, नीट बघावा लागला. तेवढी दुरूस्ती केलीत तर बरं होईल.

२८ जुलै २०१६ .... जागतिक हेपॅटायटिस दिवस

दुसर्‍या दिवशी पेप्रात आले होते.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/amitabh-bachchan...

Megastar Amitabh Bachchan, who is surviving only on 25 per cent of his liver as the rest has been damaged by the deadly Hepatitis B virus, on Thursday called for higher budget spend to prevent the fatal disease.
“Hepatitis B hit me accidentally. After the accident on the sets of ‘Coolie’ (1983), I was infused with the blood of about 200 donors and 60 bottles of blood were injected into my system,” Bachchan told an event on the World Hepatitis Day here this evening.

कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यानी केले होते.

वा वा ... बच्चनसाहेबांना पाहिलंत. अजुन काय हवं.

चारेक वर्षांपुर्वी, मुंबईला विमान उतरल्यावर इमिग्रेशनकडे येताना खुप उशीर झाला.
मग ती बाई पापो. वगैरे तपासत असताना तिला एका माणसाने काहीतरी सांगितले व ती एकदम खुष होऊन 'मॅडम मै अभी आयी' म्हणत निघुनच गेली. मग त्याच मुलाला विचारले, ' काय झालं?'. तो म्हणाला.. '१ नं.वर एश्वर्या राय आहे'...... !!!
मग काय एकदम थकवा निघुन गेला. आम्ही ७ वर होतो. वाकुनवाकुन मान वळवुन १ नं कडे पाहिले पण खांबामुळे दिसेना. तरी बाकी रांगा रिकाम्या होत्या....

मग एकदम समोर लक्ष गेले तर फक्त ७-८ फुटांवरुन बाईसाहेब ९-१० महिन्याच्या लेकीला पोटावरील झोक्यात बसवुन निघाल्या होत्या. ते अत्यंत गोंडस बाळ तिच्याकडे टुकुटुकु पहात बसले होते व ती दाईबरोबर गप्पा मारत निघाली होती. एकदम नीट बघितले. पण प्रवासाने दमलेली दिसत नव्हती. जाडी वाढलेली असल्याने सैलसर काळा अनारकली घातला होता. मेकप होता थोडा पण तरी गालवरचे खड्डे चक्क दिसले. (तेव्हा तिच्या मुलीचे फोटो देखील प्रसिद्ध झाले नव्हते)..

Pages