मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच काळाघोडा फेस्टिवलला कौतुक शिरोडकर आणि प्रसाद गोडबोले भेटले होते......
दुग्धशर्करा योग होता Proud सह्या घ्यायला विसरलो आणि द्यायला सुद्धा Sad

aschigचा रिप्ल्याय वाचून शेल्डनचीच आठवण आली.

पुल एकद डे. जिमखाना पोस्ट ऑफिसातून परत जाताना दिसले.
अपराजिता सिन्हा व त्यांची भावंडे - मधुमतीचे दिग्दर्शक कोण त्यांची मुले.
राणी वर्मा व त्यांच्या बहिणी, माणिक वर्मा, मालती बर्वे ( साबांच्या कृपेने. )
साबांना फार प्रसिद्ध व्यक्ती माहीत आहेत.
फारूख शेख, नितिन मुकेश. राणी बरोबर कार्यक्रमा करता आले होते तेव्हा.

सगळ्यांचेच अनुभव लक्षात ठेवण्यासारखे, माझेही काही (इथे लिहिले होते आधी, तरीही )

१) आम्ही १९७४ ला शिवसृष्टी (कुर्ला) रहायला आलो त्यावेळी, हायवेपासून कॉलनीत यायला नीट रस्ता नव्हता, आणि सगळे बसस्टॉप तर हायवेवरच. संध्याकाळी जर कुणी येणार असेल, तर आम्ही सोबतीला किंवा रस्ता दाखवायला, हायवेवर जाऊन बसत असू. असेच एकदा आई यायची होती म्हणून मी आणि माझे वडील, हायवेवर बसलो होतो. त्यावेळी एक गृहस्थ तिथे आले आणि, विश्राम सोसायटी कुठे आहे ते विचारु लागले. माझे वडील म्हणाले, जर वेळ असेल तर थोडे थांबा, आपण सोबतच जाऊ, कारण तसा रस्ता समजणार नाही. ते थांबले, अर्थातच दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांनी शिरवाडकर असे नाव सांगितल्यावर, वडील म्हणाले कि एक प्रसिद्ध कवि आहेत ते तूमचे कोण ? तर ते म्ह्णाले तो मीच.
मग काही वेळाने आई आली आणि आम्ही सोबत कॉलनीत आलो. आमचे घर आधी लागते त्यावेळी, वडील त्यांना म्हणाले हे आमचे घर, उद्या वेळ मिळाला तर चहाला या.
आणि ते खरेच दुसर्‍या दिवशी घरी आले. गप्पा मारता मारता माझी पण चौकशी केली. मी त्यावेळी नववीत होतो. आम्हाला त्यांची पृथ्वीचे प्रेमगीत हि कविता होती, त्यावर मी त्यांची सही मागितली, ती तर त्यांनी दिलीच, मला विचारले कि कविता आवडली का ? मी बाईंनी अजून शिकवली नाही, असे (बाणेदार) उत्तर दिले. हे लिहिताना आजही माझ्या अंगावर रोमांच उठतात, कि त्यांनी स्वतः ती कविता मला समजाऊन दिली. आज त्यांचे शब्द आठवत नाहीत, पण त्यांच्या प्रेमळ आवाज, तेजस्वी रुप आजही मनात रुजलेले आहे.

२) आज या घटनेला बरोबर २५ वर्षे झाली. अगदी तारीख लक्षात रहायचे कारण म्हणजे आज माझ्या भावाच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि त्याच्या लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच मी एका संगीत नाटकाला गेलो होतो.
मला नाट्यसंगीताची आवड लागली, ती शिलेदार मंडळींमूळे. त्यावेळी जयमाला शिलेदार यांचा हिरक महोत्सव होता आणि काही संगीत नाटकांचे प्रयोग चालू होते. मी त्या दिवशी संगीत मंदोदरी नाटकाचा
प्रयोग बघायला गेलो होतो. या नाटकाला जयमालाबाईंचे संगीत होते (पण त्यांची भुमिका नव्हती) मध्यंतरात मी त्यांना गुलाबांचा गुच्छ घेऊन भेटायला गेलो.
आधीच आनंदी चेहर्‍यावर आणखी आनंद पसरला. माझ्या पाठीवर हात फिरवून त्यांनी चौकशी केली. मी त्यावेळी नुकताच सी.ए. झालो होतो. आपल्यापैकी एक मराठी मुलगा सी. ए. झाला आणि तरीही त्याला संगीत नाटकांची आवड आहे, यांच्या त्यांना खुप आनंद झाला. मी त्यांना सांगितले कि मला गाणे शिकायचे होते पण जमले नाही, तर त्या म्हणाल्या गाणे ऐकणारे रसिक पण हवेतच ना ? तूम्हा रसिकांसाठीच तर आम्ही गातो. त्यावेळी किर्ती, पाहते वाट कदंबातळी हे गाणे गुणगुणत होती, तिला हाक मारुन माझी ओळख करुन दिली. दोघींच्या स्वाक्षर्‍या मी घेतल्या, आणि जवळजवळ तरंगतच मी बाहेर पडलो.

३) ज्या प्रसन्न भावमुद्रेसाठी मला जयमाला शिलेदार आवडतात त्याच कारणासाठी मला बेगम परवीन सुलताना आवडतात. गाण्यातल्या अत्यंत अवघड जागा घेताना, दोघींच्या चेहर्‍यावरचे प्रसन्न भाव कायम असतात.
बेगमसाहिबांचे गायन आमच्या कॉलेजमधे होते. खरे तर मला शास्त्रीय गाण्याची आवड असली तरी फारसे काही कळत नव्हते (आताही कळत नाही.) पण मला त्यांचे गायन आणि त्यापेक्षा त्यांचे सादरीकरण आवडत असल्याने, मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो.
संध्याकाळची मैफल होती, त्यांनी एक बडा खयाल पेश करुन विश्राम घेतला. मी त्यांची स्वाक्षरी घ्यायला गेलो, आणि सहज जौनपुरी मधला त्यांचा माझा अत्यंत आवडता तराणा गाल का असे विचारले. तो राग त्या वेळेसाठी योग्य आहे का, वगैरे विचारही मझ्या मनात आला नव्हता.
त्यांनी माझ्याकडे कौतुकाने बघून, जरुर पेश करूंगी बेटा असे सांगितले, शिवाय मेरा गाना आपको पसंद तो आ रहा है ना, असे विचारले.
मी उत्तरच देऊ शकलो नाही.
या तीन थोर व्यक्तींचा, विनय सहस्त्रांशांने तरी माझ्या अंगात भिनेल का, याच चिंतेत मी असतो.

कीर्ती आणि जयमाला शिलेदार यांचा कार्यक्रम नरसोबावाडीला मी पाहिला आहे... पण इथली एकंदर यादी दीपीका पदुकोण, समलान खान अशी असल्याने या व्यक्ती सुप्रसिद्ध च्या इथल्या व्याख्येत बसत नसाव्यात असे म्हणून मी उल्लेख केला नव्हता Proud

"पण इथली एकंदर यादी दीपीका पदुकोण, समलान खान अशी असल्याने...."

~ माफ करा मोहनराव, पण मला असे काही जाणवले नाही या २००+ प्रतिसादातून. असतील त्या धर्तीचे आठदहा उल्लेख, पण तितके अपेक्षित असतातच एकूण धाग्याची व्याप्ती पाहिल्यानंतर. खूप काही चांगले प्रतिसादही आलेले आहेतच (आत्ताचाच श्री.दिनेश यांचा त्यापैकी एक आहेच, हे तुम्हीही कबूल केलेले दिसते).

एक गोष्ट मात्र सर्वांनी मान्य करावी, ती अशी की केवळ "मी अमुक एकाला/एकीला तमुक एका ठिकाणी पाहिले" म्हणजे ती व्यक्ती 'भेटली' असे मानू नये. कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील थोडासा का होईना संवाद घडला असल्यास त्या अनुभवाची खुमारी वाढते.

अस्चिग, सह्हीच. Happy अरे वा धागा चांगलाच धावतोय तर . कालच विसराव देशमुखांच्या मुलाच लग्न झाल म्हणून त्यांचा किस्सा सांगते. माझ नुकतच लग्न झाल होत. माझे सासरे लातूर ला विलास राव देशमुखांना शिक्षक. त्यांना एकदा आमचा घरी जेवायला बोलावले होते . त्यांनी यायचं मान्य केल. लगेच शरद तळवलकरांच्या मिसेस ना सांगितलं . ( नवर्याची सख्खी मावशी) . त्या ताबडतोब पुण्यावरून आल्या आणि मी वांग्याचा भरीत करणार आहे अस डीक्लेर केल. माझ्या सासूने वरण-/भाताचा कुकर लाऊन आमटी- कोशिंबीर केली. माझ्या कडे पोळ्या आणि भाजी आणि मावशी नि वांग्याचा भरीत.असा बेत ठरला .
ते व्यवस्थित त्यांच्या लव्याजम्यासह आले. आणि सोसायटीत हलचल. लाल दिव्याची गाडी कोणाची म्हणून. नवीन सुनबाई नी काय केल म्हणून चौकशी केली. आणि वा मस्त पोळ्या केल्या म्हणून स्तुती पण . Happy

१) लहानपणी विमानात भेटलेले हिंदी चित्रपट सुष्टीतले राकेश रोशन, विनोद खन्ना, राजेंद्र कुमार
२) प्रभाकर पणशीकर माझ्या वडिलांचे अशील ( माझे वडील वकील होते). शेवटचे ते वडिलांनी त्यांच्या आत्मचरित्र लिहील त्याच्या प्रकाशनाला आले होते २००७ च्या डिसेंबर मध्ये
३)विनय आपटे शाळेतलाच .परत आपटे बाईंचा मुलगा
४) इला भाटे शाळेतलीच.बरेचदा दिसते बोलते. आगदी आत्ता आत्ता गेल्या वर्षी मी आणि मैत्रीण " सनसिटी" ला मराठी सिनेमा बघायला गेलो तेह्वा ती आणि उदय भाटे ( तिचा नवरा) दोघाही भेटले/ बोलले.
मैत्रीण नी विचारलं तुझ्या ओळखीची आहे . म्हटलं हो तर. उदय भाटे ( इलाचा नवरा) डॉक्टर आहे. तिची मुलगी आणि प्रदीप वेलणकरची मुलगी मधुरा दोघी एकाच वर्गात. प्रदीप ची बायको रजनी वेलणकर " पार्ले टिळक मध्ये शिक्षिका" ती सगळी फ्यामिली चांगलीच ओळखते . फक्त आत्ता मधुरा आजकाल अजिबात बोलत नाही. असतो एकेकाचा स्वभाव .
४) विक्रम गोखले माझ्या वडलांचा अशील. मी कोलेज मध्ये असताना तो काही वकिली कामाकरता जवळ जवळ रोजच येत होता. त्या वेळी मी सोलिड भाव खालेला आहे.
५) माझे सासरे " गोवा हिंदू असोशिअशन " मध्ये काम करत होते. त्यावेळा ते मला बरीच नाटक दाखवत असत. मला नाटकाची प्रचंड आवड. एकदा "ब्यारीस्टार" नाटकाला घेऊन गेले. विजया मेहता आणि विक्रम गोखलेशी ओळख करून दिली . दोन दोनदा विक्रम गोखालेना सांगितलं. विक्रम म्हणाले "अहो बाबा मी किरण ला आधी पासून ओळखतो. ती कर्वे वकिलांची मुलगी आहे ना. मी त्यांच्या घरी जात होतो "
उरलेले किस्से नंतर कधी तरी. Happy

दिनेशदा नेहेमी प्रमाणे रॉकिंग.....

सुजा ...मजा आली.

फक्त आत्ता मधुरा आजकाल अजिबात बोलत नाही. असतो एकेकाचा स्वभाव .>>>>

थोड्याश्या यशाने काही लोकं हुरळुन जातात. ज्यांना ते करायला कष्ट पडलेले आहेत त्यांना त्याची किंमत असते. तिचा सासरा ( शिवाजी साटम)कुठल्या परीस्थितीतुन वर आलाय हे माझ्या कुटुंबाने पाहिले आहे. ( आम्ही त्यांच्या समोर रहात होतो). त्याने खुप वर्ष बँकेत नोकरी केली आहे. त्याची पत्नी साधारण १३-१४ वर्षांपुर्वी कँसर ने वारली. खुप प्रतिकुल परीस्थीती तुन तो वर आला आहे.

आजकाल टीव्ही आणि अमका सोहोळा.. वगैरे कार्येक्रमांमुळे नकोत्या व्यक्ति मोठ्ठ्या होत आहेत. नुसत छान दिसणं म्हणजे अभिनय नाही हे फार थोड्यांना कळतं.

फक्त आत्ता मधुरा आजकाल अजिबात बोलत नाही. असतो एकेकाचा स्वभाव <<<
माझा संपूर्ण उलटा अनुभव आहे तिच्या बाबतीत. अगदी छान बोलते ती नेहमीच. एकेकाचा अनुभव.

हे सुजाच्या अनुभवासंदर्भात नाही. पण एकूणातच सार्वजनिक ठिकाणी सेलेब्ज दिसल्यावर त्यांनी आपल्याशी कसं आणि किती बोललं पाहिजे अशी अपेक्षा असते लोकांची? तुम्हाला ते एकदा दिसत असतात आणि तुम्हाला एकदम अप्रूप वाटत असतं कबूल पण त्यांना दिवसभरात जिथे जातो तिथे कदाचित तुमच्याचसारखे अनेक लोक भेटू पाहत असतीलच ना. प्रत्येक वेळेला भेटायला येणार्‍या प्रत्येक अनोळखी माणसाशी तितक्याच प्रेमाने, अदबीने हसून बोलणे हे किती यांत्रिक आहे. कंटाळा नाही येणार का याचा? ती पण माणसेच असतात, त्यांनाही ताण, विवंचना, तब्येतीच्या तक्रारी, मुलांनी केलेल्या हट्टामुळे कावणे हे सगळे असतेच की. तरीही भाजी आणायला जाताना, प्रवासाला निघाल्यावर विमानतळावर, शॉपिंगला गेलेले असताना अश्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपले कोलगेट स्माइल देत रहायचे, आम्ही तुमचे फॅन आहोत म्हणणार्‍यांसमोर अशक्य अदबीने वागायचे या अपेक्षा जरा जास्तच अमानुष आहेत.

>>>> तर त्यात अख्खा मी व निमॉयचा अर्ध्याहून कमी चेहरा! कान मात्र सुस्पष्ट <<<<
तरीही तुझ्या लॉजिकल(?) की कसल्या त्या विचारसरणीला हे पटणार नाहीच की "असा फोटो काढुन घेतला जायला देखिल "नशिबच लागते" Proud
तू आपला शोध घेत बसशील, संशोधन करशील की.... स्टॅटीस्टिकली
१) मूळात त्या अ‍ॅक्टरला भेटायला किती जण येत असतील? = वर्षभरात शेकडोजण
२) त्यातिल कितीजण फोटो काढून घेतात? = दहा ते वीस टक्के
३) त्यातल्या कितीजणान्च्या फोटोत अर्धाच चेहरा येतो? = हजारात एखाद्याचा
४) त्यातले किती फोटो ज्याच्यात्याच्या अर्धांगाने अर्धेच काढलेले अस्तात? लाखात एखादी केस! (तरीदेखिल ते "नशिब" नाही - स्टॅटीस्टिकल लॉजिक! ) Wink
अन एकुण सगळी आकडे वारी गोळा झाली की तू स्टॅटिस्टिकल योगायोगाचा/संभाव्यतेचा कैतरी नि:ष्कर्ष काढणार, बरोबर ना? Proud

>>>> प्रत्येक वेळेला भेटायला येणार्‍या प्रत्येक अनोळखी माणसाशी तितक्याच प्रेमाने, अदबीने हसून बोलणे हे किती यांत्रिक आहे. कंटाळा नाही येणार का याचा? <<< अगदी मान्य.
पण म्हणून तर सगळ्यान्शी अकृत्रिमरित्या प्रेमाने हसुन खेळून बोलणारे संत/महात्मे (यात काही सेलिब्रेटिज असू शकतात) अन "सेलीब्रेटीज" यातला फरक कळून येतो. नुस्ता कळत नाही, तर संत/महात्मे यांचे लोक अनुकरण करतात "फॉलोअर बनतात" सेलिब्रेटिजना करमणू़कीपुरते पाहुन/अनुभवुन नन्तर विसरुन जातात Happy (असे आपले माझे मत बर्का)

इथे संत महात्मे कुठून आणि कशाला आले?
आणि सध्याच्या जगातले संत महात्मे मानले गेलेले लोक सेलेब्ज नसतात असं आहे का?

>>> इथे संत महात्मे कुठून आणि कशाला आले? <<<
मी नै कै केल!
अन ते आले नाहीत, आणलेत.
जामोप्याने केव्हाच "अनिरुद्ध बापुन्ना" आणले आहेच ना वर कुठेतरी
हां, आता अनिरुद्धबापून्ना संत/महात्मा म्हणाव की नै याकरता मात्र वेगळा बीबी उघडा बर्का! Wink

सुहास जोशी मागे नेहेमी ठाण्याच्या गावदेवी मार्केट मध्ये दिसायच्या. भाजी घेताना. तिकडुन मा़झ्या आईचं घर जवळ आहे. त्या मुळे आईला नेहेमी नेहेमी बघुन आई त्यांच्या ओळखीची झाली होती. नंतर नंतर त्या दोघी एकमेकींशी भाजी,गर्दी इ. विषयांवर बोलायला लागल्या. अगदी सरळ बाई. कसलीच घमेंड नाही. दिसायला ही एकदम सात्विक.

अत्ताच एका नाट्यछटा स्पर्धेला मिलिंद सफई परिक्षक होते. मी उत्स्फुर्त स्पर्धक होते. त्यांनी पण खुप छान मार्गदर्शन केले. ( मला तिसरे बक्षिस मिळाले). चेतन दातार, मिलिंद सफई यांचे एक नाटक पुर्वी बघीतलेले आठवते. नाव आठवत नाही.

परवा एका अ‍ॅडच्या संदर्भात प्रसिध्ध दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल ओफिस मध्ये आला होता. माझी सेक्रेटरी मल्लु आहे. ती तर वेडी झाली होती. मोहनलाल मला माहिती म्हणजे "कालापानी" ह्या सिनेमा मुळे. त्यात अंदमान हुन २ कैदी पळतात अशी स्टोरी आहे. छान चित्रण. अन्नु कपुर ने सावरकरांची भुमिका केली आहे. थोडा दाक्षिणात्य भडकपणा आहे. पण ठीक आहे.

दिनेशदा,
मस्त!
>>या तीन थोर व्यक्तींचा, विनय सहस्त्रांशांने तरी माझ्या अंगात भिनेल का, याच चिंतेत मी असतो.
अगदी...

मधुरा त्यांच्या कौटुंबिक ओळखीतली आहे आधीपासून ओळखीतली आहे म्हणून वाटलं असेल त्यांना तसं. एरवी काही वाटलं नसतं.

सुभाष घईचा ड्रायव्हर ओळखीचा आहे असं एकाने अभिमानाने सांगितलं होतं एकदा. थोडक्यात सुभाष घईच्या ड्रायव्हरशी ज्याची ओळख आहे अशा व्यक्तीला मी ओळखतो.

मी सहावीत असतानाची गोष्ट. मी दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात (आधीचे King George High School) शिकत होतो. तेव्हा तेजाब रिलीज होऊन काहीच महिने झाले होते. मी आणि एक शाळासोबती माटुंगा स्टेशनच्या पादचारी पूलावरुन जात असताना अचानक त्याने आमच्या शेजारून जाणार्‍या एका मध्यमवयीन स्त्रीकडे बोट दाखवून
"ए ती बघ माधुरी दिक्षितची आई"

मी: काssssय?

तो: अरे तेजाब मधे माधुरी दिक्षितची आई होती ना ती!

मी: ओह, पण अरे हे सिनेमातले लोक लोकलने कशाला जातील, गाडीतून जातील. चल लवकर उशीर होतोय शाळेत जायला.

हे सगळं आम्ही त्या बाईंकडे चालत चालत एकटक बघत बोलत होतो. माझ्या "सिनेमातले लोक लोकलने कशाला जातील...." या वाक्यावर त्या बाई गालातल्या गालात हसल्याचंही आमच्या लक्षात आलं. आम्ही दोघेही तेव्हा मुलखाचे लाजाळू असल्याने त्याच सुहास जोशी हे कळूनही त्यांच्याशी काहीच न बोलता सटकलो.

मंदार,
दिक्षीतांची माधुरी जे बी नगर ला रहायची, आमच्या कॉलेजा जवळ, कधी शुटिंग आटपुन लवकर आली संध्याकाळी आमचं कालेज सुटायच्या वेळेस, तर सर्व कॉलेज ची पोरं पोरी जमा व्हायचे तिच्या गाडी समोर, मी पण पाहिलं आहे तिला ४-५ वेळा.

माधुरीच्या कॉलेज ग्रूपमधल्या एक बाई आणि मी एका कंपनीत काम करत होतो. त्या बाई पण भारीच दिसायच्या (हिरॉईनसारख्या). त्या आम्हाला सांगत होत्या की त्यांचा सुंदर आणि शिष्ट मुलींचा ग्रूपच होता. तेजाबच्या आधीचे चित्रपट बघायला त्यांचा ग्रूप जात असे. नंतर जशी माधुरी प्रसिद्ध होत गेली तसा त्यांचा संपर्क कमी होत गेला.

मंदार, माझ्या पोस्टबद्दल म्हणत असशील तर तिथे मी आधीच लिहिलंय की सुजाच्या अनुभवाबद्दल हे नाही म्हणून.

तरीही भाजी आणायला जाताना, प्रवासाला निघाल्यावर विमानतळावर, शॉपिंगला गेलेले असताना अश्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपले कोलगेट स्माइल देत रहायचे, आम्ही तुमचे फॅन आहोत म्हणणार्‍यांसमोर अशक्य अदबीने वागायचे या अपेक्षा जरा जास्तच अमानुष आहेत.>>>>

असं कोणीच म्हणत नाही. की त्यांनी सदा हसत रहावं. पण ह्या प्रसिध्धीची त्यांना ही हौस असतेच. बघा सगळ्यांच्या मुलाखती. बहुतेक जण लोक आपल्याला ओळखतात म्हणुन खुश होतात. लोकांत मिसळणे, कोलगेट स्माईल ठेवणे ही त्यांच्या प्रतिमेची गरज आहे. एके काळी बिग बी पण पत्रकारांशी, जनतेशी फटकुन वागायचा. ज्या वेळेस त्याचा पडता काळ आला, तसा तो भानावर आला. त्याची हुशारी हिच की वेळीच त्याने सगळ्यांशी मैत्री करुन टाकली. आज प्रत्येक कलाकार कुठल्या ना कुठल्या सोशल साईट वर संपर्कात असतोच. कितीही बडा कलाकार असो, तो सगळ्यात घाबरतो तो प्रसिध्धी न होण्याला, लोकांच्या विस्मरणात जाण्याला. त्याची किंमत त्याला चुकवाविच लागते. त्याला पी.आर. ठेवावाच लागतो.

ज्यांन्ना यश खुप काळाने आणि पुर्ण पणे स्वतःच्या कर्तुत्वाने मिळाले आहे, त्यांना यशाची किंमत असते. ते लोक आपला जनसंपर्क खुप चांगला ठेवतात. मग तो लेखक असो, कवि असो वा कलाकार. लोकं जो पर्यंत त्यांना लक्षात ठेवतात तेवढीच त्यांची सद्दी असते. एक चुकीची गोष्ट, एखादा चुकीचा प्रॉजेक्ट त्यांना अपयश द्यायला पुरेसा असतो.

जेवढी आपल्याला सेलीब्रीटींची गरज (?) असते, तेवढीच ती त्यांना ही असते. पटत नसेल तर राजेश खन्नाला, कुमार सानुला, अमित कुमारला विचारा. विस्म्रुतीत जाणं केवढ भयानक असतं ते त्यांना पाहुन कळतं.

मोहन कि मीरा, राजेश खन्नाचा गेल्याच वर्षीचा अनुभव अगदीच विदारक आहे. माझ्या परिचितांपैकी एकाला तो मुंबई विमानतळावर विमानाची वाट बघत बसलेला दिसला. एकेकाळी स्टार आणि तरुणींच्या हृदयाची धडकन वगैरे म्हणून मिरवलेल्या राजेश खन्नाच्या आजूबाजूला अनेक लोक होते पण कुणीही ओळखलं नाही. एकटाच बराच वेळ बसून होता आणि ध्वनीक्षेपकावरुन घोषणा होताच विमान पकडायला निघून गेला.

हेच म्हणते आहे मी मंदार!!! वर उल्लेखलेल्या तीघां मध्ये प्रतिभा न्हवती का? स्टार मटेरीयल न्हवतं का? तर नाही. पण नीगेटीव्ह पब्लीसीटीने त्यांच्या करीयर ची वाट लावली. त्या मुळे अगावु पणा कुठे करायचा, कुठे नमतं घ्यायचं, कुठे लोकांना बाजुला ठेवायचं, कुठे कोणाशी कसं वागायचं हे भान ह्या सेलीब्रिटींनी ठेवायलाच पाहिजे.

राजेश खन्ना च हे उदाहरण त्या उलट विनोद खन्ना आणि शत्रु बघा. त्यांच्या ही करीयर मध्ये अनेक वादळ येवुन गेली. ते ही राज कारणात आहेत. पण आजही सेलीब्रेटी आहेत. त्यांना बघुन माना तरी वळतात ना!!!

तेंव्हा प्रसिध्धी पण राखता आली पाहिजे. आज हेमा मालिनी जवळुन गेली तर लाखो माना अजुनही वळतात, तिथेच तिच्या मुलीला कोणी ओळखत ही नाही. हेमा काही भारंभार सीनेमे करत नाही, पण आपल्या न्रुत्याने तिने स्वतःतला कलाकार जागा ठेवला आहे. ती माझ्या आईच्याच वयाची आहे. पण अजुनही तो आब तो नखरा सांभाळुन आहे.

मंदार....

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे. माझ्या नवर्‍याला विमानतळावर ५-६ वर्षां पुर्वी श्रीदेवी दिसली होती. त्याने आर्थातच ओळखलं नाही. कारण ती मेक अप शीवाय अती भयानक दिसत होती. ती त्याच्या पुढे बोर्डींग पास साठी होती बिजनेस क्लास मध्ये. ती गेल्यावर तिकडच्या कर्मचार्‍यात गडबड उडाली. तेंव्हा माझ्या नवर्‍याला कळल की ती श्रीदेवी आहे. त्या च्या म्हणण्या नुसार ती अगदी भयानक दिसत होती.

हे लोक विमान प्रवासात भयानकच दिसतात किंवा मुद्दाम लोकांनी चटकन ओळखू नये म्हणून तसे मेक-अप करून येत असतील... Happy

Pages