मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपिका पादुकोण ही मूर्ख आहे (आधीच लिहिलय. पुन्हा लिहिते)

आयडीया फिल्मफेअरच्या नॉमिनेशन अनाऊन्समेंटसाठी हिला बोलावलं होतं. (का म्हणून विचारू नका. फिल्मफेअर आहे ते) तेव्हाच हिचा एक पिक्चर रीलीज होणार होता. तर त्याबद्दल थोडंसं बोलाल का? असं म्हटल्यावर ही बाई "चायना गेट इज अ व्हेरी स्पेशल फिल्म" करून सुरूवात. मी नोट्स घेत होते. जवळ जवळ उडालेच. तेवढ्यात कुण्या जर्नालिस्टनेच "यु मीन चांदनी चौक टू चायना" असं विचारलं.

यावर "येस, इट्स अ व्हेरी स्पेशल फिल्म" Uhoh

आता भेटला तर या भेटीचं फार अप्रुप वाटलं नसतं पण टीनएज मधुन बाहेर पडता पडता फारच महान वाटलं होतं. आम्ही मित्र-मैत्रिणी (भीमाशंकरच्या वाटेवर लागणार्‍या) डिंभे धरणाच्या सरकारी गेस्ट हाउसमधे रहायला गेलो होतो. तिथे मिलींद गुणाजी आणि राजीव सेठ - कोणी दिग्दर्शक ( तेव्हाही माहित नव्हते, अजुनही कुठे ऐकले नाहीत) रहायला होते. मिलींदने सगळ्या मैत्रिणींना सह्या दिल्या तेव्हा मी एकटीच लांब बसुन कॉफी पीत होते, तेव्हा त्याने विचारलं कि तुला नको का ऑटोग्राफ? ( तेव्हा मी लाजाळु होते म्हणे. ;)) मग मी हवा आहे सांगितल्यावर त्याने टेबलवर येवुन पेपर नॅपकिनवर सही दिली, मग मी राजीव सेठची पण सही घेतली ( वाईट दिसु नये म्हणुन. पण ते कोण ते अजुन माहीत नाही. ) मग मला आवडायला लागला गुणाजी थोडे दिवस. Proud आता राणी गुणाजी जास्त आवडते. Happy

दुसरा मिलींद ( सोमण) भेटेपर्यंत मी लाजाळु राहिले नव्हते. ह्याचा बंगला लोणावळ्याला माझ्या बॉस/मित्राच्या बंगल्याशेजारी आहे. तिथे भेटला होता. साधासा आहे. आणि दाढी वाढलेला चेहरा आणि घरचे कपडे यामधे तो मला इतका बिचारा वाटला. आम्ही सगळे भरपुर मजा करत होतो, हा एकटाच होता, म्हणुन मी त्याच्याशी थोडुश्या गप्पा मारल्या. छान आहे साधासा..... बोलायला. दिसतो..... वेरी हॅन्डसम ! Happy

ज्यांना कुणाला दीपिका पदुकोण आवडते त्यांच्यासाठी.

प्रकाश पदुकोण पुण्यात बॅडमिंटनच्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आले होते. मॉडर्न हायस्कूलच्या प्रांगणात बांधलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलमधे ती स्पर्धा होती. ऑल इंग्लंड मास्टर्स आणि इंटरनॅशनल मास्टर्स असे टायटल्स जिंकल्यामुळे ते फॉर्मात होते त्यावेळी. त्या वेळी त्यांच्याबरोबर एक गेम आम्ही मुलं खेळलो होतो. फोटो सापडला तर काढून ठेवतो.

दीपिकाला भेटायचं असल्यास मी किती महत्वाची व्यक्ती आहे हे समजलंच असेल.

>>> गुन्हेगार 'कुप्रसिद्ध' असतात मी पोस्टला प्रसिद्ध व्यक्ती <<<
प्रसिद्ध मागे "सु" वा "कु" तुम्ही लावले नाहीयेत ना पण Sad नुस्तेच प्रसिद्ध व्यक्ती असे म्हणालात!
एक तर शीर्षक सुधारा, नैतर आक्षेप मागे घ्या, कृपयाच!

"मी म्हणजे फार कुणी मोठा माणूस" असा आविर्भाव बिलकुल न आणणार्‍या ज्या काही थोड्या व्यक्ती असतील त्यात "गुलझार" यांचा वरचा क्रमांक लागेल. अतिशय विनम्र, सदैव हसतमुख, तितकाच प्रसन्न वाटणारा साधा पेहराव, जी माहिती नाही त्याविषयी तितक्याच स्पष्टतेने न बोलणे, दिवंगत व्यक्तीविषयी केवळ चांगलेच विचार प्रकटन, तसेच पुढील व्यक्तीचा अभ्यास कितीही तोकडा असला तरीही त्याला नामोहरण न करता अभ्यास वाढविण्यासाठी काही सुचविणे/सांगणे आदी अनेक गोष्टी गुलझार यांच्यात एकवटलेल्या आहेत.

"सकाळ" वर्धापन दिनासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून चक्क दोन दिवस अगोदर कोल्हापुरात येणार असल्याचे व त्यापैकी एक दिवस खाजगी भेटीसाठीच असल्याचे सकाळचे त्यावेळेचे संपादक श्री.अनंत दिक्षित यांच्याकडून आम्हा तीन मित्रांना समजले. त्यावेळेतून आम्हाला अर्धाएक तास "पर्ल हॉटेल" वर भेटतील का याची सहज चौकशी केली आणि येथील एका संगीतप्रेमीने तशी भेट घडवूनही आणली. सकाळी ९.३० ची वेळ गुलझार यानी दिली आणि दहा मिनिटे अगोदर पोहोचलो व तशी रिसेप्शनीस्टकडून त्याना सूचना दिल्याक्षणीच त्यानी वर बोलाविले आणि मग पुढील १ तास त्या सौम्य प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वाच्या सोबत जादूमय झाला. अमृता प्रीतम, आर. डी. बर्मन, मीनाकुमारी, हृषिकेश मुखर्जी, लता मंगेशकर हे विषय येणे क्रमप्राप्त होतेच पण मोझार्ट व बाख यांच्या रचनांविषयी ते ज्या उत्साहाने बोलत राहिले ते मूळ संगीताहूनही श्रवणीय वाटले. आम्हा तिघा मित्रांच्या आवडीनिवडीविषयी त्यानी थोडक्यात का होईना पण आस्थेवाईकपणे चौकशी केली. ते आम्हाला फार भावले. चहापानही झाले.

(या भेटीचे आणखीन् एक वैशिष्ट्य म्हणजे रुममध्ये येऊन आमच्यासमोरील सोफ्यात बसल्याक्षणीच गुलझार यानी प्रथम काय केले असेल तर आपला मोबाईल स्वीच ऑफ केला. ते पाहून आमच्यातील दोघांनीही ती कृती केली. एखाद्याला संभाषणासाठी वेळ दिली असेल तर तीमध्ये कसलाही व्यत्यय येऊ नये याची दक्षता घेण्याची गुलझार यांची ही पद्धत निश्चितच अनुकरणीय आहे.)

दादरला कल्पना हॉटेल मधे जेवत असताना बाजुच्या टेबल वर धनराज पिल्ले येउन बसला. माझा नवरा एकदम खुष. क्रिकेट आणि हॉकी म्हणजे strong points. सारखे जेवताना लक्ष धनराज पिल्ले कडेच. ' मी बोलु का? माझा शाळेपासुन चा favourite player आहे' वैगरे चालले होते...मी म्हट्ले एवढा तो जर आवड्तो तर तसे सान्ग त्याला. माझ्या नवर्याने धनराज पिल्ले ला सन्गितले (तेवढ्यात त्याच्या हि लक्षात आले होते ) कि तुमचा गेम मला आवड्तो वगैरे वगैरे . आम्हि जगजित सिग ची live concert बघून आलो होतो ( Jagjit's last live concert on 16th sept. 2011) त्यामुळे camera होता..म्हणून photo हि काढ्ले. आणि बोलता बोलता धनराज पिल्लै ने माझ्या नवर्याला "sir" म्हटले. आम्ही बाहेर पडलो but my husband was so embarrassed....तो मला सर का म्हणाला. त्याचे गेम बघुन लहानाचा मोठा झालो .....एक गोष्ट सांगावीशी वाटते कि एवढा जागतिक कीर्ती चा player असून he is so simple and down to earth....simply great.. फोटो काढताना पण त्याने स्वताहून सांगितले कि आपण इथे उभे राहूया म्हणजे छान फोटो येईल ...

माझ्या office मध्ये बरयाच लोकांना धनराज पिल्ले नाव माहित होते पण तो Indian hockey team चा capain होता हे माहित न्हवते Sad

प्रसिद्धचा अर्थ ईथे सर्वांनी सुप्रसिद्ध असाच घेतला आहे. कुप्रसिद्ध लोकांचे किस्से टाकायची ईच्छा असल्यास टाकावेत.

अरे वा छानैत किस्से..

मला ही हृतिक रोशन ,त्याची बायको सुझन ,हाँगकाँग ला आम्ही राहात असलेल्या मारियत हॉटेल मधे भेटले होते. रूम्स मधे जायच्या लिफ्ट मधे आम्ही तिघंच होतो.. आम्ही नुस्तं स्माईल्स एक्स्चेंज केल्या. त्याची बायको फारच लाजाळू आहे. माझ्या तोंडून नुसता बावळट प्रश्न पडला अलगद्,'तू इतका बारीक का दिसतोयेस.. त्यावर तो म्हणाला ,'कारण मी बारीकच आहे'आणी त्याला खूप हसू आलं..बरं झालं त्याचा फ्लोअर अगोदर आला आणी गोड ,हसून 'बाय'करून गेला..
ही गोष्ट मी माझ्या पोरीला सांगितल्यावर ती लगेच म्हणाली,'मम्मा,तू अगदी त्याच्या आईला शोभेलसा प्रश्न काय विचारलास;.. हीहीही!!!!

फिल्लमी लोकांमधे अरशद वारसी,अनुपम खेर, जुना विलन अजित, गोविंदा, राजेश खन्ना, श्रीदेवी विथ फ्यामिली, असे बरेच लोकं विमानप्रवासात भेटले. श्रीदेवी सोडून सर्व गोड बोलणारे होते.

तसा काही फार लोकांना भेटलो नाही. एकदा पुण्याला असताना कुठला तरी टुकार सिनेमा पाहायला गेलो होतो university रोड वरच्या theatre मध्ये तेव्हा तिथे आपल्या सिनेमाचे promotion करायला पेरिझाद झोराबिअन आणि अनुषा दांडेकर आल्या होत्या. पेरिझाद ची ऑटोग्राफ घेतली पण त्या वेळेस अनुषा काही लोकप्रिय नव्हती सो तिची ऑटोग्राफ नाही घेतली.

गामा पैलवान

तुमचा जन्म व्हायच्या आधीच मी सांगितलेलं इथं.. मी तिसरी फेल आहे. म्हणून फक्त ऑटोग्राफ ! तुम्ही इंटरफेल म्हटल्यावर तुम्हाला लिहीता वाचता येणारच कि :दीपस्तंभ:

Kiranyake, मी कागदावरच्या लिहिण्यावाचण्याचं म्हणत होतो. तुम्ही भलताच अर्थ लावलात. म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे! सेनापतींनी भरगच्च लिंक दिलीये तशी कागदाच्या सुयोग्य वापराची लिंक देऊ काय?
Wink
:दिवाळी:
आ.न.,
-गा.पै.

.

मी काल "बाबा महाराज सातारकर यांना भेटलली .

मिलींद गुणाजी...........कणकेश्वर ला भटकंती चे शुट..
अजय देव्गन, अक्शय खन्ना : जुईनगर ला

कामामुळे त्या क्षेत्राशी संबंधीत प्रसिद्ध व्यक्ती भेटतातच, पण तुमच्या क्षेत्राबद्दलची आपुलकी असणारे पण प्रसिद्ध लोक भेटतात. योगायोगानी माझी आणि माझ्या एका आराध्यदैवताची अशीच याची देही भेट झाली. शाळेत असल्यापासून मूळ स्टारट्रेकमधील कधीकधी हृदयहीन वाटण्याइतपत पराकोटीचा लॉजीकल असलेला स्पॉक माझ्या आयडॉल्स पैकी एक आहे. (माझ्यात त्याच्या विचारांची सुसुत्रता किती आली आहे कल्पना नाही, पण दुर्दैवाने स्पष्टवक्तेपणा थोडाफार आला आहे हे वेळोवेळी अनेकांनी जाणवून दिले आहे).

लिओनार्ड निमॉय उर्फ स्पॉक हा फिलॅनत्रॉफिस्ट आहे. लॉस एॅंजल्सच्या सुप्रसिद्ध ग्रिफीथ वेधशाळेचे समृद्धीकरण सुरु असताना त्याने (आणि त्याच्या बायकोने) त्या कार्यास आर्थीक हातभार लावला. पालोमार स्थित खगोलशास्त्रीय वेधशाळेच्या सहाय्याने आम्ही घेतलेल्या अवकाशीय चित्रांचे एक १५२ फूट X २० फूट मोझाईक पण तेंव्हाच ग्रिफीथमधे बिग पिक्चर या नावाने गंथर डेप्थ्स अॉफ स्पेस या विभागात साकारले गेले. त्या विभागाला लागूनच लिओनार्ड निमॉय ईव्हेंट होरायझन नामक मल्टी-मेडीया थिएटर आहे. (त्यात त्या नावाला साजेशी ग्रिफीथची ओळख करून देणारी फित दाखवण्यात येते ज्यात स्पेसबॉल्समधे खपली असती अशी निमॉयची व त्याच्या बायकोची क्लिप आहे).

तर (नमनाला झालेल्या घडाभर तेलानंतर) बृहतकरणानंतर, उद्घाटन सोहोळ्याआधी आम्हाला एक टूर देण्यात आला. तेंव्हा लिओनार्ड निमॉय पण हजर होता. इतक्यातल्या स्टारट्रेक चित्रपटात दाखवला आहे तितका वयस्कर जरी नसला तरी वय जाणवत होते, पण चेहेरा मात्र करारी आणि बोलणे मृदू. सोबत छबी काढू द्यायलाही आढेवेढे घेतले नाही. तेंव्हा नवाच असलेला १० अॉप्टीकल झूमचा टॉप अॉफ द शेल्फ अॉलिंपस कॅमेरा अनुच्या हाती दिला आमचा फोटो काढायला. आमच्या बेटर हाफला निमॉयच्या अवतारावरील माझ्या प्रेमाबद्दल माहीत होते. पण स्वत: त्यातील नसल्यामुळे असेल पण तिच्या दृष्टीने स्पॉक म्हणजे त्याचे व्हल्कन कान. त्यामुळे नंतर फोटो पाहिला तर त्यात अख्खा मी व निमॉयचा अर्ध्याहून कमी चेहरा! कान मात्र सुस्पष्ट. पण मेक-अप नसल्याने वसुंधरीयच वाटणार. माझी अवस्था मात्र मेफिस्तोफेलस भेटला असे सांगणाऱ्या H G Wells च्या गोष्टीतल्या रंगाऱ्यासारखी झाली.

http://www.griffithobservatory.org/exhibits/bbigpicture.html
http://www.griffithobservatory.org/bnimoy.html

Pages