मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> स्वाक्षरी कशासाठी घ्यायची असते?

चांगला प्रश्न आहे. नुसती स्वाक्षरी घेणे मला कधीच आवडले नाही (निदान मोट्ठ्या कोर्या कागदावर घ्यावी).
रॉजर पेनरोजची एकदा आयुकाभेट होती.
मला त्यांनी निर्माण केलेले काईट्स आणि डार्ट्सचे टायलींग आवडायचे (http://en.wikipedia.org/wiki/Penrose_tiling#The_original_pentagonal_Penr...)
मग लिहिला एक ग्राफिक्स प्रोग्राम, ए४ कागदावर केले ते टायलिंग्स प्रिंट आणि त्यावर घेतली स्वाक्षरी.

वरदाच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या क्षेत्रामुळे अनेक लोक भेटतात. कधिकधी त्याचमुळे इतरांपेक्षा लोकांच्या थोरवी बद्दल तुमचे विचार कमी-अधीक फरकाचे असु शकतात.

स्वाक्षरी कशासाठी घ्यायची असते?>>

१. मला वाटतं तो त्या भेटीतला आनंद.
२. त्या भेटीची आठवण.
३. त्या माणसाच आपल्या आयुष्यातलं महत्व - लेखक म्हणून, किंवा समाजसेवक म्हणून वगैरे.
४. अशा व्यक्तीबरोबर लोकं फोटो का काढून घेतात? फोटो शक्य नसतो तर निदान स्वाक्षरी.

प्रत्येक स्वाक्षरी घेतलेल्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात बदलच केलेला असला पाहिजे किंवा मार्गच दाखवला असला पाहिजे असंच नाही काही. नाहितर फक्त आईवडिलांची किंवा गुरुजनांचीच स्वाक्षरी घ्यावी.

जशी पुस्तकात ठेवलेली मोरपिसं किंवा चांद्या भूतकाळातल्या सुखद आठवणीत घेऊन जातात न तशाच ह्या स्वाक्षर्‍या. माझ्या काही मैत्रीणी स्वाक्षरीच्या तेथे लेखक असेल तर त्याचे वाचलेले आणि आवडलेले उतारे किंवा वक्ते असतील तर त्या दिवशी ऐकलेल्या भाषणातली वाक्यं वगैरे लिहून ठेवायच्या.

माझ्यामते खूप सकारात्मक हॉबी आहे.

"माझ्यामते खूप सकारात्मक हॉबी आहे."

~ आर्च यांच्या या मताशी सहमत. शिवाय या अशा "हॉबी" निरुपद्रवीही असतात, म्हणजे इतर काही हॉबीजपासून आजुबाजूच्या ज्येष्ठ/कनिष्ठांना त्रास होऊ शकतो, पण या छंदामुळे नाही. स्वाक्षरी, लेखकाचे आवडते उतारे एका छानशा वहीत उतरून घेऊन त्यांचे वेळोवेळी मनन करणे आदीमुळे आनंद मिळतो तो निखळ तर असतोच पण त्यामुळे आपल्या विचारसरणीतही निश्चित असा फरक पडत जातो. अर्थात ही हॉबी शालेय वयातच जोपासली जाते आणि तिचा नंतर 'इतिहास' बनून जातो. कालौघात आता ही हॉबी राहिलेली नाही आणि पालकदेखील आपल्या मुलाने/मुलीने एखाद्या चांगल्या पुस्तकातील लेखकाचे विचार उतरून घेईल का ? याकडे या वेगवान काळाने असेल कदाचित, लक्ष देत नाहीत हे सत्य आहे.

पूर्वी लेखकमंडळीही काहीशी निवांत भेटत असत आणि स्वाक्षरीसमवेत एखादा छोटासा संदेश मागितला तर देतही असत. ज्यांच्या संग्रहातील संदेश मी पाहिलेले आहेत, त्यात सर्वश्री वि.स.खांडेकर, साने गुरुजी, वि.द.घाटे, र.वा.दिघे, पु.शि.रेगे, अनंत काणेकर, विश्राम बेडेकर, श्री.ना.पेंडसे आदी मंडळी येतात. रेगे आणि बेडेकरांचे अक्षर तर अगदी टिपून घ्यावे इतके सुंदर. मात्र आचार्य अत्रे, ना.सी.फडके, दोन्ही माडगुळकर, गंगाधर गाडगीळ असे त्या त्या काळात लोकप्रियतेच्या गराड्यात असणारे लेखक स्वाक्षरी कशीबशी देत, संदेश कुणाला दिलेले मला आढळलेले नाही. लोकप्रियतेचे सर्व विक्रम पार करणारे पु.ल.देशपांडे सभासमारंभाच्यावेळी स्वाक्षरी आणि संदेश जरूर देत, पण फक्त कुणाचेही पुस्तक विकत घेऊन जर त्यांच्यासमोर आले तरच. वहीत संदेश ते देत नसत. किमान त्या निमित्ताने तरी प्रदर्शनातील पुस्तक विकत घ्यावे असा त्यामागील हेतू असे.

ना.धों.महानोर संदेशापेक्षा त्यांच्या कवितेमधीलच चार ओळी पुस्तकावर देतात. अक्षरही त्यांच्या कवितेइतकेच मोहक आहे.

नीधप...

तुम्ही म्हणता त्या प्रमाणे एक दोन वाक्यांची देवाण घेवाण, एखादे स्मित, स्वाक्षरी... ही भेट म्हणता येणार नाही. तशा ह्या लोकांच्या भेटी मग सामन्य माणसाशी काही कारणा शिवाय होणारच नाहित. मुळात बाफ ज्यांनी ओपन केला आहे, त्यांना ही ह्या चुट्पुट्त्या भेटी तुन झालेले प्रसिध्ध व्यक्तिंचे दर्शन अपेक्षित आहे. ह्या ज्या न ठरवता झालेल्या भेटी असतात त्याच त्या व्यक्ति बद्दल खुप काही सांगुन जातात.

मागे मी लहान असताना सातार्‍याला "रजताद्री" हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो. रात्री खुप आवज वाटला म्हणुन वडिलांनी बाहेर जावुन पाहिले, मागे मी पण गेले. तर समोर रेसेप्शन वर काशीनाथ घाणेकर अतिशय नशेत उघडेबंब फक्त कमरेला टॉवेल लावुन रिसेप्शन वर गरम पाण्यासाठी भांडत होते. त्यांचा तो टीपेचा आवज, ते लाल लाल डोळे बघुन मी घाबरुन गेले. त्यांची खुप नाटकं तेंव्हा जोरात चालु होती. मी लहान होते पण तरी आई वडिलांबरोबर नियमित नाटके पहात असे. त्यांचे ते दर्शन अकस्मिक होते.

एकदा मी व माझे बाबा स्कुटर ने कल्याण ला चाललो होतो. मी सात आठ वयाची असेन. मागे एक भली मोठ्ठी गाडी जोरात हॉर्न वाजवत अतिशय भरदाव वेगाने येत होती. माझ्या वडिलांनी कसे बसे स्कुटर वर नियंत्रण मिळवले. आणि कडेला स्कुटर थांबवली. पाहिले तर ती गाडी प्रसिध्ध नटी नुतन चालवत होती. चेहेर्‍यावर अतिशय हरवलेले भाव होते. तिच्या मुंबर्‍याच्या बंगल्या कडे जात असावी. तिच्या वर एक अभिनेत्री म्हणुन माझे फार प्रेम आहे. पण तिचे ते असभ्य वर्तन?

लोनावळ्याला आमच्या स्नेहींचा बंगला आहे. तिकडे एका विकांताला गेलो होतो. बाजुच्या बंगल्यात प्रचंड आरडाओरडा, गाड्यांची ये जा चालु होती. चांगली रात्र झाली तरी जोरात म्युझीक आणि प्रचंड आवाज येत होते. आजु बाजुचे सगळे वैतागले होते. आम्ही १०-१२ जण होतो. आमच्यातले ४-५ जण त्या बंगल्यात तक्रार करायला गेलो. पहातो तर काय काजोल आणि तनुजा तर्र आवस्थेत होत्या. तो बंगला शोभना समर्थांचा होता. काजोल चा वाढदिवस साजरा होत होता. त्या दोघी काहीही बोलायच्या आवस्थेत न्हवत्या. आम्ही तसेच परत आलो. नंतर समोरच्या पारशाने पोलीसात तक्रार केली. पोलीस आले तेंव्हा तो गोंगाट थांबला.

पहिल्या स्फुटात मी फक्त चांगल्याच आठवणी सांगीतल्या. वरिल सगळ्या व्यक्ति ह्या त्यांच्या क्षेत्रातिल अतिशय आदरणीय व प्रसिध्ध आहेत. तरीही त्यांचे माणुस म्हणुन दर्शन झाले ते अशा चुट पुट प्रसंगातुनच.

हे प्रसंग त्यांच्या "भेटी" म्हणता येणार नाहित. पण त्यांचे माणुसपण दाखवायला पुरेशा आहेत. जशा आशा भोसले रस्त्यात भेटल्या तसे हे लोक मला "भेटले" न्हवते. पण तरीही त्यांचा नको तो चेहेरा दिसला मात्र होता. असे अजुनही काही किस्से राजकिय लोकांचे आहेत. पण ते नेट वर देण्या सारखे नाहित.

मी ह्या प्रसिध्द लोकांना पाहिलोय

प्रमिला दातार - लहानपणी शाळेच्या अ‍ॅन्युअल डे गॅदरिंग मध्ये
प्रिती सागर - लहानपणी शाळेच्या अ‍ॅन्युअल डे गॅदरिंग मध्ये
तबस्सुम - लहानपणी शाळेच्या अ‍ॅन्युअल डे गॅदरिंग मध्ये
जु. मेहमुद - लहानपणी शाळेच्या अ‍ॅन्युअल डे गॅदरिंग मध्ये
ब्लॅक बिली (कॅब्रे डांसर) : लहानपणी शाळेच्या अ‍ॅन्युअल डे गॅदरिंग मध्ये - हे जरा अतिश्योक्ती वाटेल, पण खरंय
दिलीप कुमार आणि सायरा बानु : सांताकृझ एअरपोर्ट
मधुकर तोरडमल आणि अतुल परचुरे : तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटक भाईदास मध्ये
विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदिप पटवर्धन : मोरुची मावशी नाटक पार्ल्यात दिनानाथ मध्ये
सुदेश भोसले : जलसा ऑर्केशट्रा षणमुखानंद मध्ये
अनुष्का दांडेकर : आठवत नाही कुठे पाहिलंय, हयात रिजेंसी कि जे व्ही एम
सुनील गावस्कर / गुलाम परकार / रवि शास्त्री / दिलीप वेंगसरकर : वानखेडे वर
माईक गॅटिंग / अ‍ॅलन लँब : वानखेडे वर
जोएल गार्नर / मालकम मार्शल / अँडी रॉबर्ट्स / मायकल होलडिंग : वानखेडे वर
देव आनंद : महाबळेश्वर ला (Elephant Point वर)

सुधीर जोशी आणि विनय येडेकर - दक्षिण मुंबईतल्या एका सिनेमागृहात Golden Eye बघायला गेलो होतो तेव्हा.
स्वाक्षरी देखील घेतली आहे.
निशीगंधा वाड - दादर लोकलमधे - यांचीही स्वाक्षरी घेतली आहे (मी इयत्ता सहावीत असताना)

व्वा या छान धाग्यामुळे काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
आर्च .... अगदी अगदी .... जशी पुस्तकात जपुन ठेवलेली मोरपिस , भुतकाळातल्या सुखद आठवणी , भेटीतला आनंद
माझ्याही भेटीचा योग काही प्रसिद्ध व्यक्तींना मिळाला. Happy

राजकपूर : एक भारदस्त अन प्रसन्न व्यतिमत्व अगदी जवळुन बघण्याचा योग . ( तब राजसाब छलिया की गलिया पार किये थे लेकिन वही अदा पण हसरा लालबुंद अन गोलमटोर झालेला चेहरा ) . आर सि एफ ला असतांना आम्ही एक रॉबर्स रॉबरी नांवाचे नाटक बसविलेले, चिफ गेस्ट राजसाब होते.त्यांच्या हस्ते या रॉबरला पारितोषिक मिळाले अन मग कमिटी मेंबर्स सोबत अगदी राजसाब के बाजुमे बैठके बाते करनेका और साथमे बीअर पिनेका मौका Happy . त्यावेळी चेंबुरच्या स्टुडिओत रंगपंचमीला या असे आवर्जुन दिलेले निमंत्रण अन आता 'मेरा जुता है जपानी , .. लाल टोपी रुसी ..फिर भी दिल है हिन्दुस्तानी' . , 'आ अब लौट चले , नैन बिछाये बाहे पसारे तुझको पुकारे देश तेरा' ची अजुनही आठवण करुन देत ' देशात परत या' असे वरुन सांगताहेत Happy

डॉ लक्ष्मण देशपांडे : 'वर्‍हाड निघालं लंडनला' , वाटेत कुवेतला थांबवल आम्ही Happy तेव्हा महाराष्ट्र मंडळ तर्फे त्यांचा सत्कार , सोबत शेजारी बसुन घेतलेले जेवण अन मग या बबन्याने , होल वावर इज अवर च्या शैलीत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा कश्या विसरणार.
प्रशांत दामले , सविता प्रभुने : 'चार दिवस प्रेमाचे' , कुवेतलाच ..आम्हीही त्यांचे सोबत २ दिवस प्रेमाचे घालवले अगदी एकत्र स्वंयपाक वगैरे .. अरे प्रशांत काय मस्त जेवण बनवतो Happy

सलिल कुलकर्णी , संदिप खरे , शौनक अभिषेकी , सुबोध भावे : 'मैत्रेय' च्या मैत्री चा आस्वाद कुवेतला आम्ही घेतला , मस्त गप्पा टप्पा अन असमादीकांना सुबोध भावे च्या हस्ते समथिन्ग , काय तर म्हणे मंडळासाठी जास्त चंदा जमवला Happy एक किस्सा पण सांगावासा वाटतो , एक पुण्यातली मायबोलीकर, नेहमी म्हणायची, 'मी संदिप खरे ला ओळखते , आमच्या शेजारी राहायचा वगैरे वगैरे Happy ' तर त्यादिवशी मी संदिप खरे ला विचारलेच , पुण्यात अशी अशी एक व्यक्ती ... तु ओळखतोस का ? तर कोण ...काय कशी Happy पुण्यात आल्यावर त्या व्यक्तीला सांगितले , संदिप खरे ने तुझी आठवण काढली होती बरं का Happy

प्राण : त्या काळातला खलनायक अन मनोज कुमारच्या कृपेने कस्मे वादे प्यार वफा, अन यारी है इमान करत मस्त साईड हिरो . त्यांना माझ्या भेटीचा योग मुंबईच्या एअर पोर्ट वर आला Happy 'तेरे मेरे सपने' की असाच अर्शद वारसी (तेव्हा तो नविन नविन होता , मला ओळखत नव्हता Happy ) च्या सिनेमाचे शुटिन्ग सुरु होते . प्राण साहेब बाजुला बसलेले दिसले. आम्ही ( मी , बायको , दोन्ही मुले ) त्यांना भेटलो , मी शेकहॅन्ड वगैरे केले , सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली . त्यांनी पण आपल्या भाची अन नातवांसोबत फोटो काढुन घेतला Happy प्राण ला मामा बनवले की माझ्या बायकोने Happy

अनिलजींशी ..सहमत्..अजून सर्वांचे किस्से ऐकायला आवडतील....प्रतिमेतल्या व प्रत्यक्षातल्या व्यक्तींमधला फरक पाहून अवाक व्हायला होते आहे....

रमाकांत देशपांडे - विले पार्ले येथील एका बँकेत भेट. ते कामानिमित्त आले असल्याने त्यांची हस्ताक्षरी घेतली नाही, फक्त हस्तांदोलन करुन सटकलो.

मी विंदांना भेटलोय, त्यांच्याशी बोललोय. ते आमच्या ऑफिसात त्यांच्या कामाने आले होते. दुसर्‍या एका विभागातून बाहेर पडताना दिसले तेव्हा त्यांच्या मागे पळत गेलो. काम होईपर्यंत ते स्वागतकक्षात थांबले , तिथे थोडा वेळ त्यांच्याशी बोलता आले.
असेच विजयेंद्र घाटगे, अनिता कंवर ऑफिसात आलेले पाहिले.
ऑफिसात सुशील दोशी माझ्याशी बोलून गेल्यावर मला कळलं की ते 'ते' होते.
कॉलेजात मवांमचे काम बघताना प्रा. शंकर वैद्य, पद्मिनी बिनीवाले यांच्याशी बोलायला मिळाले.
प्रा मृणालिनी जोगळेकर (कथालेखिका आणि प्रवासवर्णनकार), प्रा नलिनी पंडित (अर्थतज्ज्ञ, लेखिका) या दोन्ही आम्हाला कॉलेजात शिकवायला होत्या. दोघींबरोबर कितीदा तरी गप्पा मारल्यात. त्यांनी त्यांच्या संग्रहातली पुस्तके वाचायला दिली होती. दोघीही आता नाहीत Sad

मकरंद अनासपुरे : माझ्या ऑफिसमध्ये आला होता. एकदम साधा माणुस. फोटो वगैरे काढला ( माझी मुलगी त्याची फॅन आहे. तिला खरं वाटलं नसतं म्हणुन फोटो काढला)

माझा एक ईटालियन क्लायेंट होती. एकदम अवलिया. वेडीच होती. तिच्या मुळे ईन्डो-ईटालियन चेंबर चे अनेक कार्येक्रम, प्रदर्शन अटेंड केली होती. तिचा माझ्या वर खुप विश्वास होता. त्या मुळे खुप ठिकाणी आम्ही जायचो. त्या कार्येक्रमात अनेक प्रसिध्ध लोक भेटले. एरवी त्यांनी ढुंकुन बघीतलं नसतं, पण माझ्या बरोबर ही गोरी कातडीची सुंदर वेडी होती ना!! तिकडे भेटलेली लोक = अनेक मिनिस्टर, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अमिताभ बच्चन, कबीर बेदी ( ह्याचे डोळे खुपच भेदक आहेत), शबाना आझमी.

ह्या ईटालियन क्लायेंट ने पेडर रोड ला जुन्या जमान्यातली नटी कामिनी कौशल हिचं घर भाड्याने घेतलं होतं. शेजारी कामिनी कौशल रहायची. अतिशय सुंदर म्हातारी... काय देखणं पंजाबी सौन्दर्य. तिचं खरं नाव उमा सुद. अतिशय फ्लुएंट इंग्रजी बोलते ती. अगदी ब्रिटीश कालिन. फारच उमदा व्यक्तिमत्व. तिच्या कडे वेळच वेळ असायचा. खुप गप्पा मारायची. तिला सगळे "कामिनी मा" म्हणायचे. पण वयाप्रमाणे विस्मरण लगेच होत असे. माझं नाव प्रत्येक वेळी वेगळच घ्यायची. पण खाउ घातल्याशिवाय सोडत नसे.

शमशाद बेगम : त्या ज्या इमारती मध्ये रहातात त्याच्या समोर आमचे ऑफिस आहे. सध्या दिसल्या नाहित. पण पुर्वी बागेत बसलेल्या असायच्या.

आरती अंकलीकर : माझ्या बहिणीच्या नवर्‍याची मैत्रिण आणि त्याच्या वडिलांची गुरुभगीनी. तिचं गाण त्यांच्याच घरी ऐकलं. खुप बडबडी आहे.

मी ६ वीत असतानाची ही गोष्ट आहे. नेहमीप्रमाणेच टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्त्व,गीतापठण,निबंध लेखन आणि गीत-गायन अशा स्पर्धा पार पडलेल्या होत्या...आणि प्रत्येक स्पर्धेत मला पहिले पारितोषिक होते.
१ ऑगस्ट रोजी बक्षीस समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि साप्ताहिक मार्मिकचे संपादक श्रीयुत बाळ ठाकरे(त्यावेळी ’बाळ’म्हणूनच ओळखले जात. बाळ चे बाळासाहेब व्हायला अजून बरीच वर्षे जायची होती. त्यावेळेला शिवसेनेचा जन्मही झालेला नव्हता.).चार वेळा बक्षीस घ्यायला मी त्यांच्यासमोर गेलो तेव्हा न राहवून ते म्हणाले, " अरे ह्याने एकट्यानेच भाग घेतला होता काय स्पर्धेत?"
मी गीता-पठणाचे बक्षीस घ्यायला गेलो तेव्हाची त्यांची प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होती. माझ्या ’देव’ ह्या आडनावाचा त्यांनी मोठ्या खुबीने असा संबंध जोडला.
बाळ ठाकरे म्हणाले, "संस्कृत ही तर देववाणी म्हणजे देवांचीच भाषा. तेव्हा ह्या ’देवाला’ गीता पठणात पहिले बक्षीस मिळाले त्यात नवल ते काय?" ह्यावर श्रोत्यांमध्ये खसखस पिकली.
त्यानंत दुसर्‍या ’गोरे’ नामक मुलाच्या बाबतीतही असेच घडले..आदल्या वर्षीच्या वार्षिक परीक्षेत त्याला इंग्लिश विषयात त्याच्या इयत्तेत सर्वाधिक गुण मिळालेले होते. तेव्हा त्याला त्याचे बक्षीस देतानाही ते म्हणाले, "इंग्लिश ही बोलून चालून गोर्‍यांचीच भाषा! तेव्हा इंग्लिश मधले पहिले पारितोषिक ह्या ’गोरे’ला मिळणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या ह्या कोटीलाही हशा आणि टाळ्यांनी श्रोत्यांनी दिलखुलास दाद दिली.

मी सुरूवातीला उल्लेख केलेल्यांपैकी बचेंद्री पाल या महिला एव्हरेस्टवीर.

दिल्लीत त्या मला भेटल्या. त्यांचं प्रेझेंटेशन चालू असताना मी पोहोचलो. त्यामुळं नाव समजलं नाही. त्यांच्यानंतर मी माझं प्रेझेंटेशन केलं. सेशन संपल्यानंतर त्यांनी आस्थेने माझ्या कामाची चौकशी केली. मी अगदी बेफिकिरीने आणि हं हं अशी तुटक उत्तरं देत होतो. त्यानंतर मी त्यांना त्यांचं नाव विचारलं. त्यांनी सांगितल्यावर मी म्हटलं एव्हढ्यात ऐकलंय हे नाव ! त्या फक्त हसल्या आणि स्वतःबद्दल बोलायचं टाळून पुन्हा चौकशी करू लागल्या..

तेव्हढ्यात एका शासकिय पत्रकाराने त्यांना ओळखले आणि दिल्ली स्टाईलमधे दि ग्रेट बचेंद्री पाल वगैरे मुक्ताफळं उधळली. त्याच्या त्या बडबडीतून मला कळालं याच त्या पहिल्या भारतीय महिला एव्हरेस्टवीर.. आणि नंतर वाटलं अरे आधी कसं नाही आठवलं हे ! आणि खूप ओशाळून गेलो.

स्वतःची इतकी मोठी कामगिरी असताना त्याबद्दल एक शब्दही न बोलणा-या पाल बरंच शिकवून गेल्या. विद्या विनयेन शोभते असं काहीसं सुभाषित आहे ना ?

मा.बो. वरिल - सर्वांचे लाडके दिनेशदा, जिप्सि, साधनाताई, मामी,अनिताताई, ईद्रा,गोळेकाका, देवकाका,नीधप, रीमा, उजु (निसर्ग गटग)
यो,बागुलबुवा,रो.मा., आनंदयात्री, बागुलबुवा ( लगीनगडावर :हाहा:)
या सर्व आपल्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ति आहेत. Happy

लेखक
श्री.शिवाजी सावंत - पुण्याच्या एका कार्यक्रमात
श्री.निनाद बेडेकर - अनेकदा यांचा सहवास लाभला आहे,अतिशय विनम्र,हुशार आणि मिष्कील स्वभाव,.
प्रा. प्र.के.घाणेकर - रायगडावर पुर्ण दिवस यांचा सहवास लाभला, अत्यंत अभ्यासु आणि म्रुदुभाषी.
श्री.आप्पा परब - याच्याकडे बरेचदा जाणे होते.
प्रा. विणा देव -पुण्याच्या एका कार्यक्रमात
यासर्वांकडुन बरच शिकायलाही मिळाल.:)

गों. नी. दां.च्या लेखनीतील अजरामर माणसं
राजगडावर - हणुवाती फणसे
रायगडावर - अवकीरकर परिवार

कलाकार बरेच कमी Happy

प्र के घाणेकर आम्हाला शिकवायला होते बॉटनीला. गरवारेमधे. खूप धमाल यायची.
तसंच हेमा साने मॅडमचं पण. धमाल नाही पण फिजिओलॉजीसारखा किचकट विषय त्यांनी ज्या सहजपणे शिकवला त्याला तोड नव्हती.

बघते तर माझ्या बाजूला आशा ताई उभ्या होत्या.
......आणि हा अजून एक गोष्ट त्यांची उंची माझ्या पेक्षा कमी आहे हा हा हा
>>
नेपोलियनची गोष्ट आठवली Happy
अनन्या दिवे घ्या, अनुभव आवडला.

एवढ्या दिग्गज भेटींपुढे आम्ही काय लिहिणार ? जे थोडेफार आहे ते सांगतो.

शरद तळवलकर : सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत यांच्या हस्ते बक्षिस मिळाले होते. (फोटो आहे)
रमेश भाटकर : मुंबई पुणे रेल्वे प्रवासात एकाच डब्यात होते, लोणावळ्याला गाडी सुटल्यावर दारात दोघेच उभे होतो, जुजबी चौकशीवजा गप्पा झाल्या.
सुधीर गाडगीळ : टोकियो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाला दोन वेळा आले होते. तेव्हा गप्पा झाल्या.
प्रशांत दामले : टोकियो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाला (गाडगीळ एकदा एकटे आले होते आणि एकदा प्रशांत बरोबर आले होते). तेव्हा गप्पा झाल्या.
दिलिप प्रभावळकर : टोकियो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाला दोन वेळा आले होते. तेव्हा गप्पा झाल्या.
स्वरूप खोपकर : मी लायब्ररिअन असलेल्या लायब्ररीत आल्या होत्या एकदा
गिरिष बापट : डेक्कनच्या वाडेश्वरमधे शेजारच्या टेबलवर होते तेव्हा बोललो होतो.
अण्णा जोशी : दिल्लीच्या महाराष्ट्र भवनमधे दिसले तेव्हा बोललो होतो.
सदानंद जोशी : "मी अत्रे बोलतोय" चे प्रयोग करणारे, बालगंधर्वला मेकअप रूम मधे जाऊन बोललो होतो.
यशवंत दत्त : एका नाटकाच्या प्रयोगाला मेकअप रूम मधे जाऊन बोललो होतो, स्वाक्षरी घेतली होतो.
राहुल देशपांडे : दिवाळी पहाट कार्यक्रम संपल्यावर भेटून बोललो होतो.

सु.शि. : नातेवाईकच असल्याने लहानपणापासुन अनेकदा घरी गेलो आहे. माझ्या लग्नात आले होते.

जरा जवळून पाहिलेले लोक पण बोलण्याचा योग आला नाही असे लोक खालीलप्रमाणे,
पु.ल.देशपांडे : पार्ले टिळक विद्यालय
लक्ष्मीकांत बेर्डे / किशोरी अंबिये : तुळशीबाग, पुणे
संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी : बालगंधर्व कॅफेटेरिया
गोविंदा : दिल्ली डॉमेस्टिक विमानतळ
हृदयनाथ मंगेशकर : स्वाक्षरी देत नाही म्हणाले म्हणुन वाद घातला होता दगडुशेठच्या कार्यक्रमात. आता आठवले की हसायला येते.
सुनिल शेंडे : दिनानाथ नाट्यमंदिर, पार्ले
सुनिल दत्त : आमच्या घराजवळच्या गणपती मंडळात याच्या हस्ते आरती होती एकदा.
पांडुरंगशास्त्री आठवले : गिरगावात त्यांच्या समोर बसुन प्रवचने ऐकली आहेत.
शंकरदयाळ शर्मा : शाळेच्या गॅदरीन्गला आले होते तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
ब्रेट ली : सिंगापूर विमानतळ (आधीच क्रिकेटचा आमचा ३६ चा आकडा, बरोबरच्या माणसाने सांगितले तेव्हा कळाले हा कोण मनुष्य आहे, मग जवळ जाऊन सेलफोनमधे पकडला)
सोमपाल : वाजपेयी सरकारमधे मंत्री होते, टोकियोमधे एका भारतीय उपाहारगृहात हे सपत्निक काही जपानी लोकांबरोबर गप्पा मारत होते. तेव्हा तो ग्रूप सोडून फक्त मी एकटा त्यांच्या शेजारच्या टेबलवर जेवत होतो.
जपान सम्राट हिरोहितो : नव वर्षाच्या निमित्ताने जनतेला दर्शन देत असताना.

कोणीतरी वर गोविंदस्वामी आफळे यांचा उल्लेख केला आहे. लहानपण त्यांची किर्तने ऐकण्यात गेले आहे.

अजुन काही आठवले तर वरच्या यादीत भर घालण्यात येईल.

१० एक वर्षांपूर्वी राळेगणसिद्धीला आण्णा हजारेंना भेटलीय. त्यांच्याशी बोलून स्वाक्षरी पण घेतली. मस्त बोलले होते ते..
"ना तुम जानो ना हम" या टुकार चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान हृतिक रोशन(हा टुकार ऑफ्कोर्स नाही! निळी जिन्स व पांढरा शर्ट घातला होता त्याने! Happy ) व इशा देओलला(ही टुकारच!) बघितले होते पुण्यात..(पोलिसांच्या गाडीवर उभे राहून!! :हाहा:)
इकडे घराजवळच कोडॅक थिएटर, चायनिज थिएटर आहे .. (ऑस्कर,प्रिमिअर्स सोहळे होतात ते). एके दिवशी असंच फिरताना गाडी चायनिज थिएटरच्या समोर सिग्नलला थांबली तर जेम्स फ्रँको दिसला. फ्रिडा पिंटो पण होती नीट दिसली नाही... "राईज ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स" या मुव्हीचा प्रिमियर होता तेव्हा.. (तेव्हा दर गुरू/शुक्रवारी प्रिमिअर्सच्या दरम्यान तिकडे चक्कर टाकायचे ठरवले होते.. ते काही जमले नाही! Proud )

एव्हरीबडी लव्हज रेमंड मध्ये "द टेन्थ अ‍ॅनिव्हर्सरी" या एपिसोडमध्ये एक अ‍ॅक्टर आहे त्याचे नाव काही केल्या अजुनही लक्षात येत नाहीये.. पण चित्रपटातून जर्र मंदच हिरो, साईड हिरो अशी कामं केलीएत त्याने.. तो इथे लॉस एंजिलीसमध्ये एका थाई रेस्टॉरंटमध्ये शेजारच्या टेबलावर होता. नाव काही केल्या आठवले नाही सो बोललो नाही! Proud
विहीर, हा भारत माझा, बोक्या सातबंडे इत्यादी चित्रपटात असलेला 'आलोक राजवाडे' माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीचा भाऊ..
चॅनेल व्ही ची गेट गॉर्जस बर्‍याच जाहिरातीतून दिसणारी व हिंदी/साऊथ चित्रपटात आजकाल दिसते ती प्रियांका शाह इंजिनिअरिंगची बॅचमेट, बॅडमिंटनच्या मॅचेसला असायचो एकत्र. ..
राहुल देशपांडे एका घरगुती मैफिलीत गायला होता.. तेव्हा मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या त्यानी.
"बालगंधर्व" माझे लांबचे चुलत आजोबा लागतात..

हेमा साने, वा!! वेगवेगळ्या विज्ञान शिबिरांमधे त्यांची व्याख्याने ऐकली आहेत्.केव्हडा तो व्यासंग ,अवाक व्हायला होते.पाय धुवुन पाणी प्यावे अशी फार कमी माणसे असतात्.त्यातल्या ह्या एक.

इथे बरेच माबोकर प्रसिद्ध व्यक्तींचे नातेवाईक किंवा स्नेही असल्याचे दिसत आहे. पुस्तकातुन वाचलेली किंवा टिव्हीवर पाहिलेली व्यक्ती प्रत्यक्षात बघताना, तिच्याशी बोलताना वेगळाच आनंद मिळतो, त्यामुळे अश्या व्यक्तींचा काही क्षणांचा सहवास आपल्याला काय देतो? हा प्रश्न गौण आहे.

तेच्च की! लोकं तर "गुन्हेगारान्ना" बघायला देखिल गर्दी करतात!
जक्कलसुतारला बघायला गर्दी होती का? --- होती
रामन राघवन ला बघायला? --- होती
कसाबला बघायला? --- होतीच हो
***********************
साध्वीला बघायला? ---- अं, तिथे मात्र नव्हती, बघायला गेलो तर आपल्यालाच आत टाकायची भिती म्हणून नसेल गर्दी! Proud

सौ. नीधप (:P) यांनी जिज्ञासा म्हणुन विचारलेल्या," अशा भेटीमधुन exactly काय मिळतं?" याचं उत्तर त्यांना अजुन मिळालेलच दिसत नाहिये. गौण ठरवला म्हणुन प्रश्न सुटत नाही.

अश्या औपचारिक भेटीतुन आनंद किंवा आणखी काही मिळु शकतं हे कठिणच वाटतय.

अशीच अचानक भेटलेली प्रसिद्ध माणसे.

आम्ही ब्राझिलला असताना तिथे कामिन्होस दास इंदियाज अशी एक भारत आणि ब्राझिल मधे घडणारी गोष्ट असलेली सिरियल (सोप ऑपेरा ) चालू होती. खूप फेमस. त्यात तिथली एक ज्युलियाना पाएस म्हणून टॉपची मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस काम करायची. (अगदी ऐश्वर्या सारखी) एकदा आमच्या इंडियन असोशिएशनच्या गेट टूगेदर ला सगळ्या स्टार कास्टला बोलावल होत. त्यात ही आली होती. दोन तीन तास असल्याने गप्पा फोटो वगैरे सगळे झाले. दुसर्‍या दिवशी ऑफिस मधे फोटो पाहिल्यावर आम्ही एकदम हिरो. (यात ज्युलियाना बरोबर आमच्या सौंचा फोटो असल्याने तो अजून डिलीट झालेला नाही. :))

तसेच एकदा श्रीलंकेला जात होतो. मुंबईला विमानात बसल्यावर अगदी विमान सुटायच्या वेळेला दोन मुली शेजारी येउन बसल्या. त्यांच्या बरोबरची इतर मंडळी मागे गेली. मुलींचा ड्रेसही एक सारखा होता. मला वाटल कुठल्यातरी बँड पथकातील असतील. अगदी सामान्य पण जरा झॅक्पॅक. तेवढ्यात वैमानिकाने त्यांच्या स्वागताची घोषणा केली. त्या होत्या डायना हेडन आणि नफिसा जोसेफ. नुकताच त्यांना भारत सुंदरी स्पर्धेत पहिला आणि दुसरा नंबर मिळाला होता. त्या कुठल्या तरी फोटो शूट साठी चालल्या होत्या. त्यांनी स्पर्धेची तयारी वगैरे वर बर्‍याच गप्पा मारल्या. नंतर त्यांना मी विश्व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आणि नंतर डायना विश्व सुंदरी झाली सुद्धा. To vikram with Loves , all the best. अस लिहून स्वाक्षरी केलेला बोर्डिंग पास घरी आल्यावर आमच्या ह्यांना दाखवला. नवर्‍याबद्दल आदर जरा वाढलेला दिसला. :). आता स्वाक्षरीचा हा फायदाच की नाही. तो पास दाखवायला मागू नका. गायब करण्यात आलेला आहे. Happy

हल्ली मोबाइल मुळे खटाखट स्नॅप मारले जातात. ते मी तिथे होतो, यांना भेटलोय हे दाखवायला उपयोगी आणि शिवाय कधी कधी चांगल्या स्मृति म्हणून सुद्धा. . पूर्वी ते काम स्वाक्षर्‍या करत असाव्यात. Happy

limbutimbu, गुन्हेगार 'कुप्रसिद्ध' असतात मी पोस्टला प्रसिद्ध व्यक्ती असे टायटल दिले आहे.प्रत्येक विषयाचा हिंदुत्ववादाशी संबंध जोडू नये (साध्वी वगैरे....).

Pages