मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी मी मला नेहमीच भेटत असते. किती किस्से सांगायचे आता.. >>>> नी, है शाब्बास! मी ही तुला तीनदा भेटलेय. म्हणजे माझाही कोटा पूर्ण झालाच.

,

मी सुरेश भटांना खूप वेळा भेटलेय. माझ्या बाबांचे ते मित्र असल्यामुळे. ते घरी आले की आम्ही मुली 'सुरेशकाका आले' म्हणत त्यांच्या भोवती जमा होत असू. स्वभावाने अतिशय मोकळा माणूस. त्यांच्या पत्नीपण खूप छान स्वभावाच्या. त्यांच्या घरीही खूपदा गेलेय ते हयात असताना.

त्यांची एक मजेशीर आठवण आहे. एकदा ते घरी आले होते. आई बाहेर गेलेली कुठेतरी. बाबा नि आम्ही मुलीच होतो घरी. आई आली तर अंगणातल्या एका खुर्चीवर ते गंभीर चेहर्‍याने बसलेले नि आम्ही सगळे भोवती चिडीचुप्प.

'काय हो, काय झालं?' आई घाबरून.

'काही नाही ग. त्याला कविता होतेय' इति बाबा.

आता आठवलं की हसू येतं.

मग एकदा कॉलेजमधे असताना बाबांबरोबर गेले होते तेव्हा त्यांनी माझ्या हट्टाखातर स्वाक्षरी करून त्यांची दोन पुस्तकं दिली होती. खूप मस्त वाटलेलं तेव्हा.

ते गेले तेव्हा आमचं सारं घर अस्वस्थ झालं होतं.

मामी, माझ्याकडे आहे असंच दिलेलं कार्ड. आणि सुपारीवर कोरलेला गणपती. Happy
२ वर्षापूर्वी दिला होता. Happy

मी गंगाधर महांबरेंकडे जायचो. खूप साधेसे होते (राहणीमानाच्या बाबतीत ). पण व्यासंग, प्रतिभा....बापरे !
त्यांच्या हॉलमधलं त्यांचं लिखाणाचं टेबल, एक वीणा इतकीच त्यांची संपत्ती ! आम्हा हौशी ऑर्कुट्या कवड्यांच्या पुस्तकाच्या कौतुकसोहळ्याला आवर्जून उपस्थित राहीले, त्यांना बसवेना म्हणून मी घरी सोडून आलो आणि दहा एक दिवसांत ती बातमी आली.

कधीच विसरू शकणार नाही अशी गोष्ट Sad

अरेच्या, या धाग्यावर बराच पाऊस पडलाय पोष्टींचा. चांगले अनुभव आहेत एकेकाचे, काहींना प्रसिद्ध व्यक्तींचा सहवास लाभलाय हे त्यांचे भाग्यच.
मला 'स्ट्रिंग २००१' कॉन्फरन्ससाठी मुंबईत आलेल्या वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग यांना अगदी जवळुन बघता आले, बोलता मात्र आले नाही कारण त्यांचे अपंगत्व.
.अजुनही अनुभव आहेत, लवकरच टाकतो ईथे.

एकदा Italy ला जाताना English रग्बी टिम प्लेन मधे भेटली होती. ६ १/२ फुटी, १००-१२० किलो वजनाचे सुट्बूट घातलेले. वाटल ३०-३५ बॉडीगाड् कुठे चालले आहेत, मग Jonny Wilkinson दिसला).

२ वीक पहिले शाहीद कपुर आणि विद्या बालन दिसली(दोगे बरोबर) इमिग्रशनला बाजुला होते, माझ्या मुलाचा दंगा बघुन शाहिद हासुन all the best म्हाणाला.

माझा वडिलांनी लता मंगेशकरांची त्याचा घरी मुलाखत घेतली होती.

बाकी अलिबागला सुनील गावसकर, लॉडस ला सचिनची सही घेतली होती.

office मधे कामासाठी आलेले ...तेव्हा त्यांना पाहिले, काहीचे काम केलेले. अशी लोक....
तनुजा, विनोद खन्ना, रीमा लागु,विवेक लागु, माझे office Indian Merchants chamberla होते तेव्हा तिथे अभिताभ बच्चन, जया, आले होते त्याचे speech ऐकले, माधुरी दिक्षीत हिला पहिले.
५ वर्षाने भारतात आलेले असताना पुस्तके खरेदि साठी शिवाजी मंदीरच्या बुक डेपो मधे गेले असताना माझ्या शेजारि एक झब्बा लेन्ग्गा घातलेला माणूस येउन तोही पुस्तके पाहू लागला.....चेहरा ओळखीचा वाटला.... मला वाटले कि असेल कोणी नाटकात काम करणारा ... .पण याच्या मागे त्याचे बॉडीगाड होते. एकजण त्याच्या मागे होता, बाकि जरा लाब उभे होते. मी त्या दुकानात १ तास होते. तो पण होता. मी बिल देउन बाहेर आले तर खुप गदीर आणि सिक्युरिटि दिसली म्हणून एकाला विचारले कि कोण आहे.. तेव्हा त्याने सागीतले कि राज ठाकरे आहे.... ५ वर्षाने आल्याने, त्याला ओळखले नव्ह्ते.
वसुन्धरा पौडवाल हि नातेवाईक असल्याने बहिणीच्या लग्नालाहि आलि होति... ..जयश्री गडकर, चित्तरजन कोल्ह्टकर, आशा काळे.....

प्रसिद्धी आणि प्रसिद्ध व्यक्ती हे थोडं सापेक्ष आहे...आपल्या रोजच्या जीवनातही कैक लोक आपल्याला काही ना काही निमित्ताने भेटत असतात..जे खरे तर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात निश्चितच प्रसिद्ध असतात...पण सवयीमुळे त्यांच्या मोठेपणाबद्दल आपल्याला फारसं काही वाटत नाही...उदाहरणच द्यायचं झालं तर ...मायबोलीवरील नीधप(नीरजा पटवर्धन), डॉक्टर कैलास गायकवाड...ह्यांना आपण इथे गप्पांच्या स्वरूपात नेहमीच भेटत असतो...त्यामुळे एरवी त्यांच्या मोठेपणाचे जे अप्रुप वाटायला हवे ते वाटत नाही...पण म्हणून ते काही सर्वसामान्य ठरत नाहीत....
मित्रांनो, मायबोलीवर अजूनही कैक नामांकित व्यक्तीमत्त्व आहेत जे आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत ह्याची मला जाणीव आहे...मी फक्त वरील दोन नावं उदाहरण म्हणून दिली आहेत...तेव्हा हे लक्षात घेऊन इतरांनी क्षमा करावी ही विनंती.

मराठी गझल गायनात ज्यांचे नाव अग्रमानांकित ठरावे असे गझलनवाझ भीमराव पांचाळे हे माझे आता छानपैकी कौटुंबिक मित्र झाले आहेत...पण त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल आपल्याला उत्सुकता असल्यास ते इथे वाचावे.
त्यानंतर त्यांची मुलाखात घेण्याचीही संधी मला मिळाली...इच्छुकांना ती ह्या दुव्यावर वाचता येईल.
प्रत्यक्ष मुलाखत जालावर दहा भागात चढवलेली आहे...ज्यांना तेवढी सवड असेल त्यांना ती इथे पाहता येईल.

त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात निश्चितच प्रसिद्ध असतात...पण सवयीमुळे त्यांच्या मोठेपणाबद्दल आपल्याला फारसं काही वाटत नाही.>>> +१

अजुन काहि... नाना पाटेकर च्या जुन्या घरी गणपतीला गेलो होतो सर्व मैत्रिणी तेव्हा तो फुलाचि आरास करत होता.... अजित वाडेकर काकाचा मित्र त्याच्याबरोबर वाडेकरच्या घरी जाउन आले............. याना पाहिले नाहि... पण... ते माझे खापर पणजोबा.....नाथमाधव पितळे.

देव काका सहीच एकदम

डॉक, कौतुक शिरोडकर, बेफिकीर ही मंडळी वलयांकित आहेत. पैकी कौतुकची झेप तर आपण पाहतोच आहोत. मध्यंतरी माबोवर असलेले धुंद रवी हे देखील असेच. सर्वात जास्त फॉर्वर्डेड साहीत्याचं रेकॉर्ड त्यांचंच असावं.

जालनिशी वाले देवकाका पण कमी नाहीत आणि भिडेकाका पण. काही सुरक्षेच्या कारणास्तव दडून बसलेले लोकही असावेत. तर काही अतिप्रसिद्ध व्यक्ती नाव बदलून वावरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी नीधप यांच्याबद्दल थोडंफार ऐकून आहे. आता वाचलं.

थोडक्यात ही मंडळी स्वतःच कर्तूत्ववान आहेत.

आपल्याकडे एक माबोकर असे आहेत ज्यांचे स्वतःचे एक प्रायव्हेट हिल स्टेशन आहे. दुस-याचे काम चालू आहे. पण लो प्रोफाईल राहतात. नाव डिक्लेअर करू शकत नाही.

माझा एक मित्र ( जो माबोकर नाही ) गरिबीत वाढलेला. आईने रस्त्यावर भाजी विकली. आज तोच २२०० कोटी रूपये टर्नओव्हर असलेल्या कंपनीचा मालक बनलाय तेही तरूण वयात. जिथे त्याच्या आईने भाजी विकली तिथेच ती आता टोयोटा कॅम्रीने जाते. त्याने प्रसिद्धी जाणीवपूर्वक दूर ठेवली आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अंक छापून देणे, बचत गटांना मदत असे उद्योग नाव न छापण्याच्या बोलीवर चालू असतात. आज ह्युंदाई, बजाज ऑटो, टाटा मोटर्स सारख्या कंपन्या त्याच्या कायंट आहेत. त्याच्या क्षेत्रात तो दिग्गजच आहे पण रूढ अर्थाने प्रसिद्ध नाही.

पण आजही मित्रांना विसरलेला नाही. आजही आम्ही एकत्रच ट्रीपला जातो. झाडाखाली बसून जेवतो. हे लिहीताना देखील अभिमानाने ऊर भरून येतोय. त्याच्याचमुळे माझ्यासारख्या कित्येक मित्रांना योग्य ती प्रेरणा मिळालीये..

१९९३/९४ मधे मुंबई चौपाटीवर अक्षय कुमार दिसला होता. 'हा नवा हिरो कोण?' म्हणून तेव्हा सही घेतली नव्हती...

आमच्या कॉलेजमधे एकदा द. मा. मिरासदारांचे व्याख्यान आयोजित केले गेले होते. एकदम मस्त, दिलखुलास बोलले होते...

दोनचार महिन्यांपूर्वी समीर धर्माधिकारी भेटला होता आमच्या बिल्डींगमधे Proud त्याचे नातेवाईक रहातात इथे.. मस्त पर्सनॅलिटी आहे!

आनंद गंधर्व अर्थात आनंद भाटे आमच्या कंपनीमधे मोठ्या हुद्यावर काम करतात..
मागच्या महिन्यात एका इण्टरनल प्रोजेक्ट फेअर मधे दिसले, आणि आम्ही बोलायला गेलो.
तेच ते रटाळ वाक्य 'आम्ही तुमचे फॅन आहोत' ऐकूनही त्यांनी चेहेर्‍यावर 'हो का? बर्र्र... आणि, या आता' असे भाव आणले नाहीत. दोनचार मिनीटं बोलले. बोलायला अगदी साधे वाटले एकदम!!!

बाकी,.. मायबोलीच्या माध्यमातून बर्‍याच लोकांना भेटलोय, जे लवकरच फेमस होणार आहेत याची मला खात्री आहे... Happy त्यांना शुभेच्छा!

पुलंच्या पार्ल्याच्या घरी गेले होते आजोबांबरोबर.
रसिका जोशी बरोबर उत्कर्षमंडळ पार्ले इथे नाट्यशिबीर अटेंड केले होते. शेवटी एक नाटक पण केले होते आम्ही.
शमी कपुरला विजयमुखी कडे भेटले होते. ईन्टरनेट युजर्स ऑफ ईन्डिया ग्रुप त्याने काढला ९५ मध्ये तेव्हा.
विजय चव्हाण यांना मोरुची मावशी बनताना पाहिले आणि तयारीला थोडी मदतही केली.

बिल क्लिंटन यांची थोडक्यात सही घेतली होती.

आपल्याच तोंडानं आपलं गुणगान करायला आवडत नाही म्हणून इतका वेळ गप्प होते. पण आम्हालाही चार लोकं ओळखतात बरं का ................ आणि ते कुटुंब आमचा शेजारीच राहतं.

Pages