मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती.

Submitted by सिंथेटीक जिनिअस on 28 January, 2012 - 03:46

प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची ,त्यांच्याशी बोलण्याची ईच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असते. आपण कधीतरी प्रसिद्ध व्यक्तींना भेटला असणारच. त्या भेटींविषयी, प्रसंगांविषयी हा धागा उघडला आहे .असे प्रसंग,त्या व्यक्तीशी झालेला संवाद या विषयी या धाग्यावर लिहावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशा भोसले - आम्ही वाईल्ड नावाच्या संस्थेत व्हॉलेंटियर म्हणून काम करायचो, तिकडे एक प्रदर्शन भरवलं होतं, ते होतं निलायमच्या जवळ, तिथेच या मंगेशकर कुटुंबियांचं घर ही आहे, नेमकं त्याच वेळेला आशा भोसले ही तिथे होत्या. त्या येऊन गेल्या.. सई बोलली होती त्यांच्याशी.. मला थोड्या खडूस वाटल्या.. Sad
त्यानंतर एकदा पुणे सेंट्रल मध्ये सुद्धा दिसल्या होत्या.. खूप थकलेल्या वाटल्या.. मी काही बोलायला गेले नाही. दुरून पाहिलं फक्त...

कोल्हपुरात, एकदा मी आणि माझी काकु कोल्हापूरच्या 'चंद्ररूप' क्लॉथ सेंटर मध्ये गेलो होतो. तिथे जे हवं होतं ते घेतलं आणि रस्ता क्रॉस करताना पलिकडच्या बाजूने पांढर्‍या फियाटीत बसून लता मंगेशकर जाताना दिसल्या.. आम्ही दोघी बघतंच राहिलो... तर ती फियाट वळून चंद्ररूपच्या बाहेर थांबली लताजी उतरून आत, आम्ही अजून अर्ध्या रस्त्यातच पटकन निर्णय घेतला अजून कायतरी विकत घ्यायचं दुकानात जाऊन. आम्ही दुकानाच्या दरवाज्याला पोचेपर्यंत तिथल्या माणसानं दुकानाचं शटर अर्धं लावून घेतलं आम्ही रिक्वेस्ट केली तर आमची जाम चेष्टा केली...आणि आम्हाला हाकलून दिलं. Proud
(अवांतर - लताजींनी तेव्हा नेहमीप्रमाणे पेडाच्या दोन वेण्या घातल्या होत्या आणि अंगावर मोती कलरची साडी होती.)

>>>> कतरिका कैफ डोळे विस्फारून त्यांच्याकडे पहात होते.. <<<< Lol Lol Lol
किरण्या, अफलातुन रे ! मस्त

पुण्यात टिंगरेनगरला निवांत ही अंध मुलांसाठी चालवली जाणारी संस्था आहे. मीराताई बडवे आणि त्यांचे पती दोघे स्वतःच्या पैशातून चालवतात. मुलांना चॉकलेटस बनवण्यापासून प्रिंटींगपर्यंत सर्व शिकवतात. मार्केटिंगलाही पाठवतात. आपण अंध आहोत ही भावनाच त्यांच्या मनातून काढून टाकण्यासाठी दोघेही प्रयत्नशील आहेत.

माझ्या आणि सहका-यांच्या एका पुस्तकाचे ब्रेललिपीत प्रकाशन आणि नंतर सीडीचा प्रकाशन सोहळा यासाठी मीराताई आल्या होत्या. ही आठवण देखील स्पेशलच

अँटीमॅटर आता येऊन पोष्टींचा आकडा बघतील तर दोन दिवस जेवणार नाहीत..
इतके बडे लोक धाग्यावर येऊन गेले म्हटल्यावर Wink

प्रत्यक्ष भेटींच्यातून, वागण्यातून माझ्या आयुष्यासाठी मला महत्वाच्या ठरलेल्या अजून काही प्रसिद्ध व्यक्ती म्हणायच्या तर..

बाबासाहेब पुरंदरे - ६ वर्ष जाणता राजा मधे काम केल्यावर काही असे पैलू जाणवले ज्या गोष्टींनी मी आजही अवाक आहे. ते जमायला पाहिजे.

भानू अथय्या - अगदी सुरूवातीच्या काळात एका प्रोजेक्टदरम्यान त्यांच्या हाताखाली काम केले. तेव्हा जे उतरलं माझ्यात ते आत्ता कामं करताना जाणवतं.

दक्षिणा, चला म्हणजे माझ्या काही साड्याना कुणी विचारलंच की ही साडी कुठून घेतली तर नेहमीसारखं कोल्हापूर असं न बोलता "जिथून लता मंगेशकर साड्या घेतात ना तिथून घेतली" असे सांगता येइल. चंद्ररूप माझं अत्यंत आवडतं दुकान. माझ्या लग्नातल्या काही साड्या तिथे घेतल्या होत्या. बाकीच्या वालावलकरमधे.

हायला नंदिनी काय सांगतेय काय? Happy सहीच.. आता तसंच सांगत जा. आणि साडी नेसली की अशी अशी... सारखी एकसारखी करायची.. म्हणजे बायका विचारतील की कुठुन घेतली... लगेच आपलं टुमणं लावायचं.. Lol
चंद्ररूप कोल्हापूरातलं प्रचंड प्रसिद्ध दुकान साड्यांसाठी, वालावलकर सुद्धा.
आमच्या लहानपणी तर कोल्हापूरात कुठेही नाही मिळालं तर चंद्ररूप किंवा वालावलकरकडे नक्की मिळणार असं लोक म्हणायचे Happy

चित्तरंजन कोल्हटकरांना पाचोरा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात भेटले होते.
सचिन पिळगावकर, जॅकी श्रॉफ नुकतेच ऑफीसात येउन गेले.

एकदा एका संध्याकाळी ६ वाजता पत्रकार भवनात राखी सावंतची मुलाखत होती, ती बातमी मी सकाळी पेप्रात वाचली... आणि घरी जाहीर केलं मी जाणार म्हणून..
सीमाने ४ वाजल्यापासून मला बेडरूमात कोंडून घातलं होतं. Proud

रच्याकने

सद्दी संपलेले लोक्स

कादर खान, विद्या सिन्हा, याना गुप्ता ... कोरेगाव पार्कात माझं दुकान होतं तेव्हा तिथं यायचे. आता यांची काय ओळख सांगायची. त्यातल्या त्यात कादर खानचं नाव आहे मात्र

ओह. हा. मी आपली हा ऑस्ट्रेलियाला कधी गेला होता आठवत बसले. Proud

मी भेटलेल्या व निदान पाचेक मिनिटे तरी त्यांच्या बरोबर बोलण्यात/वास्तव्यात काढलेल्या थोर व्यक्ती
-पं भीमसेन जोशी जी(माझ्या दिवंगत आजोबांची ओळख दिल्यावर-चंदिगडमध्ये एका मैफिलीत)
-पं रविशंकरजी(टोक्यो एअरपोर्टवर्-एकत्र चहा-साल १९९३)
-पं हरिप्रसाद चौरसिया( एम्स्टरडॅमला जाताना-मुंबई विमानतळावर-२०१०)
-श्री माधव गुडी
-श्री डी सी आनंद-चेअरमन आनंद ग्रूप
-आ.पु ल देशपांडे (त्यांचे स्नेही श्री अंध्रुटकर यांच्या कडे)
-कुसुमाग्रज -नाशिक मध्ये त्यांच्या घरी
-श्री आनंद महेंद्र
-लाला चरत राम
-श्री राजन नंदा
-सौ अश्विनी देशपांडे
-उ.अमजद अलि खान (ग्वाल्हेरला)

रेव्यु, यावरून आठवलं. पं. भीमसेन जोशी आमच्या नात्यातले. तसं फार लांबचं नातं आहे पण धारवाडला आत्याकडे कायम यायचे. माधव गुडींचे गाणे पण आत्याच्या घरच्या कार्यक्रमातच ऐकले होते.

कादर खानला मी नाही भेटलो पण माझे वडिल तिथे विद्यार्थी असताना तो साबुसिद्धिक पॉलिटेकनिक मधे प्रोफेसर होता.

Kiranyake | 31 January, 2012 - 17:35
कुणाला पूनम पांडे भेटली तर तिच्या आश्वासनाची आठवण करून द्या प्लीज..

अगदी, तिने आश्वासनाची पूर्तता केलीच तर ते कशाचं "चिन्हं" म्हणायचं Light 1 Wink

बाबासाहेब आणि निनाद बेडेकर या इतिहास क्षेत्रातल्या दिग्गजांना अनेकदा भेटायचा योग आला. आयुष्यात ज्यांच्याकडून आत्तापर्यंत बरेच काही शिकलो अश्या व्यक्ती..

राजाशिवाजी.कॉमसाठी जेंव्हा जीवाचे रान करून पुण्यात विक्रमी फोटो प्रदर्शन केले तेंव्हा राज ठाकरे यांना भेटलो.
पुण्यातले माझे स्नेही किरण खराडे यांच्यामुळे प्र. के. घाणेकर यांना खास घरी जाऊन भेटायचा योग जुळून आला.. Happy

२००९ साली लडाखसाठी मुंबई वरून श्रीनगरला जाताना विमानतळावर दी ग्रेट नसरुद्दिन शाह यांची अकस्मात भेट घडली. लाईनीत माझ्या मागे उभे होते. एकदम साधा माणूस. थोड्या गप्पा झाल्या. मला वाटतंय तेंव्हा नुकताच 'द वेनेस्डे' आला होता. सही घ्यायला जवळ वही किंवा कागदच नव्हता मग पटकन बोर्डिंग पास पुढे केला. Lol

विमानतळावर अनेकदा भेट नाही मात्र सेलेब्रिटीज दिसतात हमखास. अभिषेक बच्चनचे कसलेसे शुटींग सुरू होते एकदा. मुकेश ऋषी पण दिसलेला एकदा. एकदा रणबीर कपूर बाजूने गेला. एकदम घाणेरड्या अवतारात. आधी ओळखलेच नाही. बहुदा कोणी पटकन ओळखू नये म्हणूनच तसे गबाळ्यासारखे जात असतील. कारण पुढे असेच प्रियंका चोप्रा, जॉन आणि या वेळेला सलमान खान दिसला होता.

बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, मोहन भागवत, शरद पवार, छगन भुजबळ, मनमोहन सिंग, गोपीनाथ मुडे, अडवाणी आणी बराक ओबामा, क्लिट्न दांपत्य, बुश (दोन्हि), मुशर्रफ

Pages