निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
९०० प्रतिसाद झाले. सर्वांचेच
९०० प्रतिसाद झाले.
सर्वांचेच अभिनंदन!!!!
मागच्या पानावर चतुराबद्दल लिहिले होते. याच चतुरापैकी एकाचा क्रुरपणा पाहिला आणि टिपला.
हा चतुर पानाफुलावर बागडत होता आणि मी त्याचे फोटो काढत होतो.

अचानक कुठुनतरी एक हिरवट रंगाचा थोडा मोठा चतुर आला आणि त्याने त्याला पकडले. त्याची मान तोंडात घेऊन चटकन मोडुन टाकली.
हे इतके पटापट घडले कि त्या दुसर्या चतुराला प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही
(निसर्ग नियमात ढवळाढवळ करू नये म्हणुन मीही काही करू शकत नव्हतो.
)
त्या पहिल्या चतुराची मुंडकी खाली पडलेली पाहिली.
माय गॉड. खुन का बदला खुन,
माय गॉड. खुन का बदला खुन, मुंडी का बदला मुंडी और अगर इस जनम मे हिसाब करनेका रह गया तो अगले जनम मेभी हिसाब से छुट्टी नही मिलेगी. फिर चाहे आप चतुर बनकर भी आये तो भी बच नही पाओगे....
दोन्ही चतुर वेगवेगळे दिसताहेत. त्यांच्यातही टोळीयुद्धे होतात वाटते...
कशाला मारलं असेल त्याने? तो
कशाला मारलं असेल त्याने? तो पहिला चतुर दुसर्या चतुराचे खाद्य तर नक्कीच नाही
हि टेरीटोरीची लढाई असणार.
हि टेरीटोरीची लढाई असणार. अंडी घालण्यासाठी पाण्याच्या डबक्यातली सुरक्षित जागा मिळवण्यासाठी.
अशी लढाई बहुदा नरातच होते, आणि अशा जागेच्या मालकीवरुन मादी नराची निवड करते.
बाप रे ..........चतुराचं
बाप रे ..........चतुराचं मुंडकं!
साधना
साधना
दिनेश 'मायबोली' रेस्तराँच्या
दिनेश 'मायबोली' रेस्तराँच्या भोवती तुमच्या फोटोतले गुलाब पण लावा>>>> माधवना १००००% अनुमोदन!!
आणि शिवाय एखादा केसात माळायला पण द्या!!
दिनेशदा, फूल अप्रतिम! काय तजेलदार पिवळा रंग आहे!!!
जिप्सी, चतुराचे थरारक युद्ध तुला बघायला मिळाले.... अॅनिमल प्लॅनेट वगैरे बघितल्यासारखे वाटले असेल!
बापरे जिप्स्या चतुराच्या
बापरे जिप्स्या चतुराच्या खुनाचा साक्षिदार.
जिप्सी - तुझे हे - चतुर
जिप्सी - तुझे हे - चतुर खुनाखुनीचे फोटो पहात असतानाच काल मी पाहिलेल्या अशाच एका भयंकर दृश्याची आठवण झाली - माझ्या ऑफिसच्या बागेत घडलेली घटना - कुठल्याशा एका छोट्या पक्षाचे पिल्लू एका केस्ट्रेलने पळवून नेले व गुलमोहोराच्या झाडावर त्याचा फडशा पाडला...... सगळं माझ्यादेखत घडलं - मी फक्त हताशपणे पहात होतो.......
एरवी केस्ट्रेलसारखा शिकारी पक्षी जरा जवळपास दिसला तरी कावळे इतकी कावकाव करतात की बाकी सगळे पक्षी सावध होतात - पण काल काय झालं कोण जाणे - त्या केस्ट्रेलला शिकार मिळालीच एका फटक्यात........
माझ्या कोशातील फुलपाखरु गेलं
माझ्या कोशातील फुलपाखरु गेलं उडुन. आज सकाळी लवकर उठुन सुद्धा नाही पाहु शकले. खिडकीत गेले तेव्हा रिकामा कोश दिसला
पण एक बरं वाटलं एवढया अळ्यांमधल एक तरी जगलं
साधना ड्वायलाक (डायलॉग) आत्ता
साधना
ड्वायलाक (डायलॉग) आत्ता वाचला.....खूनका बदला....... खूप हसले. कशातला आहे की, साधना उवाच?
पण एक बरं वाटलं एवढया
पण एक बरं वाटलं एवढया अळ्यांमधल एक तरी जगलं >>
आज आमच्या आंब्याच्या झाडावर ३
आज आमच्या आंब्याच्या झाडावर ३ घुबडं दिसली. मला बघून लगेच पळाली. त्यातल एक छान जोडीने बसलेले आणि एक एकटाच होता.
घुबड ट्रॅंगल.
घुबड ट्रॅंगल.
हे कुंदा की वेगळे ?
हे कुंदा की वेगळे ?

जागू, घुबडांना दिवसा कुठे
जागू, घुबडांना दिवसा कुठे दिसतं ?
हे फूल मला लिंबू वर्गातले वाटतेय. पाने पण तशीच दिसताहेत.
शशांक,
हे नियम आपल्या खरेच कल्पनेपलिकडचे. पक्षी, प्राणी एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात पण आपल्या पिल्लाची हत्या वगैरे फार काळ नाही लक्षात ठेवत. या घटनेबद्दल थोडा वेळ आक्रोश करतात पण मग नंतर आपले जीवन सुरु करतात. आणि याची दुसरी बाजू पण महत्वाची, भूक लागल्याशिवाय काही शिकारी, शिकार करत नाहीत.
थोडे विषयांतर करतो. २००९ साली
थोडे विषयांतर करतो. २००९ साली ऑफीसच्या कामासंदर्भात दिल्ली, पंजाब गेलो होतो. नोव्हेंबरचे दिवस होते आणी थंडी मस्त पडली होती. सकाळी हॉटेलच्या दारात टॅक्सीची वाट पहात उभा असताना हे दृष्य दिसले.
गिरी आत्ता हापिसाच्या
गिरी

आत्ता हापिसाच्या परीसरात बूचाचे झाड दिसले. आमच्या येथे सध्या भेरला माड मस्त बहरलाय.:-)
@ माधव
माधव, मोठ्या करमळीचे झाड आहे ना त्याच्याच बाजुला बुचाचे झाड आहे.
दिनेशदा मला वाटत साधनाकडे हे
दिनेशदा मला वाटत साधनाकडे हे झाड होत. पण तिच्याकडच्या फुलांना वास होता ह्या फुलांना वासच नव्हता.
पण दिनेशदा रोज आमच्या आंब्याच्या झाडावर सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यात ही घुबडे असतात. मी आणि श्रावणी दोघी खिडकीतून पाहत असतो त्यांना आज तर मान वळवून ते पाहत होत. आज मी झाडाखालून जात असताना सहज वर पाहीले ते जोडप माझ्याचकडे पाहत होत. आवाजही नव्हता झाला तरी मी वर बघीतल्याबरोबर ते भुरकन उडून गेले.
आमच्या कंपनीत एका चिंचेच्या
आमच्या कंपनीत एका चिंचेच्या झाडावर एका घुबडाचे घरटे असावे. कारण खुप वेळेला मी त्या झाडावर घुबड बघितले. एकदा उशीरा काम उरकत ऑफीसात थांबलो होतो तेव्हा मला त्याने खुप वेळ त्याचे फोटो काढु दिले होते. दुर्दैवाने ते फोटो सापडत नाहीए.
गिरीकंद असे बरेच फोटो मलाही
गिरीकंद असे बरेच फोटो मलाही सापडत नाहित. वेळेतच फोटोचे व्यवस्थापन न केल्याचा परीणाम.
गिरी कित्ती गोड फोटो! आम्ही
गिरी कित्ती गोड फोटो!
आम्ही सिमल्याला गेलो असताना असेच एक साहेब भेटले होते. त्यांना चक्क ३ पीस सूट घातला होता. म्हणजे चेक्सचा कोट, वर जॅकेट आणि गळ्याला बो! गोडच दिसत होते.
हे आमचा डॅनी पण आधी टीशर्ट
हे आमचा डॅनी पण आधी टीशर्ट घालायचा गिरिकंद. फोटो शोधून टाकते. खासकरून थंडीच्या दिवसांत माझा पुतण्या त्याला टिशर्ट घालतो थंडी लागू नये म्हणून.
कोकण भटकंतीत एका झाडावर उंच
कोकण भटकंतीत एका झाडावर उंच वेलीला ही फळे लागली होती. कशाची आहे ही वेल ?

जिप्सी, चतुराचे फोटो
जिप्सी,
चतुराचे फोटो आवडले..
असाच एक मोठा चतुरा काल घरात ठाण मांडुन होता, प्रयत्न करुनही बाहेर जातच नव्हता,तसा तो खिडकीच्या वरती बसला होता,त्याला मी खिडकीतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो,पण तो पुन्हा इकडेतिकडे फिरत होता, नंतर पाहिलं तर खिडकीच्या तोंडावरच बाजुला एक पाल (त्याच्यावर ?) टपुन बसलेली दिसली
जागु,
या वेली गावाकडे पाहिल्या आहेत,नाव तर (नेहमीप्रमाणे) माहित नाही, बहुतेक या विषारी असतात अस ऐकलयं
जागू,त्याफुलाचे botanical
जागू,त्याफुलाचे botanical name आहे Wrightia antidysenterica
आणि त्या केशरी फळांना कहांडळ म्हणतात. खूप विषारी असतात असं म्हणतात. कारण आम्ही पण मधे कोकणात गेलो होतो तेव्हा आम्हालाही ही फळं दिसली, आणि तिथले स्थानिक लोकांकडून ती विषारी आहेत असं कळालं.
जिप्सी, भेरला माड बहरलाय तर
जिप्सी, भेरला माड बहरलाय तर जमल्यास त्याचे फोटो टाक ना. त्याची फुलं फार छान असतात. आणि खूपच वेगळी असतात. घोड्याच्या शेपटी सारखे हीर आलेले असतात आणि त्या हीरांना सुपारीच्या आकाराची हिरव्या रंगाची नर-मादी फुलं ३-३ च्या जोड्यांमधे लागतात. या माडालाच फिश टेल पाम पण म्हणतात.
अगं माझ्याकडे होते ते
अगं माझ्याकडे होते ते कामिनी/कुंती होते. वरच्याची पाने तशी आहेत पण कामिनीच्या पाकळ्या सुट्या असतात आणि तशाच गळतात. फुल तोडुन हातात घेणे अशक्य. वरचे तसे वाटत नाही आणि मध्यभागी महिरपही आहे. दिनेश शोधा आता/
हो ग साधना. शांकली मराठी नाव
हो ग साधना.
शांकली मराठी नाव पण शोधायला पाहीजे.
अनिल, शांकली कहांडळच्या माहीती बद्दल धन्स.
मराठीमधे याला श्रीलंकन तगर
मराठीमधे याला श्रीलंकन तगर म्हणतात. पण ही तगर नाही, तर कुड्याच्या कुळातलं फूल आहे हे.
Pages