निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या नवीन धाग्यावर काय लिहावे असा विचार येताक्षणीच पहिली आठवण झाली ती कै. डॉ. शरदिनी डहाणूकरांची. त्यांचे "वृक्षगान" हे पुस्तक बहुतेकांनी वाचले असेलच. झाडे - फुले - पाने याविषयी इतक्या आपुलकीने त्यांनी लिहिले आहे की संवेदनाशील व्यक्तीचे डोळे पाणावतातच.
या अप्रतिम पुस्तकाला प्रस्तावनाही "पु. ल." सारख्या दिग्गजाची - किती वाचनीय असेल हे सांगणे नकोच.
अशीच पुढे ओळख करुन घेऊ आपल्या माहितीतील इतरही अशाच अनेक "जाणकार", "अभ्यासू", "विद्वान" पण मुळात निसर्गप्रेमानी भरुन राहिलेल्या दिग्गजांची. दिनेशदा स्वतः डॉ. डहाणूकरांच्या संपर्कात होते - त्यांच्याकडूनही काही ऐकायला /वाचायला नक्कीच मिळेल.
ज्यांना या मंडळीविषयी अजून काही लिहावयाचे असल्यास कृपया येथे लिहावे अशी नम्र विनंती.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन.....

सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन!!!!! Happy

या अप्रतिम पुस्तकाला प्रस्तावनीही "पु. ल." सारख्या दिग्गजाची>>>>>शशांकजी, जर शक्य असेल तर ती प्रस्तावना इथे लिहा ना.

सर्व निसर्गप्रेमींचे हा धागा प्रवाही ठेवल्याबद्द्ल अभिनंदन................
जागू,गुलबक्षीच्या फुलांचा फोटो सुंदर,विशेषतः रंग फार सुंदर आहे.
जिप्सी, ती प्रस्तावना खूप मोठी आहे. पण खूपच वाचनीय आहे.

जिप्सी, ती प्रस्तावना खूप मोठी आहे. पण खूपच वाचनीय आहे.>>>>हे हि पुस्तक घ्यावेच लागेल आता. Happy या दिवाळीत हि सगळी पुस्तके घेऊन स्वत:लाच भेट द्यायचे ठरवले आहे. Happy

वृक्षगान हे श्रीविद्या प्रकाशनचे पुस्तक असून पुण्यात अप्पा बळवंत चौकात अनेक पुस्तक दुकाने आहेत तिथे मिळेल. हे पुस्तक निसर्गप्रेमींकरता खरंच संग्राह्य आहे.

जिप्स्या, पुस्तक शोधायला जाणार असशील तर इगळ्हळ्ळीकरांचे 'flowers of sahyadri' (दोन्ही भाग) दिसल्यास मला लगेच कळव.

आज आमच्याकडे केनया ऑर्किड सोसायटीचे प्रदर्शन आहे.
बघतो मला जरा बरे फोटो काढता आले तर.
जिप्स्या, माधव ती दोन्ही पुस्तके दादरच्या मॅजेस्टीक मधे मिळतील.
इंगळहाळीकरांचा फ़ोन नंबर ९१२०२४३५०७६५ असा आहे. त्यांचे इतर
लेखनही संग्रहीत झालेय का ते माहित नाही. (बहर नावाचे एक त्याआधीचे
पुस्तक आहे.)

या दिवाळीत हि सगळी पुस्तके घेऊन स्वत:लाच भेट द्यायचे ठरवले आहे.>>>>>>:हाहा:
माधव, बुके मस्तच............ जागुतै बघताय ना?...............

वा.. जागु मस्त आहे गं फोटो...

हा धागा खुप छान आहे. मी कितीही घाईत असले तरी इथे डोकावुन जातेच.

माधव बुके आवडला धन्स Lol

बघतो मला जरा बरे फोटो काढता आले तर.
Lol पहिला नंबर वाला विद्यार्थ्याने सांगावे बघतो पास होतो का तस वाटल.

निकिता मी घेतल पुस्तक एक होता कार्व्हर मी आधी वाचलेल आहे. तरी संग्रही ठेवण्यासाठी आणि परत वाचण्यासाठी घेतल. मी हे वाचल होत हे मला पुस्तक वाचताना कळल Lol

शांकली बघितले. (बघतेस ना बोल एकतर कालच एक वर्षाने वाढल्याने वय झाल्यासारख वाटतय :हाहा:)

आस नाव अ‍ॅड करते.

अरे व्वा. ४ थ्या, भागाबद्दल सर्व मित्र-मैत्रीणिंचे हार्दिक स्वागत.
जागू, हे हार आपल्या ४ ही भागासाठी.
DSCN0123.jpg

चातक,
केशराची फुले जांभळी असतात आत तीन पूकेसर असतात तेच केशर.
स्पेन,ईरान, काश्मिर आदी काही भागातच होते ते. न्यू झीलंडमधे मी
झाड बघितले पण त्याला फुले नव्हती.
आपल्याकडे ते याच महिन्यात फुलते. पण त्याची लागवड जिकिरीची
असते, कारण लागवडीपुर्वी जमीन काही वर्षे पडीक ठेवावी लागते.
केशरात हल्ली फार भेसळ असते. (प्राजक्ताच्या फुलांचे देठही असतात
पण ते तितकेसे धोकादायक नाहीत कारण दोन्हीतले रंगद्रव्य एकाच
जातीचे असते. फक्त सुगंध नसतो.)
खरे केशर फार चिवट असते. ते सहसा ओढून तूटत नाही. ते पाण्यात,
दूधात किंवा लिंबाच्या रसात घालून खलावेच लागते.

शोभा१२३ - ४थ्या भागाकरताचे हार मस्तच....
निसर्गप्रेमींकरता पुस्तके - बहुतेकांना माहिती असतीलच अर्थात....
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - ऊर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] श्री. मारुती चितमपल्लींची सर्व पुस्तके
११] पुष्पपठार कास - डॉ. संदीप श्रोत्री
१२] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
अजून कोणाला काही माहिती असल्यास एकमेकांना जरुर देत राहू.

शोभा,
माझ्याकडे पण हि ओरिजीनल फुले आहेत बरं का.

शशांक, डॉ. राणी बंग यांचे गोईण आणि दुर्गा भागवत यांचे कदंब पण.
वनस्पतीबाड नावाचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. त्याचे लेखक पालघर
भागातले एक वैद्य आहेत. छान आहे तेही.
महाराष्ट्र सरकारचा पण एक ग्रंथ आहे, पण तो आता मिळत नाही.
चितमपल्लींची तर आहेतच.

शशांक पुरंदरे,
इथे वन्यजीवांवरील पुस्तके आहेत. असाच निसर्गावरील पुस्तके धागा काढायचा का? तीथे ही लिस्ट द्याल का? पुढे मागे शोधायला सोपे पडेल.
http://www.maayboli.com/node/14167

या दिवाळीत हि सगळी पुस्तके घेऊन स्वत:लाच भेट द्यायचे ठरवले आहे. >>>जिप्स्या, मला दिली तरी चालतील रे Proud
माझ्याकडे पण हि ओरिजीनल फुले आहेत बरं का.>>>>काय म्हणता? खरंच? Wink

शशांक धन्यवाद. आता माझ्याकडे मारुती चित्तमपल्लींच रानवाटा आहे. पुष्पपठार कास आहे. मी मारुती चित्तमपल्लींचे केशराचा पाऊस वाचल आहे. आता डहाणूकरांच वृक्षगान आणि इंगळहळीकरांचे फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री काकांना आणायला सांगते मुंबईहून येताना.

शोभा मस्तच. तू बनवल्या आहेस का ? ती लोकरीची फुले मला लहानपणापासून येतात. आईने त्याचे तोरण केले होते.

साधनासाठी खास औषधे..आजच्या वेबदुनिया.कॉम मधून..

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधसोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरण शक्तीत वाढ होते.

अशोकचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्रा करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ एक कप दुधबरोबर नियमितपणे काही महिने घेतल्याने बुद्धीत वाढ होते.

शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचे योग्य विकास होते.

३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरण शक्ती वाढते.

शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ ग्रॅम पूड मुलांना दिल्याने खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.

सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येते शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते.

दूध,तूप किंवा पाण्यासोबत वचाच्या खोडीची पूड २५० मिलीग्रॅमच्या प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एका वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

१० ग्रॅम वचा पूड २५० ग्रॅम खांडसरीसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ खाण्याने विसरण्याची सवय दूर होते

Pages