निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त गप्पा चालल्यात. ज्ञानात भर पडते.
असो आम्ही कोकणीच.(कोकणस्थ नाही!)
वडील - खारेपाटणचे, आई - जुवाठीची, वडिलांचे आजोळ - साखरपा.
सासू सासरे - कशेळी(कनकादित्याची) आणि सावर्‍याचे.
दर वर्षी कामा निमित्त म्हणून जातो कोकणात. कामही आणि मस्त ट्रिपही!

मालवणचे नाटकाचे थिएटर पूर्णपणे झापांनीच वेढलेले होते. अजूनही असेल. >>
आई नेहमी सांगते. त्यांनी त्या झापांच्या थिएटरमध्ये तेव्हा भरपुर संगीत नाटक पाहिली. पण आता ते झापांच थिएटर नाही राहील. नव्याने बांधल आहे.

परत थोडेसे कोकणाबद्दल.
देशावर पाहुणा आला कि पुरणपोळीचा बेत हमखास असतोच. सोबत भजी आणि कुरड्या हव्यातच. झालीच तर वांगी बटाटा भाजी आणि कटाची आमटी. मी स्वतः अनेक मायबोलीकरांकडे हा पाहुणचार घेतला आहे.

कोकणात मात्र पाहुण्याला, घावणा करायचीच जास्तकरुन प्रथा आहे. हा पकार तसा झटपटच होतो. तांदळाचे पिठ घरात तयार असतेच. आणि तो तांदुळ घावण्यासाठी अगदी योग्य असतो. त्याचे घावणे न मोडता, व्यवस्थित उलटतात. तव्याला चिकटत नाहीत. नारळाच्या शेंडीने तव्याला तेल लावल्यामूळे अगदी थोडेसे तेल पुरते. (ही पण कोकणचीच खासियत) या घावण्यासोबत नारळाचे दूध (रसघावणे) किंवा घाटले करतात. फारच लाडका पाहुणा असेल तर नारळाचा चव भरुन भरले घावणे किंवा त्याहून जास्त वेळ असेल तर सात थराचे सातकापे घावण.
मोदक नेहमी करायची मात्र प्रथा नव्हती. ते संकष्ठी चतुर्थीलाच. पण तांदळाचे कितीतरी प्रकार केले जातात.
खांडवी, धोंडस, वडे, खीर, आंबोळ्या (या खास काळ्या वाटाण्याच्या आमटीसोबत नाहीतर सागुतीबरोबर ) शिरवळ्या, पानग्या, अडसराचे वडे, खीर, पातोळ्या, पेज, आटवल, ओल्या फेण्या .. साधारणपणे शुभप्रसंगाला वडे आणि खीर आणि श्राद्धाला (तिथे महाळ किंवा दिवसकार्य म्हणतात) पण तेच.
यातले वडे सोडले तर बाकी सर्व पदार्थ कमी तेलात होणारे आहेत.
तांदळाची भाकरी पण जास्त करुन रायगड जिल्हा आणि परिसरातच करतात. मालवण भागात ती तेवढी प्रचलित नव्हती.
तांदळाचे पोहे केले तर त्याचे पापड किंवा गुळपोहे.
पुर्वीच्या कलिंगडात पांढरा भाग खुप जाड असायचा. माझी मोठी काकी आम्हाला फक्त लाल भाग कापून देत असे, आणि पांढरा भाग किसून त्याचे धोंडस करत असे.
न्याहारीला पेज, खारातला आंबा किंवा फणसही.
----

आमची मे महिन्याची सुट्टी देशावर आणि कोकणात दोन्ही कडे जात असल्याने, आम्हाला हे फरक फार जाणवायचे.
पण आमच्या घरात प्रमाण मराठी बोलत असल्याने, आमच्या जिभेवर ती भाषा कधी चढलीच नाही. पण काही शब्दांच्या आठवणी मात्र खासच.
कोल्हापुरात कुणीही कुणाला, पैलवान म्हणून हाक मारेल, हा शब्द कोकणात नाहीच. आणि त्या अंगाची माणसेही नसत.
मुलामुलींच्या नावात पण फार फरक असायचा. आजची आधुनिक नावे सुरु व्हायच्या आधी. शोभा, शुभा, भारती, सागर, दिपक, शंकर, विष्णु, कमला, प्रमिला, विमला, सुगंधा,सरोज हि खास कोकणातली नावे तर संभाजी, शिवाजी, शाहु,कमळा, मंजूळा, विशाल, बकुळा, शालन, मालन, कुसुम, महिपती हि खास देशावरची नावे.

कोकणात भूताखेताच्या कहाण्या भरपूर. त्यांच्या कॅटेगर्‍या पण भरपुर. देवचार, राखणदार वगैरे तर मदत करणारे.
देशावरच्या भूतबाया म्हणजे कसं हिरवी साडी, कपाळभर मळवट आणि दागिन्याने मढलेली. अशा बायांची कल्पना कोकणात नव्हतीच.
कोकणातच भुतं जास्त का, यावर माझे काका छान खुलासा करायचे.
वाटा चढणी उतरणीच्या, जास्त करुन पायीच चालायचे, छोटेमोठे डोंगर भरपूर, अधून मधून पाण्याचे वहाळ, नारळ्/फणस/सुपारी अशी वेगवेगळ्या आकाराची झाडे, समुद्रसानिध्याने उलटासुलटा वारा, त्याचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज, कोकणात काही ऑर्किड्स रात्री फुलतात, त्यांचे अचानक फुलणे, तीव्र गंध यामूळे अंधारात अनेक आकारांचा भास व्हायचा.
यामुळे या कथांचा जन्म व्हायचाच.

कोकणात करण्या वगैरेच बरेच ऐकले आहे. तसेच साप घरात न येण्यासाठी घराभोवती काही अंगार्‍यासारखे टाकतात हेही ऐकलय अगदी लहानपणीच.

माझा मामा बरेच वर्षे चिपळूण मधे रहायला होता. pwd मधे नोकरी मुळे नविन रोड बांधणीपुर्व सर्वे चे काम त्याचा कडे होते. खेड-मेट शिंदी गाव जोडणारा रघुविर घाटाची आखणी त्यानेच केली. कामाच्या वेळी तेथे जंगलातुन त्याने मोर घरी आणला होता बराच काळ पिंजर्‍या शिवाय त्याचा घरी राहीला नंतर सोडून दिला.
असेच एका सर्वे च्या वेळेस त्यांना जखमी अवस्थेत भेकराचे पिल्लू सापडले होते. मग त्याने त्याचावर उपचार केले.
ते इतके लहान होते की त्याला कापसाच्या बोळ्याने दुध पाजावे लागायचे. त्यालाही त्या घराची इतकी सवय झाली होती की मामी जिथे जाईल तिच्या मागे मागे फिरायचे. जरा मोठे झाल्यावर त्याला कुठेतरी जंगलात परत सोडून दिले.

साप घरात न येण्यासाठी घराभोवती काही अंगार्‍यासारखे टाकतात >>> मंतरलेले तांदुळ पण टाकतात,
हो आणखी एक उपाय काजुच्या सालींचा धुर करतात.

दिनेश, पाहुणा अगदी स्पेशल असेल तर रसातल्या शिरवाळ्या बनतात. या पदार्थापुढे अजुन दिव्य असे काही नाही Happy

आंबोलीला पावसाळ्याच्या आधी खास कोकणातुन झापे आणुन घराच्या भिंती बाहेरील चारी बाजुनी झाकाव्या लागत नाहीतर त्या घराचे काही खरे नसे. पावसाच्या मा-याने भिंती कधी पडतील याचा नेम नसायचा. मेच्या सुरवातीलाच हे काम करावे लगे कारण मेच्या मध्यापासुन पाऊस डोळे झाकुन ओतायचे काम सुरू करायचा.

आता सगळीकडे निळे प्लॅस्टिक दिसते Sad

कोकणात करण्या वगैरेच बरेच ऐकले आहे

हो, लग्नानंतर सुरवातीला माझ्या सासुबाई माझ्याकडे 'ही बया आपल्याला करणी करुन मारणार तर नाही ना?" याच संशयाने पाहायच्या. माझा नुसता फणकारा उडायचा. मी म्हणायची कोकणात काय सगळे करणी करत नसत नाहीत, त्याचे लोक वेगळे असतात. Happy

कोकणात त्याला देवदेवस्की, वाडीचार असे शब्द आहेत.
पण पर्यटनात गोव्याची आघाडी आधी होतीच आणि मग केरळने आघाडी घेतली. कोष्टल कर्नाटका पण पुढे आला, त्यामानाने कोकणात पर्यटनाची सुरवात नंतर झाली.

===
साधना, याऊलट माझ्या आजीने सगळ्या माम्या कोकणातूनच आणल्या. कामसू असतात म्हणून. पहाटे साडेतीन ते रात्री बारा साडेबारा पर्यंत आमच्या घरात कामं चाललेली असतात. सगळ्या माम्यांचे टाईम मॅनेजमेंट जबरदस्त. प्रत्येकीला विश्रांति, माहेरपणासाठी रजा सगळे मिळते.

कोकणाबद्द्लच्या मस्त गप्पा चालल्या आहेत हं. भुता-खेतांचं पण असं बायफर्केशन असतं! मज्जा वाटली हे सारं वाचताना. खाद्यसंस्कृती, रीतीरिवाज अशा गोष्टींतून कोकण जाणवतंय - की जे माझ्यासारख्या अनेक जणांनी फक्त ऐकलं असेल. पण इथल्या (म्हणजे नि ग वरच्या) बर्‍याच जणांनी ते अनुभवलं आहे.
अशाच गप्पा वाचायला मिळू देत.

लग्नानंतर सुरवातीला माझ्या सासुबाई माझ्याकडे 'ही बया आपल्याला करणी करुन मारणार तर नाही ना?" याच संशयाने पाहायच्या.>>> Rofl
प्रत्येकीला विश्रांति, माहेरपणासाठी रजा सगळे मिळते.>>>>> Lol

घरात साप येऊ नये म्हणुन घराभोवती वेखंडाची रोपे लावतात >>>>> घरात साप येऊ नये रातरानी व तत्सम सुवासिक झाडे घराभोवती लावत नाहीत.

घरात साप येऊ नये म्हणुन घराभोवती वेखंडाची रोपे लावतात >>>>> घरात साप येऊ नये रातरानी व तत्सम सुवासिक झाडे घराभोवती लावत नाहीत.>>>>>>>
ईनमीनतीन - माझ्या माहितीप्रमाणे सापाला वास कळत नाही - रातराणीच्या गारव्यामुळे तो रातराणीच्या झुडपाजवळ येतो, वेखंडामुळे सापाला कसा प्रतिबंध होतो माहित नाही. कोणी जाणकार अधिक महिती देउ शकतील.

शशांक, केवडा आणि चंदनाचे झाड याबाबत पण असाच गैरसमज आहे. साप या झाडाजवळ आलाच तर तो थंडाव्यासाठी येतो. (आमच्या बागेत तर तगरीच्या झाडाखाली पण यायचा.)

सापाची चपळता, पटकन जमिनीतल्या बिळात नाहीसे होणे, हातपाय असे बाह्य अवयव नसूनही चपळ हालचाल करणे, काही सापांमधले विष, त्यांचे चमकदार रंग .. या सगळ्यामूळे भिती आणि गुढ वलय सापाभोवती आहेच.

रच्याकने.. खैरे यांचे साप हे पुस्तक वाचलेय का ?

आम्ही लहानपणी कोकणात खूप आतल्या भागात राहिलोय. त्यावेळी तिथे लाईट , रस्ते , दवाखाने काहीच नव्हते. आता विचार येतो हे असे रहाणे आता शक्य नाही. त्यावेळी शहराची भिती वाटायची Proud
मानुषी अजुनही तुम्ही जाता खारेपाटणला?

@ दिनेशदा, खैरे यान्च्या "साप" विषयी जास्त माहिती देता का? पुस्तक जुने की नवे, कोठे मिळेल, लेखकाचे पूर्ण नाव, पुस्तकाचे शिर्षक. धन्यवाद!

अमी

संक्रांतीच्या दरम्यान कदाचित असेन भारतात. जमले तर सगळ्यांनीच जाऊ. पावनखिंड पण तिथून जवळच आहे.>>>दिनेशदा, अगदी नक्की बर का. Happy

लग्नानंतर सुरवातीला माझ्या सासुबाई माझ्याकडे 'ही बया आपल्याला करणी करुन मारणार तर नाही ना?" याच संशयाने पाहायच्या.>>> साधने, Lol

Pages