निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी भरपूर शुभेच्छा! (आता आम्हालासुद्धा घरबसल्या हरिश्चंद्रगडची सफर होणार:))

जिप्स्या, मनाने आम्ही आहोतच समज तूझ्याबरोबर.
निकिता, तो नाका तर माझ्या ओळखीचाच. तिथे बस थांबते पण.

साधना, खरेच मनापासून शुभेच्छा आहेत.
--
आता देशावरचा शेतकरी हवालदिल झालाय. पण भरपुर कष्ट असले तरी पिकही पुर्वी चांगले यायचे.
कोकणात भात साधारण घरात खाण्यासाठीच असायचा. विकायचे उत्पन्न म्हणजे नारळ आणि सुपारी. सुपारीसाठी (म्हणजे पिकासाठी नाही, तर ती सोलण्यासाठी) भरपुर कष्ट करावे लागतात. हा व्यवहार पुर्वी बायकांच्या ताब्यात असायचा. पण सुपारी घेणारे व्यापारी मात्र त्यांना हमखास फसवायचे. प्रा. माधुरी शानभाग यांनी अशा फसवणूकीचे एका लेखात वर्णन केले होते.
नारळाचे केरळ इतके नसले तरी बरे उत्पन्न येते पण त्यावर आधारीत काथ्याचे वगैरे उद्योग तिथे रुजले नाहीत. केरसुण्या करायच्या पण त्याला कितीशी किंमत येणार ?
आपल्या भाऊंनी झाप विणण्याबाबत पुर्वी लिहिले होते. ईको फ्रेंडली, स्वस्त, हवेशीर असे ते बांधकाम साहित्य असे. मालवणचे नाटकाचे थिएटर पूर्णपणे झापांनीच वेढलेले होते. अजूनही असेल.

आज आपण ओल्या काजूगरांसाठी भरपूर पैसे मोजतो. पण त्या बिया गोळा करण्यासाठी आणि त्या सोलण्यासाठी त्या माम्या जे कष्ट करतात, त्या मानाने ते पैसे मला कमीच वाटतात. त्या माम्यांचे चिकाने सोलवटलेले हात बघून, मला खुप वाईट वाटायचे. शिवाय तो उद्योग पण काहि दिवसांचाच.

पण त्या बिया गोळा करण्यासाठी आणि त्या सोलण्यासाठी त्या माम्या जे कष्ट करतात, त्या मानाने ते पैसे मला कमीच वाटतात. >> अनुमोदन दा

शांकली ,प्रज्ञा,शोभा Happy
मी कोकणातलाच, रत्नागिरीचा , मुंबई कोल्हापुर महामार्गावर असलेले घाटीवळे हे माझे गाव, ( हे साखरप्या पासुन १२ कि.मी. नाणीज पासुन ४ कि.मी. वर आहे.

मा. बो वरिल सर्व निसर्ग प्रेमींना घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण - येवा कोकण आपलोच असा, Happy
मे महीना स्पेशल - पहाण्यासारखे
घनदाट जंगल , विविध झाडे, फुले , काजु, आंबे, फणस, नारळी, पपनिस, कोकम, साग, एन, खैर्, चिंच, ऊंबर,केळी, शेवगा, बख्खळ करवंदी, करांदे व ईतर अनेक झाडे.

प्राणि संपदा - गाई,बैल्,ससे,भेकर्,साळींदर्,रानड्डुक्कर,माकड,खारुताई,ईतर अनेक सरपटनारे प्राणि नशीबवंताना बिबट्या दर्शन ( आजकाल भरपुर जणांना दर्शन होतय गेल्या सोमवारी आमच एक वासरु याने नेल Sad )

पक्षी संपदा - खंड्या,पोपट,बुलबुल,पारवा,सातभाई,कोकीळ,टिटवी ,सुतारपक्षी,रानकोंबडी, मोर व ईतर अनेक
खाद्य संपदा - आंबा फणस साठ्,काजु , घरच्या चुलीवरील खमंग जेवण. Happy

हो आणि मस्त नदी विसरलोच की

रात्री घराच्या टेरेसवरुन निरभ्र आकाशात तारका दर्शन.

अटी - येताना आपला कॅमेरा आणावा. Wink

बोला कधी येताय. Happy

घनदाट जंगल , विविध झाडे, फुले , काजु, आंबे, फणस,नारळी,पपनिस,कोकम,साग,बख्खळ करवंदी, करांदे व ईतर अनेक झाडे.

प्राणि संपदा - गाई,बैल्,ससे,भेकर्,साळींदर्,रानड्डुक्कर,माकड, सरपटनारे प्राणि नशीबवंताना बिबट्या दर्शन ( आजकाल भरपुर जणांना दर्शन होतय गेल्या सोमवारी आमच एक वासरु याने नेल )

पक्षी संपदा - खंड्या,पोपट,बुलबुल,पारवा,सातभाई,कोकीळ,सुतारपक्षी,रानकोंबडी, मोर व ईतर अनेक
खाद्य संपदा - आंबा फणस साठ्,काजु , घरच्या चुलीवरील खमंग जेवण.

रात्री घराच्या टेरेसवरुन निरभ्र आकाशात तारका दर्शन.

अटी - येताना आपला कॅमेरा आणावा.

बोला कधी येताय. >>>>> मस्त आमंत्रण

रच्याकने, भेकर म्हणजे काय?

bhekar.jpeg
(गुगलुन)
भेकर म्हणजे काय? >> भेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरुन पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो. हे अतिशय चपळ असतात आणि यांचे डोळे बरेच मोठे असतात.

पण त्या बिया गोळा करण्यासाठी आणि त्या सोलण्यासाठी त्या माम्या जे कष्ट करतात, त्या मानाने ते पैसे मला कमीच वाटतात. >> अनुमोदन दा +१
आंबा आणि काजुच्या फळांच्या देठातील चीक एका प्रकारचे आम्ल असते, शरीराच्या झालेल्या याच्या स्पर्शातुन हमखास जखम होते, लहानपणी बरेच अनुभव आलेत.

आमच्याकडच्या कोषांचं काही कळत नाही, फांदीसकट घरात आणलेला कोष काळा पडला Sad
आणि कण्हेरीवरचे व्यवस्थित आहेत. पण त्यांची प्रगती काय होतीये ते काही कळत नाही. म्हणजे फुलपाखराची वाढ पूर्ण झाली आहे की नाही? हे बाहेरून कसं कळणार?

शांकली, घरच्या कोषाला इन्फेक्शन झालं.
आधी शशांकने फोटो टाकला होता त्यावरुन एक दोन दिवसातच पाखरु बाहेर यायला हवे होते.
बाहेरचे जे कोष असे दिसायला लागतील, त्यांच्यावर अगदी सकाळीच नजर टाकायची. मला वाटतं आता झाडावरच असू द्यावेत ते.

काल मी लाईफ सिरिजमधला प्लांट्स हा भाग परत बघत होतो. त्यात मोनार्क बटरफ्लाईज वर एक मस्त भाग आहे (तेच ते लाखोच्या संखेने जाऊन मेक्सिको मधे हिवाळी निद्रा घेतात ते ) तीच पाखरे मिल्कविड वर अंडी घालतात, हे झाड साधारण रूईसारखेच असते, फुलेही तशीच. त्या अळीने जर पानाची शिर चावली तर पटकन एवढा चिक बाहेर येतो कि अळी तिथल्या तिथे चिकात बुडून मरते. पण शहाणी अळी (?) मात्र शिर वगळून पान खाते. या फुलांचे परागीवहनही पण हिच पाखरे करतात. कॅनडा मधून मेक्सिकोमधे स्थलांतर करणारी हि पाखरे, जिथे विश्रांतीसाठी थांबतात, तिथेच हि झाडे आहेत.

दिनेशदा - अरे वा , मग याना लवकर खुप फिरु मजा येईल. म्या पामराला ही थोडी निर्सगाची माहीती मिळेल. Happy

साखरपा - हे ऐतिहासीक गाव आहे पुर्वी तेथे महाराजांची लष्करी छावनी होती, तेथे घोडबाव ही आहे,
पायरयंची विहीर येथे घोडे विहीरीत उतरुन पाणी प्यायची सोय आसलेली.
विषयांतरा बद्द्ल दिलगिर.

हं, बाकीचे कोष तसेच ठेवलेत, बघू 'तो' योग कधी येतोय ते! Happy
नितीन, मस्तच रे!! तू वर दिलेली यादी वाचून मी मनाने केव्हाच त्या सगळ्या अप्रूपात गेलेय. आणि मीच काय, पण सगळेच नि ग वाले मनोराज्यात गर्क झाले असणारेत.
मोनार्क म्हणजे एक आश्चर्यच आहे नाही?
दिनेशदा, तुम्ही ती हूव्हर फ्लायची क्लिप बघितली का?

हो बघितली, तिच ती माशी.

मोनार्क काय किंवा स्थलांतर करणारे बाकी पक्षी काय. हिमनिद्रा घेणारी अस्वले किंवा बाकिचे प्राणी काय. मला ते महान योगी वाटतात. शरीराची तयारी तर हवीच पण त्यांच्या मनाची पण किती तयारी होत नसेल ना ? कुठली प्रेरणा असते त्यांची ?
आणि पिल्लांसाठी एवढा आटापिटा करताना, पिलांकडून अक्षरशः काडिचीही अपेक्षा नसते त्यांची. या एवढ्या उदाहरणात एक मासा सोडला तर मातापित्यांची काळजी घेणार्‍या पिल्लांचे एकही उदाहरण मला दिसले नाही. (नेगल मधे एक कावळ्याच्या पिल्लाचा किस्सा आहे, पण तो अपवाद असावा.)

आणि आपण ?? जाऊ द्या आपण आपल्या सूजलेल्या मेंदूचाच गर्व करत राहू या.

हे Purple Ascocentrum.............फार मनोवेधक रंग आहे याचा.
मोबाईलमधून काढल्याने फोटो गोड मानून घ्या!

Image0817.jpgImage0818.jpg

दिनेशदा, आपण गाडी करूनच सगळेच कोकण दौरा करूया. काय मजा येइल ना?
इनमीनतीन, मी लांजा तालुक्यात होते. पावसला होते,मालवणला होते आणि खारेपाटणलाही होते. त्यानंतर पुण्यात आले, पण्.......................मनाने अजूनही कोकणातच आहे. Uhoh

मुचकुंद ह्याच काळात फुलतो. त्याला ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे फूल सोललेल्या केळ्यासारखं असतं, पाकळ्यांना तपकिरी रंगाचा बाह्यकोष असतो, पानं साधारणपणे मेपलच्या पानासारखी असतात.(कॅनडाच्या ध्वजावर या पानाचं चित्र असतं). शिवाय पानाची मागची बाजू पांढरट-चंदेरीसर असते>>>>शांकली, दिनेशदा मी पुन्हा पाहुन आलो ते झाड पण त्याची पाणे मेपलच्या पानासारखी नव्हती मात्र फुल अगदी मुचकुंदासारखेच. काहि वेळ झाडाकडे बघत होतो तेंव्हा अचानक लक्षात आले कि ह्या झाडाचा फोटो आधी मायबोलीवर टाकला होता. त्यावेळी त्याचे नाव "टेंभूर्णी" सांगितले होते. टेंबूर्णीची फुले पण अशीच असतात का? या फुलांनाही मंदसा सुवास आहे. आणि वर्णन अगदी मुचकुंदासारखे (आता सोमवारी फोटो काढल्याशिवाय चैन नाही पडणार). या झाडाला छोट्या छोट्या सॉसेजेस सारख्या शेंगा आल्यात.

हा त्या झाडाचा/पानाचा/शेंगेचा फोटो (आधी टाकला होता)

शांकली माझ्याकडे दोन वर्षांपुर्वी ही फुले फुलली होती तिच आहेत का तू टाकलेली ? पण दोन वर्ष आता त्याला फुलेच येत नाहीत. झाड कुंडीतच आहे.

जिप्स्या तोच तो.
शांकली व जागू, सुंदरच आहेत फुले ही.
याचीच एक फ़िक्कट गुलाबी जात आम्हाला एका गडावर दिसली
होती.
आणि जागू, पाचवा भाग येऊ द्या आता.

जिप्सी, हा मुचकुंदाचा भाऊच आहे. ह्याची फुलं मुचकुंदाच्या फुलांसारखीच असतात. बरेचजण यालाच मुचकुंद म्हणतात.पण याची पानं मेपल सारखी नसतात्.फुलण्याचा हंगाम पण हाच म्हणजे थंडीत असतो.याचं बोटॅनिकल नाव आहे Pterospermum canescens
आणि आणखीन एक मुचकुंद (की कर्णिकार?) त्याचं बोटॅनिकल नाव आहे Pterospermum acerifolium. पण दोघांचही कूळ एकच आहे ते म्हणजे Sterculiaceae.
तू वर दिलेले फोटो मुचकुंदाचेच आहेत.
बोटॅनिकल नावाने गूगलवर सर्च केलं की त्याचे फोटो,माहिती सगळं मिळेल.

जागू, तुझ्याकडची आणि मी दिलेल्या फोटोतली फुलं एकच! खत वगैरे घातलंस की येतील फुलं.
दिनेशदा, सगळ्या नि ग वाल्यांचं तुमच्या भारतभेटीकडे लक्ष लागून राहिलंय!
धोत्र्याच्या फळांचा फोटो मस्त आलाय.

Pages