निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, खाजकुयलीच्या कळ्या,फुले आणि शेंगा प्रथमच पाहिल्या! फोटोंबद्द्ल धन्स!!
गिरिकंद, कोतवालाचा फोटो मस्त आलाय.
दिनेशदा, तो कोष छोट्या फांदीसकट तोडून बाटलीच्या तोंडावर पान आडवं राहील असा ठेवलाय. आणि घरचे सगळेच जाता येता ख्याली-खुशाली बघताहेत!!

वॉव ! काय मस्त दिसतात फुलं. कोणालाही हात लावावासा वाटेल पटकन. पण हात लावल्यावर जे काही होइल ते प्रचंड त्रासदायक असणारसं वाटतंय. Happy

<<<
<<<<<घरचे सगळेच जाता येता ख्याली-खुशाली बघताहेत!!>>>>> शांकली, थंडीचे दिवस आहेत, जरा त्यांच्या (आणि आमच्यापण ) चहापाण्याचं पण बघा. Happy

गिरी, मी पण जिथे चालायला जाते तिथे खूप कोतवाल असतात. पण तेही कधीच फोटोला पोझ(?) देत नाहीत. म्हणजे आपण जरा पुढे गेलो की उडून जातात. (कीप सेफ डिस्टन्स)

कोतवाल खुप जिगरबाज पक्षी आहे. आपल्यापेक्षा मोठ्या पक्ष्यावर पण तो हल्ला करतो. एखाद्या झाडावर त्याचे घरटे असले तर बाकिचे पक्षी, मुद्दाम त्याच्या सोबतीने घरटे बांधतात. कारण तो सगळ्यांनाच संरक्षण देतो..... मग कॅमेराला का बरं घाबरत असेल ?

शशांक, शांकली शेवटच्या कुयलीच्या चित्रातली बोंडे आहेत तीला हात लावलात तर सगळी कुसे अंगाला किंवा बोटाला चिकटतात आणि खाज सुटते. हीच बोंडे सुकली की त्याची कुसे वार्‍यावर पसरतात. जवळ असणार्‍यांच्या मग ती अंगाला चिकटतात. दोन वर्षापुर्वी आमच्या बेडरूमच्या मागच्या बाजूला ओसाड शेत होते. तिथे राहणारी लोक बाहेर रहायचे त्यामुळे निगा नव्हती. तिथे अशीच कुयलीची बोंडे सुकली आणि वार्‍यावर त्याची कुसे उडायची. आमची खिडकी उघडी असली की ती बेडरुं मध्ये शिरायची. पाठिमागे कपडे लावलेले असायचे त्यावर चिकटायची. प्रमाण कमी असायचे त्यामुळे डास चावल्याप्रमाणे खाज यायची. असेच आमच्या शेजारच्या घरामध्ये पण व्हायचे. मग सगळ्यांच्या लक्षात आले त्या बोंडांबद्दल. मग एक मजूर घेउन आम्ही लोकांनी ते बोंडे जाळून टाकायला लावली. पण त्याच्या फुलांना किंवा इतर झाडाच्या कुठल्याही भागाला खाज नसते.

दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे ही वेल औषधी असते. माझी आजी मी लहान असताना जंत झालेत असे वाटले की हे कुयलीचे वेल मुळासकट उपटून मुळे स्वच्छ धुवुन ती चावून त्याचा रस प्यायला लावायची. छान लागतो. अजुन चव आहे जिभेवर.

एक खुष खबर मी लावलेल्या हादग्याच्या झाडाला आज कळ्या मोठ्या झाल्या. उद्या ह्याची फुले होतील ना ? भाजी कशी साधीच कांद्यावर करतात ना ?
भर दुपारी फोटो काढल्याने व्यवस्थित नाही आले.

जागू, हादग्याची पानं किन्हई या वृक्षाच्या पानांसारखी आहेत. किन्हई - Albezia procera .
हादग्याचं झाड उंचीला लहानखुरं असतं ना? प्रत्यक्ष बघितलं नाही कधी, फोटोत बघितलंय. तू लकी आहेस, बरीच झाडं तू अंगणात लावू शकतियेस. अगदी मोठे वृक्ष सुद्धा!!
अशीच तुझी बाग बहरत राहो.

मे मधे मला हा भेटला होता. Happy अजुन मी त्याच्या प्रेमातुन बाहेर पडायचे आहे. त्याचे डोळे कसले deadly आहेत ना.

Deadly.jpg

जागु, हादग्याच्या फुलांची भजी पण मस्त होतात. एकदम तों. पा. सु.
मी कधी कधी आठवड्याची भाजी आणायला गेलो तर माझे डोळे याचा शोध घेत असतात. Happy

वॉव! मस्त पक्षी आहे. आज सकाळी अंगणातल्या नारळीवरून चांगला पोसलेला भारद्वाज अंगणात उतरला. मी कॅमेरा घेऊन धावत गेले(हो ..हो..... आधी नमस्कार केला ना!)पण तो शेजार्‍यांच्या चाफ्यावर उडून गेला.
नंतर अंगणात जाऊन पाहिलं तर एक काडीकिडा पळत पळत लॉनच्या कुंपणात लपला. बहुतेक तो भारद्वाज त्याला टिपायला आला होता.

मानुषी, टाक ना फोटो तुझ्या भारद्वाजाचा. माझा अर्धा उन्हात आणि अर्धा झाडाच्या सावलीत असल्यामुळे नीट दिसत नाहीए. हा बघ.

bharadwaj.JPG

जिप्स्या मस्त. माझ्या झाडांवरचे पक्षी मी दोन दिवसांत टाकते कारण अजुन काही पक्षी मला टिपायचे आहेत.
हल्ली आमच्या आंब्याच्या झाडावर रोज सकाळी ९ ते १० च्या दरम्यात घुबड येऊन बसते. बहुतेक कोवळ्या उनासाठी ती बसते तिथे.

१] कॉमन स्वॅलो (भिंगरी )
५] पाँड हेरॉन (वंचक)
६] केस्ट्रेल किंवा मधुबाज (हनी बझर्ड) असावा - नक्की कळत नाहीये
८] व ९] तारवाली भिंगरी (वायरटेल्ड स्वॅलो )
१३] नीलकंठ (ब्ल्यू जे, इंडियन रोलर)
जिप्सी - सर्व प्र चि अप्रतिमच.......

सगळे पक्षी मस्त. याबाबतीत का कुणास ठाऊक मला त्यांचे सहकार्य मिळत नाही. इथे आजूबाजूला, अगदी माझ्या ऑफिसच्या खिडकीत पण अनेक पक्षी येतात. एकतर हातात कॅमेरा नसतो किंवा ते स्थिर नसतात.

Pages