निसर्गाच्या गप्पा (भाग ४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 October, 2011 - 15:03

निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग चतुराची एकदम सडसडीत बांधा बहिण स्मित>>>>>> चतुर "करिना" तर नव्हे?????:) Happy Happy

आमच्या बागेतही कण्हेरीच्या पानाखाली हे कोष दिसताहेत -

kosh1.jpgkosh2.jpg

मदत मदत मदत.
माझ्या ऑफिसमध्ये जीमेल, पिकासा ओपन होत नाही. तसेच माबोवरचे काही फोटोही दिसत नाहीत. दुसरा ब्राऊसर लोड होत नाही काय करू ?

माझ्या ऑफिसमध्ये जीमेल, पिकासा ओपन होत नाही. >>>आयटी डिपार्ट्मेंटने ब्लॉक केले असतील.

te open kase karayache ? permission n gheta ?

te open kase karayache ? permission n gheta ? karan permission koni denar naahi.

शशांक, कण्हेरीचे झाड विषवल्लीच आहे. बकर्‍या, गायी त्याला अजिबात तोंड लावत नाहीत. ज्या अर्थी हे कोष त्या झाडावर आहेत, त्या अर्थी त्या अळ्या पण त्याच पानांवर पोसल्या असतील. म्हणजे या फुलपाखरांचे पंख विषारी असतील आणि पक्षी, त्यांच्या वाटेला जात नसतील.

तात्पर्य त्या कोषावर लक्ष ठेवणे आणि बाहेर येणार्‍या पाखराचा फोटो काढणे, हि विनंति !

दिनेशदा - हा कोष पानासकट घरात आणून बाटलीत ठेवला तर चालेल का, यातील फुलपाखरु मरणार तर नाही ना १-२ दिवस बाटलीत ठेवले तर ? साधारण सकाळी पाखरु बाहेर येते का केव्हा....?

कसले चमकदार कोष आहेत ते शशांक! यातून बहुतेक चांदीचं पाखरू बाहेर पडणार Happy
जागू, टाचणी हा कीटक मला माहितच नव्हता. आत्ता तुझा फुलपाखरांचा धागा परत बघितला तेंव्हा समजलं.

शशांक फांदीसकटच अलगद तोडता आला तर पहा. साधारण सकाळी ५.३० ते ६ हालचाल सुरु होते.
आता कोषच आहे त्यामूळे बाटलीची गरज नाही. आधाराने फांदी उभी करुन ठेवली तरी चालेल, पण उन्हाची तिरिप येईल अशी जागा पाहिजे.

मी बाटलीत चक्क अळ्याच ठेवायचो. लिंबाची पाने खायला घालायची आणि वर झाकण न ठेवता, झिरझिरीत फडका बांधायचा.

गौरी
चांदीचं फुलपाखरू!!!!!!अगदी माझ्या मनातलं बोललीस!

आता बर्‍याच माळरानात ही तयार होतेय.

१) कुयलीच्या कळ्या.

२) कुयलीची फुले

३)

४) फुल सुकत जाऊन दिसणार्‍या कुयल्या.

५)

६) कुयली

७) दिवाळीतले नरकासुर.

नरकासुर? म्हणजे हो कुठले फळ? आय मिन, वापरातले दुसरे कोणते नाव आहे का?>>
कारेटी म्हणतात त्याला. दिवाळीला सकाळी अभ्यंग स्नान झाल्यावर देव्हर्‍यासमोर किंवा तुळशी समोर उभ राहुन फोडतात. मग त्याची एक बी जिभेला लावायची असते आणी कपाळपट्टीवर लावायची असते. भरपुर कडु असतात ही.

या खाजखुजलीच्या नेमक्या कुठल्या भागाने (पान , फूल, फळ, बिया, खोड) खाज सुटते - मानवी त्वचेला ? खूप अ‍ॅलर्जिक असते का हे? प्राण्यांना पण खाज सुटते का या खाजखुजलीने ?

शशांक, फक्त शेंगेवरच्या कुसानेच खाज सुटते. पण वेलाजवळ गेल्यावर ते अंगावर पडू शकतात.
तरीही ती कुसं औषधी आहेत. मधात घोळून पोटातही घेतात (अर्थात जाणकारांच्या सल्ल्यानेच)
त्यातला बियाही पौष्टिक असतात, त्याना गुजराथी मधे कौचा किंवा कवचबीज म्हणतात. थंडीच्या दिवसात त्याची मिठाई करुन खातात.

हा एक पक्षी मगाशी पहायला मिळाला. (हे प्र.चि. गुगलुन मिळवले आहे.) हा पक्षी कोणता? कधी कधी पहायला मिळतो पण त्याने मला कधीच त्याचा फोटु काढुन दिला नाही.

BD_7894.jpg

Pages