Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरोबर आहे झक्की! एकदा शतक
बरोबर आहे झक्की! एकदा शतक झालं असतं ना तर सगळीकडे शांतता प्रस्थापित झाली असती. टिव्हीतली, पेपरातली आणि त्याच्या भक्तांची बकवास जरा थांबली असती. सचिन खेळत असलेल्या कुठल्याही मॅचच्या आधी 'या वेळेला होणार का नाही?' यावर भंकस, नंतर 'अरेरे, या वेळेला नाही झालं, आता पुढच्या वेळेला बघू' असं कुंथणं! दर वेळेला तेच तेच नि तेच तेच! इतकी झाली आहेत आणि हेही होईल! आणि जेव्हा व्हायचं तेव्हाच होईल ते! पण दर वेळेला तेच तेच बकून त्याच्यावरचं दडपण वाढवायचं राष्ट्रीय काम जोमानं चालू असतं! लीव्ह हिम अलोन!
one day madhe sachin , dhoni,
one day madhe sachin , dhoni, yuvi... drop...
sehwag captan
मास्तुरेचा अगदी 'इनोद्राव
मास्तुरेचा अगदी 'इनोद्राव कांबळी' झालाय आज...
केवळ त्याचं शतक झालं म्हणूनच
केवळ त्याचं शतक झालं म्हणूनच नव्हे तर फलंदाजीचं त्याचं तंत्र व त्याबाबतचा ' अॅटिट्यूड' यावरून भारताला एक खराखुरा आंतराष्ट्रीय दर्जाचा 'ऑलराऊंडर' मिळणार असं वाटतंय.
५२ कसोटी सामन्यांत , केवळ ८० डावात ६९९६ धांवा [ २९ शतकं]काढणारा शतकांचा बादशाह ब्रॅडमनच्या धावांची अंतिम सरासरी ९९.९४ वरून १००वर न जाणं, यामानाने सचिनला १००वं शतक काढायला लागणारा वेळ कांहीच नाही, हें लक्षात घ्यायला हवं. पण त्याचबरोबर आंतराष्ट्रीय सामन्यांत एखाद्याने १००शतकांचा टप्पा ओलांडणं ही क्रिकेटरसिकांसाठी ऐतिहासिक व भारतीयांसाठी अभिमानास्पद घटना आहे हेंही निर्विवाद. दर सामन्याआधी याचा माध्यामांतून नको तेवढा ' हाईप' केला जातो हें खरं असलं तरीही त्या घटनेतून क्रिकेटप्रेमीना मिळणार असलेला खराखुरा निखळ आनंदही लक्षात घ्यायला हवा. माझ्यापुरतं बोलायचं तर मी केवळ त्या आनंदात सहभागी होण्याची संभाव्य संधी दवडायची नाही म्हणूनच आज वानखेडेला हजेरी लावली होती.
आज अश्विनचं शतक होऊन तो बाद झाला तेंव्हा वे. इंडीजच्या प्रत्येक खेळाडूने त्याच्याशीं हस्तांदोलन करून अभिनंदन केलं. काल द्रविडने यष्टीवर जाणार चेंडू प्रसंगावधान दाखवून पायाने अडवला तेंव्हाही
सॅमीने पाठ थोपटून त्याचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यांत हे दुर्मिळच !!
>>> मास्तरा, किती दात घशात
>>> मास्तरा, किती दात घशात गेले आत्तापर्यंत?
अरे, सगळे दात आधीच गेले होते. आज नंतर लावलेली कवळी पण घशात गेली.
>>> माझ्यापुरतं बोलायचं तर मी केवळ त्या आनंदात सहभागी होण्याची संभाव्य संधी दवडायची नाही म्हणूनच आज वानखेडेला हजेरी लावली होती.
शतक झाले नसले तरी सचिनचा खेळ बघायला मिळाला तुम्हाला. भाग्यवान आहात!
रामपॉल म्हणतो कि सचिनची विकेट
रामपॉल म्हणतो कि सचिनची विकेट planned होती. हो बाबा तो आउट झाल्यावर ती प्लॅन्नड होती म्हणू शकतो. फिडेल एडवर्ड्सला सांगायला विसरले वाटते प्लॅन गिब्सन नि रामपॉल
<< रामपॉल म्हणतो कि सचिनची
<< रामपॉल म्हणतो कि सचिनची विकेट planned होती. >> मागे आफ्रिकेतला कुठचा तरी गोलंदाज असंच कांहीसं भकला होता; नंतरच्या सामन्यानंतर नुसतं 'सचिन' म्हटलं तरी बिचार्याचे कुरळे केस ताठ व्हायचे !!
112/4 wickest...sagalya ojga
112/4 wickest...sagalya ojga ne ghetlyaa...total lead 220 ....350 chya aat sampavaa....
112/5... 5 hi wickes pan ojha
112/5... 5 hi wickes pan ojha la.........
सामन्यानंतर नुसतं 'सचिन'
सामन्यानंतर नुसतं 'सचिन' म्हटलं तरी बिचार्याचे कुरळे केस ताठ व्हायचे ! >>>
तो रामपॉल अन बिशू उगीच नडले आहेत सचिनला. खरेतर त्या सगळ्या विकेट सचिनच्या चुकीच्या आहेत. फक्त एकच विकेट वल्डकप मध्ये रामपॉलचा बॉल अप्रतिम होता, त्यातही सचिन आउट नव्हता, तो स्वतः निघून गेला. अम्पायरने आउट दिलेच नव्हते. उगाच डोक्यावर चढवून ठेवले आहे. रवी शास्त्री त्याला म्हणाला होता काल की बिशूला महत्व देऊ नकोस. मेंटल ब्लॉक म्हणावे का?
जय ओझाजी, ५ विकेट.
जय अश्विन ६ पडल्या.
लंचच्या आत आउट केले तर अजूनही आपण २७५ (सेहवाग असताना) सह्ज काढू शकतो दोन सेशन मध्ये.
6th down.... aata ashwin ne
6th down.... aata ashwin ne ghetali
7 down..... again. ashwin
7 down..... again. ashwin
आठ गेल्या.! ऑसम इंडिया!! ऑसम
आठ गेल्या.!
ऑसम इंडिया!! ऑसम प्रग्यान! कसली जबरी इन्टरेस्टिंग झाली आहे मॅच.
आधीची १०० ची लिड असतानाही मॅच आता भारत जिंकेल अशी आशा निर्माण झाली. ही टीम शेवटपर्यंत बचेंगे तो और भी लढेंगे म्हणते. विश्वास ठेवायला शिका!
८वी गेली !!! वानखेडेच्या
८वी गेली !!! वानखेडेच्या खेळपट्टीने आपला इंगा दाखवायला शेवटच्या दिवशीं सुरवात केलीय !!!जावं म्हणतोय आतां वानखेडेला !
तेंडल्याने ओपन करायला पाहिजे.
तेंडल्याने ओपन करायला पाहिजे. सेहवाग सोबत. मजा येईल.
8 th down
8 th down
9 th down....total lead 242
9 th down....total lead 242
बस्स एक बाकी है, एक धक्का और
बस्स एक बाकी है, एक धक्का और दो
अरे उद्यवन, जागे वरून उठू
अरे उद्यवन, जागे वरून उठू नकोस हा.
गेल्या. गेल्या !! २४३ फक्त.
गेल्या. गेल्या !! २४३ फक्त. ६६ ओव्हर्स बाकी. फक्त ३.६८ चा रनरेट हवा.
मास्तुरे, तुमचे बरोबर होते, चौथ्या इनिंग मध्ये आपण पटकन आवरू त्यांना ते.
all out...135.....lead
all out...135.....lead 243.... target 60 overs
mi mob var aahe....vichar
mi mob var aahe....vichar kartoy office la jau ka nako...
नको जाऊ! मी रात्री उडणार आहे,
नको जाऊ! मी रात्री उडणार आहे, पण खरेदी थांबवली, घरीच आता.
भारतानेही फार सहजतेने घेणं
भारतानेही फार सहजतेने घेणं घातक ठरूं शकतं या खेळपट्टीवर ! [ झक्कीसाहेब, उगीच नकारात्मक वगैरे नका म्हणू याला ! घरची असली तरी खेळपट्टी लहरीपणाच्याबाबतीत कुणाच्याही बाजूची अशी नसते म्हणून म्हणतोय, इतकंच
]
204.....53 overs
204.....53 overs madhe....
tendulkar century maru shakto....
sehvag kahi khayla uravle tar...
>>> मास्तुरे, तुमचे बरोबर
>>> मास्तुरे, तुमचे बरोबर होते, चौथ्या इनिंग मध्ये आपण पटकन आवरू त्यांना ते.
मी आता काहीच बोलणार नाही. आजच नवीन कवळी बसवली आहे. उगाच ती पण घशात नको जायला.
कवळी
कवळी
सचिनचे महाशतक का होत नाही?
सचिनचे महाशतक का होत नाही?
sachin out....
sachin out....
दोन डाव खेळूनही तेंडल्या केवळ
दोन डाव खेळूनही तेंडल्या केवळ ९९ धावाच करू शकला...असेही शतक नाही करू शकला.
ह्यालाच म्हणतात बेभरवशाचे क्रिकेट आणि त्याहूनही बेभरवशाचे भारतीय खेळाडू.
Pages