Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुरे हो त्या बिचार्या
पुरे हो त्या बिचार्या आश्विनला नावे ठेवणे! किती लहान, अननुभवी आहे तो. केव्हढे जबरदस्त टेन्शन आले असणार त्याच्यावर! विकेटी घ्याव्या, शतक काढावे तरी यांचे समाधानच नाही!! "सरणार कधी रण, प्रभो, तरी' असे झाले असेल त्याला.
आता द्रवीड, लक्ष्मण, तेंडुलकर, धोनी , सेहवाग, गंभीर यांना का नाही जास्त शिव्या देत, शिव्याच द्यायच्या तर?
ते सगळे 'प्रचंड अनुभवी, महान,' एव्हढे सगळे काही होते, त्यांनी काय केले?! त्यांचे काम होते ते! त्यांनी काय चुका नाही केल्या? इथे कुणि लिहीले की त्यांनी चूक केली की दहाजण त्यांच्या बाजूने येतात लिहायला! नि आश्विनला शिव्या द्यायला कसे सरसावून उठले आहेत सगळे लांडगे! गरीब दिसला की घाला लाथा.
निव्वळ व्यक्तिपूजा! फार मोठा रोग आहे हा भारतीयांना. तेंडुलकर - ३ धावा!! एकदा ९४ केल्या, लगेच सचिन, सचिन!! हजार कोटी रुपये द्या त्याला, त्याचे नामस्मरण केले, त्याला पहिले, आयुष्याचे सार्थक झाले! जरा जास्त नाही वाटत? विशेषतः आश्विनवर ज्या हिरीरीने तुटून पडला आहात त्याच्या तुलनेने!
<< सगळ्यात खुष कोणी असेल तर
<< सगळ्यात खुष कोणी असेल तर ते म्हणजे क्युरेटर सुधीर नाईक! >> मला वाटतं पॉली उम्रीगरनंतर सुधीर नाईक आज बरीच वर्षं वानखेडेच्या खेळपट्ट्यांचे क्युरेटर आहेत. मी खेळपट्ट्या बनवण्याच्या तंत्राचा खूप अभ्यास केलेला नाही. पण पहिले तीन दिवस विकेट 'पाटा ' राहील नंतर ती फिरकीसाठी अनुकूल होईल व पांचव्या दिवशीं सगळा ताळतंत्र सोडून वागेल, असं खरंच योजनापूर्वक करतां येतं? चौथ्या दिवशीं गावस्कर म्हणाला कीं विकेट बॅटींगसाठीच अनुकूल आहे पण मुंबईच्या आत्यंतिक उष्णतेमुळे खेळपट्टीच्या वरच्या थरावरून जराशी धूळ उडाल्यासारखी वाटते आहे. [ पहिल्या दिवशीं तर सचिनच्या शतकासाठीच मुद्दाम 'पाटा' विकेट बनवली आहे अशीही वदंता होती ! ]मला वाटतं 'बाउन्सी', 'संथ' किंवा कांहीशी 'कच्ची' बनवलेली असं सर्व साधारणपणे विकेटचं स्वरूप ठरवून योजनापूर्वक करतां येईल; पण वानखेडेच्या या विकेटचं हें दिवसागणिकचं विक्षिप्त वागणं ठरवून केलेलं नसावं व त्याचं श्रेय, किंवा दोष, क्यूरेटरला जात नसावं. कुणीतरी जाणकार मला खूप वर्षं सतावणार्या या शंकेचं निरसन करेल का ?
जो माणूस हार्डली दोन तीन
जो माणूस हार्डली दोन तीन टेस्ट खेळल्यावर खेळपट्टी कशी वाईट आहे ह्यावर भाष्य करतो, त्याला जर गेम कसा संपवायचा हे कळत नसेल तर मग काय बोलणार?
बाकी सुधीर नाईकांनी बरच काही म्हटलेलं आहेच आज ते ही ऐका.
>>पुरे हो त्या बिचार्या
>>पुरे हो त्या बिचार्या आश्विनला नावे ठेवणे!
अहो बाकी सगळ्याबद्दल त्याचे कौतुक आहेच की म्हणून तर त्याला मॅन ऑफ द मॅच आणि सिरीज मिळाले, पण जे चुकले ते चुकलेच ना!
मला वाटत सहवाग, कोहली आणि द्रवीडच्या चांगल्या खेळींचे चीज करणे त्याच्या हातात होते आणि जे त्याला जमले नाही... आता तो आधीच आउट होउन गेला असता तर कदाचित दोष त्याच्याकडे गेलाच नसता.... अशक्य गोष्ट जमत नाही तेंव्हा तितकेसे वाईट वाटत नाही पण शक्य गोष्ट जमली नाही की टीका होणारच मग भले तो अश्विन असो वा तेंडूलकर!
आणि झोडपण्याचे म्हणाल तर निवासी भारतीयांचे ते व्यवच्छेदक लक्षण आहे हे तुम्हाला कुणी सांगायला नकोच.
जे लोक भारतीय संघाला भारतीय संघच समजतात त्यांना वाईट वाटणारच, भारतीय संघाला 'बीसीसीआय' संघ समजणार्यांच माहीत नाही बुवा
भाऊ,
सुधीर नाईकांनी कसोटी सुरु होण्याआधीच सांगितले होते की पहीले ३ दिवस ती फलंदाजीला अनुकुल असेल आणि शेवटचे २ दिवस ती फिरकीला अनुकुल असेल आणि जवळपास तसेच घडले म्हणून ते खुष!
<< आणि जवळपास तसेच घडले
<< आणि जवळपास तसेच घडले म्हणून ते खुष!>> स्वरुपजी, सुधीर नाईकांबद्दल मला खूप आदर आहे व आपलं काम ते चोख करतात हे मला माहित आहे. माझी शंका एवढीच कीं << पहीले ३ दिवस ती फलंदाजीला अनुकुल असेल आणि शेवटचे २ दिवस ती फिरकीला अनुकुल असेल >> असं दिवसागणिक खेळपट्टीचं वर्तन खेळपट्टी बनवताना योजनापूर्वक आगाऊ ठरवतां येतं कां ? कारण, अनेक वेळां तज्ञ क्यूरेटरनी स्वतःच बनवलेल्या खेळपट्टीबद्दलचे सामन्याआधी वर्तवलेले त्यांचे अंदाज साफ चूकलेले आपण पहातोच. डॉन ब्रॅडमनने पण खेळपट्टीबाबत दिवसागणिक अंदाज व्यक्त करणार्यांबद्दल साशंकता व्यक्त केल्याचं आठवतं [ बहुधा, त्यांच्या ' आर्ट ऑफ क्रिकेट' पुस्तकात ].
अर्थात, हें फार गंभीरपणे घेऊं नये हेंही खरंय.
भाऊ, गुरूवारी सकाळी तुम्ही
भाऊ, गुरूवारी सकाळी तुम्ही मैदानात लौकर जाऊ शकला होता काय? कसे वातावरण होते?
पेपरमधे असे वाचले की सगळी तिकीटे संपली होती. पण मैदानात खूप मोकळ्या जागा दिसत होत्या.त्यामुळे मला वाटले की बर्याच लोकांना मैदानात येइपर्यंत बराच वेळ लागला असेल.
स्वरूपः शेवटच्या बॉलबाबत सहमत. शेवटच्या बॉलला कोणत्याही परिस्थितीत दोन रन्स काढायला पळायचे आहे हे ठसवण्यासाठी कॅप्टन ने टॉवेल, पाणी वगैरे घेऊन कोणालातरी पाठवायला हवे होते. टेस्ट्स मधे सहसा असे केले जात नाही पण खुद्द आश्विननेही काहीतरी निमीत्त काढून पॅव्हिलियन मधून मेसेज येइल असे करायला हवे होते. खरे म्हणजे त्यालाही दोन रन्स साठी पळल्याने काहीही नुकसान नाही हे कळायला हवे होते पण प्रत्यक्ष मैदानावरच्या खेळाडूंची गडबड होणे शक्य आहे.
असामी - आधीचे अनेक बॉल्स मारायचा प्रयत्न केल्यावर शेवटून दुसराच बॉल फक्त डिफेन्ड करण्याचे कारण कळाले नाही.
<< भाऊ, गुरूवारी सकाळी तुम्ही
<< भाऊ, गुरूवारी सकाळी तुम्ही मैदानात लौकर जाऊ शकला होता काय? >> किंचित उशीर झाला पण तो माझ्याच गलथानपणामुळे. मला मिळालेला पास पॅव्हिलीयनच्या बाजूचा असल्याने गर्दीचा त्रास नव्हता. त्यादिवशीं वातावरण 'सचिन'मय होतं व मग सचिंत होतं, आणखी काय सांगणार !
>><< पहीले ३ दिवस ती
>><< पहीले ३ दिवस ती फलंदाजीला अनुकुल असेल आणि शेवटचे २ दिवस ती फिरकीला अनुकुल असेल >> असं दिवसागणिक खेळपट्टीचं वर्तन खेळपट्टी बनवताना योजनापूर्वक आगाऊ ठरवतां येतं कां ? <<
हो. ब्रेबॉन स्टेडियमचा माळी (नांव आठवत नाही) या बाबतीत एक्सपर्ट होता. खेळपट्टी कोणाला साथ देइल या विषयीची चर्चा/सल्लामसलत खेळ सुरु होण्यापुर्वि त्याच्याबरोबर केली जात असे.
पुर्वि कॅप्टन खेळपट्टीची स्थिती पाहुन हेवी/लाइट रोलर फिरवुन घेत. आता घेतात कां याची कल्पना नाही.
पण जे चुकले ते चुकलेच
पण जे चुकले ते चुकलेच ना!
खरे आहे. पण इथल्या प्रतिक्रिया वाचून असे वाटते की बिचार्याला फारच जास्त शिव्या देतात. माझ्या मते खरी जबाबदारी गंभीर, सेहवाग, तेंडुलकर इ. 'महान, अनुभवी' वगैरे लोकांची होती. ते लवकर बाद झाले तर मात्र वाट्टेल ती कारणे सांगून त्याचे समर्थन करतात! "अहो त्याला शतक करण्याच्या कल्पनेने दबाव आला असेल हो!, बिच्चारा हो!"
आधी दहा ओळी त्यांना शिव्या द्या नि मग एक ओळ लिहा की आश्विन अननुभवी असल्याने ऐन वेळी काय करायचे ते त्याला सुचले नाही. आणि तोपर्यंत जर तेंडुलकर नि धोनी सुद्धा जबाबदारीने खेळले नाहीत, तर बिचार्या आश्विनची काय कथा?
हे म्हणजे ऑफिसातले राजकारण! ऐन मोक्याच्या वेळी कुणाला तरी प्याद्याला पुढे करायचे नि हरल्यावर ते प्यादे मरू द्यायचे. वरची मॅनेजमेंट मूर्ख, पण नोकरी जाते गरीब कारकुनांची!!
<< जो माणूस हार्डली दोन तीन
<< जो माणूस हार्डली दोन तीन टेस्ट खेळल्यावर खेळपट्टी कशी वाईट आहे ह्यावर भाष्य करतो, ...>> मा.बो.वर भाऊ नमसकरने अक्कल पाझरणे व एका नवोदित गोलंदाजाने खेळपट्टीबाबत माध्यमांकडे शेरेबाजी करणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे, हें अश्विनला जेवढ्या लवकर समजेल तेवढं तें त्याच्याकरतां हितकारक ठरेल. क्रिकेटेतर अनेक गोष्टीही द्रविड, लक्ष्मण, सचिन इ.कडून शिकण्यासारख्या आहेत, याचंही भान असावं !!!
राज, डाव सुरु व्हायच्या आधी
राज, डाव सुरु व्हायच्या आधी रोलर फिरवतातच आणि तो कोणता ते अजूनही कर्णधारच सांगतो.
पहिला एकदिवसीय सामना
पहिला एकदिवसीय सामना भारतासाठी भलताच कठीण झालाय. २१२ धावांचा पाठलाग करताना धाप लागली आहे. रोहीतही आता गेलाय. जिंकायला अजून २७ चेंडूत ११ धावा हव्यात पण ८ जण बाद झालेले आहेत. तिसरा कसोटी सामना विंडीजने दबाव आणून भारताला जिंकून दिला नाही. आज तसंच होणार बहुतेक.
९ वा पण गेला.
९ वा पण गेला.
जिंकलो
जिंकलो
बराच मूर्खपणा करून जिंकले
बराच मूर्खपणा करून जिंकले एकदाचे.
जिंकल्याशी मतलबना असामी?
जिंकल्याशी मतलबना असामी?
MURKHPANAA KARNE HI SAVAY
MURKHPANAA KARNE HI SAVAY AAHE
जिंकल्याशी मतलबना असामी? >
जिंकल्याशी मतलबना असामी? > खरय. पण तरीही काहि काही गोष्टी अनाकलनीय होत्या. अश्विनचे रन आउट होणे, विनय कुमारचे panic, अॅरॉनचे singles न घेणे ....
जिंकलो एकदाचे. निसटता विजय.
जिंकलो एकदाचे. निसटता विजय. (की पराजय). एकुण खराब कामगिरी.
यापुढे मी कुणाहि खेळाडूची
यापुढे मी कुणाहि खेळाडूची बाजू घेणार नाही. बिचार्या आश्विनचे कौतुक करायला गेलो, तर कळले की त्याला अगदी बेसिक नियमहि माहित नाहीत, धावा पळून काढण्याचे! मला सुद्धा बरेचसे कळते की कॉल कुणाचा असतो.
बरे झाले जिंकले, नाहीतर खालच्या खेळाडूंना जाम शिव्या बसल्या असत्या. म्हणजे सेहवाग, रैना, गंभीर वगैरे बहुतेक या वर्षीच्या सर्वोत्कृष्ठ चेंडूवर बाद झाले असतील म्हणा, पण शेवटच्या खेळाडूंनी मात्र खेळलेच पाहिजे!! हो, त्यांच्या चुका घाई घाईने दाखवायला पाहिजेत, कारण ते सुधारण्याची शक्यता आहे. गंभीर, सेहवागला काय सांगणार! थोर, महान, अनुभवी लोक ते! त्यांना थोडे जास्त पैसे द्यायला पाहिजेत बहुतेक, कारण इतक्या कमी पैशात खेळायचे म्हणजे लक्ष लागत नाही!
ह्या सामन्याचा असा निकाल
ह्या सामन्याचा असा निकाल लागण्यात वे. इंडीजचाच सिंहाचा वांटा आहे, असं मला वाटतं. त्यानी आक्रमक क्षेत्ररक्षण लावून फांस आवळायचा प्रयत्नच केलेला दिसला नाही, विशेषतः रोहित व जडेजा जोडी
फोडण्यासाठी व त्यानंतर .
भाऊ,,, त्यात काय विशेष.
भाऊ,,, त्यात काय विशेष. त्यांच्या नावातही इंडी आहेच... त्यामुळे जो प्रकार आपण कित्येक वेळा करतो तो त्यांनी काल केला...
>>> ह्या सामन्याचा असा निकाल
>>> ह्या सामन्याचा असा निकाल लागण्यात वे. इंडीजचाच सिंहाचा वांटा आहे, असं मला वाटतं.
विंडीजला काल भारताचा ९ वा गडी बाद केल्यावर सामना जिंकण्याची उत्कृष्ट संधी होती. भारताला अजून ११ धावा हव्या होत्या व शेवटची जोडी पूर्णपणे अननुभवी होती. पण २ खराब चेंडू टाकून विंडीजने एरॉन व यादवला २ चौकार मारण्याची संधी दिली आणि हातातला सामना घालविला.
दोन्ही कप्तान मूर्ख आहेत.
दोन्ही कप्तान मूर्ख आहेत. एकाने शेवटी धावा कशा घ्याव्यात हे शिकवले नाही तर दुसर्याने शेवतच्या २ ओव्हर कशा/व कोणी टाकाव्यात यावर विचार केला नाही. कमी मूर्ख संघ जिंकला...

एनी वे , झक्कींना कॉमेन्तरी बॉक्समध्ये बसवून कॉमेन्टरी करण्याची संधी देने ही आयडिया कशी वाटते? बहुधा अमेरिका भारताचे राजनैतिक संबंध बिघडन्याची शक्यता जास्तच. अथवा कुणीतरी भारतावर युद्ध लादण्याची.
झक्कींना कॉमेन्तरी बॉक्समध्ये
झक्कींना कॉमेन्तरी बॉक्समध्ये बसवून कॉमेन्टरी करण्याची संधी देने ही आयडिया कशी वाटते?>>> आयड्या वाईट नाही! पण त्यांचा रेट परवडेल का तुम्हाला?
जोवर अमेरिका क्रिकेट खेळत नाही तोवर राजनैतिक संबंध सुमधूर राहतील, न जाणो सुधारतील इतके की पाकिस्तानसकट बान्गालादेश, श्रीलंका भारतातून खेळतील! 
काल ९ आउट झाले तेव्हा १७ बॉल
काल ९ आउट झाले तेव्हा १७ बॉल बाकी होते. त्यात एक दोन बॉल वाईट पडणार हे साहजिक आहे. मात्र ते दोन्ही चौकार अतिशय सुंदर फटके होते हे खरे. विंडिज ची फिल्डिंग गलथान वाटली शेवटच्या ओव्हर्स मधे.
बाजो, झक्की कॉमेंटरी बॉक्स मधून पुण्याला, भारताला वगैरे जे काय बोलतील त्यावरून भारतातील सर्व मॅकडोनाल्ड्स ना सुरक्षा पुरवावी लागेल (कन्नड=वैशाली म्हणून अमेरिकन्=मॅकडी)
अमेरिका भारताचे राजनैतिक
अमेरिका भारताचे राजनैतिक संबंध बिघडन्याची शक्यता जास्तच. अथवा कुणीतरी भारतावर युद्ध लादण्याची
तसे काही होणार नाही. अमेरिका काही भारताचे अधिकृत, सरकारी बोलणेहि मनावर घेत नाही, भारतीय माणसाचे तर त्याहून नाही. नि तेहि भारतात न रहाणार्या!!
भारतावर पाकीस्तानने व चीनने युद्ध लादलेच आहे. भारतीयांना ते माहित नाही. कारण सध्या क्रिकेट चालू आहे, ते जरा थांबले की मग कुणि भ्रष्टाचार केले, कुणि अफजल गुरूवर नि कसाबवर खोटे एन्काउंटर केले, याची चौकशी होईल, त्यानंतर वेळ झाला तर बघू, काय म्हणतात चीन, पाकीस्तान ते.
आता काळजी दुसर्या एकदिवशीय सामन्याची.
आता काळजी दुसर्या एकदिवशीय
आता काळजी दुसर्या एकदिवशीय सामन्याची.>> मला वाटले अश्विनची काळजी करत असाल
अश्विनला होईल हो सवय पळण्याची
अश्विनला होईल हो सवय पळण्याची त्यात काय येवढं... बाकी काल विरू नं १० अन् ११ ची पळापळ पाहून जबरी हसत होता.
>> बाकी काल विरू नं १० अन् ११
>> बाकी काल विरू नं १० अन् ११ ची पळापळ पाहून जबरी हसत होता.
कारण त्यानं हे जे सांगितलं होतं त्याचा अर्थ त्याला तेव्हा समजला.. नं १० नं ११ का पीछा करो, नं ११ नं १० का पीछा करो!
Pages