Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१>हो २>हो ३> हो
१>हो
२>हो
३> हो
सचिन पुन्हा ऑफवरून आत
सचिन पुन्हा ऑफवरून आत येणार्या बॉल वर आउट. हाण लेका त्यापेक्षा. लौकर आउट झाला तरी चालेल.
२> तेंडल्या १००वे शतक मुंबईत
२> तेंडल्या १००वे शतक मुंबईत करणार. मुंबईकरांसाठी खास भेट.
सेहवाग आणि गंभीर खेळत होते
सेहवाग आणि गंभीर खेळत होते तेव्हा असे वाटले आता दणदणीत स्कोर करून आपण मोठा लीड देऊ...च्यायला कुठले काय १३ ओव्हर्स मध्ये ८२-० आणि २०९ ऑल डाऊन...
द्रवीड खेळला नसता तर अजून कमी झाला असता स्कोर..
मला वाटते सचिनला पण कधी एकदा ते शतक करून दडपणाखालून मोकळे होतोय असे झाले असेल...झाल्यावर सत्यनारायणाची पूजा घालेल बहुतेक
सचिनला नविन घराचा पायगुण् कसा
सचिनला नविन घराचा पायगुण् कसा लाभतोय?
पण हे अतिक्रिकेट होतय. किमान प्रमुख खेळाडूना विश्रांती तरी द्यायला हवी होती.
१ २ ३ काय फरक पडतो आपल्या
१

२
३
काय फरक पडतो आपल्या होर्याने?
प्रमुख खेळाडूंची विश्रांतीच
प्रमुख खेळाडूंची विश्रांतीच होती की भारताच्या विंडीज आणि इंग्लंड आणि इंग्लंडच्या भारत दौर्यात..
विंडीजला सचिन, सेहवाग सकट बरेच जण नव्हते. इंग्लंडला बरेच जण दुखापतीने बाहेर गेले. नंतर इंग्लंड वनडे दौर्याला ते बरेच जण नव्हते. अजून कोणत्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती हवी आहे ?
भारताचा डाव अगदीच कोसळलेला दिसतोय.
पग्या +१. आपण वाईट खेळलो असे
पग्या +१.
आपण वाईट खेळलो असे म्हणूया सरळ सरळ.
गेला रे गेला चंदरपॉल गेला. ८
गेला रे गेला चंदरपॉल गेला.
८ गेल्या.
विंडीजचा डाव चहापानाच्या आत
विंडीजचा डाव चहापानाच्या आत संपेल हा अंदाज खरा ठरला. त्यांचे एकूण आधिक्य २५० पर्यंत असेल असे वाटले होते, पण प्रत्यक्षात २७६ चे लक्ष्य आहे. भारत हा सामना उद्या नक्की जिंकणारच!
सेहवाग गेला. पण अप्रतिम
सेहवाग गेला. पण अप्रतिम फटकेबाजी करून. कसले जबरदस्त शॉट होते, आणि तो बिशूला मारलेला शेवटचा फोर, अफलातून.
साहेब आलेत खेळायला - आख्खे
साहेब आलेत खेळायला - आख्खे दोन दिवस आहेत महाशतक झळकावयाला...
यासारखी दुसरी चांगली संधी असूच शकत नाही
पहिल्या इनिंगसारखा घोळ घातला
पहिल्या इनिंगसारखा घोळ घातला तर गेलीच मॅच...
दिल्ली च्या लोकांनाच बहुदा
दिल्ली च्या लोकांनाच बहुदा कोटला मैदान समजुन चुकले आहे......... बाकिच्यांसाठी फक्त मायाजाळ ठरत आहे..
चंद्रपॉल बहुदा गेल्याजन्मीचा दिल्लीकर असावा.....
१
१
देव (कपील सुद्धा चालेल) करो
देव (कपील सुद्धा चालेल) करो आणि तसे न होवो
सेहवाग, गंभीर, सामी आणि
सेहवाग, गंभीर, सामी आणि चंदरपॉल खेळताना दिल्लीचे मैदान गप्प बसून होते. आता सचिनला बिशूने ओव्हरभर गप्प बसविले. बहुदा बेधडक खेळले की तिथे काही होत नाही.
हिम्या आपण जिंकणार ह्यात शंकाच नाही.
द्रविडविरूध्दचे रन आउट चे
द्रविडविरूध्दचे रन आउट चे अपील खूप इंटरेस्टिंग होते आत्ता. तो क्रीज मधे पोहोचून फक्त ज्या वेळेस बॉल बेल ला लागला त्यावेळेस पूर्ण हवेत असल्यासारखा वाटला. नियमाप्रमाणे पाय किंवा बॅट जमिनीला टेकलेले असणे आवश्यक आहे पण ही एरव्ही बॅट टेकून पुन्हा हवेत जाते तसा प्रकार नव्हता (खेळाडू बाहेर असतो, फक्त त्याची बॅट क्रीजमधे टेकून पुन्हा हवेत तरंगते). त्यामुळे नॉट आउट निर्णय बरोबर वाटला. द्रविड पूर्णपणे क्रीझमधे पोहोचलेला होता पण हवेत होता.
तुम्हाला काय वाटते?
नॉट आउट हा निर्णय योग्य आहे.
नॉट आउट हा निर्णय योग्य आहे. तो क्रिझ मध्ये आला होता ही अट पूर्ण झाली होती.
<< तो क्रिझ मध्ये आला होता ही
<< तो क्रिझ मध्ये आला होता ही अट पूर्ण झाली होती. >> मलाही असंच वाटतं.
आज फलंदाजी करताना सचिन व राहुल यांच्यामधे बराच सुसंवाद होता असं खूप काळानंतर जाणवलं. खरंय ?
पहिल्या दिवसापेक्षां आज फिरकी गोलंदाजी खेळणं खूपच सोपं वाटत होतं असंही जाणवलं. चेंडू फारच संथ येत होता. उद्या पहिल्या सत्रात पडझड होईलसं वाटत नाही व कदाचित ही जोडीच सामना जिंकून
देईल.
सचिनने १५००० धावांचा टप्पा ओलांडला .
काल आपली बॉलिंग स्पिनर्सनी
काल आपली बॉलिंग स्पिनर्सनी सुरू केली होती का?
कारण स्कोरकार्डमध्ये ओझा आणि अश्विनही नावं पहिली दिसत आहेत !
सेहेवागनी बरीच फटकेबाजी केलेली दिसत्ये..
कुठल्याही संघाला कमकुवत समजू
कुठल्याही संघाला कमकुवत समजू नये वगैरे ठीक आहे, पण विंडीजचा हा संघ म्हणजे रिचर्ड्स किंवा वॉल्शच्या काळातला बलाढ्य संघ नव्हे. अशा अर्धवट-बर्या संघांना बेदम चोप देण्याची, निर्दयपणे चेचण्याची सवय आपल्याला कधी लागणार?
<< तो क्रिझ मध्ये आला होता ही
<< तो क्रिझ मध्ये आला होता ही अट पूर्ण झाली होती. >> मलाही असंच वाटतं.>> क्रिकेटमधे NFL चे नियम वापरत असतील तर नाबाद असायला हवा.
मला वाटले at the contact time, in touch with ground असा नियम आहे ना ? म्हणून तर बॅट आपटून उडाली नि फलंदाजाचे शरीर क्रिजच्या बाहेर असेल तर बाद दिले जाते. ते क्रिजच्या आत असेल पण हवेत असेल तर नाबाद असते का ? कोणी तरी नियम वाचून लिहा रे.
b) Notwithstanding (a) above,
b) Notwithstanding (a) above, if a running batsman, having grounded some part of his foot behind the popping crease, continues running further towards the wicket at that end and beyond, then any subsequent total loss of contact with the ground of both his person and his bat during his continuing forward momentum shall not be interpreted as being out of his ground.
मला वाटतं वरील नियम इथे लागू होतो. राहुल क्रीझमधे पहिलं पाऊल टाकून पोचला होता व दुसरं पाऊल टाकताना त्याची बॅट उचलली गेली होती व तो पूर्णपणे हवेत असल्यासारखा वाटला.
[मला आयसीसी नियमावलीत हे नाही शोधता आलं पण लॉर्ड्सच्या वेबसाईटवरील नियमावलीतील हा २९वा नियम ग्राह्य असावा]
मला वाटले at the contact
मला वाटले at the contact time, in touch with ground असा नियम आहे ना ? म्हणून तर बॅट आपटून उडाली नि फलंदाजाचे शरीर क्रिजच्या बाहेर असेल तर बाद दिले जाते. ते क्रिजच्या आत असेल पण हवेत असेल तर नाबाद असते का ? कोणी तरी नियम वाचून लिहा रे.>>>>>
हा नियम नुकताच बदलला आहे... आता at the contact time, च्या ऐवजी before the contact time, in touch with ground असा केला आहे... त्यामुळे डाईव्ह मारल्यावर बॅट एकदा क्रीज पार केली असेल आणि तो पर्यंत बेल्स उडवलेल्या नसतील आणि नंतर बॅट हवेत गेली तरी आऊट दिला जाणार नाही.. झिम - न्यूझीलंड मॅच मध्ये पण कोणीतरी ह्या नवीन नियमामुळे बाद झाला नव्हता...
पग्या हो.. दुसर्या डावात बॉलिंगची सुरुवात स्पीनरनी केली होती.. तो एक चांगला निर्णय ठरला.. आज सकाळी दोन्ही लांबून पळत येऊन बॉल टाकणार्या बॉलरनी ताज्या दमानी जोरदार बॉलिंग केली.. ( मुद्दाम फास्ट बॉलर असा शब्द टाळतोय.. वाटतच नाहीत ते फास्ट बॉलर)
उद्या सकाळी काहीही राडा न होता मॅच जिंका म्हणजे झालं.. आपली लोकं ह्यात फारच प्रसिद्ध आहेत... बार्बाडोस, चेन्नई...
( मुद्दाम फास्ट बॉलर असा शब्द
( मुद्दाम फास्ट बॉलर असा शब्द टाळतोय.. वाटतच नाहीत ते फास्ट बॉलर)>>
आपली लोकं ह्यात फारच प्रसिद्ध आहेत.. >> सही बोला हिम्या..
हिम्या तुझे बरोबर आहे पण ४
हिम्या तुझे बरोबर आहे पण ४ वर्षांपूर्वीच पाक विरूद्ध आपण दिल्लीलाच २०४ मारले होते चेस करताना. सचिन नॉट आउट राहिला होता ५०+
http://www.espncricinfo.com/indvpak/engine/match/297806.html
उद्या उपाहारानंतर तासाभरात
उद्या उपाहारानंतर तासाभरात आपण सामना जिंकणार याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
लॉर्ड्सच्या वेबसाईटवरील
लॉर्ड्सच्या वेबसाईटवरील नियमावलीतील
ते नियम फक्त lords मैदानावरच लागू होतात, नि ते सुद्धा फक्त इंग्लंडच्या फलंदाजांना नाबाद देण्यापुरते.
आमचे अंगण, आमचे नियम - नो सरपट्टी!
<< उद्या सकाळी काहीही राडा न
<< उद्या सकाळी काहीही राडा न होता मॅच जिंका म्हणजे झालं.>> होतंय एकदांच तसंच ! उपहारापर्यंत -२५४ -४. द्रविड [३३], सचिन [७६] व लक्ष्मण [नाबाद-४५]; अनुभव कसोटीला उतरला !!
Pages