Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५१२/४................. एक तर
५१२/४................. एक तर अणिर्नित होइल अथवा आपण दणकुन हार पत्करु.............
राम नाम सत्य है......साई राम सत्य है...........
अरे कमाल आहे, त्यांचे ५०० +
अरे कमाल आहे, त्यांचे ५०० + झाले की आपले राम नाम सत्य वगैरे कसे काय? पिच मध्ये जान नाही, आपणही धावा काढूच की.
>>> मास्तर, काय कसं काय
>>> मास्तर, काय कसं काय वाटतंय आता? अजूनही जिंकण्याची आशा असेल तर सांग हो!
पहिल्या डावात विंडीज फलंदाजांनी अनपेक्षितरित्या उत्तम फलंदाजी केली. पण त्यांचा दुसरा डाव कोसळेल अशी अजूनही (वेडी) आशा आहे.
चला उशिरा का होइना वरुन एरोन
चला उशिरा का होइना वरुन एरोन पेटला..................... पुढच्या डावाला सुरुवातीलाच त्याच्या वर पेट्रोल टाका.....
गेल्या बाबा एकदाच्या ६
गेल्या बाबा एकदाच्या ६ विकेट्स...
मास्तर.. वानखेडे आहे त्यामुळे वेडी आशा बाळगायला हरकत नाही...
केदार आपले लोक महान आहेत त्यामुळे धावा काढतीलच असे सांगता येत नाही..
>> पण त्यांचा दुसरा डाव
>> पण त्यांचा दुसरा डाव कोसळेल अशी अजूनही (वेडी) आशा आहे.
म्हणजे ४ दिवसात नक्की जिंकणार नाही! आता, आपला एकदा झालेला २०० ऑल ऑऊट आणि विंडीजने दोन वेळेला कुटलेल्या ५०० च्या आसपास धावा यावरून ऑस्ट्रेलियात काय होऊ शकेल याचा विचार कर.
ऑस्ट्रेलिया ८ दिवसांपूर्वी पण
ऑस्ट्रेलिया ८ दिवसांपूर्वी पण १०० च्या आत आउट झालेली विसरला वाटतं चिमण.
आपली टीम चांगली आहे, मुख्य म्हणजे टीमचा स्वतःवर विश्वास आहे. इंग्लंडला हारलो, तेवढे एक सोडले तर काय वाईट घडले? तेंव्हाही मी बिग डील, हारलो तर हारलो असे म्हणालो होतो. तुम्हा लोकांचा विश्वास का नाही ते कळत नाही. कधी कधी कमी जास्त होते. शेवटी खेळच आहे, ते होणारच.
>>> आपला एकदा झालेला २०० ऑल
>>> आपला एकदा झालेला २०० ऑल ऑऊट आणि विंडीजने दोन वेळेला कुटलेल्या ५०० च्या आसपास धावा यावरून ऑस्ट्रेलियात काय होऊ शकेल याचा विचार कर.
याचा आणि ऑस्ट्रेलियाच्या दौर्याचा संबंध नाही. कांगारूंची फलंदाजी सध्या पूर्ण फाफललेली आहे. हसी व पाँटिंग थकलेले आहेत. पाँटिंगला हाकला, अशी मागणी होत आहे. हॅडिन, वॉटसन, क्लार्क, ह्यूज अधूनमधून खेळतात. गोलंदाजीत कमिन्स सोडला तर बाकीचे सध्या फारशी चांगली गोलंदाजी करत नाहिय्येत (मिशेल जॉन्सन, सिडल, लॉयन वगैरे). हॉरिट्झ जखमी झाल्यावर जो बाहेर पडला तो अजून परत आलेला नाही. आपण २००८ मध्ये कांगारूंविरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती. यावेळी कसोटी मालिका व एकदिवसीय मालिका पण जिंकणार.
>>यावेळी कसोटी मालिका व
>>यावेळी कसोटी मालिका व एकदिवसीय मालिका पण जिंकणार.
मास्तुरे, with all due respect to you, बरे आहात ना?
तसं झालं तर तुम्हाला हवं तिथे पार्टी.
आपली टीम चांगली आहे, मुख्य
आपली टीम चांगली आहे, मुख्य म्हणजे टीमचा स्वतःवर विश्वास आहे. इंग्लंडला हारलो, तेवढे एक सोडले तर काय वाईट घडले? तेंव्हाही मी बिग डील, हारलो तर हारलो असे म्हणालो होतो. तुम्हा लोकांचा विश्वास का नाही ते कळत नाही. कधी कधी कमी जास्त होते. शेवटी खेळच आहे, ते होणारच. >> +१.
>> ऑस्ट्रेलिया ८ दिवसांपूर्वी
>> ऑस्ट्रेलिया ८ दिवसांपूर्वी पण १०० च्या आत आउट झालेली विसरला वाटतं चिमण.
तेव्हा पलिकडे स्टेन सारखे बॉलर्स होते. आपण २०० केल्या तेव्हा पलिकडे सॅमी आणि रामपॉल सारखे होते. शिवाय आपल्याकडे सचिन द्रविड सारखे दिग्गज!
>> तेंव्हाही मी बिग डील, हारलो तर हारलो असे म्हणालो होतो. तुम्हा लोकांचा विश्वास का नाही ते कळत नाही.
हारण्यापेक्षा द मॅनर इन विच वी लॉस्ट हे मला महत्वाचं वाटतं. आपण एकदाही ३०० च्या वर धावा केल्या नाहीत. आपण दोन वेळेला डावाने हरलो. जेव्हा डावाने नाही हरलो तेव्हा रनांचा फरक १९० च्या खाली नव्हता. आपल्या ८० विकेटी त्यांनी घेतल्या आपण त्यांच्या किती घेतल्या?
आत्ता विंडीजसारखी झ दर्जाची टीम आपल्याला झुंजवते आहे आपल्याच खेळपट्ट्यांवर!
विश्वास उडायला ही कारणं पुरेशी आहेत, मला वाटतं!
>> कांगारूंची फलंदाजी सध्या
>> कांगारूंची फलंदाजी सध्या पूर्ण फाफललेली आहे. हसी व पाँटिंग थकलेले आहेत. पाँटिंगला हाकला, अशी
>> मागणी होत आहे. हॅडिन, वॉटसन, क्लार्क, ह्यूज अधूनमधून खेळतात.
मास्तरा, तरीही प्रश्न असा आहे की त्यांच्या विकेटी कोण काढणार? तेही त्यांच्या खेळपट्ट्यांवर!
२००७-२००८ मध्ये गिलख्रिस्ट,
२००७-२००८ मध्ये गिलख्रिस्ट, हेडन, ब्रेट ली इ. असूनसुद्धा इरफान पठाण, प्रवीण कुमार, इशांत शर्मा, झहीर खान, कुंबळे, हरभजन इं. नी चांगली कामगिरी केली होती. यावेळी कुंबळे व पठाण नाहीत. इशांत व प्रवीण नक्की असतील. हरभजन व झहीरचे सांगता येत नाही. जे आहेत ते गोलंदाज नक्की चांगली कामगिरी करतील असं वाटतंय.
अजून तिसरी कसोटी व वे.इंडीजचा
अजून तिसरी कसोटी व वे.इंडीजचा इथला दौरा संपायचा आहे; कशाला धावायचं आत्तांच ऑस्ट्रेलियाला !
तसं झालं तर तुम्हाला हवं तिथे
तसं झालं तर तुम्हाला हवं तिथे पार्टी.
माझा पण मास्तुरे यांना पाठिंबा आहे. मला पण पार्टी!!
कशाला धावायचं आत्तांच ऑस्ट्रेलियाला !
तेच तर. एकतर अजूनहि हा सामना संपला नाही, नंतर एक दिवशीय सामने आहेत, मग ऑस्ट्रेलिया. दुसरे म्हणजे त्यासाठी स्वतंत्र धागाहि निवडला आहे.
मास्तुरे यांची ऑस्ट्रेलिया बद्दलची मते, त्या धाग्यावर हलवावी, म्हणजे मग आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.
विंडीजसारख्या लिंबूटिंबू
विंडीजसारख्या लिंबूटिंबू संघाबरोबरचे सामने बघायला किंवा त्याबद्दल चर्चा करायला फारशी मजा येत नाही. म्हणून त्याऐवजी कांगारूंबद्दल बोलूया.
त्याऐवजी कांगारूंबद्दल
त्याऐवजी कांगारूंबद्दल बोलूया.
पण इथे नको. वेगळा धागा आहे.
<< विंडीजसारख्या लिंबूटिंबू
<< विंडीजसारख्या लिंबूटिंबू संघाबरोबरचे सामने बघायला किंवा त्याबद्दल चर्चा करायला फारशी मजा येत नाही. >> १९८२च्या विश्वचषकात वे. इंडीजचा भारताबद्दलचा हाच 'अॅटीट्यूड' त्याना खूपच महाग पडला होता; नंतर आपल्या बांगलादेशबद्दलच्या अशाच 'अॅटीट्यूड'मुळे आपण एकदां तोंडघशी पडलो होतो, याची जाण ठेवणं आतां आपल्या हिताचं ठरेल, असं आपलं मला वाटतं. असो.
पहिल्या दिवशीं वानखेडेवर जाऊन 'पाटा' विकेटचं दिवसभर दर्शन घेतलं. विकेटने अपेक्षेप्रमाणे फिरकीला खूपच साथ द्यायला सुरवात केली तरच सामन्यात रंग भरण्याची व निकाल लागण्याची शक्यता दिसते. [ त्यातच, फिल्डींग करतान नेमका बिशूचा पाय मुरगळलाय ! ] नपेक्षां, घरच्या खेळपट्टीवरचं सचिनचं संभाव्य महाशतक हेच एकमेव आकर्षण राहील या सामन्याचं, असं वाटतं !
सॅमी खूपच घाबरट दिसतोय. तब्बल
सॅमी खूपच घाबरट दिसतोय. तब्बल २ दिवस फलंदाजी करून ५७५ धावा हातात असताना, आज तिसर्या दिवशी त्याने डाव घोषित न करता फलंदाजी पुढे चालू ठेवली आणि सकाळच्या सत्रातली महत्त्वाची ३५-४० मिनिटे वाया घालविली. खरं तर कालच ५५० नंतर डाव घोषित करायला पाहिजे होता. एकंदरीत सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सामना न हरण्याचा तो प्रयत्न करतोय असं दिसतंय.
भाऊ, आज गर्दी किती आहे काही
भाऊ, आज गर्दी किती आहे काही कल्पना?
<< आज गर्दी किती आहे काही
<< आज गर्दी किती आहे काही कल्पना? >> नेमका आंकडा माहित नाही पण आत्ताच स्टेडियममधे गर्दी व्हायला सुरवात झालीय असं गावस्कर म्हणाला .
आत्ता राहुलने दोन अस्सल द्रविड छाप 'फ्रंटफुट कव्हरड्राईव्ह' मारून १३००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडला ! ५३च्या सरासरीने १३००० धांवा, ३६ शतकं, ६१ अर्धशतकं !!! त्रिवार सलाम या शैलीदार महान फलंदाजाला !!!
सहमत भाऊ. जवळजवळ सगळे करीयर
सहमत भाऊ. जवळजवळ सगळे करीयर तो ज्या "सगळे प्रेक्षक सचिनची वाट पाहात आहेत" मोडमधे खेळला आहे त्याची आणखी मोठी आवृत्ती आज तेथे असेल. गंभीर आणि द्रविड यांच्या डोक्यात मैदानावर येणारी झुंबड बघून काय येत असेल - नंतर कधीतरी वाचायला मिळेल
<< "सगळे प्रेक्षक सचिनची वाट
<< "सगळे प्रेक्षक सचिनची वाट पाहात आहेत" मोडमधे खेळला आहे >> खरंय. पण शिवलकर बेदीच्याच तोडीचा गोलंदाज असूनही त्याला केवळ बेदीमुळे कसोटी सामन्यात खेळताही आलं नाही, यापेक्षां द्रविडला नशीबाने खूपच साथ दिली असं म्हणून समाधान मानावं आपण !!
भाऊराव, तुमच्या दोन्ही
भाऊराव,
तुमच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत! द्रविड खरोखरच महान खेळाडू (निव्वळ फलंदाजी करणारा नव्हे, तर स्लीपमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि वेळप्रसंगी यष्टीरक्षण करणारा व जरूर भासल्यास सलामीचा फलंदाज पण) आहे.
सगळे प्रेक्षक सचिनची वाट
सगळे प्रेक्षक सचिनची वाट पाहात आहेत" मोडमधे खेळला आहे >> याच कारणामुळेच राहुल बद्दलच आदर आणखी वाढतो.
द्रविड गेला....८२ वर आता
द्रविड गेला....८२ वर आता फक्त सचिन आणि लक्ष्मण वर अवलंबुन आहे
>> आता फक्त सचिन आणि लक्ष्मण
>> आता फक्त सचिन आणि लक्ष्मण वर अवलंबुन आहे
अरे नंतर बॅट्समन आहेत. की तुला वेगळीच मॅच दिसतेय?
आपण धोनी चे आणि अश्विन चे
आपण धोनी चे आणि अश्विन चे पंखा दिसत आहात...... चालले तर स्वागतच आहे.. पण मी रिस्क घेत नाही नविन कुणावर.....
पुढे बॅट्समन आहेत हे समजायला
पुढे बॅट्समन आहेत हे समजायला पंखा कशाला असायला लागतं?
>> पण मी रिस्क घेत नाही नविन कुणावर.....
तू निवडसमितीत नाहीस हे भाग्यच म्हणायचं! नाहीतर लक्ष्मण, सचिन इ. रिटायर झाल्यावर तू क्रिकेट खेळणंच बंद केलं असतंस!
तसे आहे म्हनुनच विराट ला नाही
तसे आहे म्हनुनच विराट ला नाही उतरवला आधी........
Pages