विंडिजचा भारत दौरा - २०११

Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56

नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !

तर काय होणार.

१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?

तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.

(मला वाटतं आपण जिंकू)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ताच एक इंटरेस्टींग बाब टीव्हीवरील समालोचनातून लक्षात आली; सचिनने इतक्या वर्षात घरच्या मैदानावर मात्र फक्त एकच शतक झळकावलं आहे व तेंही १४ वर्षांपूर्वी !!!

सचिन नाबाद ६७. उद्या नक्की महाशतक होणार (उपाहारापूर्वीच). भारताने ५ व्या दिवसाच्या पहिल्या तासापर्यंत फलंदाजी करून ७२५ चा टप्पा ओलांडावा व नंतर उरलेल्या ५ तासात विंडीजचा डाव गुंडाळण्याचा प्रयत्न करावा. वानखेडेवर ५ व्या दिवशी हे अशक्य वाटत नाही.

<< मी तरी सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट बघणे बंद करणार आहे. >> उद्यां सचिनचं महाशतक प्रत्यक्ष वानखेडेवर जाऊन पहायचं आणि पन्नास वर्षांच्या स्टेडियमच्या वार्‍या करायच्या व्रताची सफल सांगता करायची, हा आहे माझा संकल्प !!! Wink

>> भारताने ५ व्या दिवसाच्या पहिल्या तासापर्यंत फलंदाजी करून ७२५ चा टप्पा ओलांडावा
मास्तरा, म्हणजे सुमारे १०५ ओव्हरीत ४४५ धावा कुटायला लागतात ४.२३ च्या रेटने! हे होणार नाही हे मी आत्ताच सांगतो.

>> नंतर उरलेल्या ५ तासात विंडीजचा डाव गुंडाळण्याचा प्रयत्न करावा. वानखेडेवर ५ व्या दिवशी हे अशक्य वाटत नाही
मास्तरा, तसंच प्रत्येकाने किती धावा किती वेळात करायच्या ते पण सांगून ठेव. बिचार्‍यांना अजिबात विचार म्हणून करता येत नाही बघ! Proud

१३००० धावांचा टप्पा ओलांडल्याबद्दल राहुल द्रवीडचे अभिनंदन आणि महाशतकासाठी साहेबांना शुभेच्छा Happy

<< तिकीटे आहेत का तुमच्याकडे आधीच? सकाळी खिडकी कधी उघडते? >> कुणीतरी मोठ्या प्रेमाने
अख्ख्या कसोटीसाठी एक अतिथी पास आणून दिलाय मला; पहिल्या दिवशी जावून आसन बघून आलो. आसनाचा अँगल, उंची व स्टँडमधलं वातावरण सारं 'परफेक्ट' आहे ! उद्यां परफे़क्ट कळस चढावा अशी अपेक्षा आहे !
चर्चगेट स्टेशनच्या मरीन लाईन्सच्या बाजूच्या शेवटच्या गेटमधून बाहेर पडल्यावर [समुद्राच्या बाजूला]मुंबई हॉकी असोसिएशनच्या स्टेडियमच्या तिकीटाच्या खिडक्या आहेत ; तिथंच क्रिकेट कसोटीची 'डेली' तिकीटं विकण्याची व्यवस्था असावी. तिथं पहिल्या दिवशीं त्याकरतां रांगा लागल्या होत्या. खिडक्या उघडण्याची नक्की वेळ मात्र मला माहित नाही.

सगळ्या हायवेंवर रस्ता रोको चालू दिसतो आणि बंद ची आवाहनेही आहेत. आज रात्री ती मागे घेतली गेली तरच बहुधा जाता येइल मुंबईला. त्यात एस टी चालू असेल की नाही माहीत नाही.

नेव्हर माईंड. ऑस्ट्रेलिया मध्ये निघतील. >>> खरंय. आज झाल्या असत्या तर आनंद होताच. पण तिकडे जाऊन केल्या तर अधिक आनंद होईल.

नाही गेलो. काल सगळीकडे रस्ता रोको वगैरे चालू होते, एस टी चालू नसणार वगैरे बघून येथेच थांबायचे ठरवले.

काय मस्त खेळत होता आज सकाळी सचिन! आजच व्हायला हवे होते शतक. "व्ही" मधे शॉट्स मारत असला की हमखास भरपूर रन करणार हे जाणवते. नाहीतर उगाच चीकी रन्स काढत बसला की एलबीडब्ल्यू होतो.

पण आता कोणत्याही परिस्थितीत त्याला वन डे सिरीज खेळवायला पाहिजे. या १०० च्या नादात तो कित्येक इनिंन्ग्स एकदम विचित्र खेळत आहे. आता वन डे मधे ते एकदा पूर्ण करून ऑस्ट्रेलिया दौर्‍यात त्याबद्दल विचार नको, म्हणजे त्याला नॉर्मली खेळता येइल. दुसरे म्हणजे या नादात त्याची १०० च्या आत जाणारी विकेट भारताला महाग पडू शकते. ते जास्त महत्त्वाचे आहे.

त्याला वन डे मधे विश्रांती देतील एखादेवेळेस असे वाचले. आज शतक झाले असते (किंवा दुसर्‍या डावात झाले) तर ते ठीक होते. शेवटच्या वन डे नंतर पहिल्या ऑस्ट्रेलिया टेस्ट मधे दीड महिना आहे. वन डे मधे हे शतक झाले की बरे होईल.

ONE DAY MADHE KARAAYLAA HAVE.... BISHU,RAMPAL,EDWARD LAA JAPDYA SARAKHE DHUVUN KADHAYLAA HAVE... ITAKE DHUVAYLA HAVE KI BISHU CRICKET SODUN. DILE PAHIJE... Happy

TEA PARYANT FAST KHELUN DAAV GHOSHIT KARAAVA....ANI TYANNA LAVKAR GUNDALUN 5 DIVASHI VIJAY MILAVAAVA... Happy

DHINI UGACH OUT ZALA....

अहो उद्यवन तुम्ही कॅप्स मध्ये लिहित नका जाऊ. कॅप्स मध्ये लिहिने म्हणजे रागात लिहिने. वाचणार्‍यालाही त्रास होतो.

अरेरे! सचिन ९४ वर गेला. त्याच्या ९९ व्या शतकानंतर तो कसोटीचे एकूण १२ डाव व एकदिवसीय सामन्याचे ४ डाव खेळला. त्यात ६ वेळा अर्धशतक केले (त्यात २ वेळा ९० च्या पुढे). पण १०० चा भोज्या गाठायला प्रॉब्लेम येतोय. असू दे. काही हरकत नाही. कधीतरी १०० वे शतक होईलच. कालच्या खेळावरून वाटत होते की भारत आज किमान ४ च्या रेटने ३६० धावा करेल. पण लक्ष्मण, सचिन व धोनी लवकर बाद झाल्याने ती शक्यता पूर्णपणे गेलेली आहे. फॉलोऑन टळलेला आहे. पण आता सामना अनिर्णित होणार.

smily deun suddha tumhalaa raag vaatato... Happy
chalaa followon tar taalalaa...ashwin aani kohali piss kaadhat ashe aata... Happy

अश्विन जबरदस्त खेळत आहे................ १०० गाठेल हा बंदा...........
८८ बॉल्स मधे ८० झालेत ४५५/८ शर्मा आताच आउट झाला......... Sad

हुर्रे .......................अश्विन चे शतक...............................................

mily deun suddha tumhalaa raag vaatato... >>> अहो मला नाही, जे कॅप्स मध्ये लिहित असतात ते रागात ते पोस्ट टाकतात असे समजले जाते. मला कशाला राग येईल. फक्त वाचायला अवघड जाते, त्यामुळे वाचत नाही, पण असे होऊ नये म्हणून सांगीतले, तुम्ही कॅप्स मध्ये टाकत असाल तर टाका बुवा. Happy

जय हो अश्विन !

मास्तरा, किती दात घशात गेले आत्तापर्यंत?
तू काही दिवस तुझं मौलिक भविष्य सांगणं बंद कर, नथिंग इज गोईंग युवर वे! Proud

दुसरे म्हणजे या नादात त्याची १०० च्या आत जाणारी विकेट भारताला महाग पडू शकते.
एकदा शतक झाले असते की बरेच दिवस सचिन सचिन करत बसता आले असते! मग त्याला फेरारी, लॅम्बर्घिनी, हजार कोटी रुपये, मलबार हिलवर अंबानी पेक्षा मोठे घर असे काय काय दिले त्याची चर्चा करत बसलो असतो.

मग ऑस्ट्रेलियात सगळ्या सामन्यात हरलो तरी वाईट वाटणार नाही.

भारतीय राजकारणातल्या नवीन पद्धतीनुसार कुणितरी सॅमीला थप्पड मारायला पाहिजे. म्हणजे कसे, अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे सगळे भ्रष्टाचार थांबले तसे सगळ्या भारतीयांच्या सेंच्युर्‍या होतील.

आता बसा हिंदी सिनेमात टायटल्स इतर भाषांत का नाही असल्या गहन प्रश्नांवर चर्चा करत.

Pages