Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारएण्डा... दादाबद्दलच्या
फारएण्डा... दादाबद्दलच्या सगळ्या पोस्टना अनुमोदन.. त्याला जबरदस्त संघ मिळाला नव्हता तर त्याने एक जबरदस्त संघ बनवण्यात सगळ्यात जास्त हातभार लावला आहे...
थॅन्क्स केदार, मनीष. हो
थॅन्क्स केदार, मनीष. हो दादाने संघ जेथपर्यंत आणला तेथून पुढे न्यायला धोनी एकदम योग्य आहे.
दादाची कॉमेंटरी जरा वेगळी वाटते. शास्त्री आणि गावस्कर मधे आता तोच तोच पणा येतो. गावस्कर अजूनही कधीतरी अचून माहिती सांगून जातो (परवा युवराज ला बोलिंग झेपत नव्हती तेव्हा तो काही गोष्टी मस्त सांगत होता) पण एरव्ही इतक्या वर्षांनंतर काय नवीन सांगणार.
दादा बंगालतर्फे
दादा बंगालतर्फे मध्यप्रदेशविरूद्ध रणजी सामना खेळत आहे. त्याची गंमतच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ...........आणि आज तो रणजी सामना खेळत आहे.
फारच आवड आहे हो त्याला क्रिकेटची. मी सुद्धा अजून क्रिकेटकडे लक्ष ठेवून असतो, काही कळत नसले, कॉलेजचे सामने सोडून कधी खेळलो नव्हतो, तरीहि. तेहि खेळलो कारण दहाच लोक घेऊन सामना खेळता येत नाही म्हणून मला नाईलाजाने घ्यावेच लागले. अजूनहि भारतात गेलो की निदान गल्ली क्रिकेटमधे खेळण्याची इच्छा आहे.
त्यामानाने गांगुली किती थोर! देश परदेशात चांगले खेळणे, कप्तानपद, इ. कितीतरी गोष्टी त्याच्या नावावर आहेत.
पण धाग्याच्या मूळ विषयाकडे - (हो, नाहीतर माझे नाव विषय बदलतो म्हणून कानफाट्या पडलेच आहे.)
जरी वेस्ट इंडिजचा संघ दुबळा आहे असे वाटत असले तरी त्यांच्याविरुद्ध जिंकणे बीसी सी आयच्या संघाला आवश्यक आहे. इंग्लंडमधे अक्षरशः तोंडाला काळे फासावे अशी वेळ आली होती. एक तरी सामना जिंकू का असे नैराश्य आले असणार! आता ओझा, आश्विन, यादव यांच्या सारखे नवीन खेळाडू घेऊन सुद्धा जिंकलो हे नक्कीच आत्मविश्वास वाढवणारे ठरेल - नि ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर तर आत्मविश्वास, आक्रमकपणा हा प्रत्यक्ष खेळापेक्षा जास्त महत्वाचा. अशी भीति बसली पाहिजे त्यांना की बीसीसी आयच्या खेळाडूंबद्दल एकहि वाईट शब्द बोलता कामा नये.
vinod kambli cha
vinod kambli cha aarop....star news var....96 wc chi semi bahutek fix hoti.........22 runs madhe 8 wickest gelelya...
भारतीय संघाला बीसीसीआयचा संघ
भारतीय संघाला बीसीसीआयचा संघ म्हणता यावे म्हणून झक्की आपल्या पोस्ट्स टाकत असतात...
zakki....kontya hi desha che
zakki....kontya hi desha che sangh he tya desha che naahi aahe....he lakshat ghyaa...jase team india la bcci cha mhantat tyach pramaane...itar deshachya sanghala pan bola naa.... team india ne kay ghode marale aahe aapale..?
बरे बाबांनो, आता नाही बीसी सी
बरे बाबांनो, आता नाही बीसी सी आय चा संघ म्हणणार. भारताचा संघ म्हणेन. खरे तर इतर संघांतून भारतीय वंशाचे अनेक लोक पूर्वीपासून आहेतच, वेस्ट इंडिजमधे तर खूपच. इंग्लंडमधे खूप. न्यू झिलंडमधे पण. तेंव्हा आता कुणिहि जिंकले तरी जय भारतीय संघ.
(मला वाटत होते, सारखी बीसीसी आयची जाहिरात केली तर शरद पवार १०, १२ कोटी देऊन टाकतील खूष होउन. तसे बाकी मला क्रिकेटमधले काही कळत नाही, पण पैसे आहेत म्हणे, त्यांच्याकडे, त्यातले थोडे मिळाले तर पहावे. पण पहावले नाही तुम्हा लोकांना! असो. :डोमा:)
पुनः परत मूळ विषयाकडे - कधी आहे पुढला सामना? दोन्ही संघातून कुणाला काढणार, कुणाला घेणार? भारतीय संघात काही तरुण नवोदित खेळाडूंना संधि देणार का? द्रवीड, लक्ष्मण यांना ऑस्ट्रेलियाला न्यायचे असेल तर आता विश्रांति दिली पाहिजे, असे मला वाटते. नाहीतर इंग्लंडच्या दौर्याची पुनरावृत्ति. सचिनला सुद्धा, या मुंबईच्या सामन्यात शतक झाल्यावर विश्रांति द्यायला पाहिजे. शिवाय काही वेडे वाकडे खाउ नकोस, म्हणावे. तिकडे जाताना घरूनच शिदोरी घेऊन जा. तिथले लोक त्याच्या अन्नात भेसळ करायला पुढे मागे पहाणार नाहीत!
yuvi laa kaadhalaa.....ROHIT
yuvi laa kaadhalaa.....ROHIT LA GHETALAA....
AATA MUMBAI MADHUN KON KHELNAR..?
यू डे वन, मॅच फिक्सींगचा हा
यू डे वन, मॅच फिक्सींगचा हा धागा नाही! त्याचा वेगळा आहे/ नसेल तर काढणे कृपया.
हायला झक्की, आता इथं तुम्हाला इंग्रजीतल्या पोष्टीबाबत काहीही बोलायचं नाही वाटतं?
AATA MUMBAI MADHUN KON
AATA MUMBAI MADHUN KON KHELNAR..? >> कोहली. तो ODI मधे चांगला खेळलाय त्यामूळे आपल्या T-20 च्या basis वर ODI मधे, ODI च्या basis वर Test मधे घेण्याच्या दिव्य परंपरेला जागून कोहली येईल.
KOHALI....? TO DELHI TARFE
KOHALI....?
TO DELHI TARFE KHELTO....MUMBAI TARFE KA KHELNAR..?
आता युवराजच्या जागी कोहली,
आता युवराजच्या जागी कोहली, ओझाच्या जागी राहूल शर्मा, इशांतच्या जागी वरूण इत्यादी करून घ्या. मुंबईची टेस्ट प्रयोग म्हणुन घ्यायला हरकत नाहीय..
अरे हो तुम्हाला मुंबईची
अरे हो तुम्हाला मुंबईची पडलीये होय. ते लक्षात नाहि आले, मी झक्कींच्या BCCI टिमबद्दल बोलत होतो.
आता युवराजच्या जागी कोहली,
आता युवराजच्या जागी कोहली, ओझाच्या जागी राहूल शर्मा, इशांतच्या जागी वरूण इत्यादी करून घ्या>> खर तर कोहली नि राहाणे दोघांनाही खेळवा.
गंभीर आणि सेहवाग वर आहेत. ते
गंभीर आणि सेहवाग वर आहेत. ते बर्याच दिवसांनी असल्यामुळे व नीट परफॉर्म करत असल्यामुळे त्यांना काढने अनुचित आहेत. पहिल्या ५ जनांना काढने अशक्य. ६ वाच फलंदाज जरा डचमळतोय. परत ७ ला धोनी आहेच. कोहली ६ वर खेळेल का? उगाच तो आहे म्हणून सचिन, द्रविड व लक्ष्मणचे नं बदलायला नको. यादव ऐवजी वरूण आणि अश्विन ऐवजी राहुल शर्मा.
>>सेहवाग, युवराज, कैफ, भज्जी,
>>सेहवाग, युवराज, कैफ, भज्जी, झहीर, इरफान यांना संघात आणणे, काही अपयशांनतर त्यांना आणखी संधी देत राहणे
मग निवड समिती काय करत होती? आणि अपयशानंतर आणखी संधी देत राहण्याबद्दल बोलायचे तर अश्या संधी द्रवीड, गांगुलीलासुद्धा सुरुवातीच्या काळात मिळालेल्या आणि तश्या त्या मिळालायच हव्यात... असे करणारा गांगुली एकटा नव्हता... फक्त्त त्याचा बोलबाला जरा जास्त झाला!
>>२००१ पर्यंत एकही टेस्ट बाहेर न जिंकणारा भारत आपोआप बाहेर जिंकू लागला
त्यात गांगुलीचा कर्णधार म्हणून कितीसा रोल होता?.... त्याने फार अफलातुन रणनिती आखलीये आणि त्यामुळे आपण जिंकलोय अशी कितीशी उदाहरणे आहेत? उलट जॉन राईटच्या चांगल्या कामाची पावती अनेकवेळा गांगुलीच्या नावाने फाडली गेली!
असो.... हे चालूच राहील
डावाने विजय मिळवल्याबद्दल धोनी आणि सार्या भारतीय संघाचे अभिनंदन!
आजचे द्रवीडचे स्लीपमधले दोन्ही कॅचेस मस्त होते... अजुनही त्याचे रिफ्लेक्स बर्यापैकी चांगले आहेत
त्याने फार अफलातुन रणनिती
त्याने फार अफलातुन रणनिती आखलीये आणि त्यामुळे आपण जिंकलोय अशी कितीशी उदाहरणे आहेत?>> मला वाटतेय "ते" त्याच्या attitude बद्दल त्याची भलावण करताहेत, strategic mind ची नाहि. त्या बदलाचे श्रेय त्याला मिळायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे.
पहिल्या ५ जनांना काढने अशक्य. ६ वाच फलंदाज जरा डचमळतोय.>> क्देआर तिसरी असल्यामूळे "त्या" तिघांमधील एक जण बाहेर थांबला तरी चाले.ल.
चला आता तेंडल्याचं महाशतक
चला आता तेंडल्याचं महाशतक साजरं करायच्या तयारीला लागा.
हायला झक्की, आता इथं तुम्हाला
हायला झक्की, आता इथं तुम्हाला इंग्रजीतल्या पोष्टीबाबत काहीही बोलायचं नाही
नाही. आता इंग्रजीत लिहा, उर्दूत लिहा, कुठल्याहि भाषेत लिहा.
इथले लोक म्हणत भाषा इंग्रजी असली तरी विचार महत्वाचे, काय लिहीले आहे ते महत्वाचे.
मला तर वाटते भाषा कुठलीहि वापरली तरी इथल्या कुठल्याच लिखाणात काहीच अर्थ नसतो, मग लिहा ना कुठल्याहि भाषेत.
पुनः विषयाकडे - द्रवीड व लक्ष्मणला विश्रांति द्यावी. झाले त्यांचे खेळून. उगाच फजिती होऊन, किंवा तब्येतीच्या कारणामुळे बाहेर पडावे लागण्यापेक्षा असे बाहेर जाणे बरे. सेहवाग, गंभीर यांना राहू द्या, बाकी शक्यतो कोहली, रहाणे, व नवीन गोलंदाजांपैकी कुणा कुणाला संधि द्यावी. सचिनचे आनखी एक शतक झाल्यावर त्याने पण निवृत्त व्हावे.
झक्की.. सचिनचे आनखी एक शतक
झक्की.. सचिनचे आनखी एक शतक झाल्यावर त्याने पण निवृत्त व्हावे??? > अहो अजून २२ वर्षे खेळणार आहे तो..
उद्यापासून सुरू होणारा ३ रा
उद्यापासून सुरू होणारा ३ रा कसोटी सामनाही भारत ४ थ्या दिवशीच जिंकणार. सचिन शतक करणार का एवढीच उत्सुकता आहे.
आज नेमका विंडीजच्या
आज नेमका विंडीजच्या फलंदाजांना सूर गवसला. चौघांनीही अर्धशतके केली. विंडीजचा संघ अत्यंत बेभरवशाचा आहे. उद्या १-२ जण बाद झाले की उरलेला संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल.
चांगले खेळले विंडीज, आपण टॉस
चांगले खेळले विंडीज, आपण टॉस जिंकायला हवा होता.
विकेट्स पडत नाहीत, मला आधी
विकेट्स पडत नाहीत, मला आधी वाटल्यासारखं इशांतला ब्रेक द्यायला हवा होता व यादवला ठेवायला पाहिजे होते. वरूण अॅरॉन चांगली टाकतोय, पण मला थोडे व्हेरीयेशन कमी वाटतेय, त्या मानाने आज इशांत मस्त टाकतोय (लिहिपर्यंत) पण भेदक वाटत नाही. पिच बघून ५५० + होतील असे वाटतेय. आज तर मस्त उसळी पण मिळतेय. टिकून राहिले की झाले.
आपल्या बॉलिंगची सुंदर पिसे
आपल्या बॉलिंगची सुंदर पिसे लिघालेली आहेत... ६०० वगैरे होतील वेंडीजचे.. आणि तेव्हढे झाले की मॅच वाचवणे ह्यासाठीच खेळावे लागेल..
(No subject)
जय हरी
जय हरी विठ्ठल..........................................
जय राम................... जय श्री राम
हिम्या, यावरून ऑस्ट्रेलियात
हिम्या, यावरून ऑस्ट्रेलियात आपलं काय भरित होईल असं तुला वाटतं?
>> 21/11 उद्यापासून सुरू
>> 21/11 उद्यापासून सुरू होणारा ३ रा कसोटी सामनाही भारत ४ थ्या दिवशीच जिंकणार.
>> 22/11 आज नेमका विंडीजच्या फलंदाजांना सूर गवसला. चौघांनीही अर्धशतके केली. विंडीजचा संघ अत्यंत बेभरवशाचा आहे. उद्या १-२ जण बाद झाले की उरलेला संघ पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल.
मास्तर, काय कसं काय वाटतंय आता? अजूनही जिंकण्याची आशा असेल तर सांग हो!
५००/४ राम बोलो भाई राम बोलो.
५००/४
राम बोलो भाई राम बोलो.
Pages